The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आई झाल्यावरसुद्धा हॉकी स्टिक हातात घेतली आणि देशाला मेडल मिळवून दिलं

by द पोस्टमन टीम
6 May 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आई, असं म्हणतात आई ही एक मनाची अवस्था आहे. नऊ महिने उदरात वाढणाऱ्या त्या कोवळ्या जीवाच्या लहान-सहान हालचाली टिपणं, खाताना, पिताना, झोपताना, उठता बसता बाळाची काळजी करणं या सगळ्या प्रक्रियेतून आई घडत असते.

प्रसूतीच्या दिवशी बाळासोबत ती घडत जाणारी आईसुद्धा जन्म घेते. स्त्रीचं सर्वांत शक्तिशाली रूप म्हणजे ‘आई ‘. वैज्ञानिकांनी लावलेल्या शोधानुसार एका बाळाला जन्म देणं जगातील सर्वांत वेदनादायक प्रक्रिया आहे. शरीरातील २६ हाडं एकाच वेळी तुटली तर जेवढा त्रास होइल तेवढा त्रास बाळाला जन्म देताना होतो.

असा समज आहे की गरोदरपणानंतर स्त्री कमकुवत होते, शारीरिक दृष्टीने होतंही असेल पण मानसिक आणि भावनिकदृष्ट्या अधिक शक्तिशाली होते.

एवढा त्रास सहन केल्यानंतर कुठल्याही परिस्थितीवर मात करण्याची ताकद येते, मग ती शारिरिक बदलांना देखील मागे टाकून प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर तिला हवं ते प्राप्त करु शकते. मातृत्व तिच्यासाठी ऊर्जा आहे, ताकद आहे. याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे प्रसिध्द बॉक्सर मेरी कॉम! जुळ्यांना जन्म दिल्यावर त्या पुन्हा एकदा रिंगणात उतरल्या आणि चौथ्यांदा विश्व विजेता पदाचा मान पटकावला.



आई झाल्यानंतरचा त्यांचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. अत्यंत कठोर ट्रेनिंग, कसरतीनंतर त्या खेळू शकल्या. मेरी कोम सर्वांना परिचित आहेत.

पण नऊ वर्षांपूर्वी असाच पराक्रम एका हॉकीपटूने केला, जो प्रकाशझोतात येवू शकला नाही, ती म्हणजे प्रितम राणी सीवाच. तिच्या मुलालाच्या जन्मानंतर तिने पून्हा एकदा हातात हॉकी स्टिक धरली व आपल्या टीमला सुवर्णपदक मिळवून दिलं.

तिचा जन्म हरियाणाच्या गुरूग्राम जिल्ह्यातील झारसा या गावांत एक शेतकरी कुटुंबात झाला. तिचा संघर्ष इथूनच सुरू झाला होता.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

आर्थिक परिस्थितीशी सामना तर करायचाच होता, शिवाय मुलींनी लग्न करून घर सांभाळाव असं मानणाऱ्या समाजाला आपलं अस्तित्व पटवून द्यायचं होतं. सर्वांच्या विरोधात जाऊन आपली आवड जोपासण्यासाठी तिने हॉकीची रीतसर ट्रेनिंग सुरू केली.

सुरुवातीपासूनच खेळावर तिचं प्रभुत्व होतं. वयाच्या चौदाव्या वर्षीच राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या हॉकी स्पर्धेत तिची निवड झाली आणि इथूनच तिचा प्रवास सुरू झाला.

भारतीय महिला हॉकी संघात तिला सेंटर फॉरवर्ड म्हणून खेळायची संधी मिळाली. आशिया खेळामध्ये तिच्या खेळासाठी तिला अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आलं. अर्जुन पुरस्कार मिळवणारी ती पहिली महिला हॉकीपटू ठरली.

यशाची पायरी चढताना ‘ती आई होणार आहे’ हीं गोड बातमी तिला समजली. आपल्या करिअरचा सगळा विचार सोडून ती तिच्या बाळाच्या संगोपनात व्यस्त झाली.

