The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगातला पहिला सायबॉर्ग – जन्मजात रंगांधळा होता पण आता रंगांना ‘ऐकू’ शकतो

by द पोस्टमन टीम
10 January 2026
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


ऊन-पावसाचा खेळ सुरु असताना अचानक सप्तरंगी इंद्रधनुष्य आकाशात दिसलं की कित्ती छान वाटतं. त्यातल्या तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा या रंगांकडे बघत राहावेसे वाटते.

आता विचार करा जर संपूर्ण जग तुम्हाला फक्त काळ्या आणि पांढऱ्या रंगातच दिसलं असतं तर? झाडांची पाने काळी, गुलाब काळे, आकाश पांढरे, आपल्या इंद्रधनुष्यात पण फक्त काळे आणि पांढरे रंग. कित्ती कंटाळवाणं वाटलं असतं ना. पण काही लोक असतात जे जन्मत: रंगांधळे असतात. त्यांना पांढरा आणि काळा यापलीकडेही रंग असतात हेच माहिती नाही.

अशाच एका व्यक्तीचे नाव आहे नील हार्मिसन. नीलला रंग दिसत नाहीत आणि त्याच्या या जन्मजात दोषावर कुणालाही उपचार करता आले नाहीत. फक्त रंग दिसत नाहीत एवढीच नीलची समस्या आहे. निसर्गाने दिलेल्या या वैगुण्यावरही मात करत नीलने या जगाशी जुळवून घेतले. पण रंग पाहण्याची नीलची इच्छा काही केल्या शमत नव्हती. त्याने अनेक डॉक्टरांकडे चकरा घातल्या पण उपयोग झाला नाही. शेवटी, तंत्रज्ञानाची तर आपल्याला काही मदत होईल या आशेने त्याने शोध सुरू केला. शेवटी ज्या तंत्रज्ञानाने आज माणसाला भल्याभल्या अडचणींवर मात करण्याची शक्ती दिली आहे ते तंत्रज्ञान नीलच्या समस्येसाठीही उपयोगी ठरलं.

रंग न दिसणारा नील आता या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रंगांना ऐकू लागला. पण, हे कसं शक्य झालं? यासाठी नीलला कोणत्या कोणत्या त्रासातून जावं लागलं? हे तंत्रज्ञान त्याला कशा प्रकारे वरदान ठरत आहे? 

नील हार्मिसनचा जन्म २७ जुलै १९८४ रोजी लंडन येथे झाला. नील थोडा मोठा झाल्यानंतर त्याच्या आई-वडिलांना हे लक्षात आलं की नीलला कुठलेच रंग ओळखता येत नाहीत. रंगाच्या सहाय्याने त्याला काही शिकवण्याचा प्रयत्न केला तर त्याला काहीच कळत नसे. इतर बाबतीत नील सर्वसामान्य मुलांसारखाच होता पण, त्याला फक्त काळा आणि पांढराच रंग ओळखू येत असे.



त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या या समस्येवर काही उपचार करता येतात का यासाठी खूप चौकशी केली पण नीलच्या या समस्येवर वैद्यकीय क्षेत्रात तर काहीच उपाय नव्हता. अर्थात, यामुळे नीलच्या आयुष्यावर काही फार मोठा परिणाम झाला असे नाही.

रंग ओळखताही येत नाहीत अशा नीलला चित्रकलेची आवड होती. त्याने फक्त काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा वापर करून चित्रे काढली आहेत. त्याच्या या कमतरतेचा त्याने कधीच बाऊ केला नाही.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

अनेक डॉक्टरांनी नीलच्या या समस्येसमोर आपली हतबलता व्यक्त केली. ऑपरेशन केले तरी नीलच्या या समस्येवर काही परिणाम होणार नाही असे डॉक्टरांचे म्हणणे होते. मग नीलने तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा विचार केला. सायबरनेटीक्समध्ये एक्स्पर्ट असणाऱ्या अ‍ॅडमची त्याने भेट घेतली. त्याने अ‍ॅडमला आपली समस्या सांगितली आणि त्याला रंग पाहता येतील असे एखादे मशीन बनवून देण्याविषयी विचारणा केली.

खरे तर अ‍ॅडमसाठीही हे एक आव्हानच होते, पण त्याने नकार दिला नाही. त्याच्याकडून होकार ऐकल्यावर नीलला थोडा दिलासा मिळाला. रंग पाहण्याची आपली इच्छा नक्कीच पूर्ण होणार याबद्दल त्याला खात्री वाटू लागली.

अ‍ॅडमने त्याला सांगितले की रंग पाहता येणार नाही पण ऐकता येतील असे काही यंत्र बनवता येईल. तेव्हा नीलने त्याला सूचना दिली की हे यंत्र शक्यतो एखाद्या अँटीनासारखे असले पाहिजे जे त्याच्या डोक्यात बसवता येईल.

