The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डुप्लिकेट वस्तू बनवणाऱ्या चीनने तयार केलाय चक्क कृत्रिम सूर्य, पाहा खासियत

by द पोस्टमन टीम
24 June 2025
in विज्ञान तंत्रज्ञान, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


आशियाई देशांमध्ये चीन आणि जपान हे नेहमीच चित्रविचित्र प्रयोग करत असतात. त्यापैकी कित्येक वैज्ञानिक प्रयोग हे खरंच आश्चर्यकारक असतात, तर कित्येक प्रयोग पाहिले की हसावं की रडावं तेच कळत नाही. काहीही असलं, तरी टेक्नॉलॉजीच्या बाबतीत हे दोन देश इतरांहून कित्येक पटींनी पुढे आहेत.

चीनमध्ये गुगल, फेसबुक, यूट्यूब अशा गोष्टींची प्रतिकृती वापरण्यात येते. डुप्लिकेट वस्तू बनवण्यामधील चीनचा हातखंडा तर सर्वांनाच माहिती आहे. ‘नकली’ शब्दाला समानार्थी शब्द लिहा म्हटलं की आजकालची पोरं सरळ ‘चायनीज’ लिहून मोकळं होतात.

अशा या चीनने आता सरळ सरळ सूर्याचीच कॉपी केलीय. एवढंच नाही, तर आपल्या प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेला कृत्रिम सूर्य हा खऱ्या सूर्यापेक्षा १० पटींनी शक्तिशाली असल्याचंही तिथल्या वैज्ञानिकांचं म्हणणं आहे.

न्यूक्लिअर पॉवरच्या मदतीने बनवला सूर्य

न्यूक्लिअर पॉवर हे आपण आतापर्यंत केवळ साय-फाय मूव्हीजमध्येच ऐकत आलो आहोत. मात्र हे केवळ फिक्शन राहिले नाही. चीनने आपला कृत्रिम सूर्य बनवण्यासाठी याच न्यूक्लिअर पॉवरचा उपयोग केला आहे. चीनच्या हेफेई प्रांतामध्ये असलेल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ प्लाझ्मा फिजिक्स’मध्ये हा कृत्रिम सूर्य तयार करण्यात आला आहे. ही इन्स्टिट्यूट चायनीज अकॅडमी ऑफ सायन्समार्फत चालवण्यात येते. या प्रयोगाला एक्सपेरिमेंटल अ‌ॅडव्हान्स्ड सूपरकंडक्टिंग टोकमॅक (ईस्ट) असे नाव देण्यात आले आहे.

सूर्यामध्ये ऊर्जा निर्माण होण्यासाठी न्यूक्लिअर फ्यूजनची जी प्रक्रिया होते. तीच प्रक्रिया चीनचे वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये करत आहेत. यासाठी टॉकमॅक रिअ‌ॅक्टरसोबतच एचएल-२ए आणि जे-टीईएक्सटी हे रिअ‌ॅक्टरही वापरण्यात येत आहेत. २०२०च्या डिसेंबरमध्ये एचएल-२एम टॉकमॅक रिअ‌ॅक्टर सुरू करण्यात आला होता. विशेष म्हणजे, चीन २००६ सालापासूनच यावर प्रयोग करत होते.



पर्यावरणासाठीही चांगला आहे हा उर्जेचा स्त्रोत

न्यूक्लिअर फ्यूजन या प्रक्रियेतूनच सूर्य किंवा इतर ताऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण होते. या प्रक्रियेचे वैशिष्ट म्हणजे, यातून अगदी कमी प्रमाणात ‘वेस्ट मटेरिअल’ तयार होते. यापूर्वी आपण जेव्हा कृत्रिम ऊर्जा तयार करायचो, तेव्हा ‘न्यूक्लिअर फिशन’ ही प्रक्रिया वापरायचो. मात्र या प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात ग्रीनहाऊस गॅसेस तयार व्हायचे, ज्यामुळे प्रदूषण होते. मात्र, न्यूक्लिअर फ्यूजनमध्ये असा कोणताही धोका निर्माण होत नाही.

एकदा का आपल्याला न्यूक्लिअर फ्युजनमार्फत कायम स्थिर राहणारी ऊर्जा तयार करण्यात यश आले, तर आपल्याकडे सूर्यापेक्षा अधिक चांगला, कमी खर्चिक आणि पर्यावरणपूरक असा अक्षय्य उर्जेचा स्त्रोत तयार होईल.

