The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मार्को पोलो : युरोपियन लोकांना आशिया खंडात माणसंच राहतात, राक्षस नाही, हे सांगणारा प्रवासी

by द पोस्टमन टीम
15 September 2025
in मनोरंजन, भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आपण बऱ्याचदा काही गोष्टींकडे पूर्वग्रहदूषित मानसिकतेने बघतो, आपण जे ऐकतो त्याच्या आधारावरच जगाची कल्पना करत असतो. अशाच एका पूर्वग्रहाने युरोपमधील लोक एकेकाळी बांधले गेले होते. युरोपियन लोकांना त्यावेळी आशिया खंडातील लोकांची संस्कृती ही दुय्यम दर्जाची वाटायची. त्यांना या पूर्वग्रहदूषित मानसिकतेतून बाहेर काढण्याचे काम मार्को पोलो आणि त्याच्यासारख्या असंख्य प्रवाशांनी केले. त्यांनी लिहलेल्या प्रवासवर्णनांतून पाश्चिमात्त्य जगताला पूर्वेकडील अभिजात संस्कृतीची ओळख झाली होती.

मार्को पोलो यांना आयुष्याला कुठल्या वळणावर न्यायचे याचा विचार करण्याची संधीच मिळाली नव्हती. त्यांच्यावर आधीपासूनच फिरस्तीचे आयुष्य लादण्यात आले. १२६९ साली निकोलो पोलो आणि मॅफियो पोलो मंगोल देशाचा प्रदीर्घ प्रवास करून १७ वर्षांनी व्हेनिस या आपल्या मूळगावी परतले, त्यावेळी त्यांना त्यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची वार्ता समजली. पत्नीच्या निधनाची वार्ता ऐकून दुःखी झालेल्या निकोलोसाठी त्याचा मुलगा मार्को हा एकटाच साथीदार उरला होता. असं म्हणतात, आपल्या मुलासाठीच निकोलो मंगोलदेश सोडून व्हेनिसला परतले होते.

मार्को त्यावेळी १७ वर्षांचा होता. त्याच वयात तो आपल्या पित्या व चुलत्यासोबत एका अशा प्रवासासाठी रवाना झाला, ज्याने त्याचे आयुष्य बदलून टाकले होते.

त्याकाळी मंगोल साम्राज्याचा विस्तार संपूर्ण आशिया खंडात झाला होता. त्यांनी युरेशियाचा मोठा भाग जिंकला होता. मंगोलांनी जेरुसलेमवर ताबा मिळवल्यामुळे मुस्लिम, ख्रिस्चन आणि ज्यू धर्मीयांमध्ये सुरु असलेला संघर्ष संपत नव्हता. मंगोल त्या तिघांच्या भांडणात सहभागी झाले नाहीत. ज्यावेळी मार्को पोलोचे वडील आणि चुलते व्यापार करण्यासाठी उझबेकिस्तानला गेले, त्यावेळी मंगोल नेता कुबलाई खान याने त्यांच्याशी आणि पर्यायाने ख्रिस्ती लोकांशी मैत्री केली. कुबलाई खानने यावेळी आपल्या भूभागात ख्रिस्ती धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची शपथ घेतली. मार्को पोलो यांच्या पित्यावर व्हॅटिकनच्या चर्चने होली लँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेरुसेलममधून पवित्र तेल आणायची जबाबदारी सोपविली होती. मार्को पोलो देखील आपल्या पित्यासोबत या प्रवासाला निघाला.

जेरुसेलमच्या प्रवासाला निघालेला मार्को पोलो पुढे चीनच्या प्रवासाला गेला, या संपूर्ण प्रवासादरम्यान त्याने व त्याच्या साथीदारांनी अनेक नवनवीन स्थळांना भेट दिली, अनेक नद्या ओलांडल्या, अनेक सागर किनारे पाहिले, अनेक डोंगरदऱ्यांमधून प्रवास केला. त्याच्या अनेक साथीदारांनी प्रवासादरम्यानच त्याची साथ सोडली.



या प्रवासादरम्यान मार्को पोलो व त्याच्या साथीदारांनी ज्या रस्त्याचा वापर केला त्याला सिल्क रूट म्हटले जाते. त्यांना त्यावेळी इराकच्या बगदाद शहरातून जायचे होते, जेथील खलिफाचा मंगोलांनी १२५८ साली पराभव करून आपले साम्राज्य प्रस्थापित केले होते.

मंगोलांनी बगदादमध्ये क्रौर्याची परिसीमा गाठली होती, तब्बल २ लाख लोकांचा नर*सं*हार करण्यात आला होता. बगदाद शहर यानंतर पुन्हा एकदा बेचिराख झालं ते २००३मध्ये अमेरिकेने ह*ल्ला केल्यावर!

