The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

क्लासिक कार ‘इम्पाला’चं प्रोडक्शन थांबलं आहे, परंतु तिची क्रेझ आजही कायम आहे

by द पोस्टमन टीम
25 August 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


क्लासिक गाड्यांचे चाहते असणाऱ्या सर्वांची एक विशलिस्ट असते. यांपैकी एक तरी गाडी आपल्या अंगणात असावी अशी सुप्त इच्छा आपल्या सर्वांच्याच मनात असते. या विशलिस्टमध्ये ज्याच्या त्याच्या आवडीनुसार विविध गाड्या असतात. कोणाला एक आवडते तर कोणाला दुसरी. एक गाडी मात्र अशी आहे, जी जवळपास सर्व क्लासिक कार फॅन्सच्या विशलिस्टमध्ये असतेच, ती म्हणजे शेवरलेटची इम्पाला! ज्या गाडीने सर्वांना वेडं केलं होतं, अशा इम्पालाचा इतिहास तुम्हाला माहित आहे का?

इम्पाला फक्त शेवरलेट कंपनीची ऐतिहासिक गाडी नव्हती, तर तिने अमेरिकेच्या इतिहासातही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अनेक दशके ही कार म्हणजे श्रीमंतीचं प्रतीक समजलं जात होती. १९५६ च्या फेडरल हायवे कायद्यामुळे सक्षम गाड्यांची अचानक मागणी वाढली. कारण या कायद्याअंतर्गत गाड्या, इंधन, ट्रक यांच्यावर कर लावून रस्तेबांधणीसाठी पैसा उभारण्यात येणार होता.

बेल एअर मॉडेलपेक्षा जास्त वेगवान, मोठी आणि अधिक शक्तिशाली इंजिन असलेली गाडी बनवणं हे ध्येय समोर असताना ‘शेवरलेट इम्पालाचा’ जन्म झाला. या कारच्या संपूर्ण इतिहासात तिच्यात अत्यंत प्रभावशाली पद्धतीने बदल घडवले गेले. अर्थात, एकदम रॉयल असा लुक असणारी इम्पाला ही कायमच यशस्वी मॉडेल नव्हती. अनेकदा तिच्यामध्ये फेरबदल करून तिला पुन्हा पुन्हा लॉंच करण्यात आलं. आजही इम्पाला शेवरलेटच्या प्रवासामध्ये सर्वात आयकॉनिक सिडॅन कार म्हणून प्रसिद्ध आहे. चला बघू इम्पालाचा हा ५८ वर्षांचा प्रवास कसा झाला.

जनरल मोटर्स कंपनीच्या ५०व्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभामध्ये पहिल्यांदा इम्पाला समोर आली. आफ्रिकन काळविटाच्या प्रजातीवरुन हे नाव ठेवण्यात आलं होत. फायरग्लास बॉडी असलेल्या या गाडीने स्टायलीश गाड्या आवडणाऱ्या लोकांमध्ये स्वतःची वेगळी क्रेझ निर्माण केली. 

१९५७चं हे मॉडेल जेव्हा सामान्य लोकांसाठी १९५८ साली बाजारात आलं तेव्हा जनरल मोटर्सला यात प्रचंड फायदा झाला होता. लोकांना गाडीची डिजाईन आणि त्यात असलेली अनेक नवीन वैशिष्ट्ये भुरळ पाडत होती. याचं कारण म्हणजे तेव्हा या गाडीची डिजाईन हार्ले अर्ल यांनी केली होती.



हे गाडीचं पाहिलं मॉडेल होतं, ज्यात दुहेरी हेडलॅम्प आणि तिहेरी टेललाइट्सचा समावेश करण्यात आला होता. जुन्या बेल एअरवरच आधारित असं इम्पालाचं मॉडेलिंग केलं असलं, तरी, बेल एअर इम्पाला कारला एक्स-टाइप फ्रेमवर कमी सेट, आणि मागे लांब डेक होते. त्यावेळेस एक से एक उत्तम दिसणाऱ्या गाड्या शेवरलेटने बाजारात आणल्या असल्या, तरी त्यात इम्पाला स्पोर्ट कूप हे मॉडेल सर्वात जास्त ग्राहकांच्या पसंतीला उतरलं होत.

१९५९-१९६० मध्ये इम्पालाची दुसरी जनरेशन आली. या दुसऱ्या पिढीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला होता. काही इम्पालांमध्ये सहा-पॉवर सीट आणि क्रूझ कंट्रोल ऑफर केले होते. या दुसऱ्या पिढीच्या इम्पालाचे सर्वात वाखडण्याजोगं वैशिष्ट्य म्हणजे बॅट-विंगच्या मागील टोकाला त्याच्या टिअरड्रॉप ब्रेक लाईट्स होत्या. शिवाय लाइन-अपमध्ये फोर-डोअर सेडान आणि हार्डटॉप जोडले गेले होते. 

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

१९६० मध्ये ‘स्पेस, स्पिरिट, स्प्लेंडर’ असा स्लोगन तयार करून इम्पालामध्ये मागच्या बाजूस लोखंडी जाळी, क्रोम बारच्या वरील दिवे ओलांडून एक समांतर बार, इलेक्ट्रिक ब्रेक, पार्किंग लाइट, इलेक्ट्रिक घड्याळ आणि बॅक-अप दिवे अशा नवीन गोष्टींची पूर्तता करण्यात आली होती. जरी ही गाडी म्हणावी तितकी लोकप्रिय नसली, तरी १९६० सालामध्ये ती शेवरलेटची बेस्ट सेलिंग कार ठरली होती.

