The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिकेने त्यादिवशी ओमाहा बेट तर जिंकले, पण…

by द पोस्टमन टीम
31 March 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब


दुसऱ्या महायु*द्धातील काही घटना ऐकल्या तर आजही आपल्या मनाचा थरकाप उडतो. १९२०-१९४५ म्हणजे पहिल्या महायु*द्धाच्या सुरुवातीपासून ते दुसरे महायु*द्ध संपेपर्यंतचा काळ हा मानवी इतिहासातील अतिशय वाईट, निष्ठुर, आणि मानवतेला काळिमा फासणारा काळ आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दुसऱ्या महायु*द्धाच्या काळात ओमाहा किनाऱ्यावर झालेला न*रसं*हाराबद्दल वाचले तरी अंगावर काटा येईल.

या बेटावर हि*टल*रच्या ना*झी सैनिकांनी हजारो अमेरिकन सैनिकांच्या मृतदेहांचा खच पाडला होता. शेवटी यु*द्धच ते, जिंकण्यासाठीच खेळलं जातं. पण असे रक्ताचे निर्घुण पाट वाहवून जिंकलेले यु*द्ध कोणाला काय मिळवून देणार आहे? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

ओमाहा समुद्र किनाऱ्यावरील ओमाहा बेटावर ना*झी सैनिकांनी कब्जा मिळवला होता. ओमाहा समुद्र आणि त्याच्यावरील हे बेट भौगोलिक आणि सामरिक दृष्ट्याही एक महत्त्वाचे ठिकाण. त्यामुळे फ्रांस आणि इतर मित्र राष्ट्रांचीही यावर नजर होतीच.

६ जून १९४४ रोजी हे बेट हि*टल*रच्या ताब्यातून सोडव्रून घेण्यासाठी मिशन ओव्हरलोड अंमलात आणले गेले. ते पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी फ्रांससह इतर मित्र राष्ट्रेही धडपडत होती.

फ्रांसचा बराचसा प्रदेश जर्मनच्या ताब्यात गेला होता. हा प्रदेश परत मिळवण्यासाठी फ्रांसचे प्रयत्न सुरु होते. त्यासाठी १९४३ साली एक मोहीम आखण्यात आली. या मोहिमेची संपूर्ण जबाबदारी जनरल दवाइट आयझनहावर यांच्याकडे सोपवण्यात आली होती. पाच वेगवेगळ्या किनाऱ्यावर बॉ*म्ब वर्षाव करत जर्मन सैनिकांवर ह*ल्ला करायचा आणि हे बेट ना*झी सैन्याच्या हातातून काढून घ्यायचे असे नियोजन होते. या पाच किनाऱ्यांमध्ये उताह, ओमाह, गोल्ड, जुयो आणि स्वोर्ड या किनाऱ्यांचा समावेश होता.



या योजनेसाठी त्या पाचही किनाऱ्यांची इत्थंभूत माहिती मिळावी या हेतूने धोरणकर्त्यांनी त्या किनाऱ्याचे फोटो लोकांकडून मागितले. आज आपण एखाद्या ठिकाणचा फोटो जर गुगलवर सर्च केला तर आपल्याला त्याठिकाणचे तेच तेच फोटो दिसतात. शिवाय ते ही संख्येने कमी आणि याबाबतची विश्वासार्हताही देता येणार नाही. पण त्याकाळात या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्याने १० करोड फोटो जमा झाले होते.

या सगळ्या फोटोंमुळे त्या किनाऱ्यांची अधिकाधिक माहिती जमा झाली हे खरे असले तरी यामुळे कदाचित योजना गुप्त राहिली नाही.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

मित्र राष्ट्रांनी आपले गेलेले प्रदेश पुन्हा जिंकण्यासाठी अशी काही योजना आखली आहे ही बातमी हि*टल*रच्या कानावर गेलीच. त्याने या प्रदेशातील आपले सैन्य वाढवले. त्यांना पुरवली जाणारी शस्त्रे, दारुगोळा यातही वाढ केली. शिवाय, हवाईह*ल्ले झालेच तर त्यापासून वाचता यावे म्हणून जमिनीखाली बंकरही करून ठेवण्यात आले. त्या किनाऱ्यावर तोफाही पोहोचवण्यात आल्या.

पण हि*टल*रने अशी काही पूर्वतयारी करून ठेवली असेल याचा मित्र राष्ट्रांना अंदाजच आला नाही. त्यांनी हि*टल*रपर्यंत आपली योजना पोहोचणार नाही आणि हि*टल*र गाफील राहील अशीच समजूत करून घेतली.

खरे तर हि*टल*रची तत्परता, सतर्कता पाहून कुणीही त्याला गृहीत धरण्याची चूक करायलाच नको होती. पण, फ्रांसकडून ती चूक झाली. याची किंमत मात्र हजारो अमेरिकन सैनिकांना आपल्या रक्ताने चुकवावी लागली. हि*टल*रने प्रत्युत्तराची पूर्ण तयारी केली होती. ह*ल्ला झालाच तर तो कसा परतवून लावायचा आणि आपल्या सैनिकांना कसे सुरक्षित ठेवायचे याचेही नियोजन झाले होते.

