The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या घोड्याचं गणित आपल्यातल्या अनेकांपेक्षा चांगलं होतं

by द पोस्टमन टीम
9 May 2025
in विज्ञान तंत्रज्ञान, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


मानवाइतकी प्रगत नसली तरी प्राण्यांनाही बुद्धिमत्ता असते. तुमच्या घरात आगंतुक घुसलेल्या एखाद्या मांजराच्या पिल्लाला तुम्ही वैतागला असाल तर त्याला एखाद्या दूरच्या ठिकाणी सोडून या. त्याला रस्ता दिसू नये म्हणून वाटल्यास त्याचे डोळे बांधा, पण तुम्ही त्याला सोडल्यानंतर तुम्ही तुमच्या घरी पोहोचण्याआधी ते मांजर तुमच्या घरी पोहोचलेलं असेल. त्याला रस्ता कळू नये म्हणून कितीही खबरदारी घेतलेली असली तरी मांजराने मात्र ते घर आणि त्या घराचा रस्ता बरोबर लक्षात ठेवलेला असतो.

पाळीव प्राणी गेली अनेक हजार वर्षे माणसाच्या संपर्कात रहात आहेत त्यामुळे कदाचित त्यांच्यात असे बदल दिसून येत असतील. १९व्या शतकात जर्मनीमध्ये विलहेल्म ऑस्टिन नावाचे एक गणिताचे शिक्षक होऊन गेले. ते मेंदूच्या बाहेरील कवटीचा, मस्तिष्क-विज्ञान शास्त्राचा अभ्यास करत होते. या मस्तिष्क-विज्ञान शास्त्रानुसार माणसाची बुद्धिमत्ता ही त्याच्या डोक्याचा आकारावरून ओळखता येते. त्यांना प्राण्यांमध्येही बराच रस होता. म्हणून त्यांनी या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडून प्राण्यांवर काही प्रयोग करण्याचे ठरवले.

आपल्या एका सिद्धांताची पडताळणी करण्यासाठी प्रा. ऑस्टिन यांनी तीन प्राणी निवडले आणि त्यांना शिक्षण देण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी एक मांजर, एक अस्वल आणि एका हान्स घोड्याची निवड केली. या तीन प्राण्यांत पहिल्यांदा अस्वलाने हार मानली. मांजरालाही गणित शिकण्यात काही रस नव्हता, पण प्रा. ऑस्टिन यांच्या हान्स घोड्याने मात्र थोडा चांगला प्रतिसाद दिला होता.

मग प्रा. ऑस्टिन यांनी हान्सवरच आपले लक्ष केंद्रित केले.



हान्स फळ्यावर लिहिलेले अंक ओळखू लागला. जो अंक फळ्यावर लिहिला असेल तितक्यावेळा तो आपली पावले आपटत असे. हान्सच्या या प्रतिक्रियेमुळे प्रा. ऑस्टिन यांचा उत्साह दुणावला.

मग त्यांनी हान्सला प्राथमिक आकडेमोड शिकवली. फळ्यावर काही साधी गणिते लिहायची मग त्याच्या उत्तर सांगण्यासाठी हान्सला काही पर्याय दिले जायचे. दिलेल्या पर्यायापैकी हान्स अचूक पर्यायावर पाय ठेवून उत्तर देत असे. पण यासाठी हान्सला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा सोप्या चिन्हांची ओळख करून देणे गरजेचे होते. ही ओळख करून झाल्यावर त्यांनी हान्सला आकडेमोड आणि गणिती प्रक्रिया शिकवली. पुढे पुढे तर हान्स दशांश अपूर्णांक, वर्ग आणि वर्गमूळ, गुणाकार अशी गणितेही सोडवू लागला.

प्रा. ऑस्टिन यांना वाटले आता हान्सचे हे कौशल्य सर्वांसमोर सादर केले पाहिजे म्हणून त्यांनी रस्त्यावर कार्यक्रम सुरु केले. ज्यात प्रा. ऑस्टिन यांनी विचारलेल्या प्रश्नाचे हान्स अगदी अचूक उत्तर देत असे. १८९१ पासून हान्स आणि ऑस्टिन दोघे मिळून जर्मनीत मोफत प्रयोग करू लागले.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

आता तर हान्स आपल्या पायांनी स्पेलिंग देखील ओळखायला लागला होता. अर्थात, दरवेळी तो अचूकच उत्तरे देईल असे नाही. पण बघणाऱ्या लोकांना मात्र एक घोडा गणिते सोडवतो आणि स्पेलिंग सांगतो हे पाहून खूप आश्चर्य वाटत होते.

