The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतात फिजिक्स शिकणारा असा एकही विद्यार्थी नसेल जो ‘या’ माणसाला ओळखत नाही

by द पोस्टमन टीम
24 February 2026
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


शालेय जीवनात ज्या व्यक्तीला आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमात अजिबात रस नव्हता, आज त्या व्यक्तीला भारत सरकारने शिक्षण क्षेत्रातील त्याचा योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं आहे. हरीश चंद्र वर्मा असे या व्यक्तीचे नाव असून संपूर्ण भारतात ते एच. सी. वर्मा म्हणून प्रसिद्ध आहेत.

आजही भारतात फिजिक्सचा अभ्यास करणाऱ्या कुठल्याही विद्यार्थ्याला एच. सी. वर्मा हे नाव माहिती नसेल असा विद्यार्थी शोधून सापडणार नाही.

गेल्या तीन दशकांपासून त्यांनी लिहलेल्या ‘कन्सेप्ट्स ऑफ फिजिक्स’ ग्रंथाने फिजिक्सच्या मूलभूत संकल्पनांची उकल विद्यार्थ्यांना करून देण्यात फार मोठी भूमिका बजावली आहे.

भारतात जेईई आणि नीट या दोन राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांची तयारी करण्यासाठी एच. सी. वर्मा यांच्या पुस्तकाच्या दोन खंडांना पर्याय नसल्याची भावना या परीक्षांमध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी व्यक्त करतात. पण प्राध्यापक एच. सी. वर्मा यांचे कार्य फक्त त्या दोन पुस्तकांपुरते मर्यादित नसून त्यांनी फिजिक्स क्षेत्रात अतुलनीय असे योगदान दिले आहे.

शाळेत शिकत असतांना वर्मा यांना आपल्या शिक्षणव्यवस्थेविषयी मनात प्रचंड राग होता. ते शाळेत कधीच गुणवंत विद्यार्थी नव्हते. बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील शाळेत शिकत असताना त्यांना शाळेविषयी प्रचंड तिरस्कार होता. त्यांना शाळेच्या अभ्यासक्रमात कधीच रस निर्माण झाला नाही.



त्यांचे वडील स्वत: समस्तीपुर गावात पाचव्या इयत्तेपर्यंत शिक्षण देणारी शाळा चालवायचे.

त्यांचा नेहमी प्रयत्न असायचा की आपल्या मुलाने शाळेत जावे, चांगले शिक्षण घ्यावे, आपला वेळ दवडू नये. पण मुलगा कधीच शिकण्याच्या तयारीत नसायचा, त्यांच्या आईने अखेरीस एक शक्कल लढवली आणि त्यांना आवडणाऱ्या पदार्थांच्या बदल्यात त्यांना एक तास आभ्यास करायाल सांगितला. त्यावेळी ते पाचवीत होते.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

अशाने त्यांना पुढे जाऊन अभ्यासाची गोडी निर्माण झाली.

गणित आणि फिजिक्समध्ये त्यांना विशेष रस होता पण इतर विषयांच्या बाबतीत मात्र त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पण अखेरीस मोठ्या मेहनतीने ते पास झाले.

पुढे ते पटण्याच्या विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी रवाना झाले. त्या ठिकाणी असलेल्या अत्यंत मैत्रीपूर्ण आणि मनमिळाऊ अभ्यासक वर्ग त्यांच्या मनाला भावला. त्यांनी त्या विद्यापीठात बीएससीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी आयआयटी कानपूरमध्ये एमएससी केली आणि त्यानंतर पीएचडी केली.

पीएचडी झाल्यानंतर वर्मा हे पाटण्याच्या सायन्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. मुलांना फिजिक्स शिकवणे हे एच. सी. वर्मा यांचे स्वप्न होते आणि ते त्यांनी पूर्ण करून दाखवले आहे.

प्राध्यापक म्हणून आपली कारकीर्द सुरु करण्याआधी त्यांनी दोन अमेरिकन शास्त्रज्ञ डेव्हिड हॅलीडे आणि रेसनिक यांचे फंडामेंटल्स ऑफ फिजिक्स हे पुस्तक अभ्यासले आणि या पुस्तकांनी त्यांच्यावर खूप प्रभाव टाकला. ते आज देखील त्या पुस्तकाला त्यांचे आवडते पुस्तक म्हणतात.

पण त्या पुस्तकातील किचकट भाषेमुळे विद्यार्थ्यांना फिजिक्स शिकवणे त्यांना अत्यंत अवघड जात होते.

