The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नुसतं मेकअपचं सामान विकून ही बाई करोडोच्या कंपनीची मालकीण बनली होती

by द पोस्टमन टीम
22 March 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


जगप्रसिद्ध लॉरेल या सौंदर्य प्रसाधन कंपनीची सुरुवात १९०९ साली झाली. सुरुवातीला युगेन शुवेलर यांनी एका हेअर डायची निर्मिती करण्यापासून या कंपनीची सुरुवात केली होती. तीच कंपनी आज जगातील सर्वात मोठी सौंदर्य प्रसाधन कंपनी बनली आहे. एका साध्या हेअर डायची निर्मिती करण्यापासून सुरु झालेली ही कंपनी कालांतराने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अब्जावधी रुपयांची उलाढाल करणारी कंपनी बनली.

या कंपनीचा विस्तार जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचला. १९५७ साली युगेन शुवेलर यांचे निधन झाले. त्यांचा माघारी त्यांची मुलगी लायेन बेटेनकोर्ट हिने कंपनीचा कारभार सांभाळला. बेटेनकोर्टचा २०१७ साली मृत्यू झाला तेंव्हा ती ९४ वर्षांची होती.

तिच्या मृत्यूसमयी ती जगातील सर्वात श्रीमंत स्त्री असल्याची नोंद फोर्ब्ज मासिकाने केली होती.

बेटेनकोर्ट २०१२ पर्यंत कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर म्हणून निवडल्या गेल्या. त्यांच्या पश्चात, त्यांचा नातू जीन-व्हिक्टर मेयर्स याची नियुक्ती कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरवर करण्यात आली. बेटेनकोर्ट आणि तिच्या कुटुंबाने लॉरेलमध्ये सर्वात मोठे भागीदार होते. या कंपनीचा ३३.१% इतका समभाग या कुटुंबाच्या ताब्यात आले.

मेबेलीन, लांकम आणि कैल्स ही सौंदर्य प्रसाधानातील मोठमोठी ब्रँड्स लॉरेल ग्रुपचाच भाग आहेत.



बेटेनकोर्ट हिने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेचच वडीलांना मदत म्हणून त्यांच्याच कंपनीत कामाला सुरुवात केली. इतक्या छोट्या पदावरून बोर्ड ऑफ डिरेक्टरपर्यंतचा प्रवास तिने स्वबळावर केला.

बेटेनकोर्ट लॉरेल कंपनी, त्यातील सर्व कर्मचारी आणि या कंपनीने मिळवलेले यश या सर्वांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होतं.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

लॉरेल उद्योग समूहाच्या त्या एकुलत्या एक वारसदार होत्या. त्यांचे बालपण ऐषोआरामात गेले. परंतु आयुष्याच्या उत्तरार्धात मात्र त्यांना अनेक वादविवादांनी घेरले. बेटेनकोर्टचा मित्र फ्रँकॉइस मेरी बेनिअर याने तिच्याकडून गिफ्टच्या स्वरुपात अब्जावधी डॉलर्स उकळले होते.

बेटेनकोर्टची मानसिक आणि बौद्धिक स्वास्थ्य खालावलेले असताना त्यांच्या या असहाय्य स्थितीचा फायदा घेऊन फ्रँकॉइस बेनिअर याने अब्जो डॉलर आपल्या खिशात घातले. वरून बेटेनकोर्टने आपल्याला दत्तक घेतले असल्याचा दावाही त्याने केला.

बेटेनकोर्टला अल्झायमरसारख्या गंभीर आजाराने घेरले असताना फ्रँकॉइस आणि इतर अनेक व्यावसायिक भागीदारांनी मिळून बेटेनकोर्ट यांची आर्थिक फसवणूक केली. शेवटी २००७मध्ये बेटेनकोर्ट यांची एकुलती एक मुलगी मेयर्स हीने आईच्या वतीने या सगळ्यांवर आर्थिक फसवणुकीचा खटला भरला. 

या खटल्यात फ्रेंच कोर्टाने फ्रँकॉइस आणि त्याच्या सर्व साथीदारांना दोषी घोषित केले. फ्रँकॉइसने अनेक मौल्यवान पेंटींग्ज ज्यात जगप्रसिद्ध चित्रकार पिकासोचीही काही पेंटींग्ज होती, बेटेनकोर्टकडून गिफ्ट घेतली होती.

त्याने बेटेनकोर्टची तब्बल १.३ अब्ज डॉलर इतक्या रकमेची फसवणूक केली होती. यात त्याने दोन विमा पॉलिसीजही स्वतःच्या नावावर करून घेतल्या होत्या. शिवाय, सेशेल्स येथील ६७० एकरांचे बेट त्याने स्वतःच्या नावावर करून घेतले होते.

