The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निळ्या त्वचेच्या कुटुंबाचं कोडं शास्त्रज्ञांनी शोधून त्यावर इलाज पण केलाय..!

by द पोस्टमन टीम
13 July 2024
in विज्ञान तंत्रज्ञान, ब्लॉग, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


२००९ मध्ये आलेला ‘अवतार’ हा हॉलीवूडपट अनेकांनी पाहिला असेल. २१५४ या वर्षात घडणारी गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. त्यात १० फूट उंचीची ‘नावी’ नावाची निसर्गपुजक जमात दाखवण्यात आली आहे. गंमत म्हणजे त्यांच्या त्वचेचा रंग निळा असतो. आपल्या पृथ्वीवरील लोकांच्या त्वचेमध्ये, भौगोलिक परिस्थितीनुसार गोरा, सावळा आणि अतिसावळा या तीन रंगांच्या अनेक छटा पहायला मिळतात. त्याव्यतिरिक्त इतर रंगाची त्वचा बघण्याची आपल्याला सवय नाही, त्यामुळे जर एखादा निळ्या रंगाचा माणूस आपल्या समोर आला तर! अगोदर नक्कीच आपल्याला भीती वाटेल आणि त्यातून सावरल्यानंतर वाटेल की आपण टाईम ट्रॅव्हल करून अवतारमधील ‘नावीं’च्या जगात तर नाही ना पोहचलो? पण, अठराव्या शतकामध्ये पृथ्वीवर देखील निळ्या रंगाची माणसं अस्तित्वात होती. उत्तर अमेरिकेच्या ‘केन्टकी’ राज्यातील ‘ट्रबलसम क्रीक'(ट्रबलसम नावाची खाडी) परिसरात हे निळे लोक वास्तव्यास होते.

हे निळ्या रंगाचे लोक कोण होते आणि त्यांच्या रंगामागे काय रहस्य होतं?

असं म्हणतात, १८२० मध्ये मार्टिन फगेट नावाचा एक फ्रेंच अनाथ पूर्व केन्टकीमधील एका दुर्गम खाडीजवळ वास्तव्यास आला होता. तिथं त्यानं एलिझाबेथ स्मिथ नावाच्या महिलेसोबत लग्न करून संसार सुरू केला. एलिझाबेथची तुलना प्रत्येक वसंत ऋतूमध्ये फुलं उमलणाऱ्या ‘लॉरेल डोंगरा’शी करण्यात आलेली आहे. मार्टीन फगेट हा इतर पुरुषांसारखा नव्हता. एका दुर्मिळ आनुवंशिक अवस्थेमुळं त्याच्या त्वचेचा रंग निळा होता. मार्टीन आणि एलिझाबेथ यांना सात अपत्ये झाली. त्यापैकी चारजण आपल्या वडिलांप्रमाणं निळी त्वचा घेऊन जन्माला आले होते.

मार्टीनला असणारा आजार हा मेथमोग्लोबनेमिया (methemoglobinemia) नावानं ओळखला जातो. यात लाल रक्त पेशींमध्ये मेथमोग्लोबिनची पातळी एका टक्क्यापेक्षा जास्त होते. त्यामुळे त्वचेला निळा, ओठांना जांभळा आणि रक्ताला चॉकलेटी रंग येतो. 

विशिष्ट रसायनांच्या (उदाहरणार्थ बेंझोकेन आणि क्लोलोकेन) संसर्गामुळे मेथमोग्लोबनेमिया होऊ शकतो. परंतु, फगेटच्या प्रकरणात असं काही झालं नव्हतं. त्याला हा वारसा त्याच्या आई-वडिलांकडून मिळाला होता. मात्र, तो लहानपणापासून अनाथ म्हणूनच वाढला असल्यानं त्याच्या पालकांचा शोध लावता आला नाही. मार्टीन हा एका सदोष जनुकाच्या सिक्रीशनचं उदाहरण होता. सायटोक्रोम-बी 5 मेथमोग्लोबिन रिडक्टेझ नावाच्या या घटकामुळं रक्तामध्ये एन्झाइमची निर्मिती कमी होते. हा दुर्मिळ आजार असला तरी, फगेट कुटुंबाला त्याचा काहीही त्रास नव्हता. ते इतर कुठल्याही सुदृढ व्यक्तीप्रमाणं आपलं आयुष्य जगू शकत होते. त्यांच्यापैकी काहीजण तर वयाच्या ऐंशी आणि नव्वदीपर्यंत जगले.



