The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिकन सैन्याची फेव्हरेट असलेली एम-१६ राय*फल एवढी विशेष का आहे..?

by Heramb
29 September 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


दोन्ही वैश्विक महायु*द्धांदरम्यान आणि त्यानंतरही जागतिक शस्त्रास्त्र स्पर्धेने कळस गाठला आहे. समोरा समोरच्या यु*द्धांपासून ते अगदी अ*ण्वस्त्र आणि त्याहूनही भयानक हायड्रोजन बॉ*म्बसारख्या शस्त्रापर्यंत मानवाने घातक संशोधने केली आहेत. बंदुका आणि बॉ*म्ब्स यांवरच न थांबता आता कोविड-१९च्या रूपाने जगावर जैविक अ*स्त्राने ह*ल्ला झाल्याचेही समोर आलं आहे. त्यामुळे आता ‘एनबीसी’ म्हणजेच ‘न्यू*क्लिअर बायोलॉजिकल आणि केमिकल’ शस्त्रांबद्दल बोललं जात आहे. पण या अत्याधुनिक शस्त्रास्त्र स्पर्धेतही एका पारंपरिक शस्त्राने आपलं स्थान अबाधित ठेवलं आहे, ते म्हणजे राय*फल!

जगभरात राय*फल्स तयार करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. आजही प्रत्येक देशाला आपल्या संरक्षणासाठी आणि ह*ल्ल्यांसाठी राय*फल्स या सर्वांत महत्वाच्या आहेत. आधुनिकतेच्या या युगात प्रत्येक देश स्वतःला मजबूत करण्याच्या शर्यतीत गुंतलेला आहे. जगातील सर्वात शक्तिशाली देशांचा विचार केला तर त्यात अमेरिकेचे नाव नक्कीच घेतले जाते. अमेरिका जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नवी उंची गाठत आहे. तंत्रज्ञानापासून ते रणांगणापर्यंत सर्वत्र त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे.

यामध्ये जेव्हा यु*द्धभूमीचा विचार केला जातो तेव्हा नक्कीच अमेरिकन सैन्याची शस्त्रे जाणून घेण्याची उत्सुकता वाढते. याच अमेरिकी सैन्यातील सर्वांत प्रभावी आणि उत्कृष्ट राय*फल्सपैकी एक म्हणजे एम-१६. या राय*फलची लोकप्रियता संपूर्ण जगाच्या सैन्यात दिसून येते. एम-१६ ही अमेरिकन सैन्यासाठी अधिकृतपणे नियुक्त केली गेलेली राय*फल असून ही ५.५६ कॅलिबरची राय*फल आहे. या पूर्वी अमेरिकन सैन्यासाठी अर्मलाईट ए.आर.-१५ ही राय*फल अधिकृतपणे नियुक्त करण्यात आली होती. ए.आर.-१५ याच रायफ*लचे नेक्स्ट व्हर्जन म्हणजे एम-१६ राय*फल. मूळ एम-१६ राय*फलमध्ये २० राउंडचं मॅगझीन होतं.

अमेरिकन शस्त्रास्त्र डिझायनर युगेन स्टोनर याने १९५७ साली हे राय*फल डिझाइन केले होते. १९६४ साली एम-१६ राय*फलने अमेरिकन लष्करात प्रवेश केला आणि पुढच्याच वर्षी व्हिएतनाम यु*द्धादरम्यान जंगलात लढल्या जाणाऱ्या यु*द्धांमध्ये या राय*फल्स वापरल्या गेल्या. त्यानंतर १९६९ साली एम-१४ची जागा एम-१६ए-१ या राय*फलने घेतली आणि ही राय*फल अमेरिकन सैन्याची स्टॅंडर्ड सर्विस राय*फल बनली. एम-१६ए-१ च्या सुधारणांमध्ये बोल्ट असिस्ट, क्रोम-प्लेटेड बोर, आणि ३० राउंड्सचं मॅगझीन समाविष्ट आहे.