बेटेनकोर्टची मानसिक स्थिती ठीक नसताना आणि तिच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती जवळ नसताना फ्रँकॉइस याने बेटेनकोर्ट यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. अगदी बेटेनकोर्टच्या घरातील नोकरांनीही फ्रँकॉइस कसा लीएनवर दबाव आणत होता याचे किस्से सांगितले आहेत. 

अगदी बेटेनकोर्टने कोणते कपडे घालावे, कोणती लिपस्टिक लावावी यावरही फ्रँकॉइस नजर ठेवून असे, अशी माहिती या नोकरांनी दिली. बेटेनकोर्टने आपल्याला दत्तक घ्यावे म्हणूनही तो तिच्यावर दबाव आणत होता. न्यायालयाने त्याला तुरुंगवासाची शिक्षा तर फरमावलीच पण, त्याने लुबाडणूक केलेली सर्व रक्कमही वसूल केली.

त्याचवेळी २०१० मध्ये बेटेनकोर्टने आपली नियमित कर रक्कम बुडवून ती स्विस बँकेत ठेवल्याचा आरोपही तिच्यावर करण्यात आला होता. तिचे आणि तिचा आर्थिक सल्लागार पॅट्रीस दे मैस्ट्रे यांच्या कॉल रेकॉर्डिंग उघड झाले होते. ज्यात ती आपण कररुपी रकम बुडवून ती स्विस बँकेत ठेवल्याच्या व्यवहाराबद्दल बोलत होत्या. 

फ्रांसच्या राजकीय क्षेत्रात या सगळ्याचा फार मोठा बोभाटा झाला. फ्रांसचे अध्यक्ष सार्कोझी यांचादेखील बेटेनकोर्टच्या या कर बुडवण्याच्या प्रकरणात हात असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यांच्या संभाषणाच्या रेकॉर्डिंग्जही उघड झाल्या होत्या.

या वादविवादाच्या घेऱ्यात सापडलेल्या सार्कोझी यांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबध नसल्याचा वारंवार खुलासा केला तरीही त्यांच्या राजकीय कारकीर्दीवर याचा परिणाम झालाच. २०१२च्या निवडणुकीत या प्रकरणाच्या प्रभावाने त्यांना निवडणुकीत सपशेल हर मानवी लागली.

बेटेनकोर्टचे बालपण अगदी सुखात गेले असले तरी तिच्या आयुष्याचीही एक काळी बाजू होती. तिचे वडील युगेन शेवूलेर हे नाझी प्रचारक होते. ना*झी सैन्याने जर्मनीत ज्या ज्यू लोकांची संपत्ती हडपली होती तिचा ताबा शेवूलेर यांच्याकडेच होता. 

१९५० साली लीएनने आंद्रे बेटेनकोर्टशी विवाह केला. आंद्रे बेटेनकोर्ट हे देखील नाझी विचारसारणीचे समर्थक होते. फ्रांस सरकारमध्येही त्यांचा काही काळ सहभाग होता.

बेटेनकोर्ट आयुष्यभर पडद्याच्या मागे राहिली असली तरी, नाझी चळवळीचे समर्थन केल्याचा आणि ज्यू-विरोधी प्रचाराचा डाग तिच्यावर होताच. कारण तिचे वडील आणि पती दोघेही नाझी समर्थक होते.

बेटेनकोर्ट आपल्या औदर्याबद्दलही प्रसिद्ध होत्या. आपल्या आयुष्यात त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था, वैज्ञानिक संस्था, स्मारके आणि वैद्यकीय संशोधन करणाऱ्या संस्थाना वारंवार देणगी दिली. पण, त्या कधीच कोणत्याही व्यासपिठाच्या माध्यमातून पुढे आल्या नाहीत. त्यांनी या देणगीचा गवगवा केला नाही.

बेटेनकोर्ट या जगातील सर्वात श्रीमंत स्त्री असल्याचे फोर्ब्ज या मासिकाने जाहीर केले होते. त्यांच्या मृत्यूच्या समयी त्यांच्या नावावर ३३ अब्ज युरो इतकी प्रचंड संपत्ती त्यांच्या नावावर होती. बेटेनकोर्ट यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांची मुलगी फ्रँकॉइस बेटेनकोर्ट-मेयर्स आणि दोन नातवंडांवर सोपवण्यात आली.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

हवामानबदल – ९० वर्षात पहिल्यांदाच या डेथ व्हॅलीचं तापमान एवढं वाढलं होतं

Next Post

टाटा कंपनीचं ओके साबण भारतीय मार्केटमध्ये अपयशी का ठरलं?

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

टाटा कंपनीचं ओके साबण भारतीय मार्केटमध्ये अपयशी का ठरलं?

दोनशे वर्षं बांधकामासाठी लागली तरीही हा मनोरा तिरकाच बांधला गेला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.