The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या महिला पंतप्रधानाने तिच्या देशातून कोरोनाला हद्दपार केलंय

by द पोस्टमन टीम
31 May 2020
in राजकीय, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


लेखक- अनुप देवधर

एप्रिल 2018.

एक महिला आपल्या दोन तान्ह्या बाळांना घेऊन खूप गडबडीनं खरेदीसाठी बाहेर पडली. एका सुपरमार्केटमध्ये सगळं हवं-नको ते समान घेऊन झाल्यावर बिल देण्याच्या रांगेत उभं असताना अचानक तिच्या लक्षात येतं, की ती पर्स विसरली आहे. आधीच मुलांना सांभाळताना आणि आता ह्या पर्स विसारल्यानं ती चांगलीच गोंधळून जाती. हा सगळा प्रकार तिच्या मागेच रांगेत उभारलेली महिला बघते. सगळा प्रकार तिच्या लक्षात आलेला असतोच, ती त्या महिलेला म्हणते, काळजी करू नको, मी तुझं बिल भरतेय.

वरवर बघता जगाच्या पाठीवर हा प्रसंग कुठंही सहज घडण्यासारखा आहे. पण ह्यात विशेष असं होतं, की ती बिल भरणारी महिला, त्या देशाची पंतप्रधान होती.



जेसिंडा आर्डर्न. वय ४०. २०१७ साली वयाच्या ३७ व्या वर्षी न्यूझीलंडच्या ४०व्या पंतप्रधान त्या रांगेत उभ्या होत्या, आणि त्यांनी ते बिल भरलं होतं.

एक हुशार आणि चाणाक्ष मुलगी, जी २००१ मध्ये त्यावेळच्या पंतप्रधान हेलन क्लार्क आणि लेबर पार्टीचे नेते फील गॉफ यांच्या ऑफिसमध्ये रिसर्चर म्हणून काम सुरू करते. काही दिवस एका कॅफेमध्ये नोकरी करते. पुढं ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या सल्लागार टीममध्ये सदस्य ते न्यूझीलंडच्या पंतप्रधान असा थक्क करणारा प्रवास आहे त्यांचा.

पोलीस ऑफिसर असणारे वडील आणि शाळेत कँटीनच्या कामात मदतनीस असणारी आई यांच्या सोबत आनंदात, ट्रॅक्टर चालवत शेतात रमणारं लहानपण सोबत घेऊन पॉलिटिक्स आणि पब्लिक रिलेशनमध्ये त्यांनी पदवी घेतली. त्याचदरम्यान लेबर पार्टीमध्ये प्रवेश करून राजकारणाला सुरुवात केलीच होती.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

२००८ मध्ये ‘इंटरनॅशनल यूनियन ऑफ सोशलिस्ट यूथ’ ची अध्यक्ष झाल्यावर सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता.

खरंतर २०१७ मध्ये पंतप्रधान झाल्यापासूनच,
पंतप्रधान पदावर असताना लग्न न केलेल्या जोडीदारापासून अपत्य जन्माला घालणं असो आणि मग संसदेमध्ये किंवा युनायटेड नेशन्समध्ये मुलाला घेऊन जाणं असो, अशा कारणांनी त्या जगभरात सतत चर्चेचा विषय राहिल्या आहेत. मग कधी त्यांची कार्यशैली असो, पद न मिरवणं असो किंवा वैयक्तिक आयुष्य.

वरवर मृदू, शांत आणि हासरा स्वभाव त्यांची ओळख असली तरी मानातून किती कणखर खंबीर आहेत, हे ख्राइस्ट चर्चमध्ये मशिदींवर झालेल्या हल्ल्यानंतर सगळ्या जगानं बघितलं आहे. धार्मिक हिंसाचाराला देशात थारा नाही असं ठणकावून सांगताना, बळी पडलेल्या प्रत्येक कुटुंबीयांचं भेटून सांत्वन केलं होतं, आणि मारेकऱ्यांना शोधून लगेच परिस्थिती पूर्वपदावर आणली होती.

अलीकडंच लॉकडाऊनच्या दरम्यान एक दिवस कुटुंबासोबत जेवायला एका हॉटेलमध्ये गेल्या होत्या. लॉकडाऊनच्या नियमांमुळे त्या हॉटेलचे निम्मेच टेबल ग्राहकांसाठी उपलब्ध होते. गर्दीमुळे त्यांना जागाच मिळाली नाही. त्या चक्क बाहेर वाट बघत बसल्या.

खूप वाट बघून शेवटी निघायच्या बेतात असताना एक टेबल मोकळा झाला. आणि मग मोठ्या प्रतीक्षेनंतर जेवण केलं. हॉटेलचा मालक न राहवल्यानं माफी मागू लागला, तर ‘जे सगळ्यांसाठी नियम तेच माझ्यासाठी. तुम्ही का माफी मागताय. मीच ऍडव्हान्स बुकिंग करायला हवं होतं’ असं सहजपणे हसतमुखानं म्हणून मोकळ्या झाल्या.

आपल्याकडं हीच घटना एखाद्या सरपंचाच्या बाबतीत झाली असती, तरी आश्चर्य वाटलं असतं. त्या तर पंतप्रधान.

पण फक्त अशा घटना घडतात म्हणून त्या चांगल्या पंतप्रधान आहेत का? नक्कीच नाही. त्यांचं कर्तृत्वही तेवढंच आहे.

आज त्यांनी आपला देश कोरोनामुक्त केलाय. उत्तम पॉलिसी आणि परफेक्ट एक्झिक्युशन यांच्या मदतीनं. एकीकडं सगळं जग कोरोनाच्या वणव्यात होरपळत असताना, एखादा देश कोरोनामुक्त होऊ शकतो असं स्वप्नं जगातल्या बाकीच्या देशांना बघायची संधी आज त्यांनी तयार करून दिली आहे.

त्यांच्या कर्तुत्वाला सलाम!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

आचार्य अत्रे यांचे शक्तिमान विनोद

Next Post

रायगडावरचा महाराजांचा पुतळा आप्पांनी पुरातत्व खात्याशी भांडून बसवलाय!

Related Posts

राजकीय

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

30 March 2024
राजकीय

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

25 March 2024
इतिहास

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

7 February 2024
इतिहास

हरित क्रांतीच्या ‘बिहाइंड द सीन्स’ काम करणाऱ्या या लोकांबद्दल खूप कमी जणांना माहित असेल..!

20 January 2024
राजकीय

सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग अलाऊड नाही याचं कारण म्हणजे मिलिंद देवरा यांचे वडील..!

15 January 2024
विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
Next Post

रायगडावरचा महाराजांचा पुतळा आप्पांनी पुरातत्व खात्याशी भांडून बसवलाय!

मागील दोन दशकांपासून सर्वच भयानक रोगांचा उगम चीनमध्येच का होत आहे..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.