याच युजेन स्टोनरने एआर-१५ या राय*फलचे डिझाईन आणि निर्मिती केली होती. एआर-१५च्या उत्कृष्ट कामगिरीने खुश झालेल्या अमेरिकन सैन्याधिकाऱ्यांनी त्याला नवी आणि यापेक्षा प्रभावशाली राय*फल तयार करण्यास सांगितली. आपल्या कामाच्या यशस्वीतेमुळे समाधानी असलेला स्टोनर पुन्हा नव्या आणि आधीपेक्षा उत्कृष्ट राय*फल निर्मितीत गुंतला आणि काही काळातच त्याने एम-१६ तयार केली. स्टोनरचे १९९७ साली निधन झाले पण त्याची ही निर्मिती जगात लोकप्रिय झाली.



लढाईत सहज वापरता येईल अशा प्रकारे युजेन स्टोनरने एम-१६ ची रचना केली आहे. यामुळेच सर्वांत घातक शस्त्र असूनही ही राय*फल वजनाने खूप हलकी आहे. एम-१६ चे वजन फक्त ३.२६ किलो आहे. वजनाने हलके असल्याने, सैन्याच्या लॉन्ग डिस्टन्स मिशन्समध्ये ते वाहून नेणे खूप सोपे आहे. एम-१६रायफ*लच्या मदतीने लष्कराचे जवान तीन किलोमीटरवरील लक्ष्य सहजतेने भेदू शकतात. खरंतर याच दृष्टिकोनातून ही राय*फल तयार केली जात होती.

या रायफ*लचा फा*यरिंग रेट सुमारे ७०० ते ९५० राउंड्स प्रति मिनिट्स इतका आहे. व्हिएतनाम यु*द्धानंतर एम-१६ राय*फल त्याच्या प्राणघातक शैलीसाठी सैनिकांमध्ये प्रसिद्ध झाली होती. व्हिएतनाम यु*द्धादरम्यान, अमेरिकन सैन्याने हजारो शत्रूंना ठार मारण्यासाठी या घातक शस्त्राचा वापर केला.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

दक्षिण व्हिएतनाममधील माय लाई ह*त्या*कांड प्रसिद्ध आहे. या गावात अमेरिकन सैनिकांनी व्हिएतनाम यु*द्धादरम्यान अक्षरशः रक्ताची होळी खेळली. एम-१६ राय*फल हातात आल्यानंतर, अमेरिकन सैन्याने व्हिएतनामी भूमीवर सोडलेल्या भीषण जखमा आजही ताज्या आहेत. व्हिएतनाममधील या हत्या*कांडानंतर जगातील लोकांना प्रथमच एम-१६ च्या प्राणघातकतेची जाणीव झाली. यामुळेच या राय*फलला ‘व्हिएतनाम ग*न’ असेही म्हटले जाते.

दुरून किंवा उंचीवरून एखादे लक्ष्य भेदण्यासाठी दुर्बिणीच्या मदतीने वापरले जाणारे खास ह*त्यार म्हणजे ‘स्ना*यपर राय*फल’. स्ना*यपर राय*फल एक विशिष्ट प्रकारची, वजनाने जड आणि अगदी कमी मॅगझीन असलेली बंदू*क असते. स्नाय*पर रायफ*लच्या मदतीने लांब पल्ल्याचे म्हणजे सुमारे दोन किलोमीटर्स वरील लक्ष्य सहज भेदले जाऊ शकते. आजमितीस लांब पल्ल्याच्या अनेक स्नाय*पर राय*फल्स आहेत. अशा प्रकारच्या राय*फल्सचा वापर विशिष्ट यु*द्ध पद्धतीत होतो, सर्वश्रुत आणि सुप्रसिद्ध उदाहरण म्हणजे सर्जिकल स्ट्राईक!

स्नाय*पर रायफ*लच्या मदतीने शत्रूचा सपाटा करणाऱ्या सैनिकाला स्नाय*पर म्हणतात, तर त्यासाठी स्नाय*पिंगचे प्रशिक्षण आणि सराव पूर्ण होणे आवश्यक असते. यामध्ये वाऱ्याचा वेग, दिशा, अंतर, तापमान इत्यादी गोष्टींचा विचार करावा लागतो. यासंबंधी कोणतीही आकडेवारी चुकल्यास नेम चुकण्याची शक्यता असते, आणि यामुळे धोका संभवू शकतो.