गणिते सोडवणारा घोडा बघण्यासाठी लोक भरपूर गर्दी करत असत. हान्सची भरपूर चर्चा होत असे. एवढी की न्यूयॉर्क टाइम्सलाही हान्सची दखल घ्यावी लागली. जर्मनीच्या शिक्षण मंडळानेही हान्सच्या शिक्षणात रुची दाखवली. जमर्नच्या शिक्षण मंडळाने तर, हान्सच्या शैक्षणिक क्षमतेची चाचपणी करण्याचीही तयारी दाखवली. ऑस्टिननी देखील याला परवानगी दिली. उलट त्याला तर हेच हवे होते. कारण, त्यांनी काही फसवाफसवी तर केली नव्हती. घोड्याला शिकवण्यासाठी त्यांनी बरेच कष्ट घेतले होते.

घोड्याच्या शैक्षणिक क्षमतेची चाचपणी करण्यासाठी जर्मन शिक्षण मंडळाने हान्स कमिशन नावाने एक आयोग स्थापन केला. या आयोगात एक मानसशास्त्रज्ञ, काही शिक्षक, एक सर्कस मास्टर, दोन प्राणीशास्त्रतज्ञ आणि एक अश्व प्रशिक्षक अशा व्यक्तींची निवड करण्यात आली.

या सगळ्यांनी आपापल्या परीने तपासणी केल्यानंतर या आयोगाने असा निकाल दिला की, हान्सच्या क्षमतेवर अविश्वास दाखवण्यासारखे काही नाही. यात काहीही फसवाफसवी किंवा हातचलाखी केली जात नाही.

खरोखरच तो एक हुशार आणि बुद्धिमान घोडा आहे, असा निष्कर्ष या आयोगाने दिला.

असे असले तरी जर्मनीतील मानसोपचार तज्ज्ञ ऑस्कर फांग्स्ट यांना अशा प्रकारे एखादा घोडा खरोखरच इतका बुद्धिमान असेल याबद्दल खात्री वाटत नव्हती. प्रा. ऑस्टिन यांच्या परवानगीने त्यांनी ही हान्सची परीक्षा घेण्याचे ठरवले. हान्सची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी काही वेगळ्या तंत्रांचा अवलंब केला. हान्सच्या परीक्षेसाठी त्यांनी एक तंबू उभारला. हान्सचे लक्ष विचलित होऊ नये हा त्यामागचा हेतू होता. त्याच्यावर बाहेरच्या वातावरणाचा परिणाम होऊ नये म्हणूनही खबरदारी घेण्यात आली होती. मग त्यांनी हान्सला विचारण्यासाठी एक लांबलचक प्रश्नावली तयार केली.

सुरुवातीला हान्सने नेहमीप्रमाणे बरोबर उत्तरे दिली. परंतु फांग्स्ट यांनी वातावरणात काही बदल केले आणि मग प्रश्न विचारले तेव्हा तो थोडासा गोंधळला. हान्सला प्रश्न विचारत असताना त्यांनी ऑस्टिनना त्याच्यापासून थोडे दूरच्या अंतरावर उभे राहण्याची विनंती केली. जेव्हा ऑस्टिनचा चेहरा दिसत नाही तेव्हा हान्सवर काय परिणाम होतो हे त्यांना तपासायचे होते. हा प्रयोग केल्यानंतर हान्सच्या उत्तरात गोंधळ होऊ लागला.

यानंतर फांग्स्ट यांनी काही नवे बदल करायचे ठरवले. ऑस्टिन यांनाही ज्याची उत्तरे माहिती नसतील असे प्रश्न त्यांनी हान्सला विचारायला लावले. यावेळी तर हान्स अगदीच गडबडला त्याला एकही प्रश्नाचे उत्तर बरोबर देता आले नाही. जेव्हा ऑस्टिन यांनी एका पडद्यामागे उभे राहून हान्सला हेच प्रश्न विचारले तेव्हाही तो उत्तरे द्यायला चुकला.

