The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हि*टल*रने इंग्लंडच्या माजी राजाचं अपहरण करायचा प्लॅन केला होता..!

by द पोस्टमन टीम
15 September 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


ऑपेरेशन विली हे एका जर्मन मोहिमेचं संकेतात्मक नाव होतं. ना*झी जर्मनीसाठी हि*टल*रच्या आज्ञेवरून स्कट्झफ़सेल या जर्मन निमलष्करी दलाद्वारे चालवली गेलेली हि अयशस्वी ठरलेली मोहीम. पूर्वी ब्रिटनचा राजा असलेला एडवर्ड ६ याला स्पेनमधून पकडण्यासाठी होती.

दुसऱ्या महायु*द्धादरम्यान ब्रिटनचा राजा असलेला किंग जॉर्ज – ६ नंतर त्याचा मोठा भाऊ एडवर्ड – ६ जानेवारी १९३६ रोजी गादीवर आला. एडवर्ड-६ हा ब्रिटिश इतिहासातील सर्वांत कमी काळ राज्यावर असलेला राजा. या राजाचा कार्यकाळ फक्त ३२६ दिवस इतकाच होता.

काही लोकांच्या मते त्याच्या काळात मोठा संविधानैक पेच निर्माण झाला होता. अमेरिकन नागरिक आणि उच्चभ्रू समाजात प्रसिद्ध असलेली वॅलिस सिम्प्सन आणि एडवर्ड यांना लग्न करायचं होतं, पण वॅलिसचा दोन वेळा घटस्फोट झाला असल्याने इंग्लडच्या चर्चने दोघांच्या विवाहाला प्रतिबंध केला. एडवर्डने घेतलेल्या एक वर्षाच्या आतील सिंहासन त्यागाच्या निर्णयाने अनेकांना स्तब्ध केलं. या नंतर राजा पदावरून उतरलेल्या एडवर्ड आणि सिम्प्सन यांचा विवाहसोहळा फ्रांसमध्ये पार पडला. तो पर्यंत एडवर्डला विंडसरचा सरदार किंवा ड्यूक ऑफ विंडसर म्हणून घोषित करण्यात आलं होतं.

याच काळात या सरदार दाम्पत्याने ऑक्टॉबर १९३७ मध्ये हि*टल*रचे वैयक्तिक पाहुणे ना*झी जर्मनीमध्ये दौरा केला. यामुळे या सरदार दाम्पत्याला आपल्या देश आणि राजकीय कुटुंबापेक्षा जर्मनी जवळची वाटते कि काय अशा अफवा उडू लागल्या. जर्मन्सना याबद्दल कल्पना होतीच, आणि ब्रिटन-जर्मनीमध्ये यु*द्ध झाल्यानंतर जर्मन-नियंत्रित ब्रिटनवर ताबा ठेवण्यासाठी या विंडसरच्या सरदाराचा आपल्याला फायदा होईल हे गृहीत धरूनच ते चालले होते.

पण हे सर्व घडवून आणण्यासाठी या सरदार दाम्पत्याला ब्रिटिश सिक्रेट सर्विस या ब्रिटनच्या गुप्तहेर संघटनेपासून लांब ठेवणं महत्त्वाचं होतं. सप्टेंबर १९३९ मध्ये दुसरं महायु*द्ध सुरु झाल्यानंतर विंडसरचा ड्यूक हा फ्रेंच उच्च अधिकाऱ्यांबरोबर ब्रिटिश सैन्य मोहिमेचा सम्पर्क अधिकारी बनला.



खरंतर तो ब्रिटिश मिलिटरी इंटेलिजन्सचा गुप्तहेर म्हणून काम करत होता, कारण त्यांना फ्रेंच सैन्याच्या सुरक्षाव्यवस्थेबद्दल माहिती हवी होती, विशेषतः मॅजिनोट रेषेजवळील माहिती. त्याने पुरवलेली माहिती परिपूर्ण होती, पण ब्रिटिश सैन्यानं त्या माहितीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं, कारण फ्रेंच सैन्याची तयारीच नव्हती.