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना समजू शकेल अशी भाषा त्या पुस्तकाची नव्हती, त्यामुळे प्रोफेसर एच. सी. वर्मा यांनी स्वतः संशोधन करून आणि फिजिक्स विषयातील मूलभूत संकल्पना आपल्या भाषेत लिहून ‘कन्सेप्ट्स इन फिजिक्स’ या द्विखंडी ग्रंथाचे लेखन केले.

गेल्या तीस वर्षांपासून भारतातील विद्यार्थी फिजिक्स विषयाच्या मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी आणि त्यावरील कोडी सोडविण्यासाठी या पुस्तकाचा आधार घेत आहेत.

ही दोन पुस्तके पूर्ण करायला त्यांना आठ वर्षे खर्च करायला लागली होती. त्यांनी दरम्यानच्या काळात विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा संपूर्ण आढावा घेत त्यांना अनुकूल ठरेल अशाच प्रकारे पुस्तकाची निर्मिती केली होती.

या पुस्तकांच्या आधीची या विषयावरील पुस्तकं ही तितकीशी मनाला भावत नव्हती. त्यांच्यात फक्त तथ्य दिलेले असायचे आणि मूळ गाभ्याचा आभाव असायचा म्हणून त्यांनी हे कार्य हाती घेतलं. मुलांना फिजिक्स विषयात रस निर्माण व्हावा हाच त्यांचा मूळ उद्देश होता.

पुढे १९९४ साली एच. सी. वर्मा हे आयआयटी खरगपूर येथे फिजिक्सचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. इथे काम करत असताना देखील त्यांना अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला, जो पाटण्यात करावा लागला होता.

याठिकाणी देखील त्यांचे विद्यार्थी जे फार वेगवेगळ्या बॅकग्राउंडमधून आले होते आणि भारतातील एक कठीण समजली जाणारी परीक्षा त्यांनी पार केली होती, ते देखील फिजिक्स विषयातील अत्यंत सामान्य अशा संकल्पनांशी अनभिज्ञ होते.

ह्यामुळे प्राध्यापक वर्मा फार आचंबित झाले. ह्या विषयाच्या मुळाशी पोहचल्यावर त्यांना लक्षात आलं की त्यांना अजून मोठा संघर्ष करावा लागणार होता.

मग त्यांनी नववी व दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना डेमो लेक्चर देण्यास सुरुवात केली. त्यांनी अख्खा उत्तर भारत पिंजून काढला आणि त्यांनी तब्बल १००० डेमो लेक्चर्स देशभरात दिले.

ह्या लेक्चर्समुळे देशभरातील विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांनी त्यांना विज्ञानाच्या काही मूलभूत संकल्पना अगदी सहजरित्या समजावून सांगितल्या होत्या.

त्यांनी ग्रामीण भागातील मुलांमध्ये विज्ञानविषयक रुचि निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न म्हणून सायन्स स्कुलचा उपक्रम चालू केला आहे. त्यांनी उत्तर भारतातील प्रामुख्याने बिहार मधील अत्यंत दुर्गम भागात जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांना विज्ञानातील गमतीजमती आन प्रयोग दाखवून त्यांच्या मनात विज्ञान विषयक कुतुहल निर्माण केलं आहे.

आज प्रोफेसर एच. सी. वर्मा शिक्षण सोपान या संस्थेच्या माध्यमातून दुर्गमी भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान साक्षर करण्याचा प्रयत्न करत आहेत.

ज्यावेळी प्रोफेसर एच.सी. वर्मा यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले त्यावेळी त्यांना समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्यात आल्या.

त्यांनी ज्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला स्पर्श आपल्या कार्याच्या माध्यमातून केला आहे, ते आज त्यांना मिळणाऱ्या सन्मानाने प्रचंड खुश आहेत. प्राध्यापक एच. सी. वर्मा यांच्या कार्याला आणि त्यांच्या समर्पण भावाला आमचा मानाचा मुजरा!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: H C VermaH C Verma BooksPhysicsPhysics Teaching
ShareTweet
Previous Post

या भारतीय युवकाने चंद्रावर हरवलेलं ‘विक्रम लँडर’ शोधण्यात यश मिळवलंय!

Next Post

या राजाने नालंदा विद्यापीठाला जगातील सर्वोत्तम विद्यापीठ बनवलं होतं

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

या राजाने नालंदा विद्यापीठाला जगातील सर्वोत्तम विद्यापीठ बनवलं होतं

एका राज्याचा मुख्यमंत्री राजीनामा देऊन बसने घरी गेल्याचा किस्सा वाचा...

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.