The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिकेवर ह*ल्ला करण्यासाठी जपानने आत्मघा*तकी कामिकाझे तयार केले होते

by Heramb
16 November 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


दुसऱ्या महायु*द्धात जपान आणि अमेरिकेमध्ये अटीतटीचे यु*द्ध सुरु होते, अमेरिकन सैन्य अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होते, इकडे जपानकडेही शस्त्रास्त्रांची कमतरता नव्हती, शिवाय त्यांच्या सैनिकांची आपले प्राण जरी द्यावे लागले तरी जपानला विजय मिळवून देण्याची तयारी होती. त्यानुसार जपानी सैनिकांनी अक्षरशः आपले प्राण पणाला लावले. विमानांमध्ये स्फो*टके ठेऊन थेट शत्रूंच्या जहाजावर धडकायचं आणि विनाश घडवून आणायचा, असं सुरु झालं. याच विमानांना कामिकाझे विमानं म्हणत असत.

यु*द्धातून माघार घेताना, जपानी बेटाचे रक्षण करण्याचे प्रयत्न जपानी सैन्य करीत होते. जपानी सैन्याने उरल्या-सुरल्या विमानांमध्ये स्फो*टके आणि इंधनं भरली. या विमानांना त्यांच्या शत्रूच्या जहाजांवर धडकण्याचे आदेश देण्यात आले. या क्रू*र पण धोरणात्मक ह*ल्ल्यांमुळे जपानला पॅसिफिक थिएटरमध्ये बरेच यश मिळाले तसेच अनेक अमेरिकन जहाजांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही अमेरिकन जहाजे नष्टही झाली.

कामिकाझे ह*ल्ले

कामिकाझे विमान यूएसएस सेंट लो वर आदळताना. यामुळे लेते गल्फच्या यु*द्धादरम्यान प्रचंड आगीचे लोळ उठले होते..

ही विमाने नाईलाजाने यु*द्धात वापरली गेली होती. खरं तर ही लढाऊ विमाने नव्हती. पण ही रणनीती अधिक प्रभावी होण्यासाठी जपानमधील इंजिनिअर्सनी एका वेगळ्या प्रकारचे विमान विकसित केले. योकोसुका एमएक्सवाय-७ (ओहका किंवा चेरी ब्लॉसम) हे मित्सुओ ओहटा यांनी हे संकल्पनात्मक विमान तयार केले. या विमानाला इंजिन नसून ते एका ग्लायडरच्या रूपात तयार करण्यात आले होते. विमानाला प्रॉपल्शन देण्यासाठी तीन सिंगल-युज बुस्टरचा सेट बसवण्यात आला होता.

योकोसुका एमएक्सवाय-7 ओहका

या सेटच्या मदतीने विमानाचा वेग लेव्हल फ्लाइटमध्ये ६५० किमी/तास किंवा स्टीप डाइव्हमध्ये ९०० किमी/तास इतका राहणार होता. या विमानाच्या पुढच्या बाजूला एक वॉ*रहेड (बॉ*म्ब) ठेवण्यात आला. प्रत्येक उड्डाणाच्या आधी तो विमानावर फीट केला जात असत. स्फो*टक पदार्थ जास्तीत जास्त वाढवणे आणि इच्छित स्थळी पोहोचण्यापूर्वी विमान अन्य कोठेही धडकण्याची शक्यता कमी करणे हा या ‘विमानाचा’ उद्देश होता.



हे रॉकेट बूस्टर इतर कोणत्याही प्रॉपल्शनच्या साधनांशिवाय, विमानाला त्याच्या टेकऑफ पॉइंटपासून सुमारे ३५ किलोमीटर दूर घेऊन जाऊ शकत होते. आपलं लक्ष्य भेदण्यासाठी ही विमाने त्यांच्या लक्ष्याच्या अगदी जवळून टेक-ऑफ झाली पाहिजेत, याचसाठी ‘मित्सुबिशी जी४एम२इ’ या मॉडेलच्या ‘बेट्टी’ बॉ*म्बर्सचा वापर करण्यात आला.