सन १९४० मध्ये जर्मनीकरवी फ्रांसचा पाडाव झाल्यानंतर त्यांच्यापासून सुटका करवून घेण्यासाठी विंडसर दाम्पत्याने स्पेनमधील मॅड्रिडमध्ये तळ ठोकला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

जून २३ रोजी जर्मनीचा राजदूत असलेल्या एबेरहार्ड व्हॉन स्टोहरेर याने ना*झी पररराष्ट्र मंत्री जोचिम व्हॉन रिबेन्ट्रॉप ना*झीला टेलिग्राम केला – स्पॅनिश परराष्ट्र मंत्री कर्नल जुआन एटीएन्झा याने लिस्बनच्या वाटेवर असलेल्या विंडसरच्या ड्यूकबरोबर कसा व्यवहार करावा, त्याला ताब्यात घ्यावं का? अशी विचारणा केली. यावर रिबेन्ट्रॉपने स्टोह्रेरला या सरदार दाम्पत्याला दोन महिने ताब्यात ठेवण्याचा अँटिझियाला सल्ला देण्याचा निर्देश दिला, पण हा सल्ला स्टोहरेरने दिलाय हे कळू न देण्याचे निर्देशही त्याने दिले. त्याप्रमाणे पावलं उचलली गेली.

२ जुलै रोजी स्पॅनिश परराष्ट्र मंत्र्याने ना*झी परराष्ट्र मंत्र्याला तार केली, ज्यात त्याने ड्यूकला भेटल्याचं सांगितलं आहे आणि ड्यूकच्या मनातील त्याच्या राजकीय कुटुंबाबद्दलचं वैमनस्यही स्पष्ट केलं, हे वैमनस्य त्याच्या पत्नीला दिल्या गेलेल्या चुकीच्या वागणुकीमुळे तयार झाल्याचेही तो सांगतो त्याच प्रमाणे तत्कालीन प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल आणि त्याच्या यु*द्ध नीतींवरही ड्यूकने आरोप केल्याचं यातून दिसतं.

काही काळातच विंडसरचा ड्यूक आणि त्याची पत्नी लिस्बन कडे रवाना झाले, पण यु*द्धात व्यस्त असलेल्या ब्रिटनला कसं तरी विंडसरच्या ड्यूकच्या या असमंजस वक्तव्यांबद्दल कळालं, तेव्हा चर्चिलने लगेचच ब्रिटनमध्ये परत येण्याचा ड्यूकला टेलिग्राम केला. त्या वेळी विंडसरचा ड्यूक हा मेजर जनरल या सैनिकी पदावर कार्यरत असल्याने जोपर्यंत सरकारी आज्ञा पाळली जात नाही तो पर्यंत तो कोर्ट-मार्शलसाठी पात्र आहे असा आदेश चर्चिलने काढला.

या नंतर दुसरा टेलिग्राम आला, ज्या मध्ये एडवर्डला बहामासचा राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं, असं असलं तरी विंडसर दाम्पत्य रिकार्डो डो एस्पिरिटो सान्तो सिल्वाच्या बंगल्यावर सुमारे १ महिना राहिले, रिकार्डो डो एस्पिरिटो सान्तो सिल्वा ना*झी समर्थक होते असं म्हटलं जातं.

ही गोष्ट ११ जुलै रोजी लिस्बन मध्ये असलेल्या ऑस्वाल्ड नावाच्या जर्मन मंत्र्याने नाझी परराष्ट्रमंत्री रिबेन्ट्रॉपला सांगितली त्याचप्रमाणे आपल्याला अनुकूल अशा गोष्टी होतील याची वाट बघत एडवर्ड आपला मुक्काम हलवायला उशीरच करत होता.