न्यूक्लिअर फ्यूजन करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये हायड्रोजनच्या अणूंवर मोठ्या प्रमाणात उष्णता आणि दाब दिला जातो. यामुळे हायड्रोजनमध्ये असणाऱ्या ड्यूटेरियम आणि ट्रिटियमची केंद्रके (न्यूक्लिअस) हे एकमेकांमध्ये मिसळले जातात. (या एकमेकांमध्ये मिसळण्याच्या प्रक्रियेला फ्यूजन म्हणतात.) या फ्युजनमुळे एक हेलिअम केंद्रक (हेलियम केंद्रक) तयार होते. या केंद्रकाच्या अवतीभवती मोठ्या प्रमाणात ऊर्जा असते.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

‘ईस्ट’मध्ये सूर्यापेक्षाही दहापट अधिक उर्जा

प्रयोग सुरू केल्यानंतर, या ईस्टचे तापमान हे १२ कोटी डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. हे तापमान १०१ सेकंदांपर्यंत कायम राहिले. दरम्यानच्या २० सेकंदांसाठी हे तापमान तब्बल १६ कोटी डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले असल्याचेही वैज्ञानिकांनी सांगितले. हे जास्त वाटत नसेल, तर एकदा आपल्या सूर्याचं तापमानही पाहून घ्या!

आपल्या खऱ्या सूर्याचं तापमान हे केवळ १.५ कोटी डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजेच चीनचा हा नवा कृत्रिम सूर्य आपल्या खऱ्या सूर्यापेक्षा तब्बल १० पटींनी अधिक शक्तिशाली आहे.

वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयोगशाळेतील या सूर्याचे तापमान हे सुमारे १०० सेकंदांसाठी स्थिर राहिले होते. मात्र, त्यानंतर ते कमी झाले. सध्या हे वैज्ञानिक जास्त काळासाठी हे तापमान कमी ठेवण्यावर काम करत आहेत. हा प्रयोग यशस्वी झाला, तर चीनला प्रकाशासाठी आणि ऊर्जेसाठी खऱ्या सूर्यावर अवलंबून रहावे लागणार नाही. पूर्वीच्या काळी ‘ब्रिटिशांचा सूर्य मावळत नाही’ अशी म्हण होती. मात्र, या कृत्रिम सूर्याला स्थिर ठेवण्यात चीन यशस्वी झाले, तर ‘चीनमधील सूर्य मावळत नाही’ अशी म्हण तयार करावी लागेल.

इतर देशही तयार करतायत आपापला सूर्य

सूर्यापेक्षा अधिक ऊर्जा तयार करण्यात यश मिळवलेला चीन हा पहिलाच देश नाही. दक्षिण कोरियामध्येही कोरिया सुपरकंडक्टिंग टॉकमॅक अ‌ॅडव्हान्स्ड रिसर्ज (केएसटीएआर) वर काम सुरू आहे. दक्षिण कोरियामधील कृत्रिम सूर्यदेखील २० सेकंदांसाठी दहा कोटी डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाला आहे. तेथील वैज्ञानिकही हा रिअ‌ॅक्टर अधिक काळासाठी कार्यरत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

यासोबतच फ्रान्समध्येही सध्या जगातील सर्वात मोठ्या न्यूक्लिअर फ्युजन रिसर्च प्रोजेक्टवर काम सुरू आहे. याचं काम २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फ्रान्समधील हा प्रयोग १९८५ मध्ये ३५ देशांनी एकत्रितपणे सुरू केला होता. याला इंटनॅशनल थर्मोन्यूक्लिअर एक्सपेरिमेंटल रिअ‌ॅक्टर (आयटीईआर) असे नाव देण्यात आले आहे. यात जगातील सर्वात मोठी टोकमॅक मशीन तयार करण्यात येत आहे.

तंत्रज्ञानाच्या मदतीने हा कृत्रिम सूर्य बनला आहे, अजून काय काय बनवू हे तर येणारा काळच सांगेल!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

ग्रीक दंतकथा – या बारा अशक्यप्राय कामांमुळे हर्क्युलस अजरामर झाला

Next Post

रॉयल एअर फोर्सच्या या ह*ल्ल्याने हि*टल*रच्या कॉन्फिडन्सला धक्का दिला होता..!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
Next Post

रॉयल एअर फोर्सच्या या ह*ल्ल्याने हि*टल*रच्या कॉन्फिडन्सला धक्का दिला होता..!

भारतीय वैमानिकांच्या सावधानतेमुळे भारत-पाक अणुयु*द्ध होता होता राहिलंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.