The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या शास्त्रज्ञाला वेड लागलंय या भीतीने कमिटीतील लोक नोबेल देण्यासाठी कचरत होते

by द पोस्टमन टीम
12 June 2025
in विज्ञान तंत्रज्ञान, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


ते एक प्रसिद्ध गणितज्ञ होते. जगप्रसिद्ध नोबेल आणि एबेल अशी दोन्ही पुरस्कार पटकावणारे ते एकमेव शास्त्रज्ञ. एकाच वेळी असामान्य प्रतिभा आणि तीव्र मनोविकृती घेऊन जगलेल्या या गणितज्ञाचे नाव होते जॉन नॅश!

त्यांच्या जीवनावर आधारित “द ब्युटीफुल माइंड” या हॉलीवूड चित्रपटालाही ऑस्कर मिळाला होता. या चित्रपटामुळेच जॉन नॅशची ओळख संपूर्ण जगाला झाली. हॉलीवूडच्या “द ब्युटीफुल माइंड” या चित्रपटाने त्यांच्या आयुष्याचे सत्य मांडले असले तरी वास्तवात जॉन यांचे आयुष्य चित्रपटापेक्षाही जास्त रोमांचक होते.

गणिताच्या क्षेत्रात गेम थेअरीसारखे योगदान देणाऱ्या जॉन यांना लहानपणी मात्र गणिताची अजिबात गोडी नव्हती. इतर सामान्य मुलांप्रमाणेच त्यांनाही गणिताची भीती वाटत असे.

गणित हा लहानपणी तरी त्यांच्या नावडीचा विषय होता. परंतु इ. टी. बेल यांचे मेन ऑफ मॅथेमॅटिक्स हे पुस्तक वाचल्यानंतर गणिताकडे पाहण्याची त्यांची दृष्टीच बदलून गेली इतकी की नंतर त्यांनी स्वतःच एक नवा सिद्धांत मांडला.

जॉनचे पदवीपर्यंतचे शिक्षण ‘कार्नेगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ येथे पूर्ण झाले. नॅश यांनी या संस्थेमध्येच आपल्यातील असामान्य प्रतिभेची चुणूक दाखवली होती. म्हणूनच एमआयटीला (मेसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) शिफारस पत्र लिहिताना त्यांच्या शिक्षकांनी त्यांचे वर्णन एक प्रतिभावंत विद्यार्थी असे केले होते.



वेस्ट व्हर्जिनियामधील ब्ल्यूफिल्ड येथे १३ जून १९२८ रोजी त्यांचा जन्म झाला. पिट्सबर्ग येथून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि एमआयटीमध्ये प्रवेश मिळूनही त्यांनी प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पीएचडीसाठी गेम थिअरीच्या सिद्धांतावर प्रबंध सादर केला. त्यांनी हा प्रबंध सादर केला तेव्हा ते फक्त २१ वर्षांचे होते. याच सिद्धांतामुळे भविष्यात आपल्याला नोबेल पारितोषिक मिळणार आहे याची तेव्हा त्यांना सुतरामही कल्पना नव्हती.

पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नॅश यांनी प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीतच शिकवण्याचा निर्णय घेतला. २६व्या वर्षी त्यांना विचित्र वागणुकीसाठी पोलिसांनी अटक देखील केली होती. कदाचित त्यांच्या स्किझोफ्रेनिया या गंभीर मनोविकृतीची ही सुरुवात होती. यानंतर जॉन यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जुळवून घेणे अवघड जाऊ लागले. कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या वागणुकीत बदल होऊ लागले. त्यांना मिळणाऱ्या विशेष सोयी-सवलती आणि अधिकार नाकारले जाऊ लागले.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

यांनतर काही वर्षांनी जॉन यांनी एलिसाशी लग्न केले. पण, त्यांच्यातील स्किझोफ्रेनियाचा त्रास तोपर्यंत तीव्र झाला होता. त्याचे परिणाम त्यांच्या विवाहसंबंधावर देखील झाले. या आजाराने त्यांना खूप ग्रासले होते. लोकांपासून त्यांचा हा आजार लपून राहिला नाही.

या आजारामुळेच त्यांची योग्यता असतानाही त्यांना गणित विभागप्रमुखाचे पद दिले गेले नाही.

त्यांना यावेळी आपली नोकरी गमवावी लागली. त्यांच्यावर सक्तीने मानसशास्त्रज्ञांचे उपचार सुरु करण्यात आले. दोन महिने तरी त्यांना नियमित औषधे घेण्याची सक्ती करण्यात आली.