रिबेन्ट्रॉपने ही एक आशादायक घटना म्हणून घेतली आणि मॅड्रिडमधील जर्मन दूतावासाला संपर्क साधून ड्यूकचं बहामासला जाणं टाळावं यासाठी प्रयत्न करावयास सांगितले आणि दुसऱ्या बाजूला तो त्याच्या मित्रांद्वारा स्पेनमध्ये परत कसा येईल म्हणजे त्याला आणता येईल याचीही व्यवस्था करण्याचा रिबेन्ट्रॉपने प्रयत्न केला. पुढे त्याने हेसुद्धा कळवले, बहामासला जाताच ब्रिटिश सिक्रेट सर्विस ड्यूकला घेऊन जाणार आहे.

पुढच्या दिवशी १२ जुलै रोजी व्हॉन स्टोहरेर आणि रॅमॉन सुनेर, स्पॅनिश मंत्री यांची भेट झाली. योजना ठरली होती, ड्यूकचा मित्र मिगुएल प्रिमो दी रिव्हेरा याला दूत म्हणून स्पॅनिश सरकार पाठवणार होतं, हा फ्रेंच बाहुल्य असलेल्या फॅलेन्ज या राजकीय पक्षाचा नेता आणि स्पेनच्या जुन्या राज्यकर्त्याचा मुलगा होता. रिव्हेराने त्याला स्पेनमध्ये शिकारीसाठीच्या साहिलीकरिता तसेच ब्रिटिश-स्पॅनिश संबंधांवर चर्चा करण्यासाठी म्हणून बोलवायचं, आणि तिथंच ड्यूकला त्याच्या ब्रिटिश सिक्रेट सर्विसकडून बहामासमध्ये नियोजित केल्या जाणाऱ्या अटकेबद्दलही सांगायचं असं ठरलं. जर ड्यूकने थांबायचं ठरवलं तर त्याच्या राजेपणाला शोभेल असं आयुष्यमान जगण्यासाठी त्याला आर्थिक सहाय्य्यही केलं जाईल इत्यादी गोष्टी ठरल्या होत्या. सुमारे ५० मिलियन स्विस फ्रँक्स या योजनेसाठी बाजूला काढून ठेवण्यात आल्या होत्या.

रिव्हेराने हे काम करण्यासाठी सहमती दर्शवली, त्याप्रमाणे विंडसर आणि रिव्हेरा १६ जुलै रोजी भेटले, आणि रिव्हेराने आपला प्रस्ताव विंडसरसमोर ठेवला, विंडसरला तो प्रस्ताव आणि त्याच्यामागील हेतूबरोबर समजला असावा, त्यामुळे त्याने अनेक कारणांमुळे प्रस्ताव राखून ठेवला, त्या कारणांपैकी एक म्हणजे ब्रिटन वरून वारंवार येणारे टेलेग्राम्स. २२ जुलै रोजी झालेल्या भेटीतही हेच निष्कर्ष आले. या अंतिम भेटीच्या वेळी मात्र ना*झी विंडसर दाम्पत्याचं अपहरण करण्याची योजना आखत होते. हि*टल*रने वैयक्तिकरित्या हस्तक्षेप करून वॉल्टर स्केलनबर्गला या कामगिरीवर नियुक्त केलं.

वॉल्टर स्केलनबर्ग बर्लिन वरून मॅड्रिडला आला आणि व्हॉन स्टोहरेरला भेटला, तिथून तो आपलं काम सुरु करण्यासाठी पोर्तुगालला गेला. अंतिम योजना अशी होती काहीही करून विंडसर दाम्पत्याला स्पेनच्या सीमेपर्यंत आणायचं आणि ब्रिटिश सिक्रेट सर्विस पासून त्यांची रक्षा करण्याच्या हेतूने त्यांना तिथेच ठेवायचं, विंडसर दाम्पत्याकडे पासपोर्ट्स नसल्याकारणाने अधिकाऱ्यांशी संगनमत करून हे काम करावं लागणार होतं.