१९६१-१९६४ मध्ये इम्पालाची तिसरी पिढी आली. हे ते वर्ष होते जेव्हा शेव्ही म्हणजेच शेवरलेटने पहिल्यांदा सुपर स्पोर्ट, किंवा एसएस 409 इंजिन सादर केले. अमेरिकेच्या इतिहासात ती पहिली मसल कार ठरली. त्याचबरोबर यामध्ये वॅगन बॉडी स्टाईल वापरण्यात आली होती. 

एसएस मध्ये पॅडेड इन्स्ट्रुमेंट पॅनेल, हेवी-ड्यूटी शॉक आणि स्प्रिंग्स, नॉक-ऑफ व्हील कव्हर्स अशी काही वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली होती. तिसऱ्या पिढीच्या इम्पालांची एकूण रचना अधिक पेटीसारखी, सरळ देखाव्याकडे वळली होती. १९६२ मध्ये आलेल्या इम्पालाचा मुख्य उद्देश कारच्या देखभालीचा खर्च कमी करणे हा होता. तसेच गंज लागू नये म्हणून बऱ्याच भागाला झिंक आणि अल्युमिनियम यांचा लेप देण्यात आला होता. सर्व इम्पालांमध्ये ही थर्ड जनरेशन इम्पाला सर्वात उत्तम समजली जाते.

१९६५-१९७० या काळात इम्पालाची चौथी पिढी पुढे आली. याच काळात शेव्हीने एका वर्षात अमेरिकेत १ दशलक्षाहून अधिक इम्पाला विकण्याचा विक्रम केला. या काळात इम्पालाची पुनर्र्चना करण्यात आली, ज्यात तीक्ष्ण कोन असलेली विंडशील्ड, आकार बदललेल्या खिडक्या, फ्रेमलेस साइड ग्लास अशी वैशिष्ट्ये होती. १९६६ मधील इम्पालाचे व्ही 8 इंजिन हे तब्बल ४२५ हॉर्सपॉवरचे होते. तसेच यावर्षी विविध रंगांमध्ये इम्पाला लॉंच करण्यात आल्या. मुख्यतः महिला वर्गाला आकर्षित करण्यासाठी गाडीमध्ये हे बदल करण्यात आले होते.

१९७१-१९७६ मध्ये इम्पालाची पाचवी पिढी आली. यामधील इम्पाला ही जास्त लांबीची रचना असणारी शेवटची ठरली. इथून पुढच्या जनरेशन्समध्ये इम्पालाची लांबी कमी करण्यात आली. पुढे १९७७-१९८५मध्ये इम्पालाची सहावी पिढी आली. १९७७ मध्ये आलेल्या इम्पालाच्या मॉडेलने अधिक लेग रूम, हेडरूम आणि ट्रंक स्पेस दिली होती.

या इम्पालाला मोटर ट्रेंडने “कार ऑफ द इयर” म्हणून नाव दिले होते. यात प्रामुख्याने संगणकीय सूचना कंट्रोल एमिशन सिस्टीमचा समावेश करण्यात आला होता. १९८६ नंतर इम्पाला हे नाव अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलं. यानंतर पुढची इम्पाला कधी येईल, किंवा येईल की नाही याबाबत कोणालाच कल्पना नव्हती.

१९९४ मध्ये मात्र इम्पालाने शानदार पुनरागमन केलं. यावेळी एसएस लोगो असलेली, उच्च-कार्यक्षमता असलेली सेडान कार म्हणून इम्पाला समोर आली. २०००-२००५, २००६-२०१३, २०१४-२०२० या कालावधीमध्ये अनुक्रमे इम्पालाच्या आठव्या, नवव्या आणि दहाव्या पिढीचं उत्पादन घेण्यात आलं.

एकविसाव्या शतकामध्ये तयार होत असलेल्या इम्पालांसाठी उच्च प्रतीचं स्टील वापरण्यात येतंय. यामध्ये सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच ब्लूटूथ स्ट्रीमिंग, नेव्हिगेशन आणि स्मार्टफोन यांचे एकत्रीकरण करण्यात आलं आहे.

जीएमने अलीकडेच जाहीर केले की २०१९ इम्पाला हे आयकॉनिक नेमप्लेटचे अंतिम वर्ष होते, कारण यापुढे कंपनीचे लक्ष क्रॉसओव्हर, एसयूव्ही, पिकअप आणि इलेक्ट्रिक वाहन यांच्या उत्पादनावर असणार आहे. त्यामुळे आता इम्पालाचं नवीन मॉडेल येणार नसलं, तरी इम्पालाबद्दल अजूनही लोकांना तेवढंच आकर्षण आणि प्रेम आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

कम्प्युटर नसल्याने फळ्यावर खडूने मायक्रोसॉफ्ट वर्डचा इंटरफेस काढून शिकवणारा मास्तर

Next Post

‘कपिल देव’ने १७५ धावा काढल्या आणि जगाला कळलं हा विश्वचषक भारताचा आहे..!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

'कपिल देव'ने १७५ धावा काढल्या आणि जगाला कळलं हा विश्वचषक भारताचा आहे..!

फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान लाभलेला यो*द्धा आयुष्याच्या शेवटी अमेरिकेत लिफ्टमन म्हणून काम करत होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.