The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माणूस हैदराबादला गेल्यावर चारमिनार पाहणार नाही, पण पॅराडाईजची बिर्याणी न खाता परत येणं अशक्यच!

by द पोस्टमन टीम
10 April 2025
in भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


हिंदीत अशी म्हण आहे की “दिल का रास्ता पेट से होकर जाता है|” थोडक्यात काय तर तुम्हाला एखाद्याचं मन जिंकायचं असेल तर त्या व्यक्तीला त्याच्या आवडीचा खाद्यपदार्थ खाऊ घाला! तो तुमच्यावर खुश होऊन जाईल. आपल्याकडे समोरच्या व्यक्तीला खुश करण्यासाठी असे अनेक पदार्थ आहेत जे आपल्या लोकांच्या जिभेवर अधिराज्य गाजवत आहेत, मग त्यात मिठाई असेल, मांसाहारी जेवण असेल किंवा अजून काही असेल.

पण या सगळ्या पदार्थांना हैदराबादमध्ये काहीच महत्त्व नाहीये! हे वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. हो, हैदराबादमध्ये जर तुम्हाला एखाद्याला खाद्यपदार्थ देऊन आपलसं करायचं असेल तर तिथे फक्त एक पदार्थ आहे आणि तो पदार्थ म्हणजे बिर्याणी. हैदराबाद म्हटलं की खवय्यांच्या डोळ्यासमोर पहिली गोष्ट येते ती म्हणजे हैदराबादमधली स्पेशल दम बिर्याणी.

आज जगभरात पसरलेलं हे बिर्याणीपुराण हैद्राबादमधल्या पॅराडाईज बिर्याणीशिवाय अपूर्ण आहे.

जसं हैद्राबादला बिर्याणीची राजधानी असणारं शहर म्हणून ओळखलं जातं तसंच पॅराडाईज बिर्याणीला या बिर्याणीच्या राजधानीचा आत्मा म्हणून ओळखतात. संपूर्ण हैद्राबाद बिर्याणीसाठी प्रसिद्ध असताना लोक पॅराडाईज बिर्याणीलाच का पसंती देतात तर त्यामागे असणारे कारण आहे वर्षानुवर्षे टिकून असलेला विश्वास, आणि गुणवत्ता.

चला तर मग, आपल्या चवीने खाद्यसेवेत यशशिखरे गाठलेल्या पॅराडाईज बिर्याणीच्या आजपर्यंतच्या लज्जतदार प्रवासावर नजर टाकूयात.



हुसैन हेमाती आणि गुलाम हुसैन यांनी हे पॅराडाईज १ सप्टेंबर १९५३ साली हैद्राबाद येथील सिकंदराबादमध्ये पॅराडाईज थिएटरजवळ सुरू केलं. याच दिवशी योगायोगानं हुसैन हेमाती यांच्या मुलाचा अली हेमातीचा जन्म झाला. जसं जसं अली मोठे होत गेले तसं तसं हुसैन आपल्या या पॅराडाईजची जबाबदारी अलींवर सोपवत गेले. बालपणी पायलट बनण्याची इच्छा होती, पण आईवडिलांच्या नकारामुळे त्यांनी तो विचार सोडला. पुढे थोडं मोठं झाल्यावर आपण अमेरिकेला जाऊन तिथं नवीन जीवन सुरू करावं असं त्यांना वाटलं पण इथे देखील त्यांच्या आईने त्यांना जाण्यास नकार दर्शवला.

एक वेळ अशी आली जेव्हा वडिलांच्या तब्येतीमुळं अलींना पूर्णपणे या वडिलोपार्जित व्यवसायात उतरावं लागलं. फेब्रुवारी १९७८ च्या आसपास पूर्ण व्यवसाय ते स्वतः पाहू लागले.

सुरुवातीच्या काळात ४० ते ५० माणसं हाताखाली ठेऊन शंभर-एक गिऱ्हाईक बसतील अशा जागेत त्यांचा व्यवसाय सुरू होता आणि दिवसाचे जवळपास २००० रुपये त्या वेळी रोज मिळत होते. १९६० च्या आसपास दुकानाचे रूपांतर एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये झाले होते. व्यवसायाची फारशी सवयही नाही आणि नवीनच व्यवसायात उतरल्याने त्यांनी त्यांचे काका गुलाम हुसैन यांच्या सल्ल्याखाली आपला व्यवसाय सांभाळला. त्यांनी आपल्या या पॅराडाईजमध्ये वेगवेगळे बदल करून एक वैशिष्ट्यपूर्ण वाटेल असं पॅराडाईज तयार केलं.

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

सुरुवातीच्या काळात त्यांनी त्यांच्याच क्षेत्रातील वेगवेगळी दुकानं पाहिली आणि त्यांच्या लक्षात आलं की बिर्याणीच्या दुकानात जास्त करून कुटुंब परिवार एकत्र येत नाही याचं कारण म्हणजे त्या दुकानांमध्ये बिर्याणीबरोबरच मद्यपानही असायचं.