मुलाच्या जन्मानंतर कुठेतरी मनात दबून असलेलं आपल्या खेळाबद्दलचं तिचं प्रेम तिला स्वस्थ बसू देत नव्हतं. तिने पुन्हा एकदा ट्रेनिंग सुरू केली. पण या वेळी प्रसंग वेगळा होता. गरोदरपणानंतर तिचं शरीर तिला कितपत साथ देईल याची कल्पना तिला देखील नव्हती. पण तरीही मोठ्या धाडसाने तिने घराच्या मागच्या अंगणात सराव सुरू केला. घर, मुलगा आणि ट्रेनिंग अशी तारेवरची कसरत सुरू होती.

अखेर या मेहनतीला फळ मिळालं. २०००  साली आंतर रेल्वे स्पर्धेत खेळण्याची संधी तिला मिळाली. तिचा आत्मविश्वास देखील वाढला. पुढे ती राष्ट्रस्तरीय स्पर्धेत देखील खेळली. या खेळात तिने नऊ गोल आपल्या नावावर केले.

तिच्यावर उठणाऱ्या प्रश्नांवर कायमचा आळा बसला व तिला भारतीय महिला संघात खेळण्याची संधी मिळाली. २००२ साली मँचेस्टर, इंग्लंड येथे संपन्न झालेल्या कॉमन वेल्थ गेम्समध्ये याच भारतीय महिला हॉकी संघाने जबरदस्त कामगिरी केली व भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं.

निवड होण्यापासून ते कॉमन वेल्थ गेम्सपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. समिती अंतर्गत असणाऱ्या राजकारणाचे चटके इतर खेळाडूंप्रमाणे तिला देखील सहन करावे लागले . कॉमनवेल्थ गेम्सनंतर तिने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला व सोनीपत येथें स्वतःची ‘प्रितम राणी हॉकी अकादमी’ सुरू केली. तिच्यासारख्या अनेक मुलींचे स्वप्न साकार करण्यासाठी तिने ही अकादमी सुरू केली.

२००८ साली पुन्हा एकदा तिला भारतीय संघात अनुभवी खेळाडू म्हणून खेळण्यासाठी बोलावलं गेलं. ही टीम फार दूरवर नाही जाऊ  शकली. इथून पुन्हा ती आपल्या अकादमीकडे वळली.

बाळंतपणानंतर हॉकी, जिथे प्रचंड शारीरिक ताकदीची गरज असते, अशा खेळात पदार्पण करून सर्व स्त्रियांसाठी एक आदर्श पुढे  ठेवला. हॉकी आपला राष्ट्रीय खेळ जरी असला तरी इतर खेळांच्या तुलनेत थोडा दुर्लक्षित आहे.

पुरुष संघातील खेळाडूंची नावं आपल्याला क्वचितच महितही असतील, त्यात महिला हॉकी संघातील खेळाडूंची नावं प्रकाश झोतापासून फार लांब आहेत. प्रितम वयाच्या ४५ व्या वर्षी आपल्यापरीने ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत आहे.

तिच्यासारख्या सर्व महिलांना समाजात सन्मान आणि ओळख मिळायलाच हवी. आज तिच्याकडून प्रेरणा घेऊन, तिच्या पावलावर पाऊल टाकून अनेक मुली हॉकी असो किंवा इतर कुठल्याहीं खेळात उत्तम कामगिरी बजावत आहेत.

प्रितम सीवाच, पी. व्ही सिंधू, हिमा दास, साक्षी मलिक, मेरी कॉम खेळाडू महिला सर्वांसाठी आदर्श आहेत. खेळात वाढणारा भारतीय महिलांचा सहभाग देशासाठी अभिमानाची बाब आहे. अशा अनेक प्रितम भारतात जन्म घेत आहेत.

गरज आहे ती फक्त त्यांना ओळखून, त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना मंच उपलब्ध करून देण्याची.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

हि*टल*रच्या घराच्या जागी आता पोलीस स्टेशन उभं राहिलं आहे

Next Post

भाजपच्या मर्जीतला म्हणून हिणवला गेलेला एटर्नी जनरल !

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post
mukul rohotagi featured

भाजपच्या मर्जीतला म्हणून हिणवला गेलेला एटर्नी जनरल !

मुस्लीम महिलांच्या हक्काचा लढा : तीन तलाक बंदी

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.