The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या कारणासाठी ऑलम्पिकमधून क्रिकेटला वगळलं होतं..!

by द पोस्टमन टीम
28 February 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


ऑलिम्पिक ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा आहे, जी दर चार वर्षांनी एकदा भरवली जाते. पण या स्पर्धेत काही मोजकेच खेळ खेळले जातात. काही खेळ या स्पर्धेतून वगळण्यात आले आहेत. फुटबॉल, हॉलीबॉल यांसारखे सांघिक खेळही ऑलिम्पिकमध्ये खेळले जातात. मात्र, क्रिकेट हा खेळ तर जगभर लोकप्रिय असूनही तो ऑलिम्पिकमध्ये खेळला जात नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, पूर्वी क्रिकेट हा खेळ देखील ऑलिम्पिकमध्ये खेळला जात असे. फक्त क्रिकेटच नाही तर असे आणखीही काही खेळ आहेत जे पूर्वी ऑलिम्पिकमध्ये खेळले जायचे पण आता खेळले जात नाहीत.

क्रिकेट

क्रिकेटची सुरूवात इंग्लंडमध्ये झाली असली तरी आज हा खेळ सर्वत्र खेळला जातो. आज तर गल्लीबोळातही याच खेळाला प्राधान्य दिले जाते. ऑलिम्पिकमध्येही क्रिकेट खेळला जात असे. १९०० साली ऑलिम्पिक सामन्यात क्रिकेटचा समावेश केला गेला. त्याकाळी क्रिकेट आजच्या इतका लोकप्रिय नव्हता.

ऑलिम्पिकच्या पहिल्या क्रिकेट सामन्यात फक्त चार संघांनी सहभाग घेतला होता. त्यातही दोन संघांनी ऐनवेळी खेळण्यास असमर्थता दर्शवली. शेवटी इंग्लंड आणि फ्रान्स या दोनच संघात हा पहिला सामना खेळला गेला ज्यात इंग्लंडचा संघ विजयी ठरला. 

क्रिकेटसाठी खूप वेळ जातो, जितके संघ जास्त तितका आणखी वेळ जास्त. अशा सगळ्या गुंतागुंतीमुळे आयोजक क्रिकेटच्या स्पर्धा भरवण्यात अनुत्सुकता दाखवू लागले. आयोजकांच्या उदासीनतेमुळे हा खेळ ऑलिम्पिकच्या पटलावरून हळूहळू पूर्णत: गायब झाला.

रस्सीखेच

लहान मुलांचा हा एक आवडता खेळ. या खेळासाठी शारीरिक आणि बौद्धिक दोन्ही प्रकारचा कस लागत असे. आज हा खेळ फारसा खेळला जात नाही. सुरूवातीला हा खेळही ऑलिम्पिकमध्ये खेळला जात असे. १९०० पासून १९२० पर्यंत हा खेळ ऑलिम्पिकमध्ये खेळला जात असे. अमेरिकेचे या खेळात वर्चस्व होते.



१९०४ साली तर अमेरिकेने या खेळातील सर्व सुवर्ण पदके जिंकली होती. 

हा खेळही नंतर ऑलिम्पिकमधून गायब झाला. हा खेळ का वगळण्यात आला याचे काही ठोस कारण माहिती नाही.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

सायकल पोलो

पोलो हा खेळ घोड्यावर बसून खेळला जातो. घोड्यावर बसून चेंडूला मोठ्या काठीने ढकलत गोलपोस्टपर्यंत नेले जाते. तसा हा खेळ सर्वसामान्यांसाठीचा खेळ नाही. कारण या खेळासाठी खूप खर्च होतो. घोड्यावर बसून खेळला जाणारा हा खेळ फक्त श्रीमंतांसाठी असल्याचे मानले जात असे. पण, सर्वसामान्यांनाही या खेळाची मजा लुटता यावी म्हणून या खेळात थोडा बदल केला गेला. हा खेळ घोड्यावर बसून खेळण्याऐवजी सायकलवरून खेळला जाऊ लागला. ज्याला सायकल-पोलो म्हटले जाऊ लागले.

१९००-१९०१ या काळात हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवरही लोकप्रिय झाला. १९०८ च्या दरम्यान या खेळाला ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आले. पहिल्या महायु*द्धाच्या काळात अनेक खेळाडूंना यु*द्धात सहभाग घ्यावा लागला. तेव्हा या खेळाचा जोर थोडा कमी झाला. नंतर याची लोकप्रियता कमी होत गेली आणि हळूहळू हा खेळही ऑलिम्पिकमधून रद्द झाला. आज या खेळाची कोणाला फारशी माहिती देखील नाही.

