The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कुष्ठरोगावर औषध बनवणाऱ्या संशोधिकेपासून तिच्या कामाचं श्रेय हिरावून घेतलंय

by द पोस्टमन टीम
28 February 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


कुष्ठरोग आजही एक असाध्य रोग म्हणून ओळखला जातो. या रोगावर आज आधुनिक पद्धतीचे उपचार शक्य असले तरी या रोगाशी जडलेल्या काही गैरसमजामुळे आजही कुष्ठरोग्यांना अत्यंत भयावह परिस्थिती जगावे लागते. आज कुष्ठरोग एक पूर्णतः बरा होणारा आजार आहे. पण, ज्यावेळी या रोगावर कुठलाच जालीम उपाय सापडला नव्हता त्यावेळी हवाई येथील एका आफ्रिकन-अमेरिकन मुलीने या रोगावर इलाज करण्यासाठी एक प्रभावी इंजेक्शन शोधण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यात यश मिळवले होते. तिने संशोधित केलेले हे इंजेक्शन पुढे वीस वर्षे कुष्ठरोग्यांवर उपचारासाठी वापरण्यात आले. पण, तरीही तिला श्रेय मिळाले नाही.

१९१६ साली हवाईतील कालीही हॉस्पिटलमध्ये कुष्ठरोग्यांवर उपचार करणाऱ्या हॅरी टी. हॉलमन यांना कुष्ठरोग्यांवर उपचार करण्यासाठी जालीम औषधोपचार आणि पूरक सुविधांची गरज होती. एका साध्याशा पांढऱ्या डागापासून सुरू होणाऱ्या या आजारात हळूहळू रुग्णांच्या बाह्य अवयवांची झीज होऊन त्यांना हे अवयव गमावण्याची वेळ येत असे.

कुष्ठरोगाला कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूचा शोध १८७३ मध्येच लागला आणि शेवटी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला चौलमुग्रा तेलापासून कुष्ठरोगाचे औषध निर्माण करण्यात यश मिळाले होते. हे तेल जखमेवर लावल्यानंतर किंवा तोंडावाटे घेतल्यानंतर कुष्ठरोग्यांना थोडा फरक जाणवत असे.

पण सर्वच रुग्णात याचे परिणाम दिसून येत नव्हते. काही रुग्णांमध्ये याचे विपरीत परिणामही जाणवत असत. काहींना या तेलामुळे मळमळ होत असे तर काहींना यामुळे त्वचेखाली गळू उठत असे.

या औषधाचे हे विपरीत परिणाम कमी करून त्याचा अचूक परिणाम साधण्यासाठी या तेलातील फक्त आवश्यक ते घटक घेऊन त्यापासून एक इंजेक्शन बनवण्याची गरज होती. असे इंजेक्शन ज्यामुळे रुग्णांना याचे दुष्परिणाम जाणवणार नाहीत. यासाठी हॉलमनने हवाई कॉलेजच्या एका रसायनशास्त्र प्राध्यापकाची मदत घेण्याचे ठरवले. या प्राध्यापकाने तयार केलेले औषध नंतर अनेक वर्षे कुष्ठरोग्यांच्या उपचारासाठी वापरण्यात येत होते. मात्र दुर्दैवाने आज या संशोधकाचे नाव विस्मृतीत गेले आहे.



या शास्त्रज्ञाचे नाव होते ऍलिस ऑगस्टा बॉल. ऍलिसचे हे संशोधन कुष्ठरुग्णांसाठी एक वरदानच ठरले होते. या आजारात रुग्णाला ज्या वेदना जाणवतात त्याची तीव्रता कमी करण्यात हे औषध फायदेशीर ठरले. त्याकाळी एका कृष्णवर्णीय स्त्रीने मिळवलेले हे यश अत्यंत अभिमानास्पद होते.

ऍलिस बॉलचा जन्म २४ जुलै १८९२ रोजी वाशिंग्टन येथे झाला. ती तिच्या आई-वडिलांचे तिसरे आपत्य होती. तिचे आजोबा, वडील आणि इतर अनेक कुटुंबीय फोटोग्राफर होते. तिचे आजोबा जे. पी. बॉल यांनीच डॅगेरिओटाइप फोटोग्राफीचा शोध लावला. ऍलिस लहानपणापासूनच डॅगेरिओटाइपची ही क्लिष्ट प्रक्रिया पहात पहात मोठी झाली होती. हा सगळ्या क्रिया-प्रक्रिया पहात असताना तिच्यात रसायनशास्त्राची आवड निर्माण होत होती.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

बॉलने सिएटलमध्ये राहून फार्मास्युटिकल केमिस्ट्री आणि फार्मसी अशा दोन्ही विषयात वॉशिंग्टन विद्यापीठातून पदवी मिळवली. पुढच्या अभ्यासासाठी ती हवाईला गेली.

रसायनशास्त्रातील मास्टर्स डिग्री मिळवणारी ती पहिली महिला आणि पहिली आफ्रिकन-अमेरिकन व्यक्ती ठरली. आपल्या शोधनिबंधासाठी तिने कावा रूटचा अभ्यास करण्याचे ठरवले होते.

