The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या माणसाने रोबोट्सना नियम घालून दिलेत, म्हणून आपण सुरक्षित आहोत..!

by द पोस्टमन टीम
26 September 2025
in मनोरंजन, विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


बऱ्याचदा आपण ठरवलेली कामे वेळेत होत नाहीत. व्यायाम करायचा आहे, पुस्तक वाचायचं आहे, पण वेळच नाही ही तक्रार आपण बऱ्याचदा ऐकत किंवा ऐकवत असतो. असं असलं तरी काही जण मात्र त्यांना मिळालेल्या वेळेचा आणि संधीचा असा काही वापर करतात की बघून थक्क व्हावं.

आयझॅक ऍसिमोव्ह हे देखील असेच एक नाव ज्यांनी मर्यादित संधीत निर्माण केलेल्या कर्तृत्वाकडे पाहून थक्क व्हायला होतं. यांच्या आयुष्यातील प्रतिकूल परिस्थिती आणि त्याबदल्यात त्यांनी केलेली अफाट कामं पहिली की, नक्कीच तुम्हालाही असाच प्रश्न पडेल की, यांच्याकडे नेमकी कुठली सुपर पॉवर असावी, ज्याच्या बळावर यांनी हे केलं असेल?

आयझॅक ऍसिमोव्ह यांनी एकूण फाउंडेशन आणि रोबॉट सिरीजसारखी ५०० पुस्तकं लिहिली जी विज्ञानकथेवर आधारलेली आहेत, रोबोट्सना नियम घालून दिले, त्याव्यतिरिक्त कितीतरी पाठ्यपुस्तकं, टीव्ही शोज् आणि फिल्मसाठीही लेखन केले. 

त्यांच्या या अफाट कार्यक्षमतेचे रहस्य त्यांच्या बालपणात दडले आहे. आयझॅक यांचा जन्म सोव्हिएत रशियामध्ये २ जानेवारी १९२० रोजी झाला. त्यांची आई ऍबॉना रॅचेल आणि वडील जुडाह ऍसिमोव्ह दोघेही ज्यू होते. या जोडप्याला एकूण १७ मुले होती. पण त्यातील एकटे आयझॅक वाचले. त्यांची बाकी मुले न्युमोनियाने गेली.

आयझॅक तीन वर्षांचे असताना त्यांच्या कुटुंबाने अमेरिकेत स्थलांतर केले. अमेरिकेत आल्यानंतर त्यांच्या वडिलांनी मिळेल ते काम करून थोडे पैसे साठवले आणि एक कॅन्डी स्टोअर विकत घेतले. दिवसातील १९ तास काम करून त्यांनी हा उद्योग यशस्वीरीत्या चालवला. कॅन्डी स्टोअरचे काम चांगले चालल्यानंतर आता त्यांच्या वडिलांना आपला हा व्यवसाय वाढवायचा होता. कॅन्डीसोबतच ते आता साप्ताहिक देखील विकू लागले. आयझॅक नऊ वर्षाचे झाल्यावर तेसुद्धा आपल्या वडिलांच्या व्यवसायात मदत करू लागले. घरचा व्यवसाय सांभाळून ते एका कपड्याच्या दुकानात आणि एका प्राध्यापकाकडे टायपिस्ट म्हणूनही काम करू लागले. आयझॅक यांनाही दिवसातील १९-१९ तास काम करण्याची सवय लागली. साप्ताहिक विकताविकता ते पुस्तकांच्या आणि वाचनाच्या प्रेमात पडले. न्यूयॉर्कमधील एका पब्लिक स्कूलमधून त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले.



पंधराव्या वर्षी त्यांनी न्यूयॉर्कमधील सिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सुरुवातीला त्यांनी प्राणीशास्त्र विषयासाठी प्रवेश घेतला होता, पण प्राण्यांचे डिसेक्शन करण्याच्या भीतीने त्यांनी प्राणीशास्त्र विषय बदलून रसायनशास्त्र हा विषय घेतला. खरे तर त्यांना कोलंबिया कॉलेजमध्ये प्रवेश घायचा होता पण तिथे ज्यूंसाठी असलेल्या राखीव जागा संपल्याचे कारण सांगून त्यांना प्रवेश नाकारण्यात आला.

