The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाबलीपुरमचा हा दगड न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांताला १३०० वर्षांपासून फाट्यावर मारतोय

by द पोस्टमन टीम
1 January 2026
in भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


समजा एका भला मोठा दगड एका उंच टेकडीच्या उतारावर आहे आणि त्याला धक्का दिला तर तो घरंगळत खालीच येईल ना ! गुरुत्वाकर्षणाचा नियमच तो!

तामिळनाडूमधील महाबलीपुरम येथील २५० टन वजनाच्या एका अतिभव्य दगडाने मात्र गुरुत्वाकर्षणाचा हा नियम खोटा ठरवला आहे.

तामिळनाडूच्या महाबलीपुरम येथील २५० टन वजनाचा, २० फुट उंच आणि ५ मीटर रुंद असलेला हा दगड ४ फुट उंचीच्या एका टेकडीच्या टोकावर ४५ अंशाच्या कोनात झुकलेल्या अवस्थेत स्थित आहे. महत्त्वाचे म्हणजे तो दगड स्थिर आहे.

४५ अंश कोनात जर एखादी व्यक्ती उभी राहिली तर फार काळ तोल सांभाळू शकणार नाही. एक तर ती व्यक्ती धपकन खाली पडेल किंवा पडण्याच्या भीतीने पुन्हा ताठ उभी राहील, पण हा दगड मात्र हजारो वर्षे झाली आहे त्याच अवस्थेत आहे. म्हणूनच या दगडाभोवतीचे गूढ वाढले आहे. स्थानिक लोक याला ‘देवाचा दगड’ किंवा ‘कृष्णाचा लोण्याचा गोळा’ म्हणतात.

कृष्णाचे लोणीप्रेम तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. गोकुळातील घराघरात जाऊन लोणी चोरणे हा त्याचा आवडता उद्योग. असाच एकदा तो लोण्याचा गोळा चोरून नेत असताना त्यातील अर्धा भाग इथे पडला आणि त्याचा असा भला मोठा दगड बनला. परमेश्वराने आपल्या अफाट शक्तीची प्रचीती देण्यासाठी हा दगड असा अधांतरी अवस्थेतही तोलून धरला आहे अशी दंतकथा या दगडाभोवती गुंफलेली आहे.



या दगडामागचे नेमके रहस्य तरी काय हे शोधण्याचाही प्रयत्न खूप वर्षापासून सुरू आहे. हा दगड आहे त्या ठिकाणाहून हलवण्याचे प्रयत्नही पूर्वापारपासून झालेले आहेत. इसवी सन ६३० ते ६६८ या काळात दक्षिणेत पल्लव वंशाचे राज्य होते. पल्लव राजा नरसिंहवर्मन याने हा दगड हलवण्याचा प्रयत्न केला होता. हा दगड हलवण्यासाठी त्याने शक्य ते सगळे प्रयत्न केले पण हा दगड आपल्या जागेवरून तसूभरही हलला नाही. शेवटी थकून राजाने हा दगड हलवण्याचे प्रयत्न सोडून दिले.

त्यानंतर ब्रिटीशकालीन मद्रास प्रांताचे गव्हर्नर सर आर्थर लेवी यांनीही हा दगड हलवण्याचा प्रयत्न करून पाहिला. त्यांनी तर हा दगड हलवण्यासाठी सात हत्तींचे बळ लावले होते तरीही त्यांच्या पदरी निराशाच आली. ज्या अर्थी इतके प्रयत्न करूनही हा दगड हलला नाही त्याअर्थी या दगडापासून कुणाला कसलाही धोका नाही याची आर्थर लेवीला खात्री पटली.

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

जवळपास १३०० वर्षे तो दगड त्याच ठिकाणी त्याच अवस्थेत स्थिर उभा आहे. भूकंप, चक्रीवादळ, त्सुनामी अशा कुठल्या नैसर्गिक आपत्तीमुळेही त्याचा तोल ढळला नाही.

काही केल्या हा दगड जागचा हालत नाहीये म्हणजे तो खालच्या जमिनीलाच चिकटला गेला असेल अशीही एक शंका व्यक्त करण्यात आली पण हा दगड चिकटलेलाही नाही आणि तरीही या दगडापासून कुणालाही कसलाही धोका नाही.

