The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हा रहस्यमयी मोनोलिथ पोहोचलाच कसा..?

by द पोस्टमन टीम
13 December 2020
in विश्लेषण
Reading Time:1min read
0
Home विश्लेषण

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब

एक रहस्यमय मोनोलिथ किंवा स्मारक याबद्दलचे लोकांना असणारे कुतूहल इंटरनेटद्वारा जगभर पसरलेले आपण पाहिले असेलच. हे मोनोलिथ अमेरिकेतील युटा या राज्यात दिसले नंतर तसेच एक मोनोलिथ रोमानिया आणि कॅलिफोर्नियामध्ये देखील आढळून आले. नंतर या रहस्यमयी मोनोलिथने जगभरात इंटरनेट वळती कब्जा केला आणि यावरती लोकांनी आपली अशी अनेक मते दर्शवली. काहींना वाटले हे मोनोलिथ म्हणजे एक अफवा आहे तर काही म्हणत होते की मोनोलिथ ही एक कलाकृती आहे तर काही एलियन्सने ही कलाकृती आपल्या पृथ्वीवर आणली असल्याचे मत व्यक्त करत होते.

मोनोलिथ म्हणजे काय?

मोनोलिथ एका विशाल दगडापासून किंवा खडकापासून बनलेले असतात, बऱ्याचवेळा दगडांची झीज किंवा धूप झाल्याने तयार होतात जे अतिशय कठोर आणि घनु रुपांतर किंवा अग्नेय खडकापासून बनतात.

मोनोलिथ हा शब्द पुरातन संस्कृतीशी संबंधित आहे.मोनोलिथ म्हणजे दगडी अखंड स्तंभ झोपेपूर्वी वास्तुकलेत वापरला जात असत. मोनोलिथ हा शब्द एकोणिसाव्या शतकात ‘मोनोलिथोस’ या ग्रीक शब्दापासून ‘मोनोलिथ’ हा फ्रेंच शब्द तयार झाला आणि हाच शब्द इंग्रजीमध्ये वापरला जाऊ लागला. ‘मोनो’ या शब्दाचा अर्थ अखंड असा होतो तर लिथोस म्हणजे ‘खडक’ किंवा  ‘दगड’ असा होतो.

सध्या चर्चेत असणारे हे ‘मोनोलिथ’ सर्वात आधी यूएसच्या युटा या राज्यात आढळून आले.

१८ नोव्हेंबर रोजी युटा राज्यातील दुर्गम दक्षिण पूर्वेकडील भागात दिसून आले. उटा राज्यातील काही कर्मचारी बिग हॉर्न शेप्सची हेलिकॉप्टरमधून मोजणी करत असताना एका दुर्गम भागात मध्यभागी जवळजवळ बारा फूट उंच धातूचा एक मोनोलिथ आढळून आला हा मोनोलिथ तेथे कसा आला? कुठून आला? कोणी आणला? याची कोणालाच कल्पना नाही.

यानंतर उटा राज्याच्या सार्वजनिक सुरक्षा विभागाने याविषयी अधिकृत निवेदनात हे मोनोलिथ एखाद्या कलाकाराने किंवा “२००१: स्पेस ओडिसी” या चित्रपटाच्या फॅनने याची स्थापना केली असावी असे मत व्यक्त केले.

“२००१: स्पेस ओडिसी” १९६८ मधील हा आर्थर सी क्लार्क यांनी लिहिलेला विज्ञानकल्पित चित्रपट आहे

हे देखील वाचा

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

मराठवाडी नेते, जनता अन् पंजाबचे शेतकरी…!

या चित्रपटामध्ये देखील बाह्य पार्थिव उत्पत्तीचा एक विशाल काळा मोनोलिथ दिसून येतो आणि मानवी उत्क्रांतीच्या मार्गावर कसा प्रभाव पडतो हे या चित्रपटात दिसून येते. त्यामुळेच उटा येथे सापडलेल्या मोनोलिथचा चित्रपटाशी संबंध जोडला जात आहे. १२ फूट उंच रचनेचा या शोधामुळे जगभरात कुतूहल वाढले लोक याबद्दल वेगवेगळे अंदाज बांधू लागले आणि बऱ्याच लोकांनी मोनोलिथला भेटही दिली.

