The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

क्युबाला व्हिलन बनवण्यासाठी अमेरिकेने स्वतःच्याच भूमीवर द*हश*तवादी ह*ल्ले करण्याचा प्लॅन केला होता

by Heramb
15 January 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


फेब्रुवारी २०१९. कश्मीर असंख्य लहान-मोठ्या द*हश*तवादी घटनांनी ढवळून निघत होता. उन्हाळा सुरु होत असल्याने द*हश*तवादी आणि घुसखोऱ्यांना उधाण आलं होतं. अशाच तणावपूर्ण वातावरणात उगवला १४ फेब्रुवारीचा दिवस. दुपारी तीनच्या सुमारास केंद्रीय राखीव पोलीस दलाचा कॉन्व्हॉय पुलवामाहून श्रीनगरकडे निघाला होता. यावेळी पाकिस्तान-प्रायोजित द*हश*तवादी ह*ल्ला झाला आणि त्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ४० कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले.

यानंतर अवघ्या काहीच दिवसांत, २६ फेब्रुवारीला भारताने या ह*ल्ल्याचे जोरदार प्रत्युत्तर देत सुमारे ३०० द*हश*तवाद्यांचा खात्मा केला. हा हवाई ह*ल्ला भारताने पाकिस्तानच्या भूमीवर केला होता. या सैनिकी घटनांचे अनेक राजकीय पक्षांनी राजकारण करण्याचे प्रयत्न केले. याआधीही सप्टेंबर २०१६ मध्ये झालेल्या उरीच्या द*हश*तवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून शेकडो द*हश*तवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यावेळीही या घटनांचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला होता.

अशा घटनांचे राजकारण करणे हे आपल्या देशाला काही नवे नाही. २००८ सालीही २६/११च्या द*हश*तवादी ह*ल्ल्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु वेळोवेळी या सर्व द*हश*तवादी ह*ल्ल्यांमागे कोणताही देशांतर्गत राजकीय हेतू नसल्याचे सिद्ध होत आले आहे. तरीही देशातील अनेक राजकीय पक्ष या घटनांचे संबंध निवडणुकांशी आणि विचारधारांशी जोडतात. अमेरिकेत मात्र एकेकाळी खरंच सरकार-प्रायोजित द*हश*तवादी ह*ल्ले घडवून आणण्याचा प्रयत्न झाला होता.

कोल्ड वॉ*र

संघर्ष हा मानवासाठी अटळ आहे. कारण वाढ हा माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे. दुसरा व्यक्ती आपल्या पुढे जाऊ लागला की अहंकारावर वार होतो. मग संघर्ष उद्भवतात. हाच न्याय देशांना आणि विचारधारांनाही लागू आहे. कोणत्याही काळात कोणत्याही दोन राष्ट्रांत संघर्ष होणे हे अपरिहार्य आणि नैसर्गिक असते. त्यामुळे अनेकांसाठी गुंतागुंतीचे राजकीय डावपेच महत्त्वाचे असतात. याचाच एक परिणाम म्हणजे ‘कोल्ड वॉ*र’.



१९६० नंतर कोल्ड वॉ*रने कळस गाठला. यु*द्धाच्या सततच्या शक्यतेमुळे शस्त्रास्त्र निर्मितीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. जर यु*द्ध झालं असतं तर जगातील सर्वाधिक किंवा संपूर्ण लोकसंख्या देखील नष्ट झाली असती. कोल्ड वॉ*र आणि क्युबन मिसाईल क्रायसिसमुळे मानवतेचा अंत जवळ आला होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

सोव्हिएट रशिया जगाच्या पूर्व भागात आपला प्रभाव वाढवत होती. सोव्हिएटने नुकतेच अफगाणिस्तानवर आक्र*मण केलं होतं. वेळ पडल्यास सोव्हिएट्सनी सामान्यांनाही जीवे मारलं होतं. असं करून सोव्हिएट्सने अफगाण-सोव्हिएट सरकारला पाठिंबा दिला होता. अमेरिकासुद्धा सामन्यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नांत मागे पडलेली नाही.

