आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेले न*रसं*हारी अणु*स्फो*ट जग कधीही विसरणार नाही. आपण सगळेच अणु*बॉ*म्बने होणाऱ्या नुकसानाबद्दल आणि विना*शाबद्दल जाणतोच. या अणु*स्फो*टासाठी इतिहासाने अनेक गोष्टींना कारणीभूत मानले. अणु*स्फो*टाकडे पाहण्याचे जगभरात अनेक पैलू आहेत. अनेक विचारधारांची आणि लोकांची विविध मत-मतांतरे आहेत. अशाच एका भूमिकेचा मागोवा घेणारा प्रस्तुत लेख..
जो कोणत्याही प्रकारच्या यु*द्धाची आज्ञा देतो त्याच्यावर प्रामुख्याने इतिहास लक्ष केंद्रित करतो. पण ज्याच्या हाती बंदुकीचे ‘ट्रिगर’ आहे त्याच्याकडे मात्र इतिहास पूर्णतः दुर्लक्ष करतो असे आजपर्यंत दिसून आले आहे. आज्ञा ही फक्त एक इच्छा आहे, अनेक वेळा ती राजकीय इच्छासुद्धा असू शकते. त्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे आज्ञेचं पालन करणारा अधीनस्थच (सबॉर्डिनेट) असतो.
उदाहरणार्थ, सुमारे दोनशे वर्षं ब्रिटिशांनी आपल्या अधिपत्याखाली हा सर्वार्थाने विशाल असलेला भारत देश ठेवला. पण आपल्याच क्रांतीकारकांना आणि आपल्याच स्वातंत्र्यसैनिकांना प्रत्यक्षात फासावर चढवणारे किंवा गोळ्या झाडणारे ब्रिटिश होते काय? गोळ्या झाडण्याचे किंवा फासावर चढवण्याचे आदेश गोऱ्या साहेबाने दिले असतील पण जर त्या भारतीयांमध्ये तत्क्षणी बंडाची भावना निर्माण झाली असती तर काय झालं असतं हे १८५७ साली झालेल्या स्वातंत्र्ययु*ध्दाने तीव्रतेने आपल्याला दाखवून दिले.
त्याचप्रमाणे अनेक मोठ्या योजनांमध्ये हे अधीनस्थं (सबॉर्डिनेटस्) अतिशय क्षुल्लक वाटू शकतात, पण कोणत्याही योजनेचा, व्यवसायाचा आणि राष्ट्राच्या शासनव्यवस्थेचाही ते महत्त्वपूर्ण भाग असतात. कारण कितीही भव्य इमारत ही शेवटी लहान लहान विटांच्या आणि तशाच अनेक लहान लहान लोखंडी सळयांच्या मदतीनेच उभी असते.
जर सबॉर्डिनेटस्-नी एका महत्त्वाच्या क्षणी आज्ञा अंमलात आणण्यास नकार दिला, तर आज्ञा करणाऱ्या माणसाच्या विचारसरणीचा पर्वत अगदी वाळूने बनलेल्या किल्ल्याप्रमाणे खाली कोसळतो. आज्ञेची विशालता जितकी व्यापक तितकी आज्ञा अंमलात आणण्यासाठी एक संकल्पही आवश्यक असतो. म्हणूनच सैन्यामध्ये फक्त आज्ञा नसतात तर सैनिकांचे आत्मबल वाढवण्यासाठी त्यांना राष्ट्र आणि राष्ट्राच्या अस्मितेचे धडे दिले जातात. पण एखाद्या देशावर अ*ण्वस्त्र टाकण्यासारखा आदेश अंमलात आणणे कदाचित कठीण असू शकते!
हिरोशिमा येथे ‘लिटि*ल* बॉ*य’च्या साहाय्याने बॉ*म्बिंग करणाऱ्या पॉल टिब्बेट्स नावाच्या वैमानिकाचा जन्म २३ फेब्रुवारी १९१५ रोजी पॉल टिब्बेट्स सीनियर आणि एनोला टिब्बेट्स यांच्या पोटी क्विन्सी याठिकाणी झाला. त्याला लहानपणापासूनच विमानांमध्ये खूप रस होता आणि तो फक्त १२ वर्षांचा असताना त्याने पहिल्यांदा विमानात उड्डाण करण्याचा अनुभव घेतला होता. हा अनुभव जीवन बदलणारा होता.
१९३३ साली त्याने ‘वेस्टर्न मिलिटरी अकादमी’मधून पदवी प्राप्त केली. पदवीनंतर सर्जनची कारकीर्द करण्याचा त्याचा हेतू होता. तरी कदाचित आवड म्हणून फ्लोरिडा विद्यापीठात शिकत असताना त्याने मियामीमध्ये खाजगी उड्डयन प्रशिक्षण केंद्रात उड्डाणाचे धडे घेतले. पुढे त्याचा वैद्यकीय प्रवास सुरू करण्यासाठी त्याने सिनसिनाटी विद्यापीठात बदली घेतली. पण त्याने पुन्हा आपले मत बदलले आणि दीड वर्षानंतर युनायटेड स्टेट्स आर्मी एअर कॉर्प्समध्ये भरती होण्यासाठी तो बाहेर पडला. अखेर आपले पायलट होण्याचे स्वप्न तो विसरू शकला नाही.
