The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्रीलंकेतील या ऑपरेशनच्या जखमा आजही भारतीय सैन्य विसरू शकलं नाही

by द पोस्टमन टीम
11 October 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


कधी कधी शांततेची किंमत यु*ध्दाच्या स्वरूपात मोजावी लागते. श्रीलंकेसारख्या शांत देशात ही शांती मिळवण्यासाठी १९८७ साली एक नागरी यु*ध्द झाले होते. अंतर्गत फुटीरतावादी शक्तींनी आपला जम बसवला आणि श्रीलंकेमध्ये नागरी हिं*सेत वाढ झाली.

जेव्हा आंदोलक काही केल्या शांत होईना तेव्हा श्रीलंका सरकारने भारत सरकार, पर्यायाने भारतीय सैन्याकडे मदत मागितली. भारत सरकारने मदत मंजूर केली आणि भारतीय सेनेने त्वरीत कारवाई केली. याच कारवाईला “ऑपरेशन पवन” म्हणतात.

११ ऑक्टोबर १९८७ रोजी याची सुरुवात झाली. भारतीय सैन्याच्या कुशल रणनितीमुळे त्यांना यात पुरेसे यशही मिळवता आले, परंतु या ऑपेरेशनमध्ये सेनेचे नुकसानही खूप झाले. आज आपण याच ‘ऑपरेशन पवन’बद्दल जाणून घेणार आहोत.

एका मोठ्या बेटावर वसलेल्या श्रीलंकेत त्यावेळी एलटीटीइ नावाची जहालवादी संघटना काम करत होती. उत्तर श्रीलंकेत पलाली नावाचे छोटेसे शहर आहे. पलालीमध्ये भारतीय सेनेच्या इंडियन पीस कीपिंग फोर्सचा (IPKF) मुख्य तळ होता. जिथून भारतीय सेना श्रीलंकेत चाललेल्या विद्रोहाला थांबवण्याचा प्रयत्न करत होती.



सेनेचा हा तळ ‘जाफना’ आणि श्रीलंकन मुख्यभूमीच्यामध्ये संपर्काचे मुख्य केंद्र होते. तिकडे श्रीलंकेच्या जाफना विद्यापीठात एलटीटीइचे वर्चस्व होते. एलटीटीइ (लिबरेशन टाइगर्स ऑफ तमिल इलम) आपल्या कारवायांसाठी या विद्यापीठाचा वापर करत होते. यातच भारतीय सेनेला माहिती मिळाली की ११ ऑक्टोबर, १९८७ रोजी एलटीटीइच्या मोठ्या फुटीरतावाद्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला येणाऱ्या त्या फुटीरतावाद्यांचा खात्मा करण्यासाठीच ऑपरेशन पवनची आखणी केली गेली होती.

गुप्त संघटनांकडून माहिती मिळताच सेनेच्या १२० सैनिकांना तयार करण्यात आले. कोणत्याही देशात जाऊन अवघड परिस्थितिमध्ये राहण्याची क्षमता या सैनिकांमध्ये होती. या सैनिकांना पाठीशी म्हणून १३व्या सिख लाईट इन्फंट्रीतील अतिरिक्त ६० जवान श्रीलंकेत जाफनाला पाठवण्यात आले. इतक्या कमी वेळात तयारी करून अंमलात आणलेले आजवरचे हे एकमेव ऑपरेशन आहे असं म्हणतात. योजनेनुसार सैनिकांना श्रीलंकेच्या जाफना विद्यापीठाच्या मैदानात हेलिकॉप्टरच्या सहाय्याने उतरवण्यात आले.

एलटीटीइच्या वरिष्ट अधिकाऱ्यांना या ह*ल्ल्याची माहिती त्यांच्या गुप्तचरांकडून मिळाली होती. काही गुप्त संदेश एलटीटीइच्या गुप्तचरांच्या हाती आल्याने सेनेची योजना कमजोर पडली. गुप्त संदेश मिळताच एलटीटीइने प्रतीह*ल्ल्याची जोरदार तयारी चालू केली. तयारी दोन्ही बाजूंनी जोमात होती. अडचण एकच होती आणि तो म्हणजे आपल्या योजनेची शत्रूला आधीच माहिती आहे हे भारतीय सेनेला माहीत नव्हते.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

ह-ल्ल्याची माहिती मिळताच एलटीटीइने जाफना विद्यापीठाचे रुपांतर एका किल्ल्यात केले. आता एलटीटीइचे द*हश*तवादी  बेचैन होऊन भारतीय जवानांची वाट बघत होते. या सगळ्याची काहीच कल्पना भारतीय आणि श्रीलंकन सेनेला नव्हती. 

