The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगप्रसिद्ध ‘क्वॅकर’ने दिव्यांग मुलांना प्रयोग म्हणून रेडिओऍक्टिव ओटमिल खाऊ घातलं होतं

by द पोस्टमन टीम
27 August 2024
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


१९९४ साली हिवाळ्यात मॅसाचुसेट्समधील रहिवासी फ्रेड बॉयस हे थंडीनं गारठलेल्या रस्त्यावरून कार चालवत निघाले होते. नेहमीप्रमाणं त्यांनी कारमधील रेडिओ चालू केला. रेडिओवरील एक बातमी ऐकून बॉयस तीन ताड उडाले. ‘फेडरल कमिटीने नुकतेच उघड केले आहे की, ५० वर्षांपूर्वी, विकासत्मकदृष्ट्या अपंग मुलांची संस्था, फर्नाल्ड स्टेट स्कूलमधील मुलांच्या एका गटाला एमआयटीतील संशोधकांनी प्रयोगादरम्यानं अनावधानानं किरणोत्सर्गी क्वॅकर ओट्स मिल दिले होते’, अशी ती बातमी होती. ही बातमी ऐकून फ्रेड बॉयस यांच्या मनात भीती, आश्चर्य आणि संतापाच्या भावना जमा झाल्या. फ्रेड बॉयस आणि या बातमीचा काय संबंध होता? अन् हे किरणोत्सर्गी क्वॅकर ओट्सचं प्रकरण होतं तरी काय?

१९४० दशकाच्या उत्तरार्धात, ज्या मुलांचा शारीरीक आणि मानसिक विकास इतरांच्या तुलनेत कमी गतीनं होतो, अशा ९० मुलांवर एमआयटीनं एक चाचणी केली होती. फ्रेडी बॉयस त्यापैकीच एक होते. विनामूल्य जेवण आणि बोस्टन रेड सॉक्सची तिकिट या मुलांना ऑफर करण्यात आली आणि या आमिषावर त्यांचा ‘सायन्स क्लब’ नावाचा एक गट तयार केला. एमआयटीच्या अभ्यासाला क्वॅकर ओट्स या कंपनीनं वित्तपुरवठा केला होता.

सायन्स क्लबमध्ये सहभागी होऊन आपण एका हानीकारक प्रयोगात ‘गिनी पीग’ होणार आहोत, याची त्या निरागस मुलांना पुसटशीही कल्पना नव्हती. अर्ध्या शतकानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. हे प्रकरण शैक्षणिक संशोधनाची नैतिकता आणि माहितीपूर्ण संमतीच्या आवश्यकतेबद्दल असलेल्या सर्वात गंभीर वादविवादांपैकी एक आहे.

१९४०च्या दशकात ‘क्वॅकर ओट्स’ आणि ‘क्रीम ऑफ व्हीट’ हे दोन प्रमुख ब्रॅण्ड पोषक अन्नधान्याच्या बाजारपेठेसाठी एकमेकांशी स्पर्धा करत होते. त्याच वेळी, सर्वसाधारण तृणधान्यं पौष्टिक तपासणीच्या अधीन होती. अभ्यासकांचे विविध ठिकाणी प्रयोग सुरू होते. वनस्पती-आधारित धान्यांमध्ये नैसर्गिकरित्या फायटेटची उच्च पातळी असते. फायटेट आम्लाचा एक प्रकार आहे, जे लोह आणि कॅल्शियमचं शोषण रोखते, असं काही अभ्यासांतून समोर आलं होतं.

