The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या राजाने नालंदा विद्यापीठाला जगातील सर्वोत्तम विद्यापीठ बनवलं होतं

by Tushar Damgude
11 May 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


सम्राट हर्षवर्धनचा काळ म्हणजे ५९० ते ६४७. इस्लामी आक्र*मणापूर्वीचे एक मोठे साम्राज्य म्हणून वर्धन साम्राज्याचा उल्लेख करावा लागेल. उत्तरेला हिमालय, दक्षिणेला दख्खन, पुर्वेला आसाम ते पार कंदाहारपर्यंत राज्य करणारे काहीच राजे भारताला लाभले. त्यात मौर्य साम्राज्याएवढे नाही परंतु विशाल प्रदेशावर राज्य करणारे घराणे म्हणून वर्धन घराण्याचा उल्लेख करावा लागेल.

सहाव्या शतकात हर्षवर्धनच्या काळात चार दशकं कनौज येथुन राज्यशकट हाकणारे हे राज्य सुवर्ण काळ म्हणून गणले गेले आहे.

वर्धन घराण्याचा इतिहास प्रभाकर वर्धनपासून सुरू होतो. ठाणेश्वर म्हणजे आताचे हरयाणा येथे या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. प्रभाकर वर्धनची पत्नी यशोमतीला तीन अपत्य झाली “राज्यवर्धन, हर्षवर्धन आणि कन्या राजश्री”. राजश्रीचे लग्न कान्यकुब्ज म्हणजे आत्ताचे कनौजचा राजा ग्रहवर्मन याच्यासोबत झाले.

त्या काळात भारतीय राज्यांवर हुणांची सतत आक्र*मण होत. तत्कालीन गुप्त साम्राज्याचा सम्राट स्कंदगुप्ताने या आक्र*मणाविरोधात मोठी मोहीम उघडली. त्या सगळ्या आर्थिक आणि मानवी हानीचा परिणाम गुप्त साम्राज्य कोसळण्यात झाला.



सिंधु नदीपलीकडील भाग हुणांच्या ताब्यात गेला आणि हुणांची ठाणेश्वरच्या वर्धन घराण्याबरोबर चकमक झडु लागली. त्यादरम्यान प्रभाकर वर्धनचा मृत्यु होऊन राज्यकारभार राज्यवर्धनच्या हातात आला.

इकडे शशक म्हणजे गौड साम्राज्याच्या (बंगाल) राजाने कनौजचा राजा ग्रहवर्मनची ह*त्या करून राजश्रीचे अपहरण केले. राजश्रीचे अपहरण झाल्याची बातमी कळाल्यावर राज्यवर्धनने शशकावर आक्र*मण करायचे ठरवले.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

शशकाने राज्यवर्धनला बैठकीसाठी बोलवुन कपट करुन त्याची ह*त्या केली व कनौजवर कब्जा केला.

त्यावेळी हर्षवर्धनचे वय होते १६. हर्षवर्धनने डगमगून न जाता राज्यकारभार हातात घेऊन दिग्विजय मोहिम उघडली आणि सुरुवात शशकापासुन केली. हर्षवर्धनने जाहीर दवंडी पिटुन “एकतर माझ्या बरोबर या किंवा शशकाची साथ देऊन परिणाम भोगा” अशी चेतावणी इतर राजांना दिली. शशकाविरुध्द असणाऱ्या राजांनी हर्षवर्धनचा पक्ष धरला.

हर्षवर्धनने कनौजवर आक्र*मण करून बहिणीची सुटका केली आणि शशकाला पुन्हा बंगालमध्ये हुसकावुन लावले. शशकाचा मृत्यु होईपर्यंत हा लढा सुरू राहिला आणि अशाप्रकारे मगध, बंगाल आणि कलिंगाचा प्रदेश हर्षवर्धनच्या साम्राज्यात जोडला गेला.

हर्षवर्धन इथेच थांबला नाही तर वलाभी राजांचा पराभव करुन गुजरात आपल्या साम्राज्याला जोडून घेतला. हे करताना नर्मदेच्या तिरावर दख्खनवर राज्य करणाऱ्या चालुक्य घराण्याशी त्याचा सामना झाला. चालुक्य सम्राट पुलकेशी दुसरा याने हर्षवर्धनला तोडीस तोड उत्तर दिले आणि नर्मदेचा तीर ही दोन्ही साम्राज्याची सीमारेषा असेल या समझोत्यावर दोघांचा तह पार पाडला.

