The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरीराच्या आरपार पाहणाऱ्या ‘एक्स-रे’चा शोध लावला आणि फिजिक्सचं पहिलं नोबेल मिळालं

by द पोस्टमन टीम
26 March 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


१८८५च्या शेवटचा काळ. एक जर्मन संशोधक विल्यम रंटजेन, कॅथोड किरणांवर करण्याच्या एका प्रयोगाच्या तयारीत होता. त्याकाळात विल्यम रंटजेन (ज्याने “क्ष” किरणांचा शोध लावला तो) सोडल्यास तसं फारसं कोणी क्ष किरण वगैरे गोष्टींचा अभ्यास करणारं, त्यात कुतूहल असणारं आणि या “क्ष” म्हणजेच अनोळखी, नव्या अशा ठरवून करेल असं कोणी नव्हतं.

कॅथोड किरण म्हणजे इलेक्ट्रॉन कणांचा एक झोत जो प्रकाश किरणांप्रमाणे पडतो, ते इलेक्ट्रॉन किरण म्हणजेच कॅथोड किरण विद्युत भार (इलेक्ट्रिक करंट) चालू करून कृत्रिमपणे तयार केलेल्या निर्वात पोकळीतून (व्हॅक्युम) सोडले जाणार होते.

हा अशा प्रकारचा प्रयोग त्यावेळी भौतिकशास्त्राच्या जगात बराच केला जात असे. निर्वात पोकळी म्हणजे अशी पोकळी किंवा जागा तयार करायची की जिथे वायू, कोणतंही रसायन नसेल, ती जागा ‘पूर्णपणे रिकामी’ असेल अशा जागेला किंवा पोकळीला निर्वात पोकळी म्हटलं जातं.

हे असं करून नेमकं त्याच्या त्या अंधाऱ्या प्रयोगशाळेत, त्याने ज्या काचेच्या नळीमध्ये निर्वात पोकळी तयार केली होती, ती नळी त्यातून प्रकाश बाहेर पडू नये म्हणून काळ्या रंगाच्या कागदाने पूर्णपणे झाकली. तरीही त्यातून एक चमकता प्रकाश किरण समोरच्या एका रंगीत पडद्यावर पडला.

कुतूहलाने रंटजेनने मग तो पडदा आणि नळी यांच्या दरम्यान काळी कार्डबोर्ड शीट ठेवली, त्यापुढे आणखी एक काळी शीट ठेवली, त्यानंतर एक हजार पानी पुस्तक ठेवलं, नंतर अडीच सेंटीमीटरपेक्षा जास्त जाड लाकडी कपाटही ठेवलं, ‘physics today’मध्ये आलेल्या कथनानुसार एवढे अडथळे ठेवूनही तो प्रकाशझोत त्या सगळ्या गोष्टींना भेदून त्या पडद्यावर पडतच राहिला.



एकदा तर त्याने शिशाची चकती त्यापुढे धरली, तर स्क्रीनवर पडलेला प्रकाश त्या चकतीच्या आकाराचा होता, त्यातही सोबत त्याने बोटात ती चकती धरल्यामुळे बोटांमधल्या हाडांची सावलीही त्यावर पडली होती.

त्या वेळी रात्री त्याला जेवायला जायला जरा उशीरच झाला, नंतर जेवायला गेला तेव्हाही कुणाशी न बोलता पटापट जेवण करून तो प्रयोगशाळेत त्यावर निघून गेला. नंतरच्या काळात त्याने मित्राला सांगितलं की ‘मला त्यावेळी नक्कीच काहीतरी वेगळं, अजब असं सापडलं होतं पण मला जे सापडलंय त्याबद्दल, मी जी निरीक्षणं घेतली आहेत ती योग्य आहेत की नाहीत याबाबत मीच जरा साशंक होतो.’ बराच दम एकवटून त्याने बायकोला हे सांगितलं आणि त्यानंतर त्यावर जे प्रयोग करणार आहे त्यात मदतीला बोलावलं.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

त्याने प्रयोगशाळेत लावलेला रंगीत पडदा (fluorescent screen) काढून टाकला आणि त्याजागी फोटोग्राफीक प्लेट लावली आणि जगाच्या इतिहासातला पहिला ‘एक्स रे’ घेण्यात आला! हा पहिला एक्स रे म्हणजे त्याच्या बायकोच्या उजव्या हाताच्या हाडांची आणि  एका बोटातल्या अंगठीची प्रतिमा होती.

जेव्हा रंटजेनच्या या शोधाची बातमी ५ जानेवारी १८९६ साली पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रात झळकली त्यानंतर हळूहळू या शोधाचे वैज्ञानिक आणि वैद्यकीय उपयोग जगासमोर येऊ लागले. न्यूयॉर्क टाइम्सने जरा उशीराच ही बातमी छापली पण तेही अगदी साशंकपणे, शीर्षक दिलं- ‛अदृश्य गोष्टींची प्रतिमा मिळवण्यासाठी लावला गेलेला तथाकथित शोध’

त्यानंतरही टाइम्समध्ये बरंच काही छापून आलं याबद्दल. पण, टाइम्स काय किंवा इतर कुठलंही वृत्तपत्र काय कोणीही या शोधाचा जनक असलेल्या रंटजेनबद्दल एक चकार शब्दही छापला नाही. आधीच लाजाळू आणि बुजरा असणारा रंटजेन नंतर एकटाच राहू लागला. त्याने असंही सांगितलं होतं की,  ‘मी मेल्यावर माझी सगळी संशोधनातली कागदपत्रे आणि पत्रे जाळून टाका’.

त्याच्या नशिबात ना हे संशोधन होतं ना प्रसिद्धी. त्याने त्याचं हे बहुमूल्य संशोधन स्वतःच्या नावे पेटंटही केलं नाही. कारण त्याच्या प्रामाणिक मनाला वाटत होतं, आपल्या संशोधनाचा उपयोग बाकी संशोधकांना तर व्हावाच पण वैद्यकीय क्षेत्रासाठीही ते विनामूल्य उपलब्ध असावे.

‘TIME’मध्ये आलेल्या एका टिपणानुसार “मृत्यूपूर्वीच त्याने ‘नोबेल पुरस्कारासोबत’ मिळालेली रक्कम (४० हजार डॉलर) एका वैज्ञानिक संस्थेला दान केली.”

रंटजेनच्या साधेपणाने आणि औदार्याने त्याला अगदी जीवनाच्या अंतापाशी आणून ठेवलं होतं किंवा असंही म्हणता येईल की त्याच्या सध्या स्वभावाने त्याचा घात केला. जेव्हा तो १९२३ साली निधन पावला तेव्हा संशोधनातून मिळणाऱ्या भरघोस रकमेचा अजिबात हव्यास नसल्यामुळे किंवा आपल्याला ती नकोच आहे असं त्याला वाटत असल्यामुळे त्या काळात पहिल्या महायुद्धामुळे आलेल्या आर्थिक संकटात तो अगदी कफल्लक बनून जगला आणि गरिबीतच जग सोडून निघून गेला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

केरळच्या जोडप्याने चहा विकून केला जगभर प्रवास!

Next Post

पाब्लो एस्कोबारचा मृत्यू नेमका कसा झाला, याबद्दल अजूनही लोकांमध्ये एकमत नाही आहे.

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

पाब्लो एस्कोबारचा मृत्यू नेमका कसा झाला, याबद्दल अजूनही लोकांमध्ये एकमत नाही आहे.

ऑस्ट्रेलियाचा शोध लावणाऱ्या कॅप्टन जेम्स कुकचा समुद्रसफारीवरच मृत्यू झाला होता.

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.