The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या माणसाच्या पँटला काटेरी लांडगा चिकटला आणि ‘वेलक्रो टेप’चा शोध लागला

by द पोस्टमन टीम
30 May 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


आजकाल चपलांपासून कपड्यांपर्यंत सर्व ठिकाणी ‘फिटिंग’साठी वापरली जाणारी सहज चिकटवता येईल आणि काढताही येईल अशी गोष्ट म्हणजे ‘वेल्क्रो’! कपडे, बॅग आणि खासकरून सँडलसाठी तर वेल्क्रो वापरतातच. आधी काहीही चिकटवायचं असेल की डिंकाचाच वापर करायचे पण या डिंकामुळे एकदा चिकटवलेली वस्तू पुन्हा काढायची गरज पडली की ते खराब व्हायचं. यालाच उपाय मिळाला वेल्क्रोचा.

आता वेल्क्रोची भन्नाट आयडीया नेमकी आली कुठून? जाणून घेऊया या लेखाच्या माध्यमातून..

वयाच्या १२व्या वर्षी १९०७ मध्ये सेंट-साफोरिन-सूर-मॉर्गस या छोट्याशा गावात जन्मलेल्या जॉर्ज दी मेस्ट्रल याच्या नावावर पहिलं पेटंट नोंदवलं गेलं ते खेळण्यातल्या विमानासाठी.

साधारण १९४१ सालची गोष्ट आहे, सेंट-साफोरिन-सूर-मॉर्गस या छोट्याशा गावात जन्मलेला जॉर्ज दी मेस्ट्रल शिकारीच्या प्रवासावर गेला असताना त्याच्या लक्षात आलं की त्याच्या पॅन्टला एका बर्डोक वनस्पतीची काटेरी फळं चिकटली होती. त्याने सूक्ष्मदर्शकाखाली वनस्पतीच्या या काटेरी फळांचा अभ्यास करायचं ठरवलं. यातून मग पुढे नवा व्यवसाय करण्याचं डोक्यात आलं पण त्यातूनही जास्त होतं काहीतरी त्याच्या डोक्यात तर ते होतं कुतूहल.



दी मेस्ट्रलने पाहिलं की त्यात काटेरी फळांमध्ये हजारो लहान हुक होते ज्यांनी जवळजवळ काही धाग्यांच्या असलेल्या थरावर स्वत:ला अगदी नीटपणे बांधलं होतं,अडकवून ठेवलं होतं ज्यामुळे ते चिकटले होते.

दी मेस्ट्रलला हे लक्षात आलं की आपण असं एखादं फॅब्रिक कृत्रिमपणे बनवू शकलो तर चिकटवण्याचं किंवा गोष्टी जोडण्याचं नवं मध्यम आपल्याला मिळेल.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

शर्टाची बटणं, कपड्याला असते ती चेन अशा  कित्येक गोष्टी तात्पुरत्या चिकटवण्यासाठी आणि पुन्हा वेगळ्या करण्यासाठी या कृत्रिम फॅब्रिकचा उपयोग होऊ शकेल.

त्याच्या डोक्यात होतं की त्याने जंगलात जी काटेफळं बघितली होती त्याचे काटे किंवा त्यामध्ये असलेले ‘हुक’ घेऊन ते कृत्रिमपणे बनवलेल्या अश्या फॅब्रिक ला जोडून बघायचं ज्यातून चिकटवण्याचा नवा मार्ग समोर येईल.

पण हे वाटतं तेवढं सोपं नव्हतं. दी मेस्ट्रलने फॅब्रिक वनस्पतींपासून बनवणाऱ्या काही कंपन्यांना संपर्क केला आणि आपली कल्पना मांडली, पण त्या कंपन्यांनी ही असली विचित्र कल्पना धुडकावून लावली.

खरंतर हुक अडकवण्यासाठी फॅब्रिकमध्ये मोठ्या प्रमाणावर छोटे लूप (ज्यामध्ये हुक अडकवायचे असतात ते) तयार करणं त्यामानाने सोपं होतं पण खरा प्रश्न होता तो या बारीक बारीक हुकांचा, जे कृत्रिमपणे तयार करायचे होतेच पण सोबत त्यांच्यात लवचिकताही आणायची होती आणि जरासा दाब दिला तरी चिकटतील, जरा ओढलं की लगेच निघतील यासाठीही काही करायचं होतं.

एकेदिवशी त्याला फ्रांस मधल्या लायॉन शहरात एक असा उत्पादक सापडला जो त्याच्याच वेगळ्या शैलीने जाड नायलॉन आणि सुताचे धागे यांना एकत्र करून हवं तसं फॅब्रिक बनवू शकत होता. हा माणूस बनवत होता तेच साहित्य वापरून दी मेस्ट्रेल, त्याने जसे छोटे चिकटणारे हुक सूक्ष्मदर्शकात बघितले होते अगदी तसेच हुक कृत्रिमपणे बनवू शकणार होता, जे सहजपणे ज्यात अडकवले किंवा चिकटले जाणार त्या लूपमध्ये अडकू शकतील. त्याने ते करून दाखवलं आणि या शोधासाठी १९५५ साली पेटंटही घेतलं !

