The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जॉनी लीव्हरने हृतिक रोशनच्या लिव्हरचं दुखणं जिझसचं नाव घेऊन दूर केलं होतं म्हणे..!

by द पोस्टमन टीम
18 December 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


तुम्ही अनिल कपूर, श्रीदेवी आणि उर्मिला मांतोडकरचा ‘जुदाई’ हा चित्रपट पाहिलाय का? तुमच्यापैकी काहींनी पाहिला नसेलही. मात्र, जॉनी लिव्हरचा ‘अब्बा डब्बा जब्बा’ हा डायलॉग तर कधी ना कधी नक्कीच ऐकला असेल. आपल्या या एका डायलॉगच्या मदतीनं संपूर्ण जुदाई चित्रपटात जॉनी भाव खाऊन गेला होता. जॉनीनं आपल्या अचूक कॉमिक टाईमिंगच्या आधारे मेलोड्रामॅटिक चित्रपटाला कॉमिक मेलोड्रामा करून टाकलं होतं.

आतापर्यंत तीनशेपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलेला जॉनी लीव्हर याला भारतातील पहिला स्टँडअप कॉमेडियन म्हणून ओळखले जाते. आपल्या सहज साध्या विनोदी अभिनयासाठी त्याला आतापर्यंत १३ वेळा फिल्मफेयर अवॉर्ड्सचे नॉमिनेशन्स मिळाले आहेत. त्यापैकी दोनदा त्यानं फिल्मफेयर आपल्या नावे केलं आहे.

कमालीचा मनोरंजनकार असलेला जॉनी वेगळ्याच कारणानं चर्चेत आला होता. प्रार्थना करून आपण हृतीक रोशनच्या लिव्हरचा आजार बरा केल्याचा दावा जॉनीनं केला आहे. जॉनीचा हा दावा खरा आहे की, त्याच्या कुठल्या कॉमेडी शोचा भाग, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याअगोदर आपल्याला जॉनीची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. १४ ऑगस्ट १९५७ रोजी आंध्र प्रदेशातील प्रकाशम येथील एका तेलुगू ख्रिश्चन कुटुंबात जॉनीचा जन्म झाला होता. ‘जॉन प्रकाशराव जानूमला’ हे त्याचं मूळ नाव. त्याचे वडील मुंबईतील हिंदुस्तान युनिलिव्हर प्लांटमध्ये ऑपरेटर म्हणून काम करत होते. त्यामुळे मुंबईतील धारावीच्या किंग्ज सर्कल परिसरात जॉनीचं बालपण गेलं.

मुंबईत राहिल्यामुळं मातृभाषा तेलुगू असूनही त्याला हिंदी, मराठी, इंग्रजी या भाषा अस्खलितपणे बोलता येतात. परिस्थितीअभावी त्याला आपलं शिक्षण पूर्ण करता आलं नाही. म्हणून त्यानं अनेक ठिकाणी काम लहान-मोठी काम केली. काही दिवस त्यानं हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीमध्येदेखील काम केलं.



कंपनीतील एका कार्यक्रमादरम्यान, त्यानं काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नक्कल केली होती. त्या दिवसापासून कंपनीतील कर्मचाऱ्यांनी त्याचं नामकरण ‘जॉनी लीव्हर’ असं केलं. जन्मानं ख्रिश्चन असलेल्या जॉनीची पहिल्यापासूनच ईश्वरावर श्रद्धा होती. मात्र, त्याच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेनं त्याला पूर्णवेळ धर्मोपदेशक होण्यास भाग पाडलं.

जॉनी आणि त्याची पत्नी सुजाता यांना जेमी आणि जेसी नावाची दोन अपत्यं आहेत. त्यापैकी जेसीला कॅन्सरची लागण झाल्यानंतर जॉनीचं आयुष्य बदलून गेलं. जॉनीच्या म्हणण्यानुसार, जेसी लहान असताना त्याच्या मानेवर एक गाठ आली होती. जॉनीनं आपल्या मुलाला मुंबईतील प्रसिद्ध नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र, त्या कॅन्सरच्या शस्त्रक्रियेमध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता असल्यानं डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिला.

शस्त्रक्रिया केल्यास अर्धांगवायू, दृष्टी कमी होण्याची देखील शक्यता होती. त्यानंतर तो आपल्या मुलाला घेऊन अमेरिकेला गेला. अमेरिकेत असताना तो आपल्या मुलाला घेऊन चर्चमधील हिलींग मिटिंग्जमध्ये घेऊन जात असे. हिलींग मिटिंग्ज या चर्चमध्ये भरवल्या जाणाऱ्या प्रार्थना सभा असतात. त्याठिकाणी येशूची प्रार्थना केल्यास दुर्धर आजार देखील बरे होतात, असा ख्रिश्चन बांधवांचा विश्वास आहे.

