The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मेटल डिटेक्टरचा शोध लागायला अमेरिकन राष्ट्राध्यक्षाची ह*त्या कारणीभूत आहे

by द पोस्टमन टीम
5 December 2024
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं. जेव्हा फार गरज निर्माण होते तेव्हा ती पूर्ण करण्याचा मार्ग देखील गवसतो. आपण नेहमी मेट्रो स्टेशन, एयरपोर्ट आणि मॉल अशा ठिकाणी मेटल डिटेक्टर मशीन बघत असतो. पण कधी विचार केलाय का, ही मशीन कसं काम करते आणि हे मशीन शोधायची गरज का निर्माण झाली ?

अत्यंत भयंकर ह*त्यारे आणि धातू यांची ओळख पटवण्यासाठी व त्यांचा शोध घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मेटल डिटेक्टरमधे विद्युत चुंबकत्वाचे तंत्रज्ञान वापरण्यात येते. हे तंत्रज्ञान कसे कार्य करते हे आपण सर्वप्रथम समजून घेऊया….

आपण ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर करतो त्यात इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझमचा वापर करण्यात येतो. आपल्या घरात येणारा वीजपुरवठा हा विद्युत प्रकल्पातून करण्यात येतो. या विजेची निर्मिती जनरेटरच्या मदतीने करण्यात येते. हे जनरेटर तांब्यांच्या तारांच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या एका ड्रमच्या स्वरूपात असतात.

चुंबकीय क्षेत्राच्या मदतीने या तारा वेगवान तसेच मध्यम गतीवर फिरू लागतात. यापासूनच विजेची निर्मिती होत असते. तुमच्या घरातील बहुतांश विद्युत उपकरणे याच तंत्रज्ञानावर कार्यरत आहेत. व्हॅक्युम क्लिनर आणि वॉशिंग मशीन याच आधारावर कार्य करतात.



मेटल डिटेक्टरमध्ये इलेक्ट्रिक मोटर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. विद्युत प्रकल्पातील जनरेटर याच्या उलट काम करतात. जेव्हा मोटरला वीजपुरवठा करण्यात येतो त्यावेळी तारांच्या गोलाकार कुंडलीत एक चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. या चुंबकीय क्षेत्रामुळे विद्युत तरंग मॅग्नेटीक फिल्डच्या विरुद्ध दिशेने फिरायला सुरवात होते. अशाप्रकारे विद्युत तरंग फिरल्याने एक मोठं प्रेशर निर्माण होतं. या प्रेशरमुळे मोटर कार्य करते. या मोटर तंत्रज्ञानाच्या बळावर सहजपणे इलेक्ट्रिसिटीपासून मॅग्नेटिझम आणि मॅग्नेटिझमपासून इलेक्ट्रिसिटी तयार करता येते.

मेटल डिटेक्टरचे अनेक प्रकार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मेटल डिटेक्टर हे वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. परंतु यांच्या कार्यपद्धतीमागे एकच विज्ञान आहे.

मेटल डिटेक्टरमध्ये एक ट्रांझिस्टर कॉईल असते. हे कॉईल सर्क्युलर हेडच्या अवतीभोवती गुंडाळलेले असतात. ज्यावेळी कॉईलमधून विद्युत पुरवठा सुरु होतो त्यावेळी मॅग्नेटिक फिल्ड तयार होते. जेव्हा कुठलंही मेटल या डिटेक्टरमधून पास होते, तेव्हा त्यातील ॲटम्स प्रभावित होतात आणि इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहाची दिशा बदलते, यामुळे कोणताही धातू ओळखता येतो.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

मेटल डिटेक्टर टॉपवर एका बॅटरी व ट्रान्समिटर सर्किटला जोडलेली असते. ट्रान्समीटर कॉईलमध्ये जेव्हा विद्युत प्रवाह प्रवाहित होतो त्यावेळी मॅग्नेटिक फिल्ड तयार होते. जेव्हा डिटेक्टरच्या जवळपास मेटल नेण्यात येतो, त्यावेळी त्यात मॅग्नेटिक फिल्डशी संपर्क प्रस्थपित होतो. मॅग्नेटिक फिल्डमुळे मेटलमध्ये आपोआप विद्युत प्रवाह वाहायला सुरुवात होते.

