The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा माणूस नसता तर आपल्याला गणित अजून अवघड गेलं असतं

by द पोस्टमन टीम
23 September 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब


जे गणितात रुची बाळगत नाही त्यांच्यासाठी इयान स्टुअर्ट हे नाव देवासमान आहे. गणिताच्या आकडेमोडीला समजून घेणे हे काही सोपे काम नाही. जगात असे फार कमी लोक आहेत ज्यांना हे गणिती ज्ञान समजून घेण्यात रस असतो. लोकांना गणितात रस न येण्याची कारणे इयान स्टुअर्ट यांना माहिती होती. यासाठी त्यांनी गणिताला सरळ आणि सोपे बनवून लोकांना समजेल अशा भाषेत रूपांतरित करण्याचे कार्य केले.

त्यांनी समीकरणे इतकी सहजपद्धतीने मांडली की कोणालाही ती सहजपणे लक्षात येऊ लागली. त्यांनी गणिताच्या आकडेमोडीला सोपे बनवले.

स्टुअर्ट यांचा जन्म १९४५ साली इंग्लंडच्या एका सामान्य कुटुंबात झाला, त्यांची आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती पण त्यांनी याला कधीच आपल्या प्रगतीच्या मार्गातील अडसर बनू दिले नाही. ते शिक्षणाबरोबरच खेळात देखील पटाईत होते. इतर अनेक गोष्टींमध्ये त्यांना विशेष रस होता. ते दोन वर्ष शाळेच्या रॉक बँडचा एक भाग होते, त्यांनी एक गिटारिस्ट म्हणून लोकांचे मनोरंजन केले.

अभ्यासात तर ते हुशार होतेच. गणितावर त्यांची विशेष पकड होती, ते वर्गात विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उकल अगदी सहजपणे करायचे, त्यांच्या प्रतिभेची माहिती ज्यावेळी त्यांच्या अध्यापकांना मिळाली, त्यांनी इयानकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यांना देखील जाणवले की इयानकडे गणिते सोडविण्याची एक विलक्षण प्रतिभा आहे. त्यांची इच्छा होती की संपूर्ण जगाला या प्रतिभेची माहिती मिळावी. यासाठी त्यांनी एका परीक्षेचे आयोजन केले. यात त्यांनी इयान यांना वरच्या इयत्तेतील गणिताचे समीकरण सोडविण्यास सांगण्यात आले.

सहा वर्षांचे इयान हे करू शकणार नाहीत, असं लोकांना वाटलं होतं पण ज्यावेळी निकाल आले, त्यानंतर सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी त्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले होते. स्टुअर्टच्या कामगिरीने त्यांना जगाच्या नजरेत हिरो बनवले होते. ते त्यांच्या गणिताच्या प्राध्यापकाचे फेव्हरेट बनले होते. ते त्यांची आभ्यासात जास्त मदत करू लागले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या प्राध्यापकाने त्यांना केम्ब्रिज विद्यापीठाची स्कॉलरशिप मिळवून दिली आणि ते चर्चिल कॉलेजपर्यंत येऊन पोहचले होते.



इथे त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ते इथेच थांबले नाहीत तर त्यांनी पदवीनंतर पदव्युत्तर शिक्षणास प्रारंभ केला. १९६९ साली त्यांनी वॉरविक विद्यापीठातून आपली पीएचडी पूर्ण केली.

आता ते वॉरविक विद्यापीठातच गणिताचे शिक्षक म्हणून रुजू झाले. शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांना जाणवले की गणितात मुलांना तितकी रुची नाही. मुलांना गणित विषय अजूनही क्लिष्ट आणि समजून घ्यायला कठीण वाटतो. त्यांनी तेव्हाच ठरवले की ते गणिताला साधं आणि समजायला सोपं करतील, जेणेकरून मुलांना यात रुची निर्माण होईल.

इयान यांना जाणवले की मुलांना गणितीय समीकरणात अडचणी आहेत, यानंतर त्यांनी ती समीकरणे सोपे करण्याचे काम सुरु केले. हे सुरु असताना १९७० साली एव्हरील नावाची एक महिला त्यांच्या आयुष्यात आली, दोघे एकमेकांना एका लग्नात भेटले, यानंतर दोघांचे संबंध बहरत गेले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. एव्हरील नर्स म्हणून कार्यरत आहे. त्या दोघांना दोन मुलं असून ते दोन्हीही वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

स्टुअर्ट यांनी सुरुवातीला मॅनीफोल्ड नावाच्या मासिकात लेख लिहिण्यास सुरुवात केली, त्यांची लेखमाला ‘मॅथमॅटिकल रिक्रिएशन फॉर साइंटिफिक’ या नावाने छापून येत होती. लोकांना ही लेखमाला पसंत पडली. १९९१ ते २००१ या काळात त्यांनी ९६ लेख लिहिले. स्टीव्हन हे फक्त त्यांच्या कॉलम्सपुरते मर्यादित राहिले नाहीत. 

त्यांनी ‘Game, Set and Math– Enigma and Conundrums’ नावाचे पुस्तक देखील लिहिले. यात त्यांनी गणितीय समीकरणाचे सुलभीकरण करून लोकांसमोर प्रस्तुत केले होते.

हे पुस्तक वाचून लोकांच्या विज्ञान व गणितातील अडचणी सोडविणे सहज बनले. त्यांनी यानंतर ८० पुस्तकांचे लेखन केले.

रेडियो आणि टेलिव्हिजन संस्थांनी त्यांना आमंत्रित करून लोकांना गणित सुलभपद्धतीने कसे सोडवायचे याचे मार्गदर्शन करण्यासाठी शोज् करायला सांगितले. त्यांना यामुळे मोठी प्रसिद्धी मिळाली आणि असंख्य लोक त्यांचे चाहते बनले, एवढी प्रसिद्धी मिळाली तरी त्यांचे गणितावरील प्रेम कमी झाले नाही. गणिताला ‘युझर फ्रेन्डली’ बनवण्यासाठी त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर केला. २०१४ साली त्यांनी स्वतःचे ॲप लाँच केले.

गणिताच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना मायकल फॅराडे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००८ साली त्यांना जिमन मेडल प्रदान करण्यात आले. आई. एम. एल. आणि आई. एम. ए. या संस्थांनी त्यांचा सन्मान केला. आज त्यांचे वय ६३ वर्ष असून ते वॉरविक विद्यापीठात गणिताचे अध्यपन करीत आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

राजा मार्तंड वर्मांनी डचांना पराभूत करून हिंदुस्थानातून हाकलून लावलं होतं

Next Post

या मौलानाने इंग्रजांच्या विरोधात जिहाद करण्याचा फतवा काढला होता !

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

या मौलानाने इंग्रजांच्या विरोधात जिहाद करण्याचा फतवा काढला होता !

डोळ्यात गरम सळई घुसवली तरी पृथ्वीराज चौहानांनी घोरीसमोर नजर झुकवली नाही !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.