The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या ब्रिटीश महिलेने भारताच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास देखील भोगलाय

by द पोस्टमन टीम
4 February 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक महिलांनी आपले योगदान दिले आहे, हे आपण जाणतोच. पण, त्या सर्वांचेच कार्य आपल्यापर्यंत पोहोचत नाही. काही नावे इतिहासाच्या पानांतच कैद होऊन राहतात. यात काही महिला अशाही होत्या ज्या जन्माने भारतीय नव्हत्या तरीही त्यांनी भारतीयांना स्वातंत्र्य मिळावे म्हणून प्रयत्न केले. स्वातंत्र्य चळवळीत मोलाचं योगदान दिले इतकेच नाही तर भारतीय स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास देखील सोसला.

अ‍ॅनी बेझंट, भगिनी निवेदिता याच स्त्रियांच्या यादीतील आणखी एक आदरणीय नाव म्हणजे नेली सेनगुप्त. 

नेली सेनगुप्त जन्माने ब्रिटीश होत्या. त्यांच्या जन्म इंग्लंडमध्ये झाला, त्यांचे शिक्षणही तिथेच झाले. त्या भारतीय नव्हत्या तरी भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी कारावास भोगला. अशा व्यक्तीबद्दल आणि तिच्या कार्याबद्दल अनभिज्ञता बाळगणे कृतघ्नपणाचे ठरेल.

जन्माने ब्रिटीश असूनही आजन्म भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या नेलीचे खरे नाव होते, एडिथ एलेन ग्रे. कॉलेजात शिकत असताना एडिथची ओळख भारतातून वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या यतींद्र मोहन सेनगुप्त या बंगाली तरुणाशी झाली. यतींद्र यांचे वडील मोहन सेनगुप्त हे बंगालमधील एक प्रतिष्ठित वकील आणि बंगाल विधान परिषदेचे सदस्य होते.



एडिथ आणि यतींद्र दोघांचीही कौटुंबिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय, राजकीय पार्श्वभूमी अगदी भिन्न होती. परंतु, एडिथला यतेंद्र यांच्यावर पूर्ण विश्वास होता. एडिथच्या आई-वडीलांनी मात्र तिच्या या निर्णयाला विरोध केला. आई-वडिलांच्या विरोध डावलून तिने १९०९ साली त्यांच्याशी विवाह केला आणि यतींद्र यांच्या एकत्र भारतीय कुटुंबात एडिथने प्रवेश केला.

परदेशात वकिलीचे शिक्षण घेतलेले यतींद्र एक यशस्वी वकील होते. १९११ साली पार पडलेल्या बंगाल प्रांतीय परिषदेचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवले होते.

१९२१ साली जेव्हा देशात असहकाराचे वारे सुरु झाले तेव्हा या दांपत्याचे जीवन पुरते बदलून गेले. गांधीजींनी असहकाराचे आवाहन केल्यानंतर तरुण यतींद्र यांनी वकिलाची ऐषोआरामाची नोकरी सोडली आणि त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

एक सहधर्मचारिणी बनून नेलीने यतींद्र यांच्या या निर्णयाला फक्त पाठींबाच नाही तर कृतीशील सहभाग घेत प्रोत्साहन दिले. यतींद्र हे महात्मा गांधींचे अत्यंत जवळचे अनुयायी होते. आसाम-बंगाल रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलानात सहभाग घेतल्याबद्दल इंग्रजांनी यतींद्र यांना अटक केली. यतींद्र रेल्वे कामगार संघटनेचे आणि बर्मन ऑईल कंपनीचे अध्यक्ष होते. यतींद्र यांना अटक झाल्यानंतर नेलीने स्वतः पोलिसांविरोधात आंदोलन सुरु केले.

आपल्या पतीला अटक केल्याबद्दल तिने ब्रिटीश पोलिसांचा निषेध नोंदवला आणि ठिकठिकाणी सभांचे आयोजन केले. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या सभा भरवण्यास बंदी घातली होती. नेली यामुळे ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या रोषाला बळी पडली.

खादीच्या विक्रीवर ब्रिटिशांनी बंदी घातली असताना देखील नेली स्वतः घरोघरी जाऊन खादीची विक्री करत असे. नेली आणि तिच्यासारख्याच धाडसी महिलांच्या कामाने ब्रिटीश सरकार हादरून गेले होते.