जसे अनेक कीटकांना अँटिनासारखी सोंड असते त्याच्या सहाय्याने ते अनेक गोष्टींचा अंदाज बंधू शकतात अगदी त्याचप्रमाणे.

अ‍ॅडम आणि नील यांनी शेवटी एक अँटिना बनवलाच जो नीलला वेगवेगळ्या रंगांचे सूचक म्हणून वेगवेगळे आवाज काढून दखवत होता. अशा आवाजाच्या सहाय्याने त्याने हे रंग ओळखण्यास सुरुवात केली.

हा अँटिना बसवण्यासाठी नीलच्या डोक्याचे ऑपरेशन करावे लागले. डोक्याच्या मागच्या बाजूला हा अँटिना बसवण्यात आला. हे कामही खूपच जोखमीचे होते. पण नीलच्या इच्छेपुढे सगळे हतबल ठरले. डॉक्टरांनी ऑपरेशन करून हे यंत्र त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला बसवून दिले. २००४ सालापासून नील या अँटिनासोबत वावरत आहे. सुरूवातीला त्याला याची सवय होईपर्यंत थोडा त्रास झाला. तो अँटिना त्याच्या डोक्यातील हाडांशी जुळवून घेईपर्यंत त्याला सतत त्याठिकाणी वेदना होत असत. हळूहळू ते यंत्र हा नीलच्या शरीराचा एक अविभाज्य भाग बनले.

हा अँटिना जोडल्यानंतर नीलचे आयुष्य आरपार बदलून गेले. त्याला रंग ऐकू येऊ लागले. ज्यामुळे त्याला वेगवेगळ्या रंगातील फरक कळू लागला. त्याच्या अँटिनामध्ये एक सेन्सर लावण्यात आला आहे, हा सेन्सर वेगवेगळ्या रंगानुसार वेगवेगळे ध्वनी तयार करतो. विशिष्ट ध्वनी ऐकल्यानंतर नीलला त्याच्यासमोर ठेवण्यात आलेला रंग कोणता आहे हे लगेच ओळखता येते. त्याने अनेक चित्रकारांची चित्रे याच पद्धतीने पहिली. आता तो स्वतः देखील रंग वापरून पेंटींग्ज बनवू शकतो.

नीलच्या डोक्यावरील हा अँटिना फक्त रंगच ओळखतो असे नाही तर इन्फ्रारेड अल्ट्रा व्हायलेट किरणे, जी समान्य माणसाला कधीच दिसत नाहीत त्यांचीही त्याला जाणीव होते.

भूकंपाचे सौम्य झटके जे आपल्याला जाणवू शकत नाहीत. त्याचीही जाणीव नीलला होते. नीलचा हा अँटिना आता इंटरनेट आणि ब्ल्यूटूथशी देखील जोडला जाऊ शकतो. या तंत्रज्ञानाने नीलचे आयुष्य आता बरेच सोपे झाले आहे. त्यामुळे त्याला कधीच यापासून दूर जावेसे वाटत नाही.

या अँटिनामुळेच नीलला पहिला सायबॉर्ग म्हणून ओळखले जाते.

आता नीलला या अँटिनाचा फायदा होत असला तरी याचे काही तोटेही आहेत. पहिला तोटा हा आहे की डोक्यात बसवलेल्या या अँटिनामुळे नीलला पासपोर्ट मिळत नाहीये.

इंग्लंडच्या पासपोर्ट ऑफिसच्या नियमानुसार पासपोर्ट फोटोसाठी सामान्य चेहरा असावा लागतो. त्या फोटोमध्ये चष्मा असूनही चालत नाही. त्यामुळे नीलच्या डोक्यावरील हा अँटिना पासपोर्टसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. यासाठी त्याने न्यायालयात धाव घेतली. न्यायालय आणि नील यांच्यातील ही लढाई बरीच काळ चालली शेवटी ब्रिटनच्या न्यायालयाने हे मान्य केले की नीलच्या डोक्यावरील अँटिना म्हणजे त्याचाच एक अवयव आहे.

थोड्याफार प्रमाणात त्रास जरी होत असला तरीही तंत्रज्ञानातील ही प्रगती नीलसारख्या लोकांसाठी एक वरदान ठरत आहे, हे मात्र नक्की!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

पाकिस्तानने फक्त आपल्याच नाही तर जगभरातल्या लोकांच्या डोक्याचा ताप वाढवून ठेवलाय

Next Post

‘झी फाइव्ह’वर असलेले ‘हे’ चित्रपट अजिबात चुकवू नका..!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

'झी फाइव्ह'वर असलेले 'हे' चित्रपट अजिबात चुकवू नका..!

सशांची शिकार करायला गेलेला नेपोलियन सशांकडून स्वतःच शिकार होता होता राहिला..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.