याउलट मानवी शरीर आवश्यक खनिजं आणि जीवनसत्त्वं कसे शोषून घेतं, हे पाहण्याचा निर्णय एमआयटीनं घेतला. तेव्हा क्वॅकरनं या अभ्यासाला निधी देण्याच्या निर्णय घेतला. ‘क्रीम ऑफ व्हीट’ला शह देण्याची ही मोठी संधी असल्याचं क्वॅकरच्या डोक्यात होतं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ आणि अणुऊर्जा आयोगाकडून अतिरिक्त परवानगी मिळवल्यानंतर, एमआयटीने एक योजना तयार केली. त्यांनी आपल्या अभ्यासासाठी फर्नाल्ड स्टेट स्कूलमधील ४० मुलांना निवडलं. निवडलेल्या मुलांना ठराविक काळासाठी किरणोत्सर्गी (रेडिओऍक्टीव) ट्रेसरसह काही अन्नधान्य खाऊ घालण्याची योजना होती. (रेडिओऍक्टीविटीची ही बाब त्यावेळी उघड केली नव्हती)



फर्नाल्ड स्टेट स्कूल ही संस्था विकासात्मकदृष्ट्या अपंग असलेल्या मुलांसाठी होती. युनायटेड स्टेट्समधील अशा प्रकारची ती पहिली संस्था होती. मात्र, काही बालहक्क संरक्षण कार्यकर्त्यांच्या मते, संस्थेची स्थापना नैतिकदृष्ट्या संशयास्पद तत्त्वांवर झाली होती. तेथील मुलांचा चुकीच्या कामांसाठी वापर केला जात असल्याचा त्यांना संशय होता. २०व्या शतकाच्या शेवटी, वॉल्टर ई. फर्नाल्ड या शाळेचे अधीक्षक झाले. फर्नाल्ड युनायटेड स्टेट्समधील वाढत्या युजेनिक्स (युजेनिक्स म्हणजे विशिष्ट आनुवंशिक गुण असलेल्या लोकांची निवडक करून, मानवी प्रजाती सुधारण्याचा प्रयत्न करणे) चळवळीचे प्रमुख समर्थक होते. देशातील प्रमुख विद्यापीठांपैकी एक असलेल्या एमआयटीसाठी फर्नाल्ड सेंटर हे संशोधन करण्यासाठी योग्य ठिकाण होतं.

निवडलेल्या मुलांना क्वॅकर ओट्स भरपूर प्रमाणात खायला देणे, आणि त्याला लावलेली किरणोत्सर्गी ट्रेसर वापरून लोह आणि कॅल्शियमचं नैसर्गिक शोषण ट्रॅक करणं, असं या संशोधनाचं स्वरुप होतं. त्यानंतर कित्येक आठवडे ७ ते १७ वयोगटातील निवडेल्या मुलांना किरणोत्सर्गी ट्रेसर लावलेलं ओट्स दिले गेले. या प्रयोगाचा निकाल अर्थातच क्वॅकर ओट्सला फायदा होईल असा देण्यात आला.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

या प्रयोगानंतर काही महिन्यांनी, फर्नाल्ड सायन्स क्लबमधील ३६ मुलांचा कॅल्शियम संबंधित चाचण्यांसाठी वापर करण्यात आला. या मुलांना किरणोत्सर्गी ट्रेसरसह दिवसातून दोनदा नाश्त्यात दूध देण्यात आलं. याचा निकालसुद्धा क्वॅकरच्या बाजूनं दिला गेला. क्वॅकर ओटमिल दूधासोबत मुलांना दिल्यास कॅल्शिअमची पातळी वाढते, असं सांगण्यात आलं. 

रक्तप्रवाहात कॅल्शियमचं काय होतं, हे समजून घेण्याच्या तिसऱ्या प्रयोगात, फर्नाल्ड सायन्स क्लबमधील ९ मुलांना किरणोत्सर्गी कॅल्शियमनं भरलेले इंजेक्शन देण्यात आले. ही माहिती चुकीच्या पद्धतीनं जमा केलेली असली तरी ती, ऑस्टियोपोरोसिसच्या नंतरच्या संशोधनाचा पाया ठरली आहे.

