The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अ*फूचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्याचा मुलगा भारतीय उद्योगविश्वाचा पितामह बनला

by द पोस्टमन टीम
19 May 2025
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आज भारतात अनेक उद्योगधंद्यांची रेलचेल दिसून येते. अगदी छोटीशी सुई बनवण्यापासून ते अवकाशात कृत्रिम उपग्रह पाठवण्यापर्यंत आणि विविध पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित करण्यापर्यंत भारताने आश्चर्यकारक प्रगती केली आहे. आज अन्नधन्यापासून दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंच्या उत्पादनात आज भारत स्वयंपूर्ण बनला आहे.

सामान्य माणसालाही व्यापार-उदीम आणि उद्योगाचे महत्त्व समजले आहे. आजचे अनेक तरुण स्टार्टअपद्वारे आर्थिक विकासाच्या नवनव्या संधी शोधत आहेत. त्यांच्या नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपडत आहेत. भारत सरकार देखील तरुणांच्या या प्रयत्नांना बळ देण्यासाठी नवनव्या योजना जाहीर करून त्यांना प्रोत्साहन देत आहे.

पण, ब्रिटिशांच्या अंमलाखालील भारतात अशाप्रकारे स्वतःचे उद्योग साम्राज्य उभे करण्याचे स्वप्न पाहणे आणि ते अंमलात आणणे इतकं सोपं होतं काय? तरीही, जमशेद टाटा नावाच्या पारशी तरुणाने हे शक्य करून दाखवले.

आज मिठापासून चहापर्यंत आणि स्टीलपासून ते कार-ट्रकसारख्या चारचाकी वाहनांपर्यंत आणि वित्तपुरवठ्यापासून ते सॉफ्टवेअरपर्यंत आपण आपल्या दैनंदिन जीवनात ज्या काही वस्तू, सेवा वापरतो त्यात टाटाचे उत्पादन हमखास असतंच. संपूर्ण देशभर आज टाटा उद्योगसमूहाचे जाळं पसरलं आहे. नुसता आपला देशच नाही तर, देशापल्याडदेखील उद्योग जगतात टाटा समूहानं देशाचं नाव उज्वल केलं आहे.



टाटा समूहाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या उद्योगातील मध्यवर्ती विचारसरणी.

टाटा समूहात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला याची जाणीव करून दिली जाते की, “आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारे सामान्य भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहोत.”

या महाकाय उद्योग जगताचा पाया जमशेदजी टाटा यांनी घातला. म्हणूनच त्यांना भारतीय उद्योग जगताचं जनक म्हटलं जातं.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

गुजरातच्या नौसरी भागात ३ मार्च १८३९ रोजी जमशेदजी टाटा यांचा जन्म झाला. जमशेदजींचे वडील नुसरवानजी टाटा गावातच छोटेखानी व्यापार करायचे. इंग्रजांनी व्यापाराच्या दृष्टीने मुंबई बंदराचा विकास करून नवे शहर वसवण्यास सुरुवात केली तेव्हा नुसरवानजी यांनी नौसरीहून मुंबईला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. यावेळी जमशेदजी यांचे प्राथमिक शिक्षण नौसारीमध्येच सुरु होते.

नुसरवानजी एक उत्तम व्यापारी होते. मुंबईत येण्याआधी गुजरातमध्ये त्यांचा निर्यातीचा व्यापार होता. व्यापाराच्या क्षेत्रात पश्चिमी देशांमध्ये तेव्हा तीव्र चढाओढ सुरु होती. नुसरवानजी अ*फिमचा व्यापार करत होते. विशेष म्हणजे त्याकाळी अ*फिमच्या व्यापाराला कायदेशीर परवानगी होती. यु*द्धात जखमी झालेल्या सैनिकांना वेदनेचा विसर पाडण्यासाठी अ*फिमचा वापर केला जात असे.

जमशेदजी वयाच्या तेराव्या वर्षी उच्च शिक्षणासाठी मुंबईत आले. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. अभ्यासात त्यांना चांगली गती होती. एल्फिन्स्टनमधून त्यांनी टॉप करत त्यांनी पदवी मिळवली. पदवी मिळवल्यानंतर त्यांनी वडिलांच्या व्यवसायात मदत करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी वडिलांच्या व्यवसायातच मदत केली. १८५९मध्ये त्याच्या वडिलांनी व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी जमशेदजींना हॉन्गकॉन्गला पाठवले.

देशाच्या बाहेरही आपले उद्योगविश्व वाढवावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. पुढची चार वर्षे जमशेदजी हॉन्गकॉन्गमध्येच राहिले. वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी हॉन्गकॉन्गमध्ये टाटाच्या कामाची सुरुवात केली. हॉन्गकॉन्ग पाठोपाठ चीन आणि जपानमध्ये देखील जमशेदजींनी आपल्या उद्योगाचा विस्तार केला.

