The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नासाचं हे अवकाशयान चक्क सूर्याला स्पर्श करून आलंय..!

by द पोस्टमन टीम
18 December 2021
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


रामायण आणि महाभारत या दोन महाकाव्यांतील अनेक कथा आपल्याला लहानपणापासून सांगितल्या जातात. त्यामुळं हनुमानानं आपल्या बालपणी सूर्याला फळ समजून खाण्याचा प्रयत्न केला होता, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. मला देखील माझ्या लहानपणी ही गोष्ट सांगितली गेली होती. मात्र, शाळेत भूगोलाच्या पुस्तकात सूर्य नेमका काय प्रकार आहे हे समजलं.

सूर्य हा कुणी देव वगैरे नसून साधारण साडे चार अब्ज वर्षांचा एक तारा आहे. हायड्रोजन आणि हेलियमचा हा चमकणारा गोळा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. आपल्या पृथ्वीपासून सुमारे ९३ दशलक्ष मैल (१५० दशलक्ष किलोमीटर) अंतरावर असलेल्या या ताऱ्याच्या तापमानामुळं त्याच्या आसपास कुणीही जाऊ शकत नाही. मात्र, मानवाची इच्छाशक्ती इतकी प्रबळ आहे की सूर्याच्या तापमानाला देखील मात देण्याचा आपला विचार सुरू आहे.

नासा आणि इतर आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्था आपापल्या अवकाशयानांच्या ताफ्यांसह चोवीस तास सूर्याचं निरीक्षण करण्यात व्यस्त आहेत. विशेष उपकरणांचा वापर करून सूर्याचं वातावरण, त्याचा पृष्ठभाग या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्याचा प्रयत्न अंतराळ संस्था करत आहेत. यापैकी नासाच्या हाताला यश मिळालं असून सूर्यमालेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एखादी वस्तू सूर्याच्या एकदम जवळ जाण्यात यशस्वी ठरली आहे.

नासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ या यानानं सूर्याच्या ‘कोरोना’ नावाच्या वातावरणीय स्तरातून तेथील कण आणि चुंबकीय क्षेत्रांचे नमुने घेतले आहेत. नासाचं हे मिशन नेमकं काय आहे? आणि मिशनचा भाग म्हणून सूर्याजवळ जाण्यास पार्करला कुठल्या आव्हानांचा सामना करावा लागला याबाबत हा लेख..

पार्करला मिळालेलं यश सौर विज्ञान संशोधनामध्ये मैलाचा दगड ठरू शकतो. चंद्रावर लँडिंग करून शास्त्रज्ञांनी ज्या प्रकारे तेथील भूमीचा आणि वातावरणाचा अभ्यास केला अगदी तसाच काहीसा विचार सूर्याबाबत केला जात आहे. आता तुम्ही म्हणाल, बाई चंद्राचं वातावरण थंड आहे एकवेळ ते सहन करता येईल पण सूर्याच्या आगीत कोण जाईल मरायला? सूर्यावर आपण वास्तव्य करू शकत नाही. हे जरी सत्य असलं तरी त्याचा जास्त अभ्यास केल्यास सूर्यमालेवरील त्याच्या प्रभावाबद्दल गंभीर माहिती उघड होण्यास मदत होईल हे नक्की. हाच हेतू डोळ्यांसमोर ठेवून १२ ऑगस्ट २०१८ रोजी नासानं ‘लिव्हिंग विथ अ स्टार’ या मोहिमेअंतर्गत ‘पार्कर सोलार प्रोब’ हे अंतराळ यान लॉन्च केलं होतं.



२०१९ मध्ये, पार्करनं शोधून काढलं की, पृथ्वीवरून दिसणारी सौर वाऱ्यांतील मॅग्नेटिक झिग-झॅग संरचना (याला शास्त्रज्ञ स्विचबॅक म्हणतात) सूर्याच्या एकदम जवळ आहे. मात्र, त्यांची निर्मिती कशी आणि कुठे होते हे अद्याप एक रहस्यच आहे. याच रहस्याच्या शोध घेण्यासाठी पार्कर सोलर प्रोबनं सूर्याच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न केला.

पार्कर सोलर प्रोबनं सूर्याभोवतीच्या ‘कोरोना’ या थरामध्ये प्रवेश केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ‘कोरोना’ या शब्दाची पृथ्वीवर इतकी दहशत पसरली आहे की, त्याच्या उच्चारानं देखील भीती वाटू लागते. सूर्याभोवती असलेल्या वातावरणाच्या थरालादेखील कोरोना हे नाव देण्यात आलं आहे. कारण, हा थर देखील पृथ्वीवरील कोरोना इतकाच घातक आहे.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

सूर्याजवळील कोरोनाचं तापमान सुमारे १.१ दशलक्ष अंश सेल्सिअस इतकं आहे. अशा उष्णतेत पृथ्वीवर आढळणारे सर्व पदार्थ अगदी काही सेकंदात वितळू शकतात. या उष्णतेचा सामना करण्यासाठी शास्त्रज्ञांनी पार्कर अवकाशयानामध्ये विशेष तंत्रज्ञानाची हीट शिल्ड बसवलेली आहे. ही शिल्ड लाखो अंश तापमानातही सूर्याच्या उष्णतेपासून अवकाशयानाचं संरक्षण करण्याचं काम करत आहे.