बॉल दिवसभर विद्यापीठात शिकवत असे आणि रात्री चौलमुग्रा तेलाचा अभ्यास करत असे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती या तेलामुळे होणारे दुष्परिणाम कसे टाळता येतील याचाच अभ्यास करत असे. एका वर्षाच्या आत तिने या तेलातील परिणामकारक घटक बाजूला काढून त्याचे इंजेक्शन बनवण्यात यश मिळवले. या इंजेक्शनमुळे या तेलाचे दुष्परिणाम काहीसे सौम्य स्वरूपाचे बनले.

इतके मोठे संशोधन करूनही बॉलला तिचा हा शोधनिबंध प्रकाशित करण्याची संधीच मिळाली नाही. तिचे हे संशोधन पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी ती आजारी पडली. ३१ डिसेंबर १९१६ रोजी तिने वयाच्या अवघ्या २४व्या वर्षीच जगाचा निरोप घेतला. प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना शिकवत असताना तिला क्लोरीनची बाधा झाली आणि हेच तिच्या अवेळी मृत्युचे कारण ठरले.

तिच्या मृत्यूनंतर तिचा सहकारी आणि ती ज्या कॉलेजमध्ये शिकवत होती त्या कॉलेजचे अध्यक्ष आर्थर एल. डीन यांनी तिचे संशोधन पुढे नेले. चौलमाग्रा इंजेक्शनचा व्यापक प्रमाणात वापर करणे शक्य झाल्याने या इंजेक्शनची मागणी वाढली. कुष्ठरोग्यांसाठी तर हे इंजेक्शन वरदानच ठरले. कारण यामुळे रोगाचा होणारा अत्याधिक प्रादुर्भाव रोखण्यात यश येत होते.

१९४० मध्ये कुष्ठरोगावर आधुनिक ड्रग थेरपी विकसित झाली, पण तोपर्यंत बॉलने चौलमाग्रा तेलापासून बनवलेले हे इंजेक्शनच या रुग्णावर उपचारासाठी वापरले जात असे.

हॉलमनने १९२२च्या एका मेडिकल जर्नलमध्ये बॉलने चौलमाग्रापासून एक द्रव पदार्थ बनवण्यात यश मिळवल्याचा उल्लेख केला होता. हा पदार्थ रुग्णांना इंजेक्शनद्वारे देणे शक्य होते. बॉलने तेलापासून इंजेक्शन विकसित करण्यासाठी जी पद्धत वापरली होती त्याला हॉलमनने बॉल मेथड हे नाव दिले होते. बॉलचा या संशोधनात इतकाच उल्लेख होता.

तिच्या मृत्युपश्चात डीन आर्थरने तिचे संशोधन पुढे नेले असले पण त्याने कुठेही बॉलच्या प्राथमिक कार्याचा उल्लेख कोणीही केला नाही ना तिला तिच्या कामाचे श्रेय दिले नव्हते. त्यामुळे इतके मोठे संशोधन करूनही बॉल दुर्लक्षितच राहिली.

सुमारे वीस वर्षे बॉलला तिच्या या श्रेयापासून वंचित ठेवण्यात आले. २००० साली हवाई विद्यापीठाने त्याच्या आवारातील एकमेव चौलमुग्रा झाडाखाली बॉलच्या सन्मानार्थ तिचा उल्लेख करणारे आणि तिला या संशोधनाचे श्रेय देणारे स्मारक बनवले. गव्हर्नर मेझी हिरोनो यांनी २९ फेब्रुवारी हा दिवस ऍलिस बॉल डे म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. अगदी अलीकडे हवाई विद्यापीठाने रसायनशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या मनोआ विद्यार्थ्यांसाठी ऍलिस ऑगस्टा बॉलच्या नावाने एक शिष्यवृत्ती घोषित करण्यात आली आहे.

आज कुष्ठरोगावर अनेक प्रतिजैविके निघाली आहेत. यांचा वापर करून आज कुष्ठरोग पूर्णतः बरा होऊ शकत असला तरी त्याभोवतीचा कलंक दूर झालेला नाही. आजच्या प्रगत औषधांमुळे कुष्ठरोग्याला पूर्ववत आयुष्य जगणे शक्य झाले आहे. इतकी जैवविज्ञानाने प्रगती केली आहे. पण, जेव्हा या रोगावर काहीच इलाज शक्य नव्हता तेव्हा ऍलिसने सर्वप्रथम यावर संशोधन करून इंजेक्शन बनवले होते.

ऍलिसने केलेल्या या संशोधनाने लाखो रुग्णांना दिलासा आणि वेदनामुक्त जीवन मिळाले. तिने केलेले हे काम निश्चितच स्पृहणीय आहे. तिच्या या कामाबद्दल तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्य आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

‘बिअर प्यायल्याने मुतखडा बरा होतो’ ही थाप ऐकली नाही असा माणूस शोधून सापडणार नाही

Next Post

या कारणासाठी ऑलम्पिकमधून क्रिकेटला वगळलं होतं..!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

या कारणासाठी ऑलम्पिकमधून क्रिकेटला वगळलं होतं..!

शिकारीला गेलेल्या राष्ट्राध्यक्षांनी अस्वलाच्या पिल्ल्याला मारायला नकार दिला आणि टेडी बेअरचा जन्म झाला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.