कारण त्यांनीही कम्युनिस्ट विरोधी अजेंड्याला पाठिंबा देण्यासाठी अनेक सामान्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. क्युबाला गुन्हेगार ठरवून त्यावर आक्र*मण करण्यासाठी ‘यूएस डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स’ आणि ‘जॉइंट चीफ ऑफ स्टाफ’ने ऑपेरेशन नॉर्थवूड्सद्वारे अनेक योजना आखल्या त्याबद्दलच हा विशेष लेख..

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

क्युबन मिसाईल क्रायसिस

१९६१ साली युनायटेड स्टेट्सने ‘पीजीएम-१९ ज्युपिटर मिडीयम रेंज न्यू*क्लि*अर मिसाईल्स’ तुर्कस्तान आणि इटलीमध्ये तैनात केल्या होत्या.  यु*द्ध झाल्यास या मिसाईल्समध्ये मॉस्कोवर सहज ह*ल्ला करण्याची क्षमता होती. सोव्हिएट रशियाच्या सीमेच्या अतिशय जवळ असलेल्या मिडीयम रेंज न्यू*क्लि*अर मिसाईल्सच्या तैनातीला प्रत्युत्तर देण्याचे सोव्हिएट रशियाचे तत्कालीन प्रमुख निकिता क्रुश्चेव्हने ठरवले. त्याला अमेरिकेच्या सीमेलगत अशाच प्रकारच्या मिसाईल्स डिप्लॉय करायच्या होत्या. यासाठी क्युबाइतका सर्वोत्तम देश आणखी कोणता असेल?

अटलांटिक महासागरातील क्युबा अमेरिकेच्या फ्लोरीडापासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे. इतर देशांच्या तुलनेने अलीकडेच अस्तित्वात आलेला आणि कम्युनिस्ट विचारधारा स्वीकारणारा देश पूर्वेकडील कम्युनिस्ट महासत्तेशी घनिष्ठ संबंध बनवण्यासाठी उत्सुक होता. ही संधी निकिता क्रूश्चेव्हने साधली आणि सोव्हिएट्सच्या मिडीयम रेंज मिसा*ईल्स तैनात करण्यासाठी क्युबानेसुद्धा सहमती दर्शवली. सोव्हिएट्स क्युबामध्ये R-12 मिडीयम रेंज मिसाईल्स आणि R-14 मिडीयम रेंज बॅलिस्टिक मिसा*ईल्स तैनात करण्यासाठी तब्बल ९ ठिकाणे तयार करणार होते. 

यावेळी सोव्हिएट रशिया आणि अमेरिकेतील ताण मोठ्या प्रमाणात वाढला होता. कारण आता यु*द्ध झालं तर ते अ*णुयु*द्ध होईल हे सर्वांनाच माहिती होतं. म्हणूनच दोन महासत्ता किंवा विचारधारा किंवा शासन आणि आर्थिक पद्धतींमधील हा संघर्ष मानवाच्या डोक्यावरील टांगती तलवार बनला होता. यावेळी सर्व जागतिक संघटनांचे आणि जगातील एकूण प्रमुख संस्थांचे लक्ष या दोन्ही देशांकडेच होते.

चीनने हीच संधी साधून, संपूर्ण जगाचे लक्ष तिकडे असताना भारतावर आक्र*मण केले आणि १९६२ सालच्या यु*द्धामध्ये भारताला अपमानजनक पराभवाचा सामना करावा लागला. अशा अंधाधुंद वेळेत भौगोलिकदृष्ट्या अमेरिकेच्या अतिशय जवळचे राष्ट्र कम्युनिजमचा स्वीकार करीत होते. इतकंच नाही तर त्यांनी सोव्हिएट रशियाच्या अमेरिकेविरुद्धच्या सर्वांत मोठ्या मोहिमेलादेखील हातभार लावला होता.

भांडवलशाही महासत्तेसाठी समाजवादी राष्ट्र त्यांच्या अतिशय जवळ असणे हे लांच्छनास्पद आणि धोकादायक होते. त्यामुळे ही समस्या कायमची मिटवून टाकणे गरजेचे होते. यातून अमेरिकेला बाहेर काढण्यासाठी ‘यूएस डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स’ आणि ‘जॉइंट चीफ ऑफ स्टाफ’ने ‘ऑपरेशन नॉर्थवुड्स’चा प्लॅन तयार केला.