उलट या दगड पर्यटकांच्या आकर्षणाचा आणि कुतूहलाचा विषय आहे. इथे येणारे पर्यटक या दगडासोबत वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो काढतात. या दगडाच्या सावलीत बसतात. इथले स्थानिक लोकही विकेंडला पिकनिकसाठी इथे येतात. महाबलीपुरम हे गाव तिथल्या डोंगररांगांसाठी प्रसिद्ध आहे.

युनेस्कोने देखील इथल्या या नैसर्गिक चमत्काराची दाखल घेऊन त्याला जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला आहे. भारताच्या पुरातत्वशास्त्र सर्वेक्षण खात्यानेही याला सुरक्षित राष्ट्रीय स्मारक घोषित केले आहे.

या दगडाला एका बाजूने पाहिल्यावर त्याचा आकार अंडगोलाकार आहे असे वाटते. पण वरच्या बाजूने पाहिल्यास हा दगड वरून कोणीतरी छाटला आहे असे वाटते इतकी वरची बाजू सपाट आहे.

हा दगड असा का आहे याचा शोध घेणाऱ्या काहींच्या मते घर्षण आणि गुरुत्वबलाच्या केंद्राकामुळे हा दगड आहे त्या अवस्थेत स्थिर राहतो. घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या बलामुळे हा दगड कधीच हलत नाही, असेही स्पष्टीकरण दिले जाते.

दक्षिणेतील चोल राजाने या दगडावरूनच प्रेरणा घेऊन थंजावूर बोम्मई नावाच्या मातीच्या बाहुल्या तयार केल्या होत्या.

आजच्या काळातील रॉली-पॉली बाहुलीसारखेच त्याचे रूप होते. या बाहुल्यांचा तळ हा अर्धगोलाकार होता. या बाहुल्यांना पुढे धक्का दिला तरी ते पुन्हा आपल्या जागीच स्थिर उभे राहत असत.

या बहुल्यांमध्ये त्यांचा तोल राखण्यासाठी आतल्या बाजूला एक पुली बसवलेली असे जी पुढे पडणाऱ्या बाहुलीला पुन्हा मागे खेचत असे त्यामुळे बाहुली पुढे झुकूनही पुन्हा पूर्ववत उभी राहत असे. याला वैज्ञानिक भाषेत ‘सेंटर ऑफ मास’ म्हटले आते. पुढे मागे झुकणारे खेळण्यातील ‘खबडक खबडक घोडोबा’ आणि झुलणाऱ्या आरामखुर्च्या देखील याच तत्वावर आधारलेल्या असतात.

२०१९ मध्ये चीनचे अध्यक्ष शी जिंगपिंग भारत भेटीवर आले होते तेव्हा त्यांनीही या पुरातत्वीय स्थळाला भेट दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिंगपिंग यांना ही इथे फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. ११ मे २०१९ रोजी जिंगपिंग यांनी या स्थळाला भेट दिली होती.

एका घसरणीवर एक भला मोठा दगड आपले वजन तोलून स्थिर उभा राहतो हे पाहून कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. हा दगड पाहिल्यास कोणाही सामान्य माणसाला गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतावरच शंका उपस्थित होईलच.

हा दगड पाहून, काही झाले तरी आपले विज्ञान आणि इतिहासाबाबतचे ज्ञान किती तोकडे आहे, याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. आपल्याला निसर्ग आणि त्याचे चमत्कार अजूनही समजले नाहीत हेच खरे!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

एकोणसाठ वर्षांचा मिलिंद सोमण आजही २५ वर्षांच्या पोरांना कॉम्प्लेक्स देतोय..!

Next Post

फिलिपिन्सच्या या शिक्षिकेने २०० जपानी सैनिकांना यमसदनी धाडलं होतं..!

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
भटकंती

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

8 September 2025
इतिहास

तुर्कस्तानातील हजारो वर्षांपूर्वीची ही भूमिगत शहरे अविश्वसनीय आहेत..!

8 September 2025
भटकंती

१० हजार वर्षांपूर्वीच्या या अंडरवॉटर पिरॅमिड्सचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही..!

16 October 2025
भटकंती

जगाचे मध्य ब्रिटनमध्येच का आहे?

5 September 2025
Next Post

फिलिपिन्सच्या या शिक्षिकेने २०० जपानी सैनिकांना यमसदनी धाडलं होतं..!

आपल्या नाशिकचा मॅग्नेटो डुप्लिकेट असेल पण हा मात्र शंभर टक्के खरा आहे..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.