वॉल्टर स्केलनबर्गने काही जीवघेण्या डावपेचांची अंमलबजावणी करायचं ठरवलं जेणेंकरुन ड्यूक आपला बांगला सोडून पळून येईल, आणि जे काही जीवघेणं कृत्य होईल त्याचा आळ ब्रिटिश सिक्रेट सर्विसवर घ्यायचा जेणेकरून त्याचे दोन्ही हेतू सहजपणे पूर्ण होतील. स्केलनबर्गने काही दगडं मारणारे लोक ड्यूकच्या बंगल्याजवळ लावले आणि नोकरांकरवी या सगळ्याला ब्रिटिश सिक्रेट सर्विस कारणीभूत असल्याची अफवा उडवून दिली.

या बरोबरच ड्यूकच्या पत्नीला एक पुष्पगुच्छ पाठवण्यात आला ज्यामध्ये हे ब्रिटिश षड्यंत्र असल्याचं सांगण्यात आलं होत. आणखी एक जीवघेणा डावपेच ३०जुलै ला कार्यान्वित करण्याचं ठरलं होत, ज्यात ड्यूकच्या बंगल्यावर गोळी*बार होतो, पण ड्यूकच्या पत्नीवर याचे मानसिक परिणाम होतील या शक्यतेमुळे ते टाळण्यात आलं.

पण याच दिवशी म्हणजेच ३० जुलै रोजी स्कॅलेनबर्गने असं सांगितलं की ड्यूकचा जुना मित्र, सर वॉल्टर मोंक्टॉन हा ब्रिटन वरून निरोप घेऊन आलाय, त्याला ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ड्यूकला लवकरात लवकर बहामासला घेऊन जाण्यासाठी नियुक्त केलं आहे अशीही अफवा उडवून देण्यात आली. याशिवाय १ ऑगस्ट रोजी विंडसर दाम्पत्य बाहेर पडेल हे सुद्धा जर्मन राजदूताने सांगितलं. हिटलरला जेव्हा हे कळलं तेव्हा त्याने स्कॅलेनबर्गला सगळं ढोंग सोडून देऊन विंडसर दाम्पत्याचं अपहरण करण्यास सांगितलं.

लिस्बनमधील स्पॅनिश राजदूताने विंडसर दाम्पत्याला शेवटच्या क्षणी अपील करुनही सामान घेऊन जाणाऱ्या मोटारीची “तोडफोड” करण्यात आली, स्कॅलेनबर्गच्या म्हणण्यानुसार बंदरावर सामान उशिरा पोहोचलं. जहाजावर बॉ*म्ब असल्याची अफवा पसरवल्यामुळे जहाज निघायला उशीर झाला. तरी त्या संध्याकाळी विंडसर दाम्पत्य सुखरूपपणे तिथून निघालं.

योजना फासल्याचा आरोप स्कॅलेनबर्गने मोंक्टॉनवर टाकला. स्कॅलेनबर्गने त्याच्या आठवणींमध्ये ड्यूकची इंग्लिश मानसिकता आणि स्पॅनिश योजना कोसळल्याने संपूर्ण योजना फसल्याचे सांगितले आहे.

हि*टल*रसारख्या हुषार सेनानीच्या प्रयत्नांतरीही ड्यूक दाम्पत्य त्यांच्या हाती लागलं नाही, अन्यथा कदाचित इतिहासाची पानांनी काही आगळ्या कथा सांगितल्या असत्या, आणि वर्तमानही काही प्रमाणात वेगळं असतं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या सात ‘गार्डियन एन्जल्स’कडे जगभरातलं इंटरनेट रिबूट करण्याची चावी आहे..!

Next Post

एअर इंडियाचं ‘१८२ कनिष्क’ विमान पाडून खलिस्तान्यांनी ३२९ नागरिकांचा बळी घेतला

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

एअर इंडियाचं '१८२ कनिष्क' विमान पाडून खलिस्तान्यांनी ३२९ नागरिकांचा बळी घेतला

या रियल लाईफ 'जॅक स्पॅरो'ला पकडण्यासाठी ब्रिटिशांनी जंगजंग पछाडलं तरी हाताशी आला नाही

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.