The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एका ब्रिटीशाने बनवलेला रेडिओ भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनला होता

by द पोस्टमन टीम
29 March 2025
in इतिहास, विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


टीव्ही, डिश, केबल नेटवर्क, कंप्युटर, लॅपटॉप, मोबाईल आणि इंटरनेट आज आपल्याकडे मनोरंजनाची कित्येक साधने आहेत. आपल्याला आवडेल ते गाणं किंवा आवडती सिरीयल, फिल्म, वेबसिरीज अशा कित्येक गोष्टी आपल्या हाताशी पडलेल्या आहेत.

या सगळ्या मुबलक पसाऱ्यातून स्वतःला आवडेल ते आणि अभिरुची संपन्न असे मनोरंजनाचं मध्यम निवडणं आज आपल्या हाती आहे. मनोरंजनाच्या इतक्या साऱ्या पर्यायांपैकी नेमक्या कुठल्या साधनाची निवड करावी हा आपल्या समोरील प्रश्न आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसारानंतर मनोरंजनाची अशी अनेक साधने निर्माण झाली.

पण, सुमारे सत्तर वर्षापूर्वी आपल्याकडे इतक्या साधनांची उपलब्धता नव्हती. तेव्हा जे तंत्रज्ञान उपलब्ध होते त्यावरच अवलंबून राहावे लागत होते. घरात साधा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असणे ही देखील चैनीची बाब होती. अशा काळात सर्वांना परवडणारा आणि मनोरंजनाचा एकमेव आधार म्हणजे रेडिओ!

दुसऱ्या महायु*द्धात सैनिकांना आवश्यक सूचना वेळेवर पोहोचाव्यात म्हणून रेडिओचा वापर सुरु झाला. त्यानंतर रेडिओ सर्वसामान्य माणसासाठीही खुला झाला. भारतात आलेल्या मर्फी रेडिओने भारतीयांना काही सुखद आठवणी दिल्या आहेत, ज्या आजही अनेक भारतीयांच्या मनात रुंजी घालत आहेत. आज मनोरंजनाच्या अनेक साधनांच्या भाऊगर्दीत रेडिओचा जमाना मागे पडला असला तरी, रेडिओच्या आठवणी चिरकाल राहतील. सुरुवातीला रेडिओदेखील भारतीयांचा स्टेटस सिम्बॉल होता.



लाकडी ठोकळ्यात बसवलेला रेडिओ, त्याला वरच्या बाजूला असलेला अँटेना, स्टेशन ट्यून करणारे आणि आवाजाचे बटण – रेडिओचे हे रूप याची देही याची डोळा पाहिलेली एक पिढीही भारतात आहे.

ज्यांच्यासाठी रेडिओचे दिवस म्हणजे रम्य आठवणींचा कालखंड! कित्येकांच्या दिवसाची सुरुवात रेडिओवरील हार्मोनियमच्या ट्यूनने झाली असेल. रेडिओवरील विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेत कित्येकांची अभिरुची वृद्धिंगत झाली असेल. जुन्या लोकांना रेडिओ आणि त्यावरील कार्यक्रमांच्या आठवणीने आजही कातर व्हायला होतं!

१९६० आणि ७० च्या दशकात टीव्ही ही बड्या लोकांची चैन होती, तेव्हा सामान्य लोकांना जोडणारा एकच दुवा होता, तो म्हणजे रेडिओ! अनेकांच्या माजघरात मोठ्या दिमाखाने विराजमान झालेले हे यंत्र निव्वळ एक यंत्र नव्हते, तर बाहेरच्या जगाशी जोडणारा तो एक दुवा होता. त्याकाळात मर्फी रेडिओ आणि त्यावरील मर्फीचे आयकॉन असणारे छोट्या बाळाच्या चित्राने अनेकांना भुरळ घातली होती.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

रणबीर कपूरच्या बर्फी चित्रपटातून आपल्याला याची झलक पाहायला मिळालीच आहे. रणबीरच्या आईला मर्फी मुन्नासारखा मुलगा हवा असतो. मर्फीशी जुळणारा शब्द बर्फी – आणि हेच नाव ती आपल्या मुलालाही देते. बर्फीतील हा एक किस्सा मर्फीशी सामान्य माणसाची नाळ कशी जुळली होती, हे जाणण्यास पुरेसा आहे.

मर्फी रेडिओची स्थापना फ्रँक मर्फी आणि इ. जे. पॉवर यांनी १९२९ साली केली. सुरुवातीला कंपनी ब्रिटीश सैन्यासाठी हे रेडिओ बनवत असे. त्यानंतर स्वतः फ्रँक मर्फीला वाटले की, रेडिओ हे एक सहज सुलभ यंत्र बनले पाहिजे. जे कुणाही सामान्य माणसाला सहज वापरता येईल आणि त्याने मर्फी रेडिओचा ब्रँड बाजारात आणला.

कुटुंबातील प्रत्येकाला तो वापरता यावा आणि त्याची मजा घेता यावी, असे मला वाटत होते, असे फ्रँक मर्फीने एका मुलाखतीत म्हंटले होते. म्हणूनच मर्फीचे रेडिओ वापरण्यास आणि हाताळण्यास सोपे असतील याकडे मी विशेष लक्ष दिल्याचे तो म्हणतो. १९४८ च्या सुमारास म्हणजे भारत स्वतंत्र होण्यापूर्वी हा ब्रँड भारतात दाखल झाला.