अली हुसैन यांच्या लक्षात ही गोष्ट आली आणि त्यांनी आपलं स्वतःचं फॅमिली रेस्टॉरंट बनवायचं ठरवलं. आज दरवर्षी फक्त देशातूनच नाही तर वेगवेगळ्या देशांतून लोकं इथे बिर्याणी खायला येतात. जो माणूस हैद्राबादला येतो तो पॅराडाईजला भेट देऊनच जातो. कित्येक मोठमोठी आणि प्रसिद्ध माणसं या पॅराडाईजमध्ये येऊन गेली. स्वतः दिग्गज अभिनेता आमिर खान यांनीही इथे येऊन इथल्या स्वादिष्ट बिर्याणीचा आस्वाद घेतला. शाकाहारापासून मांसाहारापर्यंतच्या सगळ्या प्रकारच्या चविष्ट बिर्याणी इथे मिळतात.

व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी, कबाब या डिशेसना तर रोज मोठ्या प्रमाणात मागणी असते. हैद्राबादी दम बिर्याणी ही इथली खूप प्रसिद्ध बिर्याणी आहे.

पॅराडाईजची मुख्य शाखा सिकंदराबादला आहे. एवढंच नाही तर संपूर्ण देशभरात पॅराडाईजच्या ६० हून अधिक शाखा आहेत, ज्या आपल्या ग्राहकांना त्यांची स्वादिष्ट बिर्याणी खाऊ घालण्यास सज्ज असतात. आज याच पॅराडाईजमुळे जवळ जवळ ३५०० लोकांना रोजगार मिळतो. त्यांचा हा व्यवसाय इतका अफाट पसरला आहे की वर्षाला कित्येक कोट्यवधी रुपयांची उलाढाल या व्यवसायाद्वारे होते.

काय ती गरमागरम बिर्याणी.. त्यातल्या मिश्रित तिखट आणि चटाकेदार मसाल्यांचा वास.. आणि त्याबरोबर बिर्याणीवर टाकायचा पातळ रस्सा.. अहाहा..!! अगदी हे ऐकल्याबरोबरच तोंडाला पाणी सुटतं!

फक्त रेस्टॉरंट पुरतेच नाही तर पॅराडाईज आपल्या ग्राहकांसाठी अगदी घरपोच सेवा देखील पुरवतं. फारच कुठे कामात असाल किंवा थकला असाल तर घरबसल्या देखील तुम्ही पॅराडाईजच्या बिर्याणीचा आस्वाद घेऊ शकता! आज कुठल्याही बाबतीत पॅराडाईज मागे नाही. सगळ्या ऑनलाइन सेवाही पॅराडाईज आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देतं. रेस्टॉरंटमध्येही अतिशय उत्कृष्ट सेवा तिथल्या वेटर्सकडून ग्राहकांना दिली जाते. आणि रोज इतकी गर्दी पॅराडाईजच्या सर्व रेस्टॉरंटना असते की लोकांना शेवटी आपल्या स्वादिष्ट बिर्याणीचा आस्वाद घ्यायला बऱ्याचदा ताटकळत उभं राहावं लागतं.

अली हेमाती यांच्या अपार कष्टामुळे आणि त्यांच्या जिद्द-चिकटीमुळे आज “पॅराडाईज” हे एक जगविख्यात ब्रँड बनले आहे.

या ब्रॅंडला देशभरातल्या बऱ्याच पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलं आहे. टाइम्स ऑफ इंडिया, बर्प अशा बऱ्याच पब्लिकेशन्सकडूनही पॅराडाईजला सन्मानित करण्यात आलं. एवढं नावाजलेलं ब्रँड ऐकल्यावर तर बिर्याणी खायची इच्छा आणखी वाढते.

अशी ही पॅराडाईझ बिर्याणी त्यांच्याकडे जाणाऱ्याला नक्कीच भुरळ घालते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: BiryaniFoodHyderabadParadise Biryani
ShareTweet
Previous Post

सह्याद्रीतील या किल्ल्यांवर चक्क वर्तुळाकार इंद्रधनुष्य बघायला मिळतं

Next Post

हा गांधीवादी उपोषणाला बसला नसता तर आज आंध्र प्रदेश अस्तित्वात नसता!

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
भटकंती

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

8 September 2025
इतिहास

तुर्कस्तानातील हजारो वर्षांपूर्वीची ही भूमिगत शहरे अविश्वसनीय आहेत..!

8 September 2025
भटकंती

१० हजार वर्षांपूर्वीच्या या अंडरवॉटर पिरॅमिड्सचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही..!

16 October 2025
भटकंती

जगाचे मध्य ब्रिटनमध्येच का आहे?

5 September 2025
Next Post

हा गांधीवादी उपोषणाला बसला नसता तर आज आंध्र प्रदेश अस्तित्वात नसता!

जिन्नांचा दुर्धर आजार त्यांच्या डॉक्टरने लपवला, नाहीतर पाकिस्तानचा जन्मच झाला नसता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.