The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

२८ वर्ष पोलिसांना न उलगडलेलं कोडं, १५ वर्षांच्या पोराने ‘गो प्रो’ कॅमेऱ्याच्या मदतीने सोडवलंय

by Heramb
23 October 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


प्रत्येकाला उत्तम रहस्यमयी कथा आवडतातच. पण जेव्हा एखाद्या रहस्याचा समाधानकारक शेवट होत नाही तेव्हा काय होते? अशीच एक घटना १९९२ साली ट्रान्सकॅनडा हायवेवर घडली होती. अनेकदा अशा रहस्यमयी घटनांचा उलगडा कधीच होत नाही. कित्येकदा उलगडा झाला तरी तो काही कारणास्तव दाबून ठेवला जातो. काही रहस्ये कित्येक वर्षांनंतर उलगडतात, अशाच एका घटनेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

मिल-बे येथील रहिवासी ‘जेनेट फॅरिस’ १९९२ साली अल्बर्टा येथे एका लग्नाला जात असताना अचानक गायब झाली होती. जेनेटला दोन अपत्यं आणि पाच नातवंडं होती. ती स्वतः ट्रान्सकॅनडा हायवेवर गाडी चालवत होती आणि क्रेडिट कार्डच्या रेकॉर्डनुसार ती गायब व्हायच्या आधी ट्रान्सकॅनडा हायवेवर सॅल्मन आर्ममध्ये गॅस भरण्यासाठी थांबली होती.

जेनेटचे कुटुंब आणि स्थानिक पोलिसांनी तिच्या शोधात अनेक दिवस घालवले. महामार्गावर तिचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला होता आणि सर्व ठिकाणी अनेक वोल्युन्टीर्सची देखील तैनाती करण्यात आली होती. परंतु ती कुठेही सापडली नाही. जेनेटची नात एरिन त्यावेळी फक्त १२ वर्षांची होती, ती म्हणाली, “मी दुःखी आहे, हे मला माझ्या पालकांसमोर कबूल करायचे नव्हते, कारण कदाचित यानेच मी आशा गमावली आहे हे सिद्ध होईल”. जेनेटचे कुटुंब दुविधेत होते कारण जेनेट बेपत्ता होती आणि तिचा मृतदेहसुद्धा सापडला नव्हता, त्यामुळे हे प्रकरण इतक्यात शांत होण्यासारखे नव्हते.

अनेक दिवस प्रयत्न करूनही जेनेटचा कुठेच पत्ता लागेना. मग पोलिसांनी आणि कुटुंबानेही आशा सोडून दिली. पोलिसांनी मात्र आपल्या रेकॉर्डमध्ये तिची आणि गाडीची माहिती ठेवली होती. वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही जेनेट कोठेही सापडली नाही, शेवटी पोलिसांनीही हात वर केले आणि केसची फाईल कायमची बंद केली.

पण काही वर्षांनी, मॅक्स वेरेन्का, यांनी ब्रिटिश कोलंबियाच्या ग्रिफिन लेकच्या पृष्ठभागावर काहीतरी विचित्र गोष्ट तरंगताना पहिली. तरंगणारी ती गोष्ट काही साधेसुधे नव्हते आणि मॅक्सच्या मते त्यात काहीतरी गडबड होती. मॅक्सचे कुटुंब ग्रिफिन लेकच्या काठावरील काही केबिन्सचे मालक आहेत. मॅक्सला सतत प्रश्न विचारायची सवय होती.



ट्रान्सकॅनडा हायवेपासून फक्त दहा फूट अंतरावर हा तलाव होता. तलावात काही विचित्र नक्कीच पहिले हे मॅक्सने सांगितले. परंतु ते प्रत्यक्षात काय आहे याची कोणालाही खात्री नव्हती. काही दिवसांनंतर व्हेरेन्का कुटुंबाने स्थानिक पोलिसांना पाचारण केले आणि त्यांना मॅक्सला काहीतरी विचित्र दिसले होते त्याठिकाणी नेले.

मॅक्सने आपला गो-प्रो कॅमेरा सोबत घेतला आणि तो तलावात उतरला. कॅमेऱ्यात सर्व काही रेकॉर्ड झाले. या रेकॉर्डिंगमध्ये मॅक्सच्या संशयानुसार खरंच काहीतरी विचित्र होते. या तलावात एक कार उलटी पडलेली आढळून आली. या कारवर पाण्यातील झाडे, बुरशी आणि असंख्य लहान लहान मासे होते. 

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

ही कार तलावाच्या पाण्यात १५ फूट खोलवर उलटी पडली आहे याची खात्री झाल्यानंतर तीन दिवसांनी स्थानिक पोलिसांनी आपल्याबरोबर एक डायव्हर्सची टीम आणली. त्यांना या गाडीबरोबरच एक लायसन्स प्लेट सापडली. ही लायसन्स प्लेट १९९२ पासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या केसशी संबंधित होती. त्यानंतर एका स्थानिक टो कंपनीला घटनास्थळी आणले गेले. कारला केबल जोडण्यात आल्या आणि कार तलावावरून बाहेर काढण्यात आली. कारमध्ये एका मृतदेहाचे अवशेषही सापडले.

विशेष तपासानंतर आणि संशोधनानंतर हे वाहन आणि त्यातील मृतदेहाचे अवशेष हे व्हॅनकूवरच्या ७० वर्षीय महिला, जेनेट फॅरिसचे आहेत याची पोलिसांनी खात्री केली. सुमारे २८ वर्षांपूर्वी, जेनेट फॅरिस ऑक्टोबर १९९२ मध्ये या तलावाजवळील ट्रान्सकॅनडा हायवेवरूनच बेपत्ता झाली होती.

मॅक्सने केवळ त्याच्या परिश्रमाने आणि निरीक्षण शक्तीने २८ वर्ष न उलगडलेले रहस्य सोडवले. मॅक्सच्या जन्माच्या तब्बल १४ वर्षांपूर्वी जेनेट बेपत्ता झाली होती. ग्रिफिन सरोवरातून जेनेटचे अवशेष सापडले तेव्हा ही बातमी फॅरीस कुटुंबाला धक्का देणारी ठरली. खरंतर जेनेटच्या कुटुंबाच्या आनंदाला सीमा नव्हती.

जेनेटची नात म्हणते, “आम्हाला आता योग्य प्रकारे शोक प्रकट करता येईल आणि तिच्या स्मृतींना तिला आमच्याकडून हवं त्याप्रमाणे सन्मान देता येईल, (कारण आता कोणतीही संदिग्धता मनात नाही.)” तर अशा प्रकारे तीन दशके जुने रहस्य सोडवले गेले. जेनेट फॅरिसचे मृतावशेष आता तिच्या पतीच्या कबरीशेजारी पुरण्यात आले आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

‘आंद्रे द जायंट’च्या तशा अवाढव्य शरीरामागे एक मोठी शोकांतिका होती

Next Post

समुद्राच्या तळाशी तब्बल तीन दिवस जिवंत राहून जगण्याच्या जिद्दीने तो परत आला

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

समुद्राच्या तळाशी तब्बल तीन दिवस जिवंत राहून जगण्याच्या जिद्दीने तो परत आला

जपानवर अणु*बॉ*म्ब टाकणाऱ्या विमानाच्या पायलटला त्या गोष्टीचा कधीच पश्चाताप झाला नाही

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.