एम-१६ राय*फल स्नायप*र्ससाठी अत्यंत उपयुक्त शस्त्र आहे. उंच टेकड्यांवर रिमोट इंस्टॉलेशन असो किंवा बर्फाच्या पांढऱ्या ढिगामध्ये लपून शत्रूला संपवण्याचे मिशन असो. एम -१६ राय*फल ही अमेरिकन स्नायप*र्सची पहिली पसंती असते. या रायफ*लच्या मदतीने स्नाय*पर्स सहजपणे लांब पल्ल्याचे लक्ष्य भेदू शकतात. तसे तर, अमेरिकन सैनिक अनेक घातक राय*फल्स वापरतात, त्यापैकी एम-16 राय*फल देखील एक आहे. जेव्हापासून एम-१६ राय*फल वापरात आली आहे, तेव्हापासून त्याची डिझाइन आणखी चांगली करण्याचे प्रयत्न सतत सुरु आहेत.

या वेगवेगळ्या डिझाइन्स आणि अपडेट्समुळेच एम-१६ वेगवेगळ्या व्हर्जन्समध्ये अस्तित्वात आहे. एम-१६ए-१, एम-१६ए-२ आणि एम-१६ए-३ असे या रायफ*ल्सचे व्हर्जन्स आहेत. अमेरिकेत क्रिस काईल नावाचा एक प्रचंड यशस्वी स्नाय*पर होता. रणांगणावर त्याने अडीचशेहून अधिक अचूक लक्ष्यभेद केले आहेत.

इराकमध्ये तैनात असताना त्याने अनेक शत्रूंना यशस्वीरित्या लक्ष्य केले होते. या अमेरिकन स्नाय*परने इराकमधील तैनातीदरम्यान एम-१६ चा वापर केला. क्रिस काईलच्या आवडत्या शस्त्रांच्या यादीत एम-१६ हे नाव प्रामुख्याने आहे.

अमेरिकन लष्कराने अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये एम-१६ राय*फलचा वापर केला आहे. सध्या अमेरिकन लष्कर ही राय*फल वापरत आहे. सोमालियन यु*द्धात अमेरिकन लष्कराने या राय*फलच्या मदतीने सोमालियाच्या अनेक सेनानींवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले होते. यानंतर, अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान यु*द्ध आणि इराक यु*द्धातही या रायफलचा वापर करून अनेक महत्वाच्या मोहिमा पूर्ण केल्या होत्या.

एकंदरीत, जेव्हा जेव्हा अमेरिकन सैन्य इतर देशांमध्ये उतरते, तेव्हा अमेरिकन सैनिकांच्या हातात निश्चितपणे एम-१६ राय*फल असते. एवढेच नव्हे तर अमेरिकेच्या कमांडो दलांपैकी एक सील कमांडोचे सैनिकही शत्रूला भेदण्यासाठी याच घातक शस्त्राचा वापर करतात. व्हिएतनाम यु*द्धात नाइंथ इन्फन्ट्री डिव्हिजनच्या एडेलबर्ट वाल्ड्रॉनने एम-१६ राय*फल वापरून १०९ शत्रुंना ठार केले होते.

एम-१६ राय*फल हे अमेरिकन लष्कराचे सर्वात घातक शस्त्र बनले आहे. ही राय*फल अधिक प्राणघातक बनवण्यासाठी अमेरिका संशोधन करत आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

‘टायटॅनिक’सह विसाव्या शतकातील तीन मोठ्या सागरी अपघातांतून वाचलेली ‘व्हायलेट’

Next Post

मुहम्मद अली बॉक्सिंगमध्ये किंग तर होताच पण त्याला दोन वेळा ग्रॅमी’चं नामांकनही मिळालं होतं

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

मुहम्मद अली बॉक्सिंगमध्ये किंग तर होताच पण त्याला दोन वेळा ग्रॅमी'चं नामांकनही मिळालं होतं

'किस ऑफ लाइफ' या फोटोनं जगभरातील लोकांचा वीज कर्मचाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.