The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फक्त स्त्रियांच्या मालकीचं असलेलं पाचशे वर्ष जुनं मार्केट

by द पोस्टमन टीम
7 March 2025
in विश्लेषण, भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


महिला सशक्तीकरणाच्या जगभरात गप्पा होत असतानच भारतातील मणिपूर राज्यातील इमा बाजार किंवा मदर्स मार्केट ही जगातली अशी एकमेव बाजारपेठ आहे जिथे केवळ महिला विक्रेत्यांचेच व्यवसाय आहेत. थोडी थोडकी नाही तर जवळपास साडेचारशे वर्षांची परंपरा असणारा हा बाजार जगात आपली ओळख अभिमानाने मिरवत आजही दिमाखात उभा आहे. जाणून घेऊया या अनोख्या बाजारपेठेविषयी-

भारतातील सेव्हन सिसस्टर्समधील एक राज्य मणिपूर. निसर्गसौंदर्याची भरभरून उधळण असलेल्या या सेव्हन सिस्टर्समधल्या मणिपूरची जगभरात आणखी एका कारणासाठी ओळख आहे. सोळाव्या शतकात अस्तित्वात आलेला इमा कॅथेल किंवा मदर्स मार्केट ही बाजारपेठ हे जगातलं बहुतेक एकमेव असं मार्केट आहे जिथे सर्व व्यावसायिक महिला आहेत. १५३३ साली बनलेल्या या बाजारपेठेचं हे वैशिष्ट्य आजतागायत अबाधित आहे.

मणिपुरी भाषेत ‘इमा’चा अर्थ आहे आई आणि ‘कॅथेल’चा अर्थ आहे बाजार. जगभरात इमा कॅथेल किंवा इमा बाजार या नावानं ही बाजारपेठ प्रसिध्द आहे.

हे असं का? याचीही एक कथा आहे. त्या काळात घरातले पुरूष भाताच्या शेतात काम करायला जात असत. सकाळीच जेवणाची सोय करून झाली आणि घरगुती कामं आटोपली की दिवसभर बायकांच्या हाताला विशेष असं काम उरायचं नाही. या बायकांनी हळूहळू एकत्र येत छोटीशी बाजारपेठ वसवली. ज्यात गरजेच्या सामानाची विक्री होऊ लागली. रिकाम्या हातांना काम मिळालं, आपल्याला हवी ती गोष्ट घेण्यासाठी फ़ार दूर जाण्याची गरज राहिली नाही आणि मुख्य म्हणजे चार पैसे गाठीशी येऊ लागले. या सगळ्या कारणांमुळे या बाजारानं अल्पावधीतच चांगलं बाळसं धरलं.

माशांपासून महागड्या कापडचोपडापर्यंत सर्वकाही या बाजारत विक्रीसाठी उपलब्ध असतं. कालांतरानं या भागातलं पर्यटन वाढलं आणि या बाजारपेठेचं स्थानिक लोकांसाठीचं स्वरूप बदलून त्याला नवं व्यावसायिक रूप मिळालं. आज मणीपूरला भेट देणार्‍या प्रत्येक पर्यटकाला या बाजाराला भेट देण्याची उत्सुकता असतेच. पर्यटनाचा महत्त्वाचा हिस्सा बनलेलं इमा मार्केट पर्यटनाला चालना देणारं ठरलं, इतकंच नाही तर जगाच्या पर्यटन नकाशावर मणिपूर आणि भारताचं नाव ठळकपणे पुढे आणणारं ठरलं.



आजच्या घडीला या बाजारपेठेत साडेतीन हजारांहून जास्त महिला व्यावसायिकांनी आपली दुकानं थाटली आहेत. पूर्वीचं जे जुनं मार्केट होतं त्याच्याच बाजूला लागूनच सरकारनं २०१० साली नवीन मार्केट उभं केलं आहे. जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना आपला व्यवसाय या मार्केटच्या माध्यमातून करता यावा.

महिला एकमेकींशी स्पर्धा करण्याबाबत प्रसिध्द आहेत. “भला उसकी साडी मेरी साडी से सफ़ेद कैसी” अशी इर्षा बाळगून असणार्‍या महिला नेहमीच विनोदाचा विषय बनलेल्या आहेत. एकमेकींवर कुरघोडी करणं हा स्त्री स्वभाव असल्याचं थट्टेनं पूर्वंपार म्हणत आलेल्या समाजाला इमा मार्केट एक सुखद धक्का देतं. इथे कोणतीही महिला दुसर्‍या विक्रेतीशी व्यावसायिक स्पर्धा करताना दिसणार नाही. समजा तुम्हाला एखादी वस्तू एखाद्या दुकानात नाही मिळाली तर तिथली दुकानदार आपणहूनच तुम्हाला ती वस्तू मिळणार्‍या दुकानाचा आपुलकीनं पत्ता देईल.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

बाजारात पाऊल ठेवलेली व्यक्ती तिला हवी असलेली वस्तू विकत घेतल्याशिवाय बाहेर जाऊ द्यायची नाही हा इथला अलिखित आणि प्रेमळ नियम आहे.

