The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मलिंगासमोर खेळताना बॅट्समनला एकच प्रश्न असायचा, ‘विकेट वाचवायची की जीव वाचवायचा?’

by द पोस्टमन टीम
28 August 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


ब्लीच केलेले कुरळे केस, टॅटू, पियर्सींग केलेल्या भुवया घेऊन गोलंदाजी करणाऱ्या लसीथ मलिंगाला पहिल्यांदा पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक प्रश्न नक्की येत असणार तो म्हणजे, हे ध्यान नक्की आहे तरी कोण? लोकांना असा विचार करायला लावणारा लसिथ मलिंगा खऱ्याअर्थानं श्रीलंकेचा पिन-अप बॉय होता.

यॉर्करचा बादशाह असलेल्या लसिथ मलिंगानं २०२१ साली टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. मलिंगानं आपल्या नवीन युट्यूब चॅनेलद्वारे आपला निर्णय जाहीर केला. सोबत त्यानं एक संदेश लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या होता.

‘मी आजपासून माझ्या टी-20 बॉलिंग शूजला पूर्णपणे विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या करियरमध्ये मला पाठिंबा देणाऱ्या आणि मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मी आभारी आहे’, असा संदेश त्यानं लिहिला. याशिवाय त्यानं श्रीलंकन क्रिकेट मंडळाचे अधिकारी, खेळाडूंसह मुंबई इंडियन्स आणि मेलबर्न स्टार्स संघांचेदेखील आभार मानले आहेत.

‘कामयाब होने के लिए नहीं काबिल होने के लिए पढ़ो, कामयाबी झक मारके तुम्हारे पिछे आएगी’ थ्री इडियट्स चित्रपटामध्ये आमिरच्या तोंडून निघालेला एक डायलॉग प्रचंड फेमस आहे. लसिथ मलिंगा नावाचा श्रीलंकन खेळाडू हा डायलॉग पुरेपुर जगला. प्रत्येक बॉल फेकण्यापूर्वी त्याचं चुंबन घेणं, काहीशा विचित्र ॲक्शनसह १४५ च्या वेगानं बॉल फेकून त्यानं अनेक खेळाडूंना जायबंदी केलं आहे. त्याची प्रत्येक गोष्ट निराळी होती.

आपल्या कामगिरीच्या जोरावर त्यानं आपला हा वेगळेपणा जगाला स्विकारण्यास भाग पाडलं. ज्या देशाच्या मातीतून निघून मुथैया मुरलीधरनसारख्या क्रिकेटमधील महामानवानं जगावर राज्य केलं. त्याचं लंकेच्या भूमीतून लसिथ मलिंगानं आपली सोनेरी कारकीर्द घडवण्याची किमया करून दाखवली.



श्रीलंकेत वाढणाऱ्या अनेक मुलांप्रमाणेच मलिंगानं देखील समुद्रकिनाऱ्यांवर क्रिकेटची सुरुवात केली. वयाच्या अकराव्या वर्षी त्यानं गाले जवळच्या आपल्या रथगामा या गावात पहिल्यांदा बॉल हातात घेतला आणि बिच क्रिकेटमध्ये अल्पावधीतच प्रसिद्ध झाला.

त्याची बॉल फेकण्याची शैली मात्र निराळी होती. तो हात वरती घेण्याऐवजी आडवा घेत असे. गालेच्या समुद्रकिनाऱ्यावर प्रसिद्ध असलेल्या या मुलानं श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज चंपाका रामानायके यांचं लक्ष वेधून घेतलं. त्याच्या आउट-ऑफ-द-बॉक्स ॲक्शनला आउट-ऑफ-द-बॉक्स प्रशिक्षकाची साथ मिळाली. त्याला प्रशिक्षण देण्यासाठी रामानायके यांनी बूटांचा एक जोड क्रीजवर चिकटवला होता. त्या बुटांना बॉल मारण्यात मलिंगा तासन्तास घालवायचा.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

त्याची प्रतिभा फार काळ लोकांपासून लपून राहिली नाही. त्यानं वयाच्या १७ व्या वर्षी गाले क्रिकेट क्लबकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं एकूण आठ विकेट्स घेतल्या. राष्ट्रीय संघातील त्याचे भावी सहकारी जेहान मुबारक आणि प्रसन्ना जयवर्धने हे दोघं देखील त्या सामन्यात खेळले होते.

स्थानिक क्रिकेटमध्ये त्यानं आपल्या गोलंदाजीचे दीर्घकाळ टिकून राहतील असे तरंग निर्माण केले. परिणामी त्याला लवकरच राष्ट्रीय संघात संधी मिळाली. त्यानं २००४ साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तगड्या ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंसाठी गोलंदाजी करण्याची पहिली संधी त्याला मिळाली होती. त्यानंतर त्याला दुसरी संधी देखील मोठीच मिळाली. २००४-२००५मध्ये न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेलेल्या लंकन संघात त्याची वर्णी लागली.

