The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिरो ऑफ सोविएत युनियन किताब पटकावणारे राकेश शर्मा हे एकमेव भारतीय आहेत

by द पोस्टमन टीम
12 January 2026
in विज्ञान तंत्रज्ञान, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


अंतराळयात्रा म्हणजे प्रत्येकाचं लहाणपणी असलेलं स्वप्न. आकाशातील ताऱ्यांच्या जगात रमण्याची मजा काही औरच. पण या ताऱ्यांच्या दुनियेत जाऊन राहण्याचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होईलच असं नाही.

असंच ताऱ्यांच्या दुनियेत जगण्याचं स्वप्न प्रत्यक्षपणे अनुभवणारे एकमेव पुर्णत: भारतीय नागरिकत्व असलेली व्यक्ती म्हणजे श्री. राकेश शर्मा. 

श्री. राकेश शर्मा यांचा जन्म १३ जानेवारी १९४९ रोजी पंजाबमधील पटीयाला येथे झाला. १९८४ साली अंतराळात जाऊन इतिहास रचवणाऱ्या राकेश शर्मानी त्या अगोदर भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून काम केलं आहे.

कल्पना चावला, सुनिता विलियम्स या अंतराळविरांनीही अंतराळात यात्रा केली असली तरी त्यांना अमेरिकी नागरिकत्व असल्यामुळे अजूनही राकेश शर्मा हेच एकमेव भारतीय अंतराळवीर आहेत.

हवाई दलात काम करत असताना आपल्याला आयुष्य बदलून टाकणारी अशी काही संधी मिळेल असा विचार स्वप्नातही केला नव्हता असं ते आजही आश्चर्याने आणि तेवढ्याच अभिमानाने सांगतात.



१९८४ मध्ये रशियन सोवियतच्या सोयुज टी-११ या अंतराळयानात गेलेल्या राकेश शर्मा यांनी अंतराळात ७ दिवस, २१ तास आणि ४० मिनीट वास्तव्य केले. त्यांच्या बरोबर सोवियत युनियनचे आणखी दोन अंतराळवीर युरी मैलिशेव, गेनाडी स्ट्रेकलोव हेसुध्दा होते. ३ एप्रिल १९८४ ते ११ एप्रिल १९८४ या वेळेत राकेश शर्मा अवकाशात राहीले.

या अंतराळयात्रेनंतर राकेश शर्मा यांना अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले. भारत सरकारने त्यांना अशोक चक्र देऊन सन्मानित केले. तसेच सोवियत युनियनने त्यांना ‘हिरो ऑफ़ सोवियत युनियन’ या पुरस्काराने सन्मानित केले. सोवियत युनियनचे विभाजन होण्याअगोदर हा पुरस्कार तेथील सरकार कडून दिला जात असे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर राकेश शर्मा हिरो म्हणून प्रसिद्ध झाले.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

एका वर्तमानपत्रास दिलेल्या मुलाखतीत भारत अंतराळातून कसा दिसतो या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितले की त्यांना हाच प्रश्न तत्कालीन पंतप्रधान मा. इंदिरा गांधी यांनी विचारला होता, ज्याचं उत्तर त्यांनी “सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा” असं दिलं होतं.

सूर्योदय आणि सुर्यास्त या दोन गोष्टी अंतराळातून अनुभवणे त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे असं ते सांगतात. शून्य गुरुत्वाकर्षणामध्ये काढलेले ते ७ दिवस त्यांच्यासाठी एक अद्भुत असा अनुभव होता असं सुद्धा ते आवर्जून सांगतात.

८० च्या दशकाच्या सुरवातीस सोवियत युनियन एक अंतराळयान अवकाशात पाठविण्याची तयारी करत होता. सोवियतकडून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे दोन भारतीय अंतराळवीरांना पाठविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाचा स्वीकार करत इंदिरा गांधी यांनी राकेश शर्मा आणि रविश मल्होत्रा या दोन अंतराळवीरांना पाठविण्याचा निर्णय घेतला. रविश मल्होत्रा यांना अतिरिक्त म्हणून ठेवण्यात आले. त्यांना अंतराळ यात्रेसाठी पाठविण्यात आले नव्हते.

भारतीय अवकाश संशोधनात झालेल्या उत्तुंग प्रगतीबद्दल बोलताना राकेश शर्मा म्हणतात, “अवकाशात माणूस पाठविण्यास आज भारत पूर्णतः तयार आहे. यामध्ये फक्त संशोधक नसून एका सामान्य नागरिकालासुध्दा सहभागी होण्याची संधी मिळणार आहे”.

आज ३ दशकं उलटून गेली असली तरी स्वत:च्या अंतराळ यात्रेसाठी असलेली उत्सुकता पहिल्या भारतीय मानव अंतराळ योजनेच्या बाबतीत ही तशीच राकेश शर्मा यांच्यामध्ये आहे.

देशहितामध्येच स्वहित शोधणाऱ्या मुठभर मंडळींमध्ये राकेश शर्मा यांचं नाव आजही अग्रक्रमाने घेतलं जातं ते त्यांच्या असाधारण आणि अतुलनीय कार्याचा गौरवच आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

गांधीजींच्या अगोदर भारतीय नोटांवर कोणाचे फोटो असायचे..?

Next Post

त्या काळात बॉक्सिंगमध्ये जगभरात फक्त हवा सिंहची हवा होती

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

त्या काळात बॉक्सिंगमध्ये जगभरात फक्त हवा सिंहची हवा होती

दादाभाई नौरोजी ब्रिटीशांच्या कनिष्ठ सभागृहात निवडून जाणारे पहिले आशियाई व्यक्ती होते

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.