६०,००० हत्ती आणि १,००,००० सैन्यदल असणाऱ्या हर्षवर्धनने तत्कालीन पाच मोठ्या साम्राज्यांशी टक्कर घेऊन आपला राज्यविस्तार केला.

तीस वर्षे शस्त्र न उचलता शांतपणे राज्यकारभार करत “सकल उत्तर पथ नाथ” ही पदवी प्राप्त केली असे ह्यु. एन. त्संग या चिनी प्रवाशाने लिहुन ठेवले आहे.

हर्षवर्धनचे साम्राज्य म्हणजे गुजरात, कलिंगा, बंगाल, राजपुताना, जालंदर, काश्मीर, नेपाळ, सिंध, कामरूप (आसाम) असे विस्तृत पसरलेले होते.

हर्षवर्धनचा काळ कला आणि शैक्षणिक दृष्टीने सुवर्णकाळ होता. हर्षवर्धन स्वतः लेखक होता आणि त्याने संस्कृत मध्ये “नागनंदा, रत्नावली, प्रियदर्शिका” ही नाटकं लिहिली. राज्याच्या उत्पन्नातील एक चौथाई हिस्सा हा विद्वानांवर खर्च होत असे. हर्षवर्धनच्या काळात नालंदा विद्यापिठ कसे भरभराटीला आले होते याविषयी ह्यु एन त्संग लिहिले आहे.

हर्षवर्धनच्या काळात नालंदा विद्यापिठात जगभरातील १०००० विद्यार्थी शिक्षण घेत होते आणि २००० शिक्षक त्यांना विद्यादानाचे कार्य करत होते. विद्यार्थ्यांची निवड परीक्षा अत्यंत कठीण असे आणि इच्छुक विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा दरवाजा वर असणारे रक्षक देखील घेत आणि मगच आत प्रवेश देत.

नालंदा विद्यापिठात वेद, बौद्ध धर्म विषयक ज्ञान, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, शहर नियोजन, औषधोपचार, कायदा, अवकाशशास्त्र, इत्यादी विषय शिकवले जात.

शिवभक्त असणाऱ्या हर्षवर्धनने नंतर महायान बौद्ध मार्ग स्विकारला. हर्षवर्धननी ह्यु एन त्संगच्या अध्यक्षतेखाली कनौज येथे विद्वानांची महासभा भरवली. ह्यु एन त्संगने अनेक हस्तलिखिते आपल्याबरोबर चीनला नेली, त्यातील ६०० संस्कृत हस्तलिखिते त्याने भाषांतरीत केली.

दुसरी महासभा प्रयाग येथे भरवली तिथे बुद्ध, सुर्य आणि महादेवाचे पुजन केले गेले, दानं वाटली गेली हा सोहळा ७५ दिवस चालला. दर पाच वर्षांनी हा सोहळा भरवला जात असे आणि वस्त्रालंकार दान केले जात आणि हे तीन-तीन महिने चालत असे. शेवटच्या काळात स्वतःजवळील भरपुर संपत्ती वाटून झाल्यावर हर्षवर्धनने अंगावरील कपडे आणि अलंकार देखील दान केले.

हर्षवर्धनच्या काळात गावांना जमिनी कसायला दिल्या गेल्या ज्याचा परिणाम म्हणून स्थानिक जमिनदार गब्बर झाले. त्यामुळे साम्राज्य हळूहळू खिळखीळे झाले. हर्षवर्धनचा मृत्यु ६४७ मध्ये झाला. याच्या मृत्युविषयी मतमतांतरे आहेत. एका दाव्यानुसार हर्षवर्धनच्या हयातीतच त्याचे पुत्र वाग्यवर्धन आणि कल्याणवर्धनची ह*त्या मंत्र्यांनी केली.

हर्षवर्धनच्या मृत्युनंतर राज्यकारभार अर्जुन नावाच्या मंत्र्याने हाती घेतला आणि तिबेटींनी त्याच्यावर ह*ल्ला करून कारावासात टाकले व ६४८ मध्ये वर्धन साम्राज्याचा अंत झाला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: HistoryIndian HistoryKing HarshavardhanRajput History
ShareTweet
Previous Post

भारतात फिजिक्स शिकणारा असा एकही विद्यार्थी नसेल जो ‘या’ माणसाला ओळखत नाही

Next Post

एका राज्याचा मुख्यमंत्री राजीनामा देऊन बसने घरी गेल्याचा किस्सा वाचा…

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

एका राज्याचा मुख्यमंत्री राजीनामा देऊन बसने घरी गेल्याचा किस्सा वाचा...

लडाखच्या या सर्जनने तब्बल १० हजार यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.