त्या दौऱ्यात एक गमतीशीर किस्सा घडला होता. मलिंगा इतका विध्वंसक झाला होती की यजमानांना बॉल दिसण्याससुद्धा अडचणी येऊ लागल्या होत्या! न्यूझीलंडचा कर्णधार स्टीफन फ्लेमिंगनं तर अंपायर्सला त्यांचं टायसुद्धा काढून टाकण्याची विनंती केली होती. जेणेकरून मलिंगाचा आडव्या हातानं येणारा बॉल नीट दिसेल! अंपायर्सनी कमरेला पांढऱ्या जर्सी बांधाव्यात असं देखील सांगण्यात आलं होतं.

स्टिव बकनरनं तत्काळ ही विनंती मान्य केली मात्र, डेरेल हेयरनं नाराजी व्यक्त केली होती. ‘मलिंगा आडव्या हातानं बॉल फेकतो, त्यामुळं तो बॉल विकेट जवळ उभ्या असलेल्या अंपायरच्या एकदम जवळून बॅट्समनकडे येतो. अशा परिस्थितीत बॉलकडं लक्ष जाण्याऐवजी अंपायरच्या कपड्यांकडे लक्ष जातं,’ अशी प्रतिक्रिया फ्लेमिंगनं दिली होती. एखाद्या गोलंदाजाच्या ॲक्शनमुळं अंपायरला गणवेशच बदलण्यास सांगण्याची ती क्रिकेटमधील पहिलीचं वेळ होती!

आपल्या एकदिवसीय आणि कसोटी कारकीर्दीमध्ये चांगला जम बसवल्यानंतर ‘दुखापत’ नावाची एक ‘चिपकू सौंदर्यवती’ मलिंगाच्या आयुष्यात आली. २००८ मध्ये त्याच्या गुडघ्यांना दुखापत झाली. त्यामुळं त्याच्या कसोटी कारकीर्दीला विश्रांतीचा तडा गेला. यातून बाहेर पडण्यासाठी त्यानं शस्त्रक्रियांपासून अगदी आयुर्वेदापर्यंतचा प्रवास केला.

पुढे अनेकदा त्याला लहान-मोठ्या दुखापतींचा सामना करावा लागला. दुखापतींच्या फेऱ्यात अडकलेला असूनही त्यानं प्रत्येकवेळी जोरदार कमबॅक केला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो नेहमीच समोरच्या संघासाठी सर्वात मोठा धोका असायचा. दुखापतींमुळं कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात त्याच्या गोलंदाजीत वेग मंदावलेला असूनही, एकदिवसीय क्रिकेटमध्ये चार आंतरराष्ट्रीय हॅट्ट्रिकसह ३०० विकेट्स घेण्यात त्याचा वसीम अक्रमनंतर क्रमांक लागतो. टी-20 क्रिकेटमध्येसुद्धा तो दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे.

२०१४ चा टी-20 वर्ल्डकप त्याच्या आयुष्यातील नक्कीच एक अविस्मरणीय क्षण आहे. जेव्हा व्यवस्थापनानं मूळ कर्णधार दिनेश चंडीमलला वगळण्याचा निर्णय घेतला तेव्हा मलिंगाच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली. त्यानं आपली जबाबदारी खंबीरपणे निभावली. आपलं सर्व कौशल्य पणाला लावत त्यानं बलाढ्य भारतीय संघाला पराभूत करून ट्रॉफी मायदेशी नेऊन दाखवली. अर्जुन रणतुंगानंतर आयसीसी विश्वचषक जिंकणारा मलिंगा त्याच्या देशाचा फक्त दुसरा कर्णधार आहे.

क्रिकेटच्या इतिहासातील तो एकमेव खेळाडू आहे ज्यानं एकदिवसीय सामन्यात सलग चार चेंडूंत चार विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या या पराक्रमामुळं सर विव रिचर्ड्स इतके प्रभावित झाले की, त्यांनी मलिंगा ‘अरविंदा डी सिल्वा’नंतर श्रीलंकन ​​क्रिकेटमध्ये घडलेली सर्वोत्तम गोष्ट असल्याचं म्हटलं. जयवर्धने, दिलशान, जयसूर्या, मुरलीधरन आणि संगकारा यांच्या सहभागामुळं श्रीलंकन क्रिकेट खऱ्या अर्थानं उजळून निघालं होतं आणि त्यात मलिंगाचा मोठा वाटा होता.

आपल्या १७ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये लसिथ मलिंगानं अनेक विक्रमांना गवसणी घातली आणि अनेक नवीन विक्रम प्रस्थापित केले. त्याची कारकीर्द आणि क्रिकेटमधील योगदान काही मोजक्या शब्दांमध्ये बंदिस्त करण केवळ अशक्य आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

शालेय अभ्यासक्रमात सम्राट ‘कारिकाला चोल’बद्दल शिकवलं जात नाही हे आपलं दुर्दैव आहे

Next Post

शेती जमली नाही म्हणून इंजिनिअरिंग केली, आज टाटा ग्रुपचे प्रमुख आहेत

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

शेती जमली नाही म्हणून इंजिनिअरिंग केली, आज टाटा ग्रुपचे प्रमुख आहेत

अगाथा ख्रिस्तींच्या गुप्तहेर कादंबऱ्यानी कित्येक पिढ्यांचं बालपण समृद्ध केलंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.