निळ्या त्वचेमुळं त्यांना काही शारीरीक त्रास झाला नाही. मात्र, ही गोष्ट त्यांना लाजिरवाणी वाटत असे. त्यांच्यापासून इतरांना काहीही धोका नव्हता तरी देखील फगेटच्या त्वचेच्या रंगामुळे स्थानिक लोक त्यांच्यापासून दूर पळत. त्यांचा अपमान करत. यामुळे निळ्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. ते जास्तीत जास्त सामाजिक अलिप्तता ठेवू लागले.

एका विचित्र योगायोगामुळं म्हणा किंवा समाजाच्या मानसिकतेमुळं म्हणा मार्टीन फगेटला एलिझाबेध स्मिथसोबत लग्न करावं लागलं होतं. दोघंही एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त होते. फरक फक्त इतकाच होता की, मार्टीन निळा होता आणि एलिझाबेथ गोरी. यामुळे दोघांकडून हा जेनेटीक डिसऑर्डर त्यांच्या मुलांमध्ये जाण्याची शक्यता अतिशय जास्त होती आणि त्याप्रमाणं झालंही त्यांच्या सातपैकी चार मुलांची त्वचा निळी होती.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

‘ट्रबलसम क्रीक’ हा प्रदेश अतिशय दुर्गम आणि कमी लोकवस्तीचा होता. त्याठिकाणी रस्ते वाहतूक आणि रेल्वे देखील पोहचलेली नव्हती. यामुळं स्थानिक मुला-मुलींना जास्त चांगला जीवनसाथी मिळण्याची शक्यताही कमीच होती. त्यांना खाडीतीलच कुणाशी तरी लग्न करावं लागत असे.

यामुळं मार्टीन आणि एलिझाबेथ यांचा मुलगा झॅकराया याला त्याच्या मावशीसोबत लग्न करावं लागलं. खाडीतील सामाजिक वातावरणानं निळ्या त्वचेची विकृती वाढण्यासाठी परिपूर्ण इनक्यूबेटर म्हणून काम केलं, असं म्हणता येईल.

पुढे १९६०च्या दरम्यान डॉ. मेडिसन केवाइन नावाचे रक्तदाबशास्त्रज्ञ (हिमॅटॉलॉजिस्ट) केन्टकी विद्यापीठात संशोधन करत होते. विद्यापीठाच्या लेक्सिग्टन मेडीकल क्लिनिकमध्ये कामासाठी गेल्यानंतर त्यांच्या कानावर ‘निळ्या फगेट कुटुंबाविषयी’ अनेक अफवा आल्या. त्यामुळं त्यांची उत्सुकता चावळली गेली. त्यांनी या लोकांच्या शोधासाठी लेक्सिग्टनपासून हझार्डपर्यंतचा आठ तासांचा प्रवास केला. हझार्डमध्ये मेडिसन यांची ओळख ‘अमेरिकन हार्ट असोसिएशन क्लिनिक’मधील एका नर्ससोबत ओळख झाली. रूथ पेडरग्रास असं त्या नर्सचं नाव होतं. तिने डॉ. मेडिसनसोबत काम करण्याची तयारी दर्शवली कारण, काही दिवसांपूर्वी रूथकडे रक्त तपासणी करण्यासाठी एक निळ्या त्वचेची महिला आली होती. तेव्हापासून रूथला देखील याबाबत जास्त जाणून घेण्याची इच्छा होती.