ऑपेरेशन नॉर्थवूड्स

ऑपरेशन नॉर्थवूड्सद्वारे क्युबावर आक्र*मण करण्यासाठी तेथील सरकारला द*हश*तवादी कृत्यांसाठी दोषी ठरवण्याची योजना होती. जेणेकरून अमेरिकेला जगभरातून समर्थन मिळण्याची शक्यता वाढणार होती. थोडक्यात अमेरिका यामध्ये ‘व्हिक्टीम कार्ड’ खेळणार होतं. विशेष म्हणजे, ऑपेरेशनच्या प्लॅननुसार, ही द*हश*तवादी कृत्ये स्वतः युनायटेड स्टेट्सचे सरकारच घडवून आणणार होतं.

या द*हश*तवादी कृत्यांमध्ये अमेरिकेच्या नौदलाची आणि नागरी जहाजे उ*ध्वस्त करणे, अमेरिकेच्या शहरांमध्ये द*हश*तवादी ह*ल्ले घडवून आणणे आणि अमेरिकेचीच नागरी विमाने हायजॅक करणे किंवा उ*ध्वस्त करणे इत्यादींचा समावेश होता.

यानंतर, क्युबन सरकारने हे ह*ल्ले केले आहेत असं दर्शविण्यासाठी पुरावे तयार केले जाणार होते. जेणेकरून अमेरिकेला क्युबा या लहानशा कॅरिबियन बेटावर मोठ्या प्रमाणात आक्र*मण करण्याचे कारण मिळू शकेल. या प्लॅनमधील एका मजकुराप्रमाणे, “या योजनेच्या अंमलबजावणीचा अपेक्षित परिणाम म्हणजे क्यूबाच्या बेजबाबदार सरकारपासून युनायटेड स्टेट्सचे रक्षण आणि पश्चिम गोलार्धातील शांततेसाठी मोठा धोका बनलेल्या क्युबा राष्ट्राची द*हश*तवादी राष्ट्र अशी आंतरराष्ट्रीय इमेज तयार करणे.”

राष्ट्राध्यक्षांची भूमिका

अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीत शीतयु*द्धातील दोन सर्वांत मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. पण ऑपरेशन नॉर्थवुड्सचा प्रस्ताव त्यांच्या डेस्कवर पोहोचला तेव्हा ते साशंक होते. अमेरिकेच्या माथ्यावर आधीच हिरोशिमा आणि नागासाकीच्या प्रचंड हिं*साचाराचा आरोप होता. त्यामुळे मानवतावादी असलेल्या जॉन एफ. केनेडींनी ऑपेरेशन नॉर्थवूड्सचा हा प्रस्ताव फेटाळून लावला. ऑपरेशन नॉर्थवुड्स आणि इतर तत्सम ऑपरेशन्सना जॉन एफ. केनेडींनी मान्यता दिली नाही.

ऑपरेशनची वर्णने असलेली कागदपत्रे १८ नोव्हेंबर १९९७ रोजी ‘जॉन एफ. केनेडी असॅसिनेशन रेकॉर्ड रिव्ह्यू बोर्ड’ने जाहीर केली होती आणि त्यानंतरही योजनेचे काही भाग जाहीर करण्यात आले होते. तर ३० एप्रिल २००१ रोजी अमेरिकेच्या ‘नॅशनल सिक्युरिटी आर्काइव्ह’ने संपूर्ण जगासमोर सत्य उघड करून या ऑपरेशनचे सर्व डॉक्युमेंट्स ऑनलाइन केले होते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

…म्हणून आईन्स्टाईन जर्मनीचं नागरिकत्व सोडून अमेरिकेत स्थायिक झाला..!

Next Post

FBIने १९ वर्षे तपास केला पण हे तीन फरार कैदी शेवटपर्यंत सापडले नाहीत

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

FBIने १९ वर्षे तपास केला पण हे तीन फरार कैदी शेवटपर्यंत सापडले नाहीत

चोरांनी अ‍ॅमेझॉन, फेडेक्सच्या सामानाच्या रेल्वे लुटून अक्षरशः हाहाकार माजवला आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.