बेट्टी बॉम्बर

‘बेट्टी’ बॉ*म्बर्स त्यांच्या इच्छित लक्ष्याच्या जवळ आल्यावर, ओहका ग्लायडर-विमान बेट्टी बॉ*म्बर्सपासून वेगळे होत असत. शत्रूला कळू न देता, ओहका ग्लायडर-विमान अमेरिकन जहाजांच्या जवळ जात. विमानांच्या लहान आकारामुळे ते सहजासहजी दिसत नसत. रेंजमध्ये येताच, ओहका ग्लायडर-विमानाचा वैमानिक त्याच्या रॉकेट बूस्टरला ॲक्टिव्हेट करत असे आणि विमानाला जहाजावर धडकावून देत असे. यामुळे विमानाच्या पुढच्या बाजूला असलेल्या वॉ*रहेडचा स्फो*ट व्हायचा.

नुकसान

जपानी कामिकाझे ताफ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सामान्य विमाने होती. आत्मघाती विमाने म्हणून काम करण्यासाठी ओहकाचा मर्यादित का होईना पण फायदा होता. परंतु अशा प्रकारच्या विमानांचा वापर हळू हळू कमी होऊ लागला. त्यामागे प्रमुख तीन कारणे होती.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

पहिलं म्हणजे कामिकाझे विमानाला इच्छित स्थळी आणण्यासाठी वेगळ्या विमानाचा, अर्थात बेट्टी बॉ*म्बर्सचा वापर करावा लागत असे. एकदा बेट्टी बॉ*म्बर्सनी ओहकाला सोडले की त्यांना परत तळावर उड्डाण करावे लागत, यामध्ये अनेक बेट्टी बॉम्बर्स नष्ट झाले. आर्थिकदृष्ट्या पाहिलं तर हे अजिबात परवडण्यासारखं नव्हतं. कारण एका ह*ल्ल्यामध्ये दोन विमानं कायमची गमवावी लागत असत.

दुसरी अडचण म्हणजे जरी डिझाईनमध्ये ही विमाने सामान्य कामिकाझे विमानांपेक्षा अधिक प्रभावी होती, तरीही त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागला. ओहका वेगवान आणि लहान असूनही, अशा प्रकारच्या अनेक विमानांना विमानविरोधी तोफखाना आणि अमेरिकेच्या लढाऊ वैमानिकांनी उ*ध्वस्त केले.

तर तिसरी अडचण म्हणजे हे विमान सामान्य कामिकाझे विमानांच्या तुलनेत मोठे पेलोड वाहून नेऊ शकत नसले तरी स्फो*ट करणारे यंत्र कधीतरी बंद पडत असे. असं घडलं होतं ‘यूएसएस स्टॅनली’च्या बाबतीत. यावरही ओ*हकाने आत्मघाती ह*ल्ला केला होता. जहाजाला धडकून, जहाजावर स्फो*ट होण्याऐवजी, ते विमान जहाजाच्या खालच्या भागातून बाहेर आले. जहाजापासून सुमारे २० मीटर अंतरावर पेलोडचा स्फो*ट झाला. त्यामुळे या जहाजाला काहीही नुकसान झाले नाही.

यु*द्धादरम्यान प्रत्यक्षात वापरल्या गेलेल्या ७४ कामिकाझे विमानांपैकी ५६ विमाने बेट्टी बॉ*म्बर्सपासून वेगळे झाल्यानन्तर एअरडिफेन्सच्या मदतीने पाडण्यात आले. काही विमाने त्यांना वाहून आणणाऱ्या विमानांवर असतानाच उ*ध्वस्त झाले.

त्यामुळे हा शोध नाविन्यपूर्ण असला तरी तो त्यावेळी यु*द्धभूमीसाठी योग्य नव्हता.

आजही कामिकाझे विमाने ड्रोनच्या स्वरूपात वापरली जातात. चीन, रशिया, जपान, इराण या देशांकडे कामिकाझे ड्रोन्स असल्याच्या बातम्या आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या स्त्रीने तिच्या मुलीचं अपहरण करून ह*त्या करणाऱ्या दहा गुंडांना शोधून त्यांना संपवलं होतं

Next Post

एक्स्प्लेनर – भारत आणि रशियामधील एस-४०० मिसाईल्स एअर डिफेन्स सिस्टीम डील

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

एक्स्प्लेनर - भारत आणि रशियामधील एस-४०० मिसाईल्स एअर डिफेन्स सिस्टीम डील

लिथुआनियातील जनतेने स्वातंत्र्यासाठी आंदोलन केलं आणि तिथूनच सोव्हिएतची दुर्दशा सुरु झाली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.