सूर्याच्या वातावरणातून अचूक आणि स्पष्ट माहिती मिळावी, म्हणून पार्करच्या समोरील कपमध्ये हीट शिल्ड लावलेली नाही. टंगस्टन, निओबियम, मॉलिब्डेनम आणि सफायर यांसारखे उच्च वितळण बिंदू असलेले पदार्थ वापरून पार्करच्या कपची निर्मिती करण्यात आली आहे. नासाची मालकी असलेल्या या यानाच्या बांधणीसाठी ‘हार्वर्ड युनिव्हर्सिटी’ आणि ‘स्मिथसोनियन सेंटर फॉर ॲस्ट्रोफिजिक्स’ या संस्थांतील तज्ज्ञांसह निष्णात इंजिनियर्सची एक मोठी टीम कार्यरत होती.

अजूनही ही टीम पार्कर प्रोबमधील महत्त्वाच्या उपकरणांची देखरेख करण्यात गुंतलेली आहे. स्पेसक्राफ्टच्या कपमध्ये गोळा केलेल्या डेटाच्या विश्लेषणातून असं दिसलं आहे की, २८ एप्रिल रोजी पार्कर प्रोबनं सूर्याच्या वातावरणातील बाह्यभाग तीन वेळा ओलांडला होता. त्यातील एकदा तर किमान पाच तासांसाठी यान बाह्यभागाच्या आतमध्ये थांबलं होतं. ‘फिजिकल रिव्ह्यू लेटर’ या जर्नलमध्ये सोलर प्रोबच्या या कामगिरीची माहिती देण्यात आली आहे.

पृथ्वीच्या जन्मापासून तिला प्रकाश आणि उष्णता देणार्‍या सूर्याबद्दल आतापर्यंत फारशी माहिती समोर आलेली नाही. विशेषत: सूर्याच्या रचनेबाबत सध्या जी माहिती उपलब्ध आहे, ती प्रामुख्यानं हायपोथेटिकलचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, सूर्याच्या बाह्य वातावरणाचं तापमान दोन दशलक्ष अंश सेल्सिअसचं तर, सूर्याचं तापमान पाच हजार ५०० अंश सेल्सिअस असल्याचं म्हटलं जातं. मात्र, हा देखील शास्त्रज्ञांनी लावलेला अंदाजचं आहे.

ॲस्ट्रोफिजिसिस्ट्सचा असा अंदाज आहे, की सूर्याच्या उष्णतेमुळे त्याच्या सभोवताली चुंबकीय क्षेत्रं निर्माण होतं. ज्यामुळं सूर्याच्या तापमान इतक्या उच्च पातळीवर गेलेलं आहे. परंतु सूर्याचं वातावरण चुंबकीय क्षेत्रातील ऊर्जा आतमध्ये कशी शोषून घेतं, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळं सूर्याशी संबंधित विविध रहस्य उलगडण्यासाठी पार्कर सोलर प्रोबचं सूर्याच्या वातावरणात झालेला प्रवेश अतिशय महत्त्वाचा आहे.

नासाचं हे अंतराळ यान सूर्यापासून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आणि वेगवान सौर वाऱ्यांबद्दल अधिक माहिती गोळा करण्यात मदत करत आहे. विशेष म्हणजे आपल्यापैकी अनेकांना ही गोष्ट माहिती नाही की, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आणि वेगवान सौर वारे हे दोन्ही घटक पृथ्वीवर थेट परिणाम करतात. त्यांच्यामुळं कधीकधी पृथ्वीवरील पॉवर ग्रीड्स आणि रेडिओ कम्युनिकेशनमध्ये समस्या निर्माण होतात.

पार्कर सोलार प्रोबच्या हाती सूर्याच्या वातावरणीय स्तरातील कण आणि चुंबकीय क्षेत्रांचे नमुने आले असले तरी हा या मोहिमेचा शेवट नाही. पुढील काही वर्ष पार्कर सूर्याच्या जवळ फिरत राहणार आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी २०२२ अखेरीस पार्कर सूर्याच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहे. पार्कर सूर्याच्या त्रिज्येपासून ३.८३ दशलक्ष मैल अंतरावर पोहोचणार आहे. त्यामुळं शास्त्रज्ञांच्या हाती येत्या काळात मोठी माहिती लागण्याची अपेक्षा आहे. तेव्हा या मोहिमेतून आणखी काय माहिती समोर येते हे पाहणं औत्सुक्याचं असेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

फिलिपिन्समध्ये आलेल्या या वादळाने अक्षरशः मृत्युचं थैमान घातलंय!

Next Post

आपल्याला वर्ल्डकप फायनलमधून घरी पाठवणाऱ्या रिकी पॉन्टिंगवरचा राग अजूनही गेला नाही…!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

आपल्याला वर्ल्डकप फायनलमधून घरी पाठवणाऱ्या रिकी पॉन्टिंगवरचा राग अजूनही गेला नाही...!

जॉनी लीव्हरने हृतिक रोशनच्या लिव्हरचं दुखणं जिझसचं नाव घेऊन दूर केलं होतं म्हणे..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.