The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात तब्बल १२ कोटींची हाय सेक्युरिटी मर्सिडीज मेबॅक भरती झालीये

by द पोस्टमन टीम
28 December 2021
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


मर्सिडीज… बस नाम ही काफी है! मर्क म्हणजे क्लास, मर्क म्हणजे दिमाख, मर्क म्हणजे उच्चभ्रूपणाचा आविष्कार. तिच्या फिनिशपासून लोगोपर्यंत आणि स्टाईलपासून आलिशान इंटीरियर पर्यंत सगळ्याच बाबी सर्वसामान्यांच्या दृष्टीने कुतुहलाचा विषय असतात. हाय क्लास गाड्यांमध्येही तिच्या इतके कौतुक क्वचितच कुणाच्या वाट्याला येत असेल.

पण आज ज्या गाडीची इथे चर्चा आहे ती मुख्यत्वे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वापरली जाणार आहे. तीही थेट आपल्या पंतप्रधानांच्या दिमतीला. ही अत्याधुनिक गाडी म्हणजे मर्सिडीज मेबॅक एस६५० गार्ड. आरामदायी आसने, भरपूर लेगस्पेस, सीट्समध्ये मसाजर या सुविधांनी परिपूर्ण असलेल्या या गाडीचे महत्त्व सुरक्षेच्या कारणाने खासच आहे. अंदाजानुसार, या गाडीची किंमत साडेबारा कोटींपेक्षा जास्त आहे.

ही कार अनेक उत्तमोत्तम आणि हायटेक फीचर्सने सुसज्ज आहे. विशेष म्हणजे या कारवर बंदुकीच्या गोळ्या किंवा स्फोटके यांचा परिणाम होत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यामध्ये या चिलखती गाडीचा सामावेश करण्यात आलाय. याआधी त्यांच्या ताफ्यात रेंज रोव्हर व्होग आणि टोयोटा लॅण्ड क्रुझर या गाड्या होत्या. हैदराबाद हाऊसच्या बाहेर या नव्याकोऱ्या गाडीचे सगळ्यात आधी दर्शन झाले होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारतभेटीदरम्यान मोदी याच गाडीतून त्यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले होते.

मर्सिडीज मेबॅक एस ६५० गार्ड ही मुख्यतः अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षितता लक्षात घेऊन निर्माण करण्यात आली आहे. ही गाडी जगातील सर्वात महागड्या बुलेट प्रूफ गाड्यांपैकी एक आणि अशा प्रकारच्या गाड्यांमधील सर्वात सुरक्षित गाडी आहे. या गाडीला व्हीआर १० स्तराची सुरक्षा आहे.



पण ही गाडी अशीच कुणासाठीही मागवली जात नाही. आपल्या देशात अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजेच एसपीजी या गटाच्या खांद्यावर असते. त्यांच्याद्वारे पंतप्रधानांच्या ताफ्यातील नवीन गाड्या ऑर्डर केल्या जातात. जिच्यासाठी ही गाडी मागवायची त्या व्यक्तीला खरोखर एवढ्या सुरक्षित गाडीची गरज आहे का याची छाननी केली जाते आणि मगच नवीन गाडी ऑर्डर केली जाते. तसेच सुरक्षेच्या मुद्द्यातून एका वेळी अनेक गाड्या मागवल्या जातात. कुणी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची दिशाभूल करणे हा यामागील उद्देश असतो. यामुळे महत्त्वाची व्यक्ती नक्की कोणत्या गाडीत आहे हे पटकन लक्षात येत नाही.

या गाडीची वैशिष्ट्ये अशी :

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

इंजिन – ६.० लिटर ट्विन टर्बो व्ही१२

पॉवर – ५१६ बीएचपी

पिकअप टॉर्क – अंदाजे ९०० एनएम

वेग – १६० किमी प्रति तास (कमाल)

ही गाडी खऱ्या अर्थाने अभेद्य आहे. मजबूत तर इतकी, की तिची बॉडी स्टीलच्या गोळ्यांचाही प्रतिरोध करू शकेल. या गाडीच्या मटेरियलला २०१० एक्सप्लोजन प्रूफ व्हेइकलचं रेटींग मिळालेलं आहे. अगदी दोन मीटर अंतरावर १५ किलो टीएनटी स्फोटकांचा स्फोट झाला तरी ही गाडी सुरक्षित राहू शकते.

गाडीच्या खिडकीच्या काचांवर पॉलीकार्बोनेटचे कव्हरिंग आहे. गॅस अटॅक पासून बचाव करण्यासाठी गाडीच्या मागील केबिनला विशेष एअर सप्लाय युनिटची तजवीज आहे. या गाडीच्या इंधनाच्या टाकीवर विशेष कोटींग केलेले असल्याने अपघातानंतर इंधनाची टाकी फुटली तरी आपोआप त्यामधील छिद्रे भरली जातात.

बोईंग त्यांच्या ए एच ६४ अपाचे टँक अटॅक हेलिकॉप्टरसाठी जी सामग्री वापरते, त्याच सामग्रीपासून मर्सिडीज-मेबॅक एस ६५० गार्डची इंधन टाकी बनवली आहे. शिवाय या गाडीला फ्लॅट टायरचा पर्याय आहे. त्यामुळे गाडीचे टायर पंक्चर झाले तरी आत बसलेल्या व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी पोहचवता येते. या कारमध्ये केवळ दोनच सीट्स आहेत. त्यामुळे प्रवासादरम्यान थकवा आला तर प्रवाशांच्या हिशोबाने त्यात लेगरुम तयार करता येऊ शकते.

अर्थात, पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी हा अनुभव नवीन नाही. यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी बुलेटप्रूफ महिंद्रा स्कॉर्पिओने आणि २०१४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बीएमडब्ल्यू ७ सीरीज हाय-सिक्युरिटी वाहनाने प्रवास केलेला आहे. त्यात या नवीन गाडीची भर पडली आहे इतकेच.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

नासाने अवकाशात सोडलेल्या जेम्स वेब टेलिस्कोपमुळे अनेक प्रश्नांचा उलगडा होणार आहे..!

Next Post

ऑलिम्पिकमध्ये विजयाच्या जवळ पोहोचला असताना याने बदकांसाठी होडी थांबवली होती

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

ऑलिम्पिकमध्ये विजयाच्या जवळ पोहोचला असताना याने बदकांसाठी होडी थांबवली होती

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अन्नपूर्णा महाराणाने दिलेलं योगदान विसरून चालणार नाही

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.