आशियामध्ये जमशेदजींना उद्योगाच्या बाबतीत चांगले यश मिळाले असले युरोपात मात्र त्यांना सुरुवातीला म्हणावं तेवढं यश मिळालं नाही. मात्र, व्यवसायाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने त्यांनी चीन, जपान, अमेरिका, इंग्लंड या देशांचे दौरे केले. तेथील उद्योगजगताचा चांगला अभ्यास केला.

जमशेदजींची पदवी पूर्ण झाली त्यावेळी भारतात ब्रिटीशविरोधी लढ्याला सुरुवात झाली होती. हा काळ प्रचंड संघर्षाचा होता. ब्रिटिशांनी १८५७चे बंद दडपून टाकले होते. मात्र ब्रिटीशविरोधी विद्रोहाची हीच सुरुवात होती. देशभर सर्वत्र अनागोंदी असताना टाटांनी आपल्या व्यापाराला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले.

१८६८ साली जमशेदजींनी स्वतःची कंपनी सुरु केली. तोपर्यंत ते आपल्या वडिलांसोबतच काम करत होते. युरोपच्या दौऱ्यावर असताना त्यांनी कापडाच्या व्यापारातील फायदा जवळून बघितला. त्यानंतर १८९६ मध्ये भारतात आल्यावर त्यांनी चिंचपोकळी येथील एक दिवाळखोरीत निघालेली एक तेल मिल विकत घेतली आणि तिचे रुपांतर कॉटन मिलमध्ये  केले. या मिलमधून त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले.

जसा मिलमधून चांगला नफा मिळू लागला तशी त्यांनी ती मिल विकून टाकली. मिल विकून मिळालेल्या पैशातून त्यांनी नागपूरला नवी मिल चालू केली. या मिलमधूनही त्यांना प्रचंड फायदा झाला. पुढे याच मिलचे ‘एम्प्रेस मिल’ असे नामकरण करण्यात आले.

यानंतर जमशेदजींनी चार नव्या कल्पना अंमलात आणल्या.

यामध्ये एक होती स्टील कंपनीची, दुसरी जागतिक दर्जाचे हॉटेल, तिसरे शैक्षणिक संस्था आणि चौथे जलविद्युत निर्मिती. या चारही योजना जर यशस्वी झाल्या तर भारत लवकरच आत्मनिर्भर देश बनेल असा त्यांचा कयास होता.

अर्थात, यातील हॉटेल ताजचं स्वप्न त्यांच्याच हयातीत पूर्ण झालं. ३ डिसेंबर १९०३ रोजी मुंबईतील कुलाबा येथे हॉटेल ताजचं उद्घाटन झालं. पोलाद उद्योगात उतरण्याचं त्यांचं स्वप्न होतं. यासाठी त्यांनी १८८२ साली कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मयुरगंज येथे लोखंड आणि कोळशाचे साठे आढळले होते. म्हणून त्याच ठिकाणी पोलाद कारखाना सुरु करण्याचा त्याच्या मनसुबा होता. त्याकाळी पोलाद निर्मितीसाठी त्यांनी २ कोटी ३२ लाख रुपयांचं भांडवल उभं केलं होतं.

पण, त्यांच्या इतर कल्पना पुढील पिढीने प्रत्यक्षात उतरवल्या. या चार कल्पनांमुळेच ‘टाटा ग्रुप ऑफ कंपनीज’ची स्वतःची ओळख निर्माण झाली. या कंपनीच्या स्थापनेनंतर देशात मोटारी, ट्रक, इत्यादी अवजड साहित्यांची निर्मिती करणे शक्य झाले.

१९०० साली ते व्यापाराच्या निमित्ताने जर्मनीच्या दौऱ्यावर असताना आजारी पडले. यानंतर त्यांचे प्रकृती स्वास्थ्य खालावतच गेले. १९ मे १९०४ रोजी बॅड नौहेम येथे त्यांचे निधन झाले. इंग्लंडमधील पारशी समाजाच्या ब्रूकवूड दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या व्यक्तीने ‘बेयर फुट कॉलेज’च्या माध्यमातून सोलर इंजिनिअर्सची चळवळ उभी केली आहे

Next Post

चिमाजी आप्पाच्या तलवारीने महापराक्रम गाजवत स्वराज्याचा विस्तार केला होता

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

चिमाजी आप्पाच्या तलवारीने महापराक्रम गाजवत स्वराज्याचा विस्तार केला होता

माओच्या संपूर्ण क्रांतीच्या स्वप्नामुळेच लाखो चीनी नागरिकांचे आयुष्य धुळीस मिळाले होते

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.