बातम्या सांगणारा आणि मनोरंजन करणारा हा छोटेखानी रेडिओ लवकरच भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनला. रस्त्यावर घोळक्याने जमा होऊन लोकं रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आणि गाणी ऐकत असत, असे किस्से मर्फीच्या या आठवणीत रमणारे अनेक जण सांगतात. अगदी १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्याच्या रात्री पंडित नेहरूंनी दिलेले भाषणही याच रेडिओने प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहोचवले.

रेडिओवरून प्रसारित होणारे  बिनाका गीतमालासारखे कित्येक कार्यक्रम त्याकाळी लोकप्रिय होते.

नेमक्या कालावधीत आणि अचूक वेळेवर प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमांमुळे घरातील प्रत्येक व्यक्तीला याची आतुरता असायची. विशेष म्हणजे गृहिणींपासून वयोवृद्ध आणि लहान मुलांपर्यंत, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी काही ना काही खास मनोरंजनासह माहिती देणारे कार्यक्रमांची यावर रेलचेल असे. आकाशवाणीचे हे दिवस आठवताना आजही आपल्या घरातील वडीलधारी माणसे कशी भावूक होऊन जातात हे आपणही अनुभवले असेलचं.

विशेष म्हणजे पार्लेच्या बिस्कीट पुड्यावरील छोट्या मुलीच्या चित्राने जशी सर्वांना भुरळ घातली, अगदी तशीच जादू या मर्फी रेडिओवरील छोट्या मुलाच्या चित्राने केली होती. या चित्रातील हा छोटा मुलगा, ज्याचे केस ऐटदार पद्धतीने कानांपर्यंत रुळत आहेत आणि ओठाच्या शेजारी गालवर बोट ठेवून हा मुलगा कुठल्याशा स्वप्नरंजनात मग्न आहे, या चित्राने तर कित्येकांना अक्षरश: वेड लावले होते.

बर्फी चित्रपटामधील रणबीर कपुरची आई – जिने मर्फीने प्रेरित होऊन आपल्या मुलाचे नाव बर्फी ठेवले – म्हणजे या छोट्याच्या चित्राने मोहित झालेल्या प्रत्येक सामान्य भारतीयाची प्रतिनिधी वाटते. या छोट्या मुलाने नंतर भिक्खू संघाची दीक्षा घेतली आणि त्याही नंतर त्याने प्रसिद्ध अभिनेत्री मंदाकिनीशी विवाह केला ही एक वेगळी कथा होऊ शकेल. पण, या जाहिरातींच्या आठवणी सांगताना त्यांनाही भरून येते.

प्रसिद्ध गायक आणि भारतीयांच्या गळ्यातील ताईत असणारे गायक मोहम्मद रफी यांनी मर्फीची जिंगल ट्यून गायली होती. त्यांच्या मोहक आवाजातील मर्फीच्या या ट्यूनने देखील रसिकांना संमोहित केले होते. “मर्फी घर घर की रौनक, तरह तरह के मर्फी रेडिओ, ला देते है घर में जान” अशी त्या ट्यूनची शब्दरचना होती. ही धून रेडीओवरूनच प्रसारित होणाऱ्या जाहिरातीत वाजत असे.

एका छापील जाहिरातीत लाजरी शर्मिला टागोर ग्राहकांना यावर्षीच्या दिवाळीला मर्फी रेडिओ घेऊन ही दिवाळी अधिक रोशन करण्याचा लाडिक आग्रह करत आहे. तिच्या शेजारी मर्फीचा तो लाडका आयकॉनही आहेच. वर्तमानपत्रातील मर्फीची ही जाहिरात पाहून अनेक लहानग्यांनी त्याकाळी दिवाळीला आपल्याकडेही मर्फीचा रेडिओ हवा, असा बालहट्ट केला असेल आणि त्या बालहट्टापुढे पालकांनीही सपशेल शरणागती पत्करली असेल.

शेवटी, मर्फीचा रेडिओ आम्हीही घेऊ शकतो, हे दाखवून देण्याची एक सुप्त उर्मीही त्यामुळे शमली असेल. अर्थात, आजच्या काळात मर्फी आणि रेडिओ हे दोन्ही शब्द तसे इतिहास जमा झाले असले तरी, त्यांच्या आठवणी मात्र कधीच इतिहासजमा होणार नाहीत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: murphy radio
ShareTweet
Previous Post

अवघ्या एकविसाव्या वर्षी हुतात्मा होत या वीराने व्हिक्टोरिया क्रॉसवर आपलं नाव कोरलं होतं

Next Post

भारताचे पहिले दलित क्रिकेटपटू ज्यांना आंबेडकरांनी देखील आदर्श मानलं होतं

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

भारताचे पहिले दलित क्रिकेटपटू ज्यांना आंबेडकरांनी देखील आदर्श मानलं होतं

या खलाशांनी जीवावर उदार होऊन जगाचा नकाशा बनवलाय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.