एकीकडे लोक त्याबद्दल आपापले तर्क लावत होते आणि एक दिवस अचानक आश्चर्यकारकरीत्या हा मोनोलिथ गायब झाला. त्या मोनोलिथला भेट देणाऱ्या रॅनबॅचर या पायलटने मोनोलिथ अदृश्य झाल्याची बातमी युटाच्या मीडियाला दिली.

युटा राज्यातील ‘भूमी व्यवस्थापन विभागाने’ देखील हा मोनोलिथ ही खाजगी मानली जाणारी मालमत्ता आम्ही हटवली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे हा मोनोलिथ आला कुठून आणि परत कुठे गेला याबद्दल सगळ्यांनाच आश्चर्य वाटू लागले.

यानंतर २६ नोव्हेंबर म्हणजेच युटामधून मोनोलिथ गायब होण्याआधी एक दिवस असाच एक धातूचा खांब रोमानियामध्ये आढळून आला आणि काहीच दिवसांत रुमानियामधून देखील तो गायब झाला.

युटा  आणि रोमानिया नंतर काही दिवसांतच कॅलिफोर्नियाच्या डोंगरावरती एक ‘मोनोलिथ’ तेथे आढळले. त्या रचनेला काही तज्ञांनी भेट दिली तेव्हा युटामध्ये आढळून आलेल्या मोनोलिथपेक्षा हे मोनोलिथ काही फुट लहान असल्याचे लक्षात आले.

तर सर्वात आधी युटा त्यानंतर रोमानिया आणि नंतर कॅलिफोर्नियामध्ये आढळून आलेल्या रहस्यमय ‘मोनोलिथ’मुळे सर्व जगभर याविषयी कुतूहल पसरले आहे.

अद्यापही कोणीही या मोनालीच्या स्थापनेची जबाबदारी स्वीकारलेली नाही तथापि काही अधिकारी आणि तज्ज्ञ व्यक्तींच्या मते ही रचना “२००१: स्पेस ओडिसी ” या चित्रपटाद्वारे प्रेरित होऊन कोणी कलाकाराने याची स्थापना केली असल्याचे म्हटले जात आहे.

युटामध्ये या मोनोलिथची स्थापना कोणी केली हे जरी आपल्यासाठी रहस्य असले तरी हे मोनोलिथ कोणी काढले हे रहस्य मात्र उलगडत असल्याचे दिसत आहे.

ADVERTISEMENT

हे मोनोलिथ कोणा एलियन्सकडून नाही तर आपल्यासारख्याच काही माणसांनी काढल्याचे फोटोज आणि व्हिडिओज बाहेर येताना दिसत आहेत.

रॉस बर्नाल्ड नावाच्या एका फोटोग्राफरने त्या मोनोलिथला भेट दिली असता तेथे घडलेल्या घटनेचे फोटोज इंस्टाग्रामवर शेअर करत घडलेल्या पूर्ण घटनेचे वर्णन त्याने आपल्या कॅप्शनमध्ये केलेले आहे. यात तो सांगतो,

“मी आणि माझे तीन मित्र सहा तासांचा प्रवास करून मोनोलिथकडे जाणाऱ्या पायवाटेने तिथे पोहोचलो.  मोनोलिथजवळ आम्ही पोहोचल्यानंतर मी काही फोटोज घेतले आणि थोडावेळ ब्रेक घेऊन सेटिंग बदलण्याचा विचार करत असतानाच आम्हाला खोऱ्यातून आवाज ऐकू येऊ लागला.थोड्याच वेळात तेथे चार लोकांची टोळी आली तेव्हा साधारण रात्रीचे ८:४० झाले असतील. ते त्या मोनोलिथच्या भोवती गोल करून उभे राहिले त्यांच्यातील दोघे पुढे आले आणि त्यांनी मोनोलिथला धक्के देण्यास सुरुवात केली. त्यांच्यातील एक पुढे आला आणि त्याने ए मोनोलिथ लाइक जोरात धक्का दिला तसे ते खालच्या बाजूला वाकले. तो त्याच्या बाकी मित्रांकडे बघून ओरडला ‘हे खाली पाडण्यासाठी त्यांना कोणत्याच साधनांची गरज नाही’. नंतर या चौघांनी ते मोनोलिथ जवळजवळ जमिनीकडे ढकलले होते आणि ते अजून धक्के देणार इतक्यात ते मोनोलिथ जोरदार धमाका करत जमिनीवर कोसळले”.