त्यांनी १९३१ साली नेलीला अटक केली. नेलीने जेलमधील आपले भयानक अनुभव सांगताना जेल हे एक गलिच्छ ठिकाण असल्याचे म्हटले. कैद्यांच्या वंशावरून त्यांना भेदभावाची वागणूक दिली जात असल्याचे पाहून तिला प्रचंड खेद वाटला. फक्त पतीला अटक झाली म्हणून तिने स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला असे नाही तर, तिच्यात चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणण्याची क्षमता होती.

जेलमधले आपले अनुभव लिहिताना नेली म्हणते, “एकदा मी आजारी पडले. माझी प्रकृती तपासण्यासाठी डॉक्टर माझ्या बेडरूममध्ये आले तेव्हा सिनियर जेलर तिथेच उभा राहून माझ्याकडे टक लावून पाहत होता. त्याच्या या वागण्याने मी खजील झाले होते.”

रांचीच्या जेलमध्ये असतानाचा १९३३ साली यतींद्र यांचा मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर नेली स्वातंत्र्य संग्रामातील आपला सहभाग कमी करेल अशी कल्पना अनेकांनी केली असेल पण, नेलीने आपला लढा तितक्याच जोरकसपणे सुरु ठेवला.

स्वातंत्र्य चळवळ दडपण्यासाठी ब्रिटीशांचे हरेक प्रयत्न सुरु असताना, त्यांच्याच देशातील एक ब्रिटिश स्त्री मात्र स्वदेशी चळवळीचा जोरात प्रचार आणि प्रसार करत होती. खादीच्या खरेदी विक्रीला प्रोत्साहन देत होती. लोकांनी ब्रिटीश वस्तूंवर बहिष्कार टाकावा आणि स्वदेशी वस्तू स्वीकाराव्यात म्हणून नेली स्वतः पुढाकार घेऊन घरोघरी अशा वस्तू पोहोच करत असे.

मिठाच्या सत्याग्रहावेळी राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष पंडित मदन मोहन मालवीय यांना देखील अटक झाली होती. अशावेळी कलकत्ता येथील कॉंग्रेस परिषदेचे नेतृत्व कोण करणार असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा या जबाबदारीसाठी नेली स्वतःहून पुढे झाली. राष्ट्रीय कॉंग्रेसच्या ४७व्या अधिवेशनासाठीचे अध्यक्षपदासाठी नेलीची निवड करण्यात आली. १९३३ साली ही परिषद कलकत्त्याला पार पडली. सन १९४० आणि १९४६ मध्ये ती बंगाल विधानसभेची देखील सदस्य होती.

१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि सोबत फाळणीही. फाळणीच्या वेळी नेलीने आपल्या पतीच्याच गावी चटगावला राहणे पसंद केले. बंगालचा हा भाग त्यावेळी पूर्व पाकिस्तानमध्ये मोडत होता. तिथेही त्यांनी आपले समाजकार्य सुरुच ठेवले. अल्पसंख्याक बोर्डाच्या सदस्य या नात्याने तिने अल्पसंख्याक लोकांसाठी काम करणे सुरू ठेवले.

१९७२ साली म्हणजे स्वातंत्र्याच्या तब्बल दोन दशकानंतर भारतात आली तेव्हा एका अपघातात तिच्या हाडांना दुखापत झाली होती. त्यावेळी इंदिरा गांधीनी तिला बोलावून घेऊन तिच्या उपचारांची व्यवस्था केली होती. नेली भारतात आली तेव्हा तिचे जंगी स्वागत करण्यात आले होते. १९७३ साली भारत सरकारने तिला पद्म विभूषण देऊन तिचा गौरव केला.

नेलीचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हे योगदान अविस्मरणीय आहे. तिच्या लढाऊ आणि सत्यप्रिय, न्यायप्रिय बाण्यामुळे ती सदैव आपल्यासमोर एक प्रेरणास्त्रोत बनून राहील.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

भारतीयांबद्दल आस्था असलेला व्हाईसरॉय…!

Next Post

या कॉमेडी ग्रुपने आपलं इंटरनेट कॉर्पोरेट्सच्या घशात जाण्यापासून वाचवलं आहे

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

या कॉमेडी ग्रुपने आपलं इंटरनेट कॉर्पोरेट्सच्या घशात जाण्यापासून वाचवलं आहे

३० वर्ष रोज १५ किमी जंगलातून वाट काढत हा पोस्टमन दुर्गम भागातील लोकांना पत्र पोचवतोय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.