The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मागील दोन दशकांपासून सर्वच भयानक रोगांचा उगम चीनमध्येच का होत आहे..?

by द पोस्टमन टीम
17 January 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


कोरोनाचा उगम कुठून आणि कसा झाला आता यावर बऱ्याच चर्चा सुरू असतात. अमेरिकेने चीनवर कोरोनाच्या उगमाचे आणि प्रसाराचे भांडे फोडत एका रिपोर्टच्या माध्यमातून चीनवर कोरोना संबंधित सत्य लपवल्याचा आरोप केला.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ’ब्रायन यांनी चीनने गेल्या २० वर्षांत पाच गंभीर महामारी सदृश्य आजार दिल्याचा दावा केला आहे. त्यात ते म्हणतात की चीनमधून जगासाठी येणारी आपत्ती आता वेळीच थांबवणे गरजेचे आहे.

त्यांनी चीनमधून पसरलेल्या पाच रोगांना नमूद केले त्यात सार्स, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू आणि कोविड-19 या रोगांचा उल्लेख करण्यात आला आहे.

त्यांचा हा दावा तांत्रिकदृष्ट्या काही बाबतीत चुकीचा असला तरी या दाव्यात थोडेफार तथ्य देखील आहे. स्वाईन फ्लूचा उगम चीनमध्ये झालेला नसला तरी इतर आजारांप्रमाणे त्याचा चीनच्या मांस विक्री बाजाराशी संबंध असल्याचे या अगोदर देखील उघड झाले आहे.



कोरोना व्हायरसचा उगम देखील अशाच एका मांसविक्री बाजारातून झाल्याचे बोलले जात आहे. परंतु हा व्हायरस लॅबमध्ये तयार करण्यात आला, या दाव्यात काही तथ्य नसल्याचे मत देखील शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला देखील चीनमधून असाच एक आजार सुरु झाला – एचएमपीव्ही. 

चीनमधून आतापर्यंत कोणकोणते आजार जगभरात पसरले आणि त्याचा एकूण परिणाम काय झाला ते आपण जाणून घेऊया..

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

सार्स

२००२ च्या नोव्हेंबरमध्ये चीनमधून सार्सचा प्रसार होण्यास सुरुवात झाली होती. सर्वप्रथम दक्षिण चीनच्या गुओंगडाँग भागात हा व्हायरस आढळला होता. नोव्हेंबर २००२ च्या मे आणि २००३ च्या जुलै महिन्यापर्यंत याचा मोठा प्रादुर्भाव निर्माण झाला होता. यात देखील शेकडो लोकांचा जीव गेला होता.

तब्बल ३७ देशांत या व्हायरसचा प्रादुर्भाव झाला होता आणि तब्बल ९.६ टक्के इतका या व्हायरसचा मृत्युदर होता. आजपर्यंत या आजारावर कुठलाच औषधोपचार सापडलेला नाही.

सार्सच्या वेळी देखील चीनच्या मांस विक्री बाजाराशी संबंधित अनेक गोष्टी व्हायरल झाल्या होत्या. अनेक तज्ज्ञांच्या मते, हा व्हायरस आधी वन्यजीवांमध्ये तयार झाला असावा आणि पुढे त्यांच्या मांसभक्षणातून हा आजार मानवी शरीरात आला. चीनचा मांस विक्रीचा बाजार हा या आजाराचे केंद्र बनला होता, याठिकाणी साध्या जनावरांबरोबरच विषारी प्राण्यांचे मांस देखील खाल्ले जाते, यामुळेच असे रोग याठिकाणी वेगाने पसरतात. 

बर्ड फ्लू

एवीयन इन्फ्लुएनजा म्हणून प्रसिद्ध असलेला हा आजार कोंबडीमध्ये आढळला आणि त्यातूनच हा आजार पसरला होता. या रोगाने ग्रस्त असलेल्या कोंबडीला खाल्ल्यामुळे तसेच श्वसनावाटे हा मनुष्याच्या शरीरात दाखल झाला होता. या व्हायरसला H5N1 म्हणून ओळखले जाते. याचा उगम देखील चीनमध्येच १९९६ साली झाला होता. साल २००० नंतर हा रोग जगभर पसरला, ह्यानंतर अशा प्रकारचे अनेक रोग चीनमुळे जगभरात पसरले.

स्वाईन फ्लू

स्वाईन फ्लू अर्थात H1N1 फ्लू म्हणून ओळखला जाणारा हा आजार आधी डुकरांमध्ये होता पण डासांच्या माध्यमातून तो माणसामध्ये आला आणि पसरतच गेला. हा आजार अत्यंत धोकादायक होता यामुळे अनेक रुग्ण दगावल्याचा घटना देखील घडल्या होत्या. भारतात देखील हा विषाणू चांगलाच पसरला होता. परंतु वेळेत यावर औषध शोधून काढण्यात यश आल्याने आजाराचा फैलाव रोखता आला.

अमेरिकेच्या मते, हा व्हायरस चीनमधून आला नसून याचा उगम वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या देशात झाला होता. फिलिपाईन्समध्ये याचा मोठा प्रादुर्भाव निर्माण झाला होता.

कोरोना व्हायरस

चीनच्या वुहान शहरात तयार झालेला कोरोना व्हायरस हा देखील त्या मांस विक्री बाजारातूनच आला असून अनेक लोक तो लॅबमध्ये तयार करण्यात आल्याचा दावा करतात. कोरोना हा या शतकातील सर्वांत गंभीर आजार असून त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि पाश्चात्त्य देशांची झालेली अवस्था आपल्यासमोर आहे.

चीनचा मांस विक्री बाजार या सर्व रोगांच्या प्रादुर्भावाला जबाबदार असून चिनी लोकांच्या अत्यंत विचित्र अशा अन्न पदार्थांच्या आवडीमुळे निसर्गचक्र विस्कळीत होऊन हे निरनिराळ्या प्रकारचे विषाणू आपल्या जीवाला धोका निर्माण करत आहेत. प्राण्यांच्या माध्यमातून एड्स, स्वाईन फ्लू यांच्यासारखे आजार पसरत असतात, सार्स आणि बर्ड फ्लू ही त्याच प्रकारचे आहेत, यामुळे या मांस विक्री बाजारात प्राण्यांवर केले जाणारे अत्या*चार रोखणे गरजेचे झाले आहे.

एचएमपीव्ही व्हायरस 

२०२५ या वर्षाच्या सुरुवातीलाच या व्हायरसच्या केसेस चीनमध्ये सापडू लागल्या. याची लक्षणं कोरोना व्हायरससारखीच असून त्याच्या आतापर्यंत सुमारे १५ केसेस आढळल्या आहेत. 

केवळ चीनच्याच नाहीतर जगभरातील वन्य प्राण्यांचे मांसभक्षण करणाऱ्या बाजारांवर बंदी घालणे अत्यावश्यक आहे. पाळीव पशु वगळता इतर प्राण्यांच्या सेवनामुळेच आज ही आपत्ती आपल्यासमोर निर्माण झाली आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

रायगडावरचा महाराजांचा पुतळा आप्पांनी पुरातत्व खात्याशी भांडून बसवलाय!

Next Post

आंतरजालावरील काळी दुनिया ‘डार्क वेब’ काय आहे जाणून घ्या..!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

आंतरजालावरील काळी दुनिया 'डार्क वेब' काय आहे जाणून घ्या..!

'ग्रीन टी'चे फायदे सर्वांना माहित आहेत, आता इतिहास वाचा

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.