The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काय आहे तामिळनाडूमधील मंदिरावर कोरलेल्या सायकलस्वाराच्या व्हायरल फोटोमागचं सत्य?

by द पोस्टमन टीम
5 April 2025
in विश्लेषण, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


जिओने इंटरनेट स्वस्त केल्यापासून आणि स्मार्टफोनच्या किमती कमी झाल्यापासून जवळपास प्रत्येकाच्या खिशात स्मार्टफोन सापडतो. दारावर येणाऱ्या भाजीवाल्यापासून ते एखाद्या मोठ्या कंपनीच्या मालकापर्यंत सगळेच आज सोशल मीडियावर “ॲक्टिव्ह” असतात. एखाद्या ग्रंथालयापेक्षा जास्ती “ज्ञानाचा साठा” आज सोशल मीडियावर सापडतो.

दिसला फोटो टाक फेसबुकवर. कोणीतरी काहीतरी मेसेज केला त्याची शहानिशा न करता दे पुढे पाठवून. सुरुवातीला हा मेसेज १० लोकांना पाठवा नाही तर तुमच्यासोबत चांगलं काही घडणार नाही असे मेसेज यायचे, मग अचानक सगळे “सुविचार” बनले आणि इनबॉक्स सुविचारांनी भरून वाहू लागला.

गेल्या काही काळापासून सगळे तज्ज्ञ झालेत. सगळ्याच बाबतीत. मग आरोग्य असूदे किंवा राजकारण असूदे नाहीतर मग अजून काही. व्हाट्सॲपचा इनबॉक्स असाच ‘तुम्हाला हे माहिती आहे का?’ वाल्या ज्ञानात भर पडणाऱ्या मेसेजेसनी भरलेला दिसतो. यातले अर्ध्याहून अधिक मेसेज अर्थातच फेक असतात. कोणीतरी अर्धवट माहितीतून काहीतरी खरडतो आणि ते पुढे सरकत राहतं. या फेक मेसेजेसच्या बातम्या बनणे हे आजकाल नेहमीचं झालंय.

असाच एक मेसेज मध्यतंरी खूप ‘व्हायरल’ झाला होता. फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील “हिंदुत्व से बढकर कोई धर्म नही, गौ गीता और गायत्री” या पेजवर एक पोस्ट पडली होती. त्यात एका माणसाचं शिलाचित्र होतं. हा माणूस सायकलवर बसून कुठेतरी जातो आहे अशाप्रकारचं ते चित्र होतं. त्याबरोबर एक मेसेज लिहिला होता. तो असा-



“तामिळनाडूमध्ये पंचवर्णस्वामी मंदिर आहे. त्याच मंदिरातील ही दोन हजार वर्षांपूर्वीची मूर्ती आहे असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. असे असूनही सायकलचा शोध लावल्याचा मान मात्र दुसऱ्याच कोणाला तरी दिला जातो.
भारताच्या या सोनेरी इतिहासाला विसरून केवळ भिकारी आणि मांत्रिकांचा देश असे चित्र उभे करण्याचे पाप कोणी केले???”

या फोटोमध्ये एक माणूस सायकलवर बसला आहे त्याच्या आजूबाजूला फुलं आहेत, डोक्यावर टोपी आणि कानाच्या मागे फुल असं भिंतीवर कोरलेलं आढळून येतं. यानंतर ही पोस्ट अनेक ठिकाणी शेअर झाली. कित्येक लोकांनी याचं समर्थन केलं आणि आपली संस्कृती मोठीच होती अशा आशयाचे बोलणे सुरू झाले. पण यातल्या एकानेही ही माहिती कितपत खरी आहे याची खात्री करून घेतली नाही.

याची पडताळणी केली इंडिया टुडे या वृत्तसंस्थेच्या ‘अँटी फेक न्युज वॉर रूम’ (AFWA) या विभागाने. ही पोस्ट जेव्हा व्हायरल होऊ लागली तेव्हा त्यांनी याची सत्यता तपासली. त्यात त्यांना आढळून आलं की हा फोटो तामिळनाडूचा नाही. खरंतर हा फोटो भारतातील नाहीच. इंडोनेशियामधील एका मंदिरातील हा फोटो आहे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

आणि राहिला मुद्दा सायकलचा तर सायकलचा शोध जर्मनीमध्ये १८१७ साली लागल्याचे पुरावे उपलब्ध आहेत.

या AFWA ने जेव्हा याचा शोध घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हे कोरीवकाम बाली, इंडोनेशिया येथील Pura Meduwe Korang या मंदिरातील आहे. हा फोटो तुम्हाला tripsavy आणि bali local guide या वेबसाईटवर देखील सापडेल.

Lonely planet च्या म्हणण्यानुसार हे शिलाचित्र १९०४ साली काढलेलं असून एका डच माणसाचं आहे जो बालीला सायकलवरून भटकंती करत होता. 

या पोस्टमध्ये उल्लेख केलेलं पंचवर्णस्वामी हे शिवमंदिर तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथील आहे. शोध घेत असताना the hindu या वृत्तपत्राच्या एका लेखात या मंदिरात असलेल्या सायकलवरील माणसाच्या शिलालेखाचा उल्लेख आढळतो. पण त्यातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हे शिलाचित्र साधारण १९२० च्या दरम्यान मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या वेळी कोरण्यात आलेले आहे.

आता राहिला प्रश्न सायकलचा शोध कोणी लावला याचा तर हा शोध Barl Karl von Drais यांनी १८१७ साली जर्मनी येथे लावला. आणि याला पुष्टी देणारे पुरावे देखील उपलब्ध आहेत.

तात्पर्य हे शिलाचित्र भारतातील मंदिरातील नाही आणि सायकलचा शोधही जर्मनमध्ये लागला आहे.

इंटरनेटने जग जवळ आणलं, आपल्यासाठी ज्ञानाचं भांडार खुलं केलं हे जरी खरं असलं तरी पण त्याचा योग्य वापर करून खरी माहिती लोकांपर्यंत पोहचवणे मात्र आपल्याच हातात आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

चीनला कोंडीत पकडण्याचा पाकिस्तानने बनवलेला प्लॅन नेहरूंनी धुडकावून लावला होता.

Next Post

या जवानाच्या बुद्धीचातुर्यामुळे लडाख चीनच्या घशात जाण्यापासून वाचला होता

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

या जवानाच्या बुद्धीचातुर्यामुळे लडाख चीनच्या घशात जाण्यापासून वाचला होता

पावसाळ्यात कोरोना संक्रमणाचा धोका वाढेल काय? पहा काय सांगतात वैज्ञानिक

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.