आपल्या चाचण्या पूर्ण केल्यानंतर एमआयटीनं फर्नाल्डसोबतचा संबंध संपवला. संशोधकांनी कोणत्याही चाचण्यांबाबत पाठपुरावा केला नाही. क्वॅकर ओट्सला मात्र, याचा प्रचंड फायदा झाला. ‘हाय आयर्न’ हा घटक त्यांच्या जाहिरात मोहिमेचा महत्त्वाचा घटक बनला. एमआयटी आणि क्वॅकरनं केलेल्या अभ्यासाचे तपशील खोदण्यासाठी ४० पेक्षा जास्त वर्षांचा कालावधी लागला. जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा मात्र, गदारोळ उडाला.

डिसेंबर १९९३ मध्ये, बोस्टन ग्लोबचे पत्रकार स्कॉट ऍलन यांनी फर्नाल्ड सेंटरमधील मुलांवर झालेल्या नैतिकदृष्ट्या संशयास्पद अभ्यासाची कागदपत्रं शोधून काढली. ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी ‘रेडिएशन यूज्ड ऑन रिटार्डेड’ हा लेख प्रकाशित केला. यामुळे वैद्यकीय संशोधनाच्या नैतिकतेवर राष्ट्रीय वादविवाद पेटला. हा गदारोळ इतका मोठा होता की, सरकारला या प्रकरणाचा तपास सुरू करण्यास सिनेट समिती नेमावी लागली.

एमआयटीचे फर्नाल्ड सायन्स क्लबमधील प्रयोग या तपासाच्या केंद्रस्थानी होते. त्यावेळी प्रयोगात वापरलेल्या मुलांचा शोध घेणे, हे सर्वात मोठं आव्हान समितीसमोर होतं. त्यासाठी त्यांनी वर्तमानपत्रांमध्ये एक जाहिरातच दिली. त्यानंतर फर्नाल्ड सायन्स क्लबमध्ये काही मुलं समोर आली. त्यावेळी त्यांचं वय ६० ते ७० वर्षांच्या दरम्यान होतं. १९९७ मध्ये, ३० पीडितांच्या गटानं, त्यांच्या नागरी हक्कांचं उल्लंघन केल्याच्या कारणास्तव ६ करोड डॉलर्सचा दावा एमआयटी आणि क्वॅकर ओट्सवर दाखल केला.

अस्तित्वात असलेल्या संशोधन मानकांनुसार त्यांनी संशोधन केलं होतं, असा दावा एमआयटीनं केला. मात्र, तरीदेखील त्यांनी क्वॅकर ओट्ससह दंडाची रक्कम भरण्याचा निर्णय घेतला. दीर्घ कायदेशीर लढाईचा खर्च टाळण्यासाठी, हा निर्णय होता, असं सांगितलं जातं. क्वॅकरला याचा मोठा फटका बसला. त्यांची ग्राहक संख्या झपाट्यानं कमी झाली. २००१मध्ये पेप्सिको या जगप्रसिद्ध कंपनीनं क्वॅकरचे मालकी हक्क खरेदी केले. त्यानंतर पुन्हा क्वॅकर बाजारपेठेमध्ये चांगलं स्थान मिळवण्यात यशस्वी झालं.

या प्रकरणानंतर जगभरातील अनेक संशोधनांच्या ह्युमन ट्रायल्स संकटात सापडल्या होत्या. जेव्हा प्रकरण तापलेलं होतं तेवढ्यापुरतं सर्वांनी पारदर्शकपणे संशोधनं पार पाडली. आता पुन्हा काही गैरमार्गांचा वापर करून संशोधनं होत असल्याचा संशय आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

लिओनार्डो डिकॅप्रियो आणि टोबे मॅगुइर म्हणजे हॉलिवूडचे जय-वीरू..!

Next Post

लॉस एंजेलिसच्या डोंगरावर लावलेल्या HOLLYWOOD नावाच्या छेडखानीचे हे किस्से वाचाच

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

लॉस एंजेलिसच्या डोंगरावर लावलेल्या HOLLYWOOD नावाच्या छेडखानीचे हे किस्से वाचाच

आजही नॉन स्ट्रायकर एन्डच्या बॅट्समनला 'मांकडिंग'ची भीती वाटत असते..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.