The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या ब्रिटिश महिलेने ४० वर्षे सोव्हिएतसाठी हेर म्हणून काम केलं, ब्रिटनची न्यू*क्लिअर सिक्रेट्स रशियाला पुरवली

by Heramb
26 November 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


अलीकडेच ॲमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘स्पेशल ऑप्स’ नावाची सिरीज रिलीज झाली आहे. अनेक दर्शकांनी या चित्रपटमालिकेला पसंती दर्शवली. कारण यामध्ये यु*द्धकथा आणि ॲक्शनशिवाय प्रामुख्याने ‘हेरगिरी’ दाखवण्यात आली आहे. हेरगिरीबद्दल आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना ‘कथांव्यतिरिक्त’ आणखी काहीही माहिती नाही. दोन वैश्विक महायु*द्ध आणि शीतयु*द्धाच्या काळात तर हेरगिरीने कळस गाठला होता.

हेरगिरी करण्यामध्ये खरं तर पुरुषांना प्राधान्य दिलेलं आपण ऐकलं किंवा वाचलं असेल. कारण हेरगिरीचे काम हे अनिश्चिततेचे आणि धोक्याचे असल्याने पहिल्यापासूनच हेरगिरीमध्ये पुरुषांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आला आहे. पण शीतयु*द्धाच्या काळात आ*ण्विक रहस्यांची तस्करी करणार्‍या एका केजीबी गुप्तहेराची प्रतिमा तुमच्या-आमच्या कल्पनेपलीकडील आहे. काही जणांना विश्वास बसणार नाही पण केजीबीच्या काही प्रमुख कारवायांमध्ये गुप्तहेर म्हणून दीर्घकाळ काम करणारी एक स्त्री होती.

तसं तर गुप्तहेरांना काही स्थिर नावे नसतात. पण या महिला हेराला ‘होला’ या गुप्त-नावाने ओळखले जात होते. आजच्या या विशेष लेखात ‘होला’बद्दल आणि (कदाचित) तिच्या खऱ्या व्यक्तीत्वाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या कामाबद्दल गुप्तता बाळगण्यात एक वृद्ध स्त्रीसुद्धा एवढी पारंगत असावी हे पाहून तिच्या मुलीलाही आश्चर्यचा धक्का बसला.

होलाचा जन्म ब्रिटीश आई आणि लॅटवियन वडिलांच्या पोटी झाला होता. या कुटुंबाने दक्षिण इंग्लंडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. जसजशी तिची वाढ होत गेली तसतशी होलाच्या मनात डाव्यांबद्दल आणि कम्युनिस्ट विचारसरणीबद्दल तीव्र सहानुभूती निर्माण झाली. तिची ही डाव्यांप्रती असलेली सहानुभूती तिच्या पालकांकडूनच तिच्याकडे आली होती. ते डाव्या विचारसरणीचे प्रखर समर्थक होते. तिचे वडील डाव्या विचारसरणीच्या एका मासिकाचे संस्थापक होते तर आई एका सहकारी संस्थेची सदस्या होती. होलाने या सगळ्याच्या पलीकडे जाऊन थेट युएसएसआरलाच आपली सेवा निष्ठापूर्वक दिली.



१९३० च्या दशकात, अर्थात आर्थिक महामंदीच्या काळात, महामंदीने कळस गाठलेला असताना होलाला तिच्या समाजातील गरिबी आणि निराधारपणा दिसत होता. लोक पोट भरण्यासाठी आणि साधे बिल्स भरण्यासाठीही बराच संघर्ष त्यावेळी करत असत. यामुळेसुद्धा डाव्या विचारसरणीवरचा तिचा विश्वास आणखीनच दृढ झाला. शिवाय, तत्कालीन आर्थिक परिस्थितीमुळे तिच्या कुटुंबाला कामाच्या शोधात लंडनला जावे लागले.

लंडनमध्ये आल्यानंतर होलाचा राजकीय क्षेत्रातील रस वाढू लागला आणि १९३६ साली ती कम्युनिस्ट पक्षात सदस्य म्हणून सामील होणार होती, पण याच काळात तिच्या आयुष्यात आणखी एक महत्त्वपूर्ण वळण आले. तिने लंडनमधील नॉन-फेरस मेटल रिसर्च असोसिएशनमध्ये सचिव म्हणून काम सुरू केले होते.