६ जून १९४४ रोजी ठरल्यानुसार ओमाहा किनाऱ्यावर जहाजातून आणि विमानातून बॉ*म्ब फेकण्यात आले. पण ना*झी सैन्य भूमिगत बंकरमध्ये सुरक्षित होते त्यांना या बॉ*म्ब वर्षावामुळे कसलाही फरक पडला नव्हता. परंतु अमेरिकन सैन्याला वाटले की ना*झी सैन्य संपले आहे.

शत्रूला कमकुवत मानणे हीच चूक अमेरिकन सैनिकांना पुढे खूप महागात पडली. कारण, एकही ना*झी सैनिक दिसत नव्हता. पण हे सैन्य खाली भूमिगत बंकरमध्ये सुरक्षित होते.

अमेरिकन सैनिक आपल्या टप्प्यात येण्याची ते वाट पाहत होते. अमेरिकन सैनिक जेव्हा ओहामा बेटावर पोहोचले तेंव्हा दडून बसलेल्या ना*झी सैनिकांनी गोळीबार सुरु केला. अमेरिकन सैनिकांना हा गोळीबार चुकवता चुकवता पळता भुई थोडी झाली होती. शत्रूचे सैन्य कुठे आहे आणि गोळीबार कुठून होतो आहे हेच त्यांच्या लक्षात येत नव्हते.

जसेजसे अमेरिकन सैनिक पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. तसतसे त्यांच्यावरील ह*ल्ले अधिक तीव्र होत होते. सगळीच परिस्थिती त्यांच्या विपरीत होती. जर्मन सैनिकांनी एका उंच डोंगराचा आश्रय घेतला होता आणि ते वरून खालील अमेरिकन सैनिकांना लक्ष्य करत होते.

ओमाहा समुद्र किनाऱ्यावरील पाण्याला अमेरिकन सैनिकांच्या रक्ताचा रंग चढला होता. एकावर एक मृतदेहांचा ढीग लागत होता. सगळी जमीन रक्ताने भिजून गेली होती.

इतके होऊनही अमेरिकन सैनिकांनी आपले धैर्य खचू दिले नाही. त्यांनी ना*झी सैनिकांचा पिच्छा करणे सोडले नाही. आपले सैनिक मारले जात आहेत हे पाहूनही त्यांनी यु*द्धभूमीवरून पळ काढला नाही.

उलट त्यांनी ना*झींचा सूड उगवण्यास सुरुवात केली. आपल्या संपूर्ण शक्तीसह ते ना*झी सैन्यावर तुटून पडले. ना*झी सैनिक ज्या डोंगरावर लपून बसले होते तिथे पोहोचून त्यांचा सफाया केला. या सगळ्यात मात्र २००० पेक्षा जास्त अमेरिकन सैनिक मारले गेले होते. ४०००-४५०० सैनिक जखमी झाले होते. ओमाहाचा तो किनारा त्या दिवशी रक्तात न्हाऊन निघाला होता. ज्या किनाऱ्यावर रोज समुद्राच्या लाटांची येजा सुरु असायची तिथे आज रक्ताचे पाट वाहत होते.

इतक्या मोठ्या प्रमाणावर सैनिकांची झालेली क*त्तल पाहून अमेरिकेला हादरा बसला. ज्याने ही मोहीम आखली होती त्याला अमेरिकन सरकारने धारेवर धरले. मोहिमेचे नियोजन फसल्याबद्दल त्यालाच जबाबदार ठरवण्यात आले. हि*टल*रला मूर्ख समजून बेफिकीर राहण्याची चूक केली नसती तर इतकी मोठी किंमत मोजावी लागली नसती.

कुणालाही जबाबदार धरले तरी गेलेले लोक माघारी थोडेच येणार होते. या सैनिकांच्या कुटुंबावर कसा दुःखांचा डोंगर कोसळला असेल याची कल्पनाही करवत नाही.

अमेरिकेने त्यादिवशी ओमाहा बेट तर आपल्या ताब्यात घेतले पण, त्यासाठी खूप मोठी किंमत चुकवली. अमेरिकेला आजही ही घटना तितकीच दुर्दैवी आणि भयावह वाटते. महायु*द्धाने प्रत्येक राष्ट्राला अशा न विसरता येणाऱ्या ठसठशीत जखमा भेट म्हणून दिलेल्या आहेत.

इथून पुढच्या कालखंडात तर यु*द्ध हे कोणत्याही समस्येचे उत्तर होऊ शकत नाही, हा धडा धोरणकर्त्यांनी या घटनेतून घ्यायला हवा.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

ख्रिस गेल – वेस्ट इंडिजचा ‘रनमशीन’ स्लमडॉग मिलेनियर

Next Post

१८५७ च्या आधी ब्रिटीशांच्या विरुद्ध केलेला उठाव आपल्या विस्मरणात गेलाय

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

१८५७ च्या आधी ब्रिटीशांच्या विरुद्ध केलेला उठाव आपल्या विस्मरणात गेलाय

राजा मार्तंड वर्मांनी डचांना पराभूत करून हिंदुस्थानातून हाकलून लावलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.