१९३९ साली त्यांचा रसायनशास्त्र विषयातील पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाला. त्यानंतर त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील पदवी घ्यायची होती. यासाठी त्यांनी न्यूयॉर्कमधील पाच मेडिकल कॉलेजमध्ये अर्ज केले. प्रत्येक कॉलेजने त्यांना प्रवेश नाकारला होता. सगळ्यांकडून नकार मिळाल्यानंतरही त्यांनी पुन्हा एकदा अर्ज केला आणि पुन्हा एकदा त्यांच्या वाट्याला नकारच आला.

कोलंबियाच्या ग्रॅज्युएट स्कूल फॉर केमिस्ट्रीमध्येही त्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला होता पण, तिथेही त्यांना प्रवेश नाकारला गेला. कोलंबिया विद्यापीठाच्या विभागप्रमुखांशी चर्चा करून त्यांनी फक्त एक वर्षासाठी प्रवेश देण्याची विनंती केली. प्रशासनाने त्यांना प्रवेश देण्याचे मान्य केले. आणि १९४१ साली त्यांनी केमिस्ट्रीमध्ये मास्टर्स डिग्री मिळवली.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

१९४५ साली त्यांनी काही काळ फिलाडेल्फिया नेव्हल एअर एक्स्परिमेंट स्टेशनमध्ये काम केले. दुसऱ्या महायु*द्धाच्या दरम्यान त्यांनी अमेरिकन लष्करातही काम केले. नऊ महिने लष्करात काम केल्यानंतर त्यांच्याकडून झालेल्या काही तांत्रिक चुकीमुळे त्यांना लष्करातून काढून टाकण्यात आले. लष्करातून बाहेर पडल्यानंतर ते पुन्हा आपल्या अभ्यासाकडे वळले. १९४८ साली त्यांनी केमिस्ट्रीमधून डॉक्टरेट मिळवली.

१९४९ साली ते बॉस्टनच्या युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये बायोकेमिस्ट्रीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पण कॉलेजमध्ये शिकवण्यापेक्षा त्यांना लेखनात जास्त रस होता. लेखनातूनच त्यांची चांगली कमाई होत होती. १९३९ साली एका सायन्स-फिक्शन मॅग्झीनसाठी लेखन सुरु केले.

मरून्ड ऑफ वेस्टा ही त्यांची पहिली कथा अमेझिंग स्टोरीजने विकत घेतली होती. त्यांचे लेखन हे जास्तीतजास्त सायन्स-फिक्शन होते. त्यानंतर १९५० पासून त्यांनी कादंबऱ्या लिहायला सुरुवात केली. या कादंबऱ्याही विज्ञान-कथेवरच आधारलेल्या असत. बॉस्टन विद्यापीठात नोकरी करत असतानाच ते ठिकठिकाणी व्याख्याने देण्यासाठीही जात असत. त्यांची वाख्याने आणि पुस्तक अफाट लोकप्रिय ठरत होती. याचवेळी त्यांनी बायोकेमिस्ट्रीतील पाठ्यपुस्तकांसाठीही लेखन केले.

बायोकेमिस्ट्री अँड ह्युमन मेटाबॉलीजम नावाचे पुस्तकही लिहिले. १९५८ पासून त्यांनी शिकवण्यापेक्षा लेखनावरच जास्त लक्ष केंद्रित केले. त्यानंतर तब्बल दोन दशकांनी म्हणजे १९७९ साली बॉस्टन विद्यापीठाने त्यांना पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून रुजू करवून घेतले.

१९५०च्या दशकात आयझॅक यांनी ‘पॉल फ्रेंच’ या टोपणनावाने लेखन केले.

या काळातील त्यांचे हे लेखन हे विशेषत: लहान मुलांसाठी होते. मुलांसाठी त्यांनी लकी स्टार सिरीज नावाने सहा विज्ञानाधारीत कादंबऱ्या लिहिल्या. डेव्हिडचा लकी स्टार आणि सौरमंडळाभोवती गुंफलेल्या साहसकथा असे या कादंबऱ्यांचे स्वरूप होते. प्रकाशक डुबलडे यांना या कथांवर टीव्ही शो करायचे होते. पण, कुठल्या नावाने हे लेखन प्रसिद्ध होणार हे द्वंद्व न सोडवता आल्याने टीव्ही शोची ही कल्पना बारगळली. या सिरीजमधील काही कादंबऱ्या या पॉल फ्रेंच आणि काही ऍसिमोव्ह यांच्या नावाने आहेत.