दोन महिन्यांनी रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी अचानकच युरोपला जाण्याचा निर्णय घेतला. एलिसाने याकाळात त्यांची खूपच काळजी घेतली. आपले नवजात बाळ तिने आपल्या आई-वडिलांजवळच ठेवले आणि तिने नॅश यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण तिथे गेल्यावर लगेचच त्यांना अटक करून पुन्हा अमेरिकेला पाठवण्यात आले.

त्यांच्या मानसिक आजारामुळे त्यांना अगदी छोट्या छोट्या गोष्टींविषयी अनाकलनीय भीती वाटत होती. जसं की एखादा लाल टाय घातलेली व्यक्ती पहिली की हा माणूस कम्युनिस्ट कारस्थानी गटाचा सदस्य असावा असे त्यांना वाटे. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे त्यांना कधी भास नाही झाले. पण, त्यांना भासमान आवाज ऐकू येत असत, ज्याचा या चित्रपटात उल्लेखच केलेला नाही.

आज स्किझोफ्रेनिया हा एक आजार आहे, हे आपण सर्वच जण जाणतो मात्र, जेंव्हा नॅश या आजाराने त्रस्त होते तेंव्हा मानसशास्त्रदेखील बाल्यावस्थेत होते. या आजारासाठी योग्य त्या उपचार पद्धतीचा शोध लागला नव्हता. त्यामुळे कधी कधी नॅश यांना त्यांना होणारे भ्रम आणि त्यांच्या कल्पना यातील फरकच कळत नसे.

नॅशच्या गेम थेअरीचा उपयोग गणितासह अर्थशास्त्र, समाजशास्त्र अशा इतर क्षेत्रांतही होत होता. म्हणूनच गणितासाठी नोबेल दिला जात नसल्याने त्यांना अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर झाला.

विशेष बाब म्हणजे नॅश आणि अर्थशास्त्र यांचा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नव्हता. त्यांनी कधीच अर्थशास्त्राचा अभ्यास केला नव्हता. त्यांच्या थिअरीचा समाजावर व्यापक परिणाम होत होता म्हणूनच त्यांना यासाठीचा नोबेल देण्यात आला. पण, नोबेल देतानाही नोबेल पारितोषिक समितीला या व्यक्तीच्या योग्यतेबद्दल शंका होती. शेवटी, नोबेल पारितोषिक देताना त्यांचे व्याख्यान न ठेवता, त्यांच्या गेम थिअरीवर तज्ज्ञांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला.

२१व्या वर्षी लिहिलेल्या सिद्धांतासाठी त्यांना ६६व्या वर्षी नोबेल दिला जात होता. त्यांच्या कामाची शेवटी दखल घ्यावीच लागली.

नॅश प्रतिभावंत होते यात काहीच वाद नव्हता. पण, त्याचवेळी त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक काळी किनारही होती. स्किझोफ्रेनियासारख्या आजारामुळे असेल कदाचित पण, नॅश चारचौघात कधीच मिसळत नसत. याउलट ते प्राण्यांसोबत वेळ घालवत. ते प्राण्यांचा अतोनात छळ करत असत.

नॅश यांनी अनेकदा स्वतःहून आपल्या मानसिक आजाराचा कबुलीजबाब दिला होता. या मनोविकारामुळे एलिसा आणि नॅश यांच्या संसारातही विघ्न निर्माण झाले. १९६३ साली दोघांनीही घटस्फोट घेतला. यानंतरही नॅश यांचे दवाखान्यातील हेलपाटे काही चुकले नाहीत. एलिसाने पुन्हा एकदा त्यांचा आजारासह त्यांचा स्वीकार केला आणि २००१ मध्ये ते दोघेही पुन्हा विवाहबद्ध झाले.

२०१५ मध्ये एका कारअपघातात नॅश आणि त्यांची पत्नी एलीस यांचे निधन झाले. दोन सर्वोच्च जागतिक सन्मान पटकावण्याची पुनरावृत्ती पुन्हा घडेल याची शक्यता खूपच धूसर आहे. म्हणूनच नॅश यांचे संशोधन क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

ब्रिटनच्या लायब्ररीत ठेवण्यात आले आहेत जगातील सर्वात खतरनाक बॅक्टेरिया !

Next Post

भटकंती – महाराजांच्या आठवणी जागवणारी उंबर खिंड

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
Next Post

भटकंती - महाराजांच्या आठवणी जागवणारी उंबर खिंड

सुनील जोशीच्या गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.