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

इराकने त्याकाळी पेट घेतलेला होता. एकीकडे लूटमार, ह*त्या आणि जबरदस्तीने  धर्मांतराचे सत्र सुरु होते तर दुसरीकडे मार्को पोलो आणि त्याचे साथीदार कठीण मार्गावर आपली परिक्रमा करत होते. असंख्य अडचणींना तोंड देत ते बगदादहुन पुढे इराणला गेले. तिथून पुढे इसवी सन १२७५ साली ते बीजिंग शहरापासून २०० किलोमीटरवर असलेल्या शांगडू शहरात येऊन पोहचले. त्याठिकाणी त्यांची भेट कुबलई खानाशी झाली.

बीजिंग शहरात पोहचल्यावर पूर्वेकडील देशांविषयी त्याच्या मनात असलेले सर्व पूर्वग्रह दूर झाले होते. युरोपात लोक म्हणायचे की पूर्वेकडे नरकाचे द्वार आहे आणि तिथे राहणारे लोक दानवांचे वंशज आहेत.

पण ज्यावेळी मार्को पोलोने आपला प्रवास सुरु केला त्यावेळी त्याला काहीतरी वेगळंच जाणवलं, त्याला आपल्यासारखीच माणसे येथे राहतात याची जाणीव झाली.

१२७५ साली मार्को पोलोची यात्रा संपल्यावर त्याने मंगोल शासक कुबलई खानाकडे राजदूत म्हणून काम करण्यास सुरुवात केली. राजदूत म्हणून काम करत असताना मार्कोला अनेक नवे अनुभव आले.

एकदा त्याला कुबलई खानचा भाचा अर्गनसाठी शोधण्यात आलेल्या कोकोचीन को या पर्शियन मुलीला तिच्या राजवटीपर्यंत पोहाचवायचे होते. यासाठी त्याला चीनच्या जातुन प्रांतातून सुमात्रामार्गे पर्शियाला पोहचायचे होते. या प्रवासासाठी त्याला तब्बल १४ बोटींचा वापर करावा लागला. १२९५ साली तो ज्यावेळी पर्शियाला पोहचला त्यावेळी अर्गनचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती त्याच्या कानावर पडली. आपले काम संपवल्यावर देखील मार्को ९ महिने तिथेच वास्तव्यास होता.

यानंतर तुर्कीच्या मार्गाने त्याने व्हेनिस गाठले. वयाच्या सतराव्या वर्षीच मार्को व्हेनिस सोडून गेला होता. त्यानंतर तब्बल २४ वर्षांनी तो परतला होता. या २४ वर्षांत बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या. व्हेनिस आणि जिनिव्हा यांच्यादरम्यान यु*द्ध होणार होते. हे यु*द्ध झाले आणि ४० वर्षांच्या मार्को पोलोला कैद करण्यात आले. पण आता इतक्या वर्षांत प्रवासात येणाऱ्या विविध धक्क्यांमुळे त्याने कुठल्याही परिस्थितीत सदैव सकरात्मक राहण्याची कला आत्मसात केली होती.

तुरुंगात असताना त्याने आपल्या प्रदीर्घ प्रवासाचे वर्णन करणाऱ्या एका पुस्तकाचे लेखन केले. ‘ट्रॅव्हल्स ऑफ मार्को पोलो’‘ या नावाने आज ते प्रसिद्ध आहे. या पुस्तकात त्याने कुबलई खानाच्या साम्राज्याची ओळख पाश्चात्त्य जगताला करून दिली.

कुबलई खानचे साम्राज्य, त्यातील पत्रव्यवहार, कोळसा, व्यापार इत्यादी गोष्टींवर प्रदीर्घ लेखन त्याने केले होते, पूर्वेकडील विश्वाच्या लोकांची नवीन ओळख पाश्चात्त्य जगाला करून दिली होती. त्याचे हे लिखाण त्यावेळी प्रचंड गाजले आणि त्याच्यानंतर झालेल्या शेकडो प्रवाशी, खलाशी व संशोधकांसाठी उपयुक्त ठरले.

अमेरिकेचा शोध लावणारा ख्रिस्तोफर कोलंबस देखील मार्को पोलोचे पुस्तक वाचूनच पूर्वेच्या शोधात निघाला होता, पण त्यावेळी पूर्वेत ना चीनचे अस्तित्व उरले होते, ना कुबलई खानाचे !


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

समुद्राखाली आहे हे पोस्ट ऑफिस, पत्र टाकायला नऊ फूट पाण्याखाली पोहत जावे लागते..!

Next Post

भंवरी देवी : महिलांच्या शारीरिक शोषणाविरोधात उठलेला क्रांतिकारी आवाज

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
Next Post

भंवरी देवी : महिलांच्या शारीरिक शोषणाविरोधात उठलेला क्रांतिकारी आवाज

१ हजार दुष्काळग्रस्त गावांना जलमय करणाऱ्या वॉटर मॅनची गोष्ट

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.