डॉक्टर आणि नर्सच्या या जोडगोळीनं फगेटच्या वंशातील सदस्यांची भेट घ्यायला सुरुवात केली. एक दिवस त्यांची भेट पॅट्रिक आणि रेचल रिची नावाच्या जोडप्यासोबत झाली. एका मुलाखतीमध्ये डॉ. मेडिसन यांनी या भेटीचं वर्णन केलं होतं-

‘सर्वांत पहिल्यांदा आम्ही पॅट्रिक आणि रेचलला भेटलो तेव्हा ते आम्हाला पाहून पळून गेले होते. त्वचेचा रंगा निळा असल्याबद्दल त्यांना खरोखरच लाज वाटत होती. जेव्हा ते स्वत:हून आम्हाला भेटण्यासाठी आले तेव्हा देखील पॅट्रिक हॉलमध्ये खाली मान घालून आला होता आणि रेचल तर आत येण्याससुद्धा तयार नव्हती.’ 

यावरून तुम्हाला अंदाज लावता येऊ शकतो की, त्यांचं किती मोठ्या प्रमाणात मानसिक खच्चीकरण झालं होतं.

पॅट्रीक आणि रेचलच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर त्यांचा आजार हृदयाशी निगडीत नसल्याची खात्री झाली. त्यानंतर डॉ. मेडिसन यांनी फगेट यांचा ‘फॅमिली ट्री’ तयार केला. हा मेथमोग्लोबनेमिया असण्याचा डॉक्टरांचा संशय होता मात्र, त्याविषयी त्यांना ठोस पुरावे मिळत नव्हते.

वेगळ्या प्रकारचं हिमोग्लोबिन तयार होणं किंवा जास्त प्रमाणात “विटॅमिन-के”चं सेवन करण्यासारख्या बऱ्याच शक्यता होत्या. मात्र, विविध रक्त तपासण्यांअंती शेवटी डॉक्टरला खरा दोष सापडला. फगेट कुटुंबाच्या रक्तामध्ये एन्झाइमची कमतरता असल्याची गोष्ट डॉ. मेडिसनच्या लक्षात आली.

आजार आणि त्याचं कारण लक्षात आल्यानंतर डॉ. मेडिसन यांनी त्यावर उपाय शोधण्यास सुरुवात केली. पॅट्रिक आणि रेचलच्या निळ्या त्वचेला गुलाबी बनविण्यासाठी त्यांनी मेथिलीन ब्लू या औषधाचा आणि डायचा शॉट वापरला. आश्चर्य म्हणजे डॉ. मेडिसनच्या प्रयत्नांना यश आलं. पॅट्रिक आणि रेचल दोघांच्याही त्वचेचा रंग बदलून गुलाबी झाला होता. मात्र, हे थोड्या काळासाठी परिणामकारक ठरलं कारण मेथिलीन ब्लू रक्तातून लगेच लघवीमध्ये जाते.

यावर आणखी काम करून डॉ. मेडिसन यांनी मेथिलीन ब्लूच्या गोळ्या तयार केल्या आणि सरतेशेवटी फगेटच्या वंशावळीला निळ्या रंगाच्या शापातून मुक्तता मिळाली!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

मुकेश अंबानींनी नीता अंबानींना बड्डे गिफ्ट दिलेलं प्रायव्हेट जेट सरकारने जप्त केलं होतं

Next Post

बकार्डीने क्युबात बंडखोरांना सत्तेत यायला मदत केली, त्यांनीच बकार्डीला देशाबाहेर काढलं

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
Next Post

बकार्डीने क्युबात बंडखोरांना सत्तेत यायला मदत केली, त्यांनीच बकार्डीला देशाबाहेर काढलं

या माणसाने जगाला बेफिकिरीच्या हिप्पी लाइफस्टाइलचं वेड लावलं होतं..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.