पॉल मॅककार्टनीला एक सायफाय म्युजीकल शो बनवायचा होता त्यासाठी त्याने ऍसिमोव्हला लिहिण्याची विनंती केली होती. मॅककार्टनीसाठी ही त्यांनी फाईव्ह अँड फाईव्ह अँड वन नावाची विज्ञानकथा लिहिली होती. मॅककार्टनी आणि ऍसिमोव्ह यांच्यामध्येही काही मतभेद झाले आणि या चित्रपटाचा बेतही बारगळला.

सुरुवातीला आलेल्या अपयशानंतर आयझॅक ऍसिमोव्ह यांनी टीव्ही गाईड या खास सायफाय शोसाठी लिखाण केले. यात स्टार-ट्रेक नावाच्या शोचाही अंतर्भाव होता. या शोमधील काही प्लॉट आणि व्यक्तिरेखा त्यांनीच सुचवल्या होत्या.

१९४१ साली त्यांनी लिहिलेल्या लायर या लघुकथेत त्यांनी पहिल्यांदा रोबोटिक्स या संकल्पनेचा पहिल्यांदा वापर केला होता.

पुढच्या वर्षी त्यांनी रनअराउंड नावाची आणखी एक लघुकथा लिहिली, या कथेमध्ये त्यांनी रोबोटिक्सचे तीन नियम सांगितले आहेत. रोबोट माणसाला इजा करू शकत नाही, रोबोटने मानवी आज्ञांचे पालन केले पाहिजे, रोबोटनी स्वसंरक्षण केले पाहिजे हे ते तीन नियम आहेत.

१९९२ साली बहात्तर वर्षांचे असताना न्यूयॉर्कमध्येच त्यांचे निधन झाले. त्यांच्या हयातीत त्यांच्या लेखनाला अनेक ह्युगो आणि नेबुला पुरस्कार मिळाले. अमेरिकेच्या ह्यूमॅनिस्ट असोसिएशनचे ते अध्यक्ष देखील होते. एका बटूग्रहाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. मंगळावरील एका क्रेटरलाही त्यांचेच नाव देण्यात आले आहे. शिवाय ‘ब्रुकलीन इलेमेंटरी स्कूल, होंडा’ज ह्यूमनॉइड रोबोट, असे अनेक सन्मान त्यांना मिळाले. त्यांच्या नावाने चार साहित्यिक पुरस्कारही दिले जातात.

१४ विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट दिली. अनेक जीवनगौरव पुरस्कारही मिळाले. त्यांच्या पुस्तकाचे टायपिंग, प्रुफरीडिंग, इंडेक्सर आणि लिटररी एजंट ते स्वतःच करत होते. एकाच वेळी इतक्या भूमिका निभावूनही त्यांनी उभा केलेला कामाचा डोंगर पाहून डोळे विस्फारल्या शिवाय राहत नाहीत. त्यांनी केलेल्या कामावरून एक नजर जरी टाकली तरी, आयझॅक ऍसिमोव्हसारखी व्यक्तिमत्वे म्हणजे निसर्गाचा चमत्कारच असावीत असे वाटते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या एका फसवणुकीमुळे मानवी उत्क्रांतीचा इतिहास अनेक दशके भरकटला होता

Next Post

ज्या स्पर्धेत लहान दिसतो म्हणून प्रवेश नाकारला तिथेच गामा पैलवानाने सगळ्यांना अस्मान दाखवलं

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
Next Post

ज्या स्पर्धेत लहान दिसतो म्हणून प्रवेश नाकारला तिथेच गामा पैलवानाने सगळ्यांना अस्मान दाखवलं

दोन देशांना जेरीस आणणारी सौंदर्यवती; जिच्यामुळे ५० हजारांहून अधिक सैनिकांचा जीव गेला..

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.