या संशोधनावरच्या प्रोजेक्टसाठी एक छोटी संस्था स्थापन करून त्याने दीड लाख डॉलरचं कर्जही घेतलं होतं.

दी मेस्ट्रलला त्याला हवं तसं मटेरियल सापडलं होतं आणि ते काम करेल हे त्याने सिद्धही केलं होतं पण मुख्य अडचण जरा वेगळीच होतं. हे मटेरियल वापरून तो स्वहस्ते हे हुक्स बनवू शकत होता पण हेच हुक किंवा हेच वेलक्रो मोठ्या प्रमाणावर बनवणं अवघड होतं कारण एक हुक एका माणसाने एका वेळी बनवण्याचं कामच वेळखाऊ होतं त्यामुळे अशी शेकडो, हजारो बनवणं हे तर त्याच्या आवाक्याबाहेरचं काम होतं.

यावर बराच खर्च होत असतानाच त्याने आल्प्स पर्वतातल्या कॉमुग्नी या एका गावात एक छोटी खोली घेतली, जिथे तो या प्रश्नावर उत्तर शोधत बसला होता. अखेर त्याला ते सापडलंच. त्याने एक यंत्र तयार केले जे त्याला मोठ्या प्रमाणात उत्पादन देईल आणि हे तयार करण्याचा वेगही वाढवेल.

उत्पादनाचा वेग वाढवणारी यंत्रणा जरी त्याला मिळाली असली तरी ते कितपत उपयुक्त ठरतंय हे त्याला तेव्हाच लक्षात आलं जेव्हा ते यंत्र ६० च्या दशकाच्या सुरवातीला बाजारात आलं. बाजारात वेलक्रो बघून लोकांनी विचारलं केला, “असेल का हे खरच उपयोगाचं, काय उपयोग याचा आम्हाला रोजच्या जगण्यात, कशाला उगा घ्यायचं हे?”  या नव्या वेलक्रोकडे कापड उत्पादकांनीही पाठ फिरवली. या उत्पादकांनी नवं काही आत्मसात करायचं नाही आणि जुन्याच गोष्टीत अडकून पडायचं असंच ठरवलं होतं.

अशावेळी नासा पुढे आली. त्यांना असं काही हवं होतं की जे अवकाशात पृथ्वीच्या कक्षेत फिरणाऱ्या यानामधल्या गोष्टी भिंतीला तात्पुरत्या चिकटून ठेवेल, जे त्यांना दी मेस्ट्रेलकडे मिळालं. नासाने या वेलक्रोचं जास्त उत्पादन करणारी यंत्रणा तयार केली. दी मेस्ट्रेलचं हे संशोधन तसं काही फारसं वेगळं, आश्चर्यकारक वगैरे नव्हतं. पण तो काळ अवकाशयुगाचा होता.

नासाने हे वापरल्यामुळे नंतर ६०च्या दशकात हळूहळू वेलक्रो कपड्यांवरही दिसू लागले. अगदी फ्रेंच फॅशनमधील बडी आसामी असलेला पियर कार्डियनसुद्धा या वेल्क्रोची करामत पाहून वेडा झाला होता. 

फायनली दी मेस्ट्रेलचं हे संशोधन अधिकृतपणे ‘हिट’ झालं !

खरंतर हल्लीचे वेल्क्रो उत्पादक सांगायला बिचकतात की वेल्क्रो हे त्या वस्तूचं किंवा उत्पादनाचं नाव नसून वेल्क्रो हे ते तयार करणाऱ्या पहिल्या कंपनीचं नाव होतं ज्याने वेल्क्रो बनवण्याची क्रिया वेगवान केली. वेल्क्रो कंपनीने वेगवेगळ्या नैसर्गिक गोष्टींचा, कृत्रिम गोष्टींचा वापर करत वेल्क्रो उत्पादनात बरेच बदल केले. १९९० साली कॉमुग्नी या आल्प्समधल्या छोट्या गावात जिथे त्याने वेल्क्रो तयार करण्यासाठी बरीच मेहनत घेतली होती आणि बाकीची नव्या संशोधनांवर काम केलं होतं तिथेच दी मेस्ट्रेलचं निधन झालं.

दी मेस्ट्रेल हा लोकांच्या वेल्क्रोला कायमच चिकटून राहील, कारण जंगलात गेलेल्या दी मेस्ट्रेलच्या पायाला चिकटलेल्या त्या छोट्याशा टोचून त्रास देणाऱ्या काटेफळांमुळे दी मेस्ट्रेलला ही कल्पना सुचली होती.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

एक तरंगते वेश्यालय : सर्वाधिक कलंकित समुद्रप्रवासाची गोष्ट

Next Post

टाटा नॅनोच्या आधी फोर्डने मध्यमवर्गाला परवडणारी पीपल्स कार बाजारात आणली होती

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

टाटा नॅनोच्या आधी फोर्डने मध्यमवर्गाला परवडणारी पीपल्स कार बाजारात आणली होती

खान सर की अमित सिंग या फेमस युट्युब टीचरचं नेमकं नाव काय आहे..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.