मेटल ऑब्जेक्टमधील करंट त्याच्या सभोवती अजून एक मॅग्नेटिक फिल्ड निर्माण करते. यामुळे मॅग्नेटिक फिल्डच्या चारही बाजूंना विद्युत प्रवाह प्रवाहित होतो. हा प्रवाह विद्युत प्रवाह जेव्हा वर बसवण्यात आलेल्या लाऊडस्पिकर पर्यंत पोहचतो त्यावेळी त्यातून ध्वनीनिर्मिती होते. या आवाजाच्या आधारावर धातूची ओळख पटते.

जमिनीत दबलेले मेटल्स कसे व कोणत्या आकाराचे आहेत हे बघणे अवघड असते. मोठ्या आकाराचे मेटल्स अधिक सहजपणे सापडतात. छोटे सापडणे त्यामानाने अवघड असते. ज्या मेटल ऑब्जेक्टचा शोध घ्यायचा आहे तो जमिनीत कशाप्रकारे दबलेला आहे, याच्या आधारावर त्याची ओळख पटवण्यात येते. जर तो मेटल ऑब्जेक्ट वर वर पुरण्यात आला असेल तर त्याला शोधणे सहज शक्य असते, पण जर तो ऑब्जेक्ट जमिनीत फार खोलवर पुरलेला असेल अथवा फार काळापासून दबलेला असेल तर त्याला शोधणे अवघड असते, कारण त्याचा टार्गेट एरिया कमी असतो.

जर एखादा मेटल ऑब्जेक्ट जास्त काळापासून जमिनीखाली असेल तर त्यावर गंज चढायला सुरुवात होते, यामुळे देखील मोठी समस्या निर्माण होते. याशिवाय मातीच्या प्रकारावर देखील मेटल डिटेक्टरचे फ़ंक्शन अवलंबून असते.

अंदाजे ८ ते २० मीटर खोलवर असलेला मेटल ऑब्जेक्ट शोधण्याची रेंज मेटल डिटेक्टरची असते.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफिल्ड यांच्यावर झालेल्या ह*ल्ल्यानंतर मेटल डिटेक्टरचा शोध लावण्यात आला. १८८१ साली तत्कालीन राष्ट्राध्यक्ष गारफिल्ड यांच्या छातीवर गोळीबार करण्यात आला होता. लाख प्रयत्न केल्यावरसुद्धा डॉक्टरांना राष्ट्राध्यक्षांच्या छातीतील गोळी सापडत नव्हती. टेलिफोनचा शोध लावणाऱ्या ग्राहम बेल यानेच मेटल डिटेक्टरचा शोध लावला. हे एक इलेक्ट्रो-मॅग्नेटिक डिव्हाईस होते. या डिव्हाईसला इंडक्शन बॅलेन्स म्हटले जाऊ लागले. जर्मन शास्त्रज्ञ ‘विल्यम हेन्री डोव्ह’च्या संशोधनाच्या आधारावर बेलने या उपकरणाची निर्मिती केली होती.

हे मशीन जरी राष्ट्राध्यक्षांचा जीव वाचवण्यात अयशस्वी ठरले तरी पुढे त्याचा असंख्य मानव-उपयोगी कामांसाठी वापर करण्यात आला.

पुढच्या वेळी या मेटल डिटेक्टरमधून जाताना त्याचा इतिहास नक्की आठवा !


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

एकेकाळी ‘बुलेट’ला टक्कर देणारी ही बाईक पुन्हा मार्केटमध्ये आली आहे !

Next Post

गालिबच्या शायऱ्या वाचून सिंगल पोरांना पण उगाच ब्रेकअप झाल्यासारखं वाटतं

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

गालिबच्या शायऱ्या वाचून सिंगल पोरांना पण उगाच ब्रेकअप झाल्यासारखं वाटतं

हा कोंबडा बिन मुंडक्याचा दीड वर्ष जगला होता..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.