जेव्हा जॉनी आपल्या मुलांना घेऊन अशा हिलींग मिटिंग्जमध्ये जात असे तेव्हापासून त्याच्या मनावर खोलवर प्रभाव पडला. पुढे दिवंगत अभिनेते सुनिल दत्त यांच्या शिफारसीनुसार अमेरिकेतील एका डॉक्टरांनी जॉनीच्या मुलावर उपचार केले आणि तो बरा झाला. या घटनेमुळं आपला देवावरील विश्वास दृढ झाल्याचं जॉनी म्हणतो. आपला मुलगा कॅन्सरमधून बरा झाल्यानंतर जॉनीनं पूर्णवेळ धर्मोपदेशक होण्याचा निर्णय घेतला. जवळपास गेल्या दहा ते बारा वर्षांपासून तो हे काम करत आहे.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

जॉनीच्या म्हणण्यानुसार, जगभरात येशूच्या वचनाचा प्रचार सुरू केल्यानंतर, त्याला हिलिंग पॉवर्स मिळाल्या आहेत. त्यानं आपल्या शक्तींचा कधी स्पष्ट शब्दांमध्ये उल्लेख केलेला नसला तरी त्यानं आपल्या अनेक वक्तव्यांमधून हिलिंग पॉवर असल्याचा दावे केले आहेत. त्यानं आपल्या अनेक मुलाखती आणि हिलिंग मिटिंग्जमध्ये एक विचित्र दावा केलेला आहे. तो म्हणजे त्यानं अभिनेता हृतिक रोशनचा यकृताचा आजार बरा केला.

काही काळापूर्वी सोशल मीडियावर एक क्लिप फिरत होती, ज्यामध्ये जॉनी लीव्हर ‘युथ असोसिएट इंटरनॅशनल’ या संस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात एका मोठ्या जनसमुदायाला संबोधित करताना दिसत आहे. ‘युथ असोसिएट इंटरनॅशनल’ ही पुण्यातील एक मिशनरी संस्था आहे.

या संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना जॉनी लोकांना सांगत आहे की, ‘कोयला चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान दिग्दर्शक राकेश रोशन यांना चालताना त्रास जाणवत होता. ही गोष्ट जॉनीच्या लक्षात आल्यानंतर त्यानं राकेश रोशन यांना ‘मी तुमच्यासाठी प्रे करू का?’ असा प्रश्न विचारला. त्यांनी होकार दिल्यानंतर जॉनीनं ईश्वराचा धावा केला आणि पुढील काही मिनिटांतच राकेश रोशन यांचा पाय ठिक झाला.’

याच व्हिडिओमध्ये त्यानं आणखी एक दावा केला आहे. ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर जॉन अभिनंदन करण्यासाठी राकेश रोशन यांना भेटला. तेव्हा त्याला हृतीक रोशनच्या यकृताच्या आजाराबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर जॉनीनं हृतीकसाठी प्रे केलं. तेव्हापासून आजपर्यंत हृतीकला यकृताच्या आजारासाठी एकही गोळी खावी लागलेली नाही.

गेल्या कित्येक वर्षापासून जॉनी लिव्हर हा दावा करत आला आहे. मात्र, रोशन कुटुंबातील कुणीही या दाव्याला पाठिंबा दिलेला नाही किंवा त्याचं खंडन देखील केलेलं नाही. त्यामुळं अनेकांना जॉनीच्या वक्तव्यांवर विश्वास बसतो. राकेश रोशन आणि हृतीक रोशन तर प्रसिद्ध आहेत म्हणून आपल्याला माहिती आहेत. मात्र, अशा कितीतरी लोकांना आपण ठिक केलं असल्याचं जॉनीचं म्हणणं आहे. त्याच्या दाव्यांमध्ये कितपत सत्यता आहे, हे त्यालाच माहिती.

प्रत्येक धर्मातील देवतांच्या अस्तित्त्वाबाबत अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत. या मुद्द्यावरून आस्तिक आणि नास्तिक लोकांमध्ये कायम वाद होतात. त्यामुळं आस्तिक लोकांना जॉनी लिव्हरच्या दाव्यावर विश्वास बसेल आणि नास्तिक त्याची खिल्ली उडवतील हे नक्की. बाकी कुठल्या गोष्टीवर कितपत विश्वास ठेवायचा हे समजण्याइतकं प्रत्येकजण सुज्ञ आहेच.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

आपल्याला वर्ल्डकप फायनलमधून घरी पाठवणाऱ्या रिकी पॉन्टिंगवरचा राग अजूनही गेला नाही…!

Next Post

‘रेअर अर्थ एलिमेंट्स’वरची चीनची मक्तेदारी जगासाठी डोकेदुखी ठरत आहे.

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

'रेअर अर्थ एलिमेंट्स'वरची चीनची मक्तेदारी जगासाठी डोकेदुखी ठरत आहे.

सरकार स्थापन करून वर्षही झालं नाही आणि तालिबान सरकार जगभर पैसे मागत फिरत आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.