यावरून फांग्स्ट यांनी असा निष्कर्ष काढला की, हान्सला उत्तर येवो अगर न येवो त्याला प्रश्न विचारणाऱ्याचा चेहरा स्पष्ट दिसला पाहिजे आणि प्रश्न विचारणाऱ्याला उत्तर माहिती असले पाहिजे.

ऑस्टिन यांनी घोड्याला प्रश्नोत्तरे शिकवली असली तरी, त्याला प्रश्न कोण विचारात आहे, यावर हान्सची प्रतिक्रीया ठरलेली असे. फांग्स्ट यांना हेच दाखवून द्यायचे होते की, प्रश्न बदलल्याने आणि प्रश्न विचारणारा बदलल्याने हान्सच्या उत्तरात फरक पडतो. त्याला उत्तर माहिती नसते तर तो प्रश्न कर्त्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहून उत्तर देतो. जे उत्तर ऑस्टिन यांना माहित असते त्याचेच उत्तर हान्स देऊ शकतो ज्याचे उत्तर त्यांनाही माहित नसते अशा प्रश्नाचे उत्तर हान्स देऊ शकत नाही.

हान्सचे उत्तर हे प्रश्नकर्त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावर अवलंबून असते. जेव्हा प्रश्नकर्ता प्रश्न विचारतो आणि हान्स त्याचे उत्तर देण्यासाठी पाय उचलून वेगवेगळ्या पर्यायांजवळ नेतो तेव्हा तो प्रश्नकर्त्याच्या चेहऱ्यावरील भाव, त्याच्या श्वासाची गती, त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा तणाव या सगळ्या गोष्टींचा अंदाज लावत असतो. जेव्हा हान्स चुकीच्या उत्तराकडे पाय नेतो तेव्हा अर्थातच प्रश्नकर्त्याचा चेहरा तणावपूर्ण दिसतो. जेव्हा तो अचूक उत्तराच्या दिशेने पाय नेतो तेव्हा प्रश्नकर्त्याच्या चेहऱ्यावरील तणाव निवळतो. हान्सची उत्तर देण्याची पद्धती ही अशी होती.

हान्सने उत्तर शिकण्यापेक्षा चेहऱ्याचे परीक्षण करण्यास शिकले होते. म्हणूनच जेव्हा प्रश्नकर्त्यालाच उत्तर माहित नसतात किंवा प्रश्नकर्त्याचा चेहरा दिसत नाही तेव्हा हान्सची उत्तरे पूर्णतः चुकतात. ऑस्टिनला याचा जराही अंदाज आला नाही की आपण आपल्या चेहऱ्यावरून हान्सला उत्तरासाठी हिंट देतोय. खरे तर ही प्रक्रिया अगदीच नकळतपणे घडत होती.

ही प्रक्रिया अधिक स्पष्टपणे समजावून देण्यासाठी फांग्स्ट यांनी स्वतः हान्सची भूमिका स्वीकारली आणि प्रश्नकर्त्याच्या देहबोलीवरून उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. आता हा प्रयोग करताना प्रश्नकर्त्यांनाही माहित होते की, आपल्या चेहऱ्यावरील हावभावातून समोरच्याला उत्तरासाठी हिंट मिळणार आहे, पण तरीही ते आपल्या मनातील भावना लपवू शकले नाहीत. तेव्हापासून अशा प्रकारे निर्हेतुकपणे एखाद्याला हिंट दिली जात असेल तर त्याला ‘क्लेव्हर हान्स इफेक्ट’ अशी संज्ञा वापरली जाऊ लागली.

हान्स गणिती क्रिया करू शकत नव्हता किंवा अचूक स्पेलिंग सांगू शकत नव्हता हे खरे असले तरी, तो एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकला होता. माणसाची देहबोली ओळखणे. आता जी बुद्धिमत्ता ऑस्टिन हान्समध्ये शोधत होते ती त्याच्यात नसेलही पण त्याच्याकडे जे होते ते त्याहूनही कितीतरी जास्त महत्त्वाचे होते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अमेरिकेतल्या पहिल्या पेंड्युलम घड्याळातील दोषामुळे फिजिक्सला कलाटणी मिळाली

Next Post

भटकंती – मन प्रसन्न करणारा कसोल ते खीरगंगा जंगल ट्रेक

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
Next Post

भटकंती - मन प्रसन्न करणारा कसोल ते खीरगंगा जंगल ट्रेक

अपघातात एक डोळा गमावून पण टायगर पतौडींनी मैदान गाजवलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.