पॉलचे त्याच्या साथीदारांना, समवयस्कांना होणारे तीन प्रमुख फायदे होते. तो लष्करी शाळेत गेला होता, तो सर्जनचे शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयात गेला होता आणि त्याहूनही अधिक म्हणजे त्याला उड्डाणाचा पूर्वीचा अनुभवही होता. तो सहजपणे विमानचालन कार्यक्रमासाठी पात्र झाला, तो एक उत्कृष्ट पायलट असल्याचे त्याने सिद्ध केले.
त्याची पहिली नियुक्ती फोर्ट बेनिंग येथे झाली. तिथे त्याने ‘ब्रिगेडियर जनरल जॉर्ज पॅटन’साठी पर्सनल पायलट म्हणून काम केले. त्याला पुढच्या दोन वर्षांतच ‘कॅप्टन’ पदावर बढती मिळाली आणि येथूनच ‘ब*म्बा*र्डमेंट एक्सपर्ट’ म्हणून त्याची कारकीर्द सुरू झाली. ‘ट्वेन्टीनाइंथ ब*म्बा*र्डमेंट ग्रुप’मध्ये सामील झाल्यानंतर त्याने ‘बोईंग-बी-१७’ या महाकाय विमानावर प्रशिक्षण सुरु केले.
पर्ल हार्बरवरील ह*ल्ल्यानंतर युरोपमधील अमेरिकेच्या पहिल्या ह*ल्ल्यादरम्यान त्याने ‘बुचर शॉप’ नावाच्या लढाऊ विमानाचे उड्डाण आणि पूर्ण नेतृत्व केले. त्याचप्रमाणे ना*झीव्याप्त फ्रांसमधील औद्योगिक सुविधा आणि रेल्वे ट्रॅक नष्ट करण्यासाठी त्याने १०० लढाऊ विमानांचे नेतृत्व केले. पण वास्तविक लक्ष्य नष्ट करण्यापेक्षा विमानाने सर्वांत जास्त नागरिकच मारले. असं असलं तरीही शत्रूच्या प्रदेशात खोलवर जाणे हा एक पराक्रमच होता. कारण ना*झी अँटी एअरक्राफ्ट आर्टिलरीने मित्र राष्ट्राची ३३ विमाने पाडून त्यांचे प्रचंड नुकसान केले होते.
एखाद्या मोहिमेत निष्पाप नागरिक मारले गेले अशी पॉलची ही पहिलीच हवाई मोहीम होती. यामुळे त्याला आपल्या नैतिकतेवरच संशय येऊ लागला. कारण जे नागरिक मरण पावले त्यांचा या यु*द्धाशी काही संबंधही नव्हता.
जपानशी यु*द्ध सुरू झाल्यावर, पॉलला नवीन बोईंग विमानावर काम करण्यास सांगितले गेले. काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच, पॉलच्या जीवनाचा पुढील आणि कदाचित सर्वात महत्वाचा टप्पा सुरू झाला. तो टप्पा म्हणजे ‘प्रोजेक्ट मॅन*हॅटन’. मॅन*हॅटन प्रोजेक्ट म्हणजेच अमेरिकेने पहिली अ*ण्वस्त्रे तयार करण्यासाठी केलेला संशोधन प्रकल्प. सिव्हिल इंजिनीअर्स आणि प्लंबरच्या वेशात वैज्ञानिक गुप्त आ*ण्विक बॉ*म्बवर काम करत होते अशा गुप्त तळावर त्याने काम केले.
अमेरिकेच्या बाजूने यु*द्धाचे पारडे फिरवणारे एकमेव शस्त्र तयार झाले. अ*णुबॉ*म्ब. जपान वर अ*ण्वस्त्रांचा प्रयोग करायचा हे निश्चित झाल्यावर टिबेट्सने आपले लढाऊ विमान ‘एनोला गे तिनियन’ ते ‘हिरोशिमा’पर्यंत २००० मैलांच्या पुढे नेले. विमानात अ*णुबॉ*म्बचे कोड नेम होते “लि*टिल बॉ*य”!
या मोहिमेबद्दल पॉल २००५ साली एका मुलाखतीत सांगतो, “माझी या मोहिमेसाठी नेमणूक झाली तेव्हा मला ही एक भावनिक गोष्ट असणार हे माहित होते. आम्हाला भावना होत्या, पण त्या बाजूला ठेवाव्या लागल्या. बॉ*म्ब जिथे पडणार तिथपासून सगळीकडे माणसं मरणार आहेत हे आम्हाला माहित होते. पण माझा रस शक्य तितके चांगले काम करणे याच्यात होता, जेणेकरून शक्य तितक्या लवकर (अमेरिकन) ह*त्या थांबवू शकू.”
आपल्या वरिष्ठांची आज्ञा पाळण्यासाठी पॉलने हा नैतिक भार स्वतःच्या खांद्यावर उचलणे हे कितपत योग्य होते?
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