भारतीय सेनेने आपल्या योजनेनुसार रात्रीच्या अंधारात ४० जवानांचा एक संघ जाफना विद्यापीठाच्या मैदानात उतरवला. हे जवान आपली जागा घेतच होते तेव्हाच एलटीटीइच्या द*हश*तवाद्यांनी गोळी*बार सुरु केला. यामुळे बाकीच्या सैनिकांना उतरण्यासाठी जागाही त्यांना निश्चित नाही करता आली.

पुढचे हेलिकॉप्टर जेव्हा बाकीच्या जवानांना खाली उतरवण्यासाठी आले तेव्हा हेलिकॉप्टरच्या चालकाला खालच्या गोळी*बाराचा अंदाज आला होता. त्यामुळे चालकाने बाकीच्या जवानांना खाली उतरवलेच नाही आणि तसेच मुख्य तळावर हेलिकॉप्टर परत नेले. आधी खाली उतरलेल्या जवानांनी घाबरून न जाता आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत एलटीटीइच्या अति*रेक्यांचा जिकरीने सामना केला. प्रतिह*ल्ला करताना सेनेच्या जवानांनी बऱ्याच अतिरे*क्यांचा खा*त्मा केला. अतिरिक्त पाठबळ नसल्याने जवान कमजोर पडत होते.

एलटीटीइच्या अति*रेक्यांसमोर केवळ ४० भारतीय जवान होते. ज्यांनी त्यांना सर्व बाजूंनी घेरले होते. जवानांचा पुढचा गट पण लवकरच येईल हा अंदाज एलटीटीइला होताच, म्हणून त्यांनी आपल्या तयारीत कसलीही कसर सोडली नव्हती. एलटीटीइचा पुढचा कट थेट हेलिकॉप्टरवर मशीनगनने गो*ळीबार करण्याचा होता.

जसे हेलिकॉप्टर आले तसा त्यावर मोठ्या हत्या*रांनी आणि मशीनग*नने ह*ल्ला करण्यात आला. या ह*ल्ल्यात पायलट जखमी झाले, तरीही त्यांनी धैर्य दाखवत जवानांना खाली उतरवले. आधीच दबा धरून बसलेल्या एलटीटीईच्या अति*रेक्यांनी जवानांवर ह*ल्ला चढवला. भारतीय सेनेच्या जवानांनी हार मानली नाही. जवान आणि एलटीटीईच्या अति*रेक्यांमधली ही लढाई पुढचे बरेच तास चालूच होती. या लढाईत भारतीय सेनेचे ३५ पेक्षाही जास्त जवानांनी आपले प्राण गमावले. भारतीय सेनेच्या इतिहासात ‘ऑपरेशन पवन’ सगळ्यात घातक सिध्द झाले. परंतु, भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या असाधारण शौर्यामुळे एलटीटीइचे बरेच अति*रेकी मारले गेले.

‘ऑपरेशन पवन’ काही प्रमाणात यशस्वीही झाले असे म्हटले जाते. भारतीय सेनेने केलेल्या या ह*ल्ल्यामुळे एलटीटीइचे सदस्य प्रचंड अस्थिर झाले, त्यांचेही बरेच नुकसान झाले होते. याचाच परिणाम म्हणून ह*ल्ल्याचा बदला घेण्यासाठी ४ वर्षानंतर १९९१ साली तत्कालीन भारतीय पंतप्रधान राजीव गांधीची ह*त्या करण्यात आली.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

चीनच्या युवकांमध्ये रवींद्रनाथ टागोर एवढे प्रसिद्ध का आहेत..?

Next Post

भारताच्या ‘टिकली’ने जगभरातल्या महिलांना भुरळ घातलीये

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

भारताच्या 'टिकली'ने जगभरातल्या महिलांना भुरळ घातलीये

या चौदा वर्षाच्या मुलाने चाचा नेहरूंचे प्राण वाचवले आणि 'बाल शौर्य पुरस्कार' सुरु झाला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.