क्रॉकेट

फ्रान्समध्ये पूर्वी हा खेळ खूपच लोकप्रिय होता. या खेळासाठी दोन ते सात खेळाडू लागतात. १९०० साली हा खेळ ऑलिम्पिकमध्ये सामाविष्ट करण्यात आला. पण क्रिकेटप्रमाणेच या खेळासाठीही इतर कुठल्या देशांनी फारशी उत्सुकता दाखवली नाही.

या खेळात कमी संघांनी सहभाग घेतल्याने प्रेक्षकांनाही हा खेळ पाहण्यात विशेष रस राहिला नाही.

शेवटी या खेळासाठी संघच उपलब्ध झाले नसल्याने हा खेळ ऑलिम्पिकमधून हद्दपार झाला.

कबुतर निशाणेबाजी

आज ऑलिम्पिकमध्ये निशाणेबाजीचे खूप प्रकार खेळले जातात. पूर्वी म्हणजे १९०० साली निशाणेबाजीसाठी कबुतरांचा वापर केला जात असे. आज मात्र एखाद्या वस्तूचा वापर करून त्यावर निशाणा साधला जातो. कबुतरांवर निशाणा साधून खेळण्याच्या या खेळात अनेक कबुतर विनाकारण मारले जाऊ लागले. कबुतरांची अशी ह*त्या करणे योग्य नसल्याने याप्रकारच्या खेळावर ऑलिम्पिकने बंदी आणली.

पाण्यावर स्थिर राहणे

पोहण्याचेही अनेक प्रकार आहेत आणि आजच्या ऑलिम्पिक स्पर्धेत यापैकी अनेक प्रकार खेळले जातात. असाच पोहण्याशी संबधित असलेला हा एक प्रकार. ज्यामध्ये खेळाडू पाण्यात उडी मारत असे आणि ६० सेकंदासाठी त्याला पाण्यात आपले शरीर स्थिर ठेवावे लागत असे. ६० सेकंदात जास्त अंतर पोहून येणाऱ्या व्यक्तीला या स्पर्धेचा विजेता घोषित केले जाई. यासाठी स्पर्धकांना काही विशेष मेहनत घ्यावी लागत नाही. त्यामुळे आयोजकांना या खेळात जास्त रस नव्हता. शेवटी हा खेळही ऑलिम्पिकमधून रद्द करण्यात आला.

दोरीवर चढणे

आजकाल कुणीही याकडे खेळ म्हणून पाहतच नाही. आजच्या जमान्यात दोरीवर चढणे हा एक व्यायाम प्रकार आहे. विशेषत: ज्यांना आपले शरीर लवचिक बनवायचे असते असे लोकच हा व्यायाम प्रकार करतात. व्यायाम म्हणूनही आज हा प्रकार तितकासा लोकप्रिय नाही. पण १८९६च्या काळात हा खेळ ऑलिम्पिकमध्येही खेळला जात असे. काही मोजके लोक सोडले तर त्यावेळीही या खेळात कुणाला फारसा रस नव्हता. या खेळप्रकारासाठी स्पर्धकांची संख्याच कमी झाली तेव्हा ऑलिम्पिकने हा खेळ बंद केला.

ऑलिम्पिकची सुरुवात ग्रीकमध्ये झाली, तेही तिथल्या उत्सवांचा एक भाग म्हणून अशा स्पर्धा तिथे भरवल्या जात असत. ऑलिम्पिकमध्ये कुठला खेळ खेळला जाईल आणि कुठला नाही याबद्दल सुरुवातीपासूनच अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. कित्येक जुने खेळ जाऊन त्याची जागा नव्या खेळांनी घेतली. काळानुसार बदलत जाणारी अभिरुची आणि आवड याची नोंद ऑलिम्पिकने वेळोवेळी घेतली आहे आणि त्यानुसार आपल्या स्पर्धेत बदलही केला आहे. म्हणूनच आजही ऑलिम्पिकविषयीचे प्रेम आणि आदर कमी होत नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

कुष्ठरोगावर औषध बनवणाऱ्या संशोधिकेपासून तिच्या कामाचं श्रेय हिरावून घेतलंय

Next Post

शिकारीला गेलेल्या राष्ट्राध्यक्षांनी अस्वलाच्या पिल्ल्याला मारायला नकार दिला आणि टेडी बेअरचा जन्म झाला

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

शिकारीला गेलेल्या राष्ट्राध्यक्षांनी अस्वलाच्या पिल्ल्याला मारायला नकार दिला आणि टेडी बेअरचा जन्म झाला

'प्लेइंग इलेव्हन'मध्ये नसतानासुद्धा 'मॅन ऑफ द मॅच' फक्त 'जॉन्टी ऱ्होड्स'च होऊ शकतो..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.