या घटनेनंतर ३४ वर्षे अँन्ड्री लुईस नावाच्या स्लॅकलाईन परफॉर्मर आणि ऍडव्हेंचर स्पोर्ट्समनने “आम्ही उटा मोनोलिथ काढला” या नावाने एक व्हिडिओ त्याच्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट केला आहे.

फोटोग्राफर रॉस बर्नाल्डने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोजमध्ये आणि अँन्ड्री लुईस या स्लॅकलाईन परफॉर्मरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बरेच साम्य आणि जवळजवळ सारख्याच प्रतिमा दिसून येत आहेत. परंतु याबद्दल कोणीही आणखी स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे हा मोनोलिथ एका ठिकाणाहून गायब होऊन दुसरीकडे कसा पोहोचला हे एक रहस्यच आहे.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Share this:

  • Twitter
  • Facebook

Related

ShareTweetShare
Previous Post

भारतातून चीनमध्ये गेलेल्या या बौद्ध भिक्खूने मार्शल आर्ट्सचा शोध लावलाय

Next Post

गांधीजींना ‘महात्मा’ पदवी देणारे स्वामी श्रद्धानंद!

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता
विश्लेषण

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

20 January 2021
जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?
विश्लेषण

जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

16 January 2021
मराठवाडी नेते, जनता अन् पंजाबचे शेतकरी…!
ब्लॉग

मराठवाडी नेते, जनता अन् पंजाबचे शेतकरी…!

6 December 2020
व्ही पी सिंहांनी मंडल आयोगाच्या तरतुदी लागू करण्याची घोषणा केली आणि संपूर्ण देशात आंदोलन पेटलं
राजकीय

व्ही पी सिंहांनी मंडल आयोगाच्या तरतुदी लागू करण्याची घोषणा केली आणि संपूर्ण देशात आंदोलन पेटलं

2 December 2020
जगातले सर्वात जास्त तेलाचे साठे असूनही या देशातल्या लोकांचे खायचे वांधे आहेत..
ब्लॉग

जगातले सर्वात जास्त तेलाचे साठे असूनही या देशातल्या लोकांचे खायचे वांधे आहेत..

2 December 2020
कमळाच्या देठापासून कापड बनवण्याच्या हिच्या कल्पनेची पंतप्रधानांनीसुद्धा दखल घेतलीय
विश्लेषण

कमळाच्या देठापासून कापड बनवण्याच्या हिच्या कल्पनेची पंतप्रधानांनीसुद्धा दखल घेतलीय

10 November 2020
Next Post
गांधीजींना ‘महात्मा’ पदवी देणारे स्वामी श्रद्धानंद!

गांधीजींना 'महात्मा' पदवी देणारे स्वामी श्रद्धानंद!

गंगेच्या किनाऱ्यावर मजूरांचे दुःख ऐकून स्वामी विवेकानंद रडले होते!

गंगेच्या किनाऱ्यावर मजूरांचे दुःख ऐकून स्वामी विवेकानंद रडले होते!

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  • Trending
  • Comments
  • Latest
दोन भावांच्या टोकाच्या वादातून ‘आदिदास’ आणि ‘पुमा’ या जगप्रसिद्ध ब्रँड्सचा जन्म झालाय!

दोन भावांच्या टोकाच्या वादातून ‘आदिदास’ आणि ‘पुमा’ या जगप्रसिद्ध ब्रँड्सचा जन्म झालाय!

21 April 2020
शास्त्रज्ञांच्या मते पुढची जागतिक महामारी कोंबड्यांमुळे पसरेल..!

शास्त्रज्ञांच्या मते पुढची जागतिक महामारी कोंबड्यांमुळे पसरेल..!

20 June 2020
हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

11 January 2021

अफगाणी सैनिकांसाठी युद्धभूमीवर काळ बनलेले हरी सिंह ‘नलवा’

16 January 2021
भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

6
म्हणून हिटलरने त्याचा देह त्याच्या धर्माप्रमाणे दफन न करता हिंदूंप्रमाणे जाळण्याचे आदेश दिले होते

म्हणून हिटलरने त्याचा देह त्याच्या धर्माप्रमाणे दफन न करता हिंदूंप्रमाणे जाळण्याचे आदेश दिले होते

3
“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

2
स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

2
हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

20 January 2021
जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

16 January 2021
हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

11 January 2021

पुणे करारावर सही करताना बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं..

4 January 2021

Recent News

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

20 January 2021
जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

16 January 2021

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!