इमा मार्केट हा मणिपूरच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा बनला आहे. तो इतका ताकदीचा आहे की, मणिपूरमधली अंतर्गत व्यावसायिक व्यवस्था जवळपास महिलांच्याच नियंत्रणाखाली आहे.

या बाजारपेठेतल्या आधुनिक इमारतींमध्ये तुम्हाला खानपानाच्या गोष्टी, कपडे, गॅजेट्स सर्वकाही मिळतंच शिवाय आजूबाजूच्या खेड्य़ांमधून, डोंगरदर्‍यांमधून वास्तव्य करणार्‍या खेडूत, आदिवासी महिलाही रोज ताज्या भाज्या, फळं, वानवळा विकायला मोठ्या संख्येनं येतात.

इथे केवळ व्यापाराच्याच गोष्टी होतात असं नाही तर इमा कॅथेल हे मणिपूरमधलं एक महत्त्वाचं राजकारणाचं केंद्रही आहे. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत या ठिकाणी महिला राजकारण, समाजकारण यावर एकत्र येऊन चर्चा करताना दिसतील. महिला आंदोलनाचं एक मुख्य केंद्र म्हणूनही इमा कॅथेलकडे पाहिलं जातं.

या बाजारपेठेचीच देणगी आहे, मणिपूरची सर्वांत सशक्त महिला संघटना, ”मइरापाईबी”. याची परंपराही खूप जुनी आहे. Nupi Lan चळवळ, जिचं साधारण भाषांतर महिलांचं यु*ध्द असं होईल, ही मणिपूरच्या इतिहासातील ठळक घटना आहे. सबंध देशात ब्रिटिशांनी सत्ता स्थापन केली होती, अगदी राजे महाराजेही ब्रिटिशांचे हुजरे बनले होते त्या काळात बाजारपेठेतला तांदूळ देशाबाहेर नेला जातो आहे, इथल्या विक्रेत्यांचं शोषण होत आहे हे लक्षात आल्यावर इमा कॅथेलमधल्या महिला एकत्र आल्या आणि त्यांनी या कायद्यांविरूध्द यु*ध्दच पुकारलं. १९०४ आणि १९३९ असं दोनदा हे यु*ध्द ब्रिटिशांविरूध्द केलं गेलं.

दिसायला नाजूक आणि सुबक ठेंगण्या अशा या मणिपुरी स्त्रिया वेळ आली तर हाती शस्त्र घेण्याइतक्या कणखर आहेत. म्हणूनच तर जगभरात पुरूषांचं वर्चस्व असणार्‍या या सेक्टरवर मणिपूरमधे नारीशक्ती पाचशे वर्षं वर्चस्व राखून आहे.

या बाजारपेठेचं आपलं असं एक तंत्र आहे, एक व्यवस्था आहे. बाजारपेठेत दुकान थाटायचं तर त्या महिलेकडे परवाना असणं गरजेचं आहे. हा परवाना IMC इंफ़ाल म्युनिसिपल कौन्सिलकडून दिलं जातं. यासाठी काही विशिष्ट वर्षांचा करार करून भाडे तत्वावर जागा वाटप होतं.

ज्या महिलांकडे अशा प्रकारचा दुकान परवाना नसतो त्या बाजारातच पथार्‍या पसरून विक्री करतात. या प्रकारची विक्री करणार्‍या बहुतांश महिला या डोंगरदर्‍यातल्या खेड्यातून येणार्‍या किंवा आदिवासी असतात. काही जणी सामान घेऊन येतात आणि बाजारातल्याच एखाद्या महिलेला सगळं सामान विकून पैसे घेऊन निघून जातात. वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या हा बाजार आपलं वेगळेपण राखत, महिला सशक्तीकरणाच उदाहरण बनत उभा आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

क्रांतिवीर मंगल पांडेंना फाशी देण्यासाठी तुरुंगातील जल्लादांनी नकार दिला होता!

Next Post

सुलतान तुघलकच्या एक से एक आयडियापुढे एलोन मस्क पण फेल झाला असता

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

सुलतान तुघलकच्या एक से एक आयडियापुढे एलोन मस्क पण फेल झाला असता

मध्ययुगात तब्बल १० वर्षे आकाशात चंद्रच दृष्टीस पडला नव्हता !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.