संस्थेचे नाव कंटाळवाणे आणि नोकरशाही पद्धतीचे वाटत असले तरी ही एक अत्यंत महत्त्वाची एजन्सी होती. कारण ब्रिटीश अणु*बॉ*म्ब तयार करण्याच्या प्रयत्नांमध्ये याच एजन्सीची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. शिवाय, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये जवळचे संबंध असल्याने, ही एजन्सी दोन्ही देशांच्या संयुक्त अण्व*स्त्र-निर्मितीच्या प्रयत्नात ‘ट्यूब ॲलॉय’ प्रकल्पात सहभागी होती.

विसाव्या शतकात अनेक वर्षे त्याच ठिकाणी काम केल्यानंतर, होला सोव्हिएत युनियनला आ*ण्विक गुपिते हस्तांतरित करणार होती. महत्त्वाची गुपिते आणि माहिती मिळवण्याची तिची पद्धत अतिशय सोपी होती. ती फक्त तिच्या बॉसचे ऑफिस रिकामे होईल अशा एका क्षणाची वाट पाहायची आणि आत जायची, तिजोरी उघडून महत्वाच्या कागदपत्रांचे फोटोज काढून घ्यायची. कागदपत्रांचे फोटो काढल्यानंतर ती यूकेमधील सोव्हिएत एजंटकडे कॅमेरा पाठवत असत. सोव्हिएट्समध्ये तिला फक्त ‘होला’ म्हणून ओळखले जात असे.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

नॉर्वुडच्या अर्थात होलाच्या कारनाम्यांमुळे ती सोव्हिएट्ससाठी एक अत्यंत मौल्यवान असेट होती. नंतर प्रसिद्ध झालेल्या कागदपत्रांवरून सोव्हिएत युनियनमध्ये ‘केजीबी’ आणि ‘मिलिटरी इंटेलिजन्स’ यांच्यामध्ये ‘होलाला’ कोण ऑपरेट करणार यामुद्द्यावरून अनेक मतभेद आणि भांडणं झाल्याचे उघड झाले आहे. १९७०च्या दशकाच्या सुरुवातीस तिच्या ‘प्रोफेशन’मधून निवृत्त होईपर्यंत नॉर्वुड सोव्हिएत गुप्तहेर म्हणून अनेक दशके सक्रिय राहिली. पण ही निवृत्ती सोव्हिएत युनियनशी नॉर्वुडच्या परस्परसंवादाचा शेवट नक्कीच नव्हता.

१९७९ साली, नॉर्वुड अर्थात होला आणि तिचा नवरा मॉस्कोला जाणार होते. नॉर्वुडला “द ऑर्डर ऑफ द रेड बॅनर” हा सोव्हिएत पुरस्कार प्राप्त झाला होता. हा पुरस्कार डाव्या विचारांच्या उत्कृष्ट सेवेची ओळख म्हणून दिला जात असे. शिवाय, सोव्हिएत नॉर्वुडला भरीव आर्थिक पुरस्कारही देणार होते, पण तिने तो नाकारला आणि केवळ “ऑनररी” पुरस्कार स्वीकारला.

नॉर्वुडने तिचे पूर्वीचे आयुष्य आणखी दोन दशके गुप्तहेर म्हणून यशस्वीपणे लपवले. गुपिते राखून ठेवण्यात ती इतकी चांगली होती की, आपली आई सोव्हिएत गुप्तहेर होती हे तिच्या स्वतःच्या मुलीलाही माहीत नव्हते. एका माजी सोव्हिएत अधिकार्‍याने त्याच्यासोबत अंतर्गत कागदपत्रांनी भरलेली ट्रंक तिच्या घरी आणल्यानंतर हे रहस्य अखेरीस बाहेर आले.

केंब्रिजचे प्राध्यापक, ख्रिस्तोफर अँड्र्यू, बाहेर आलेल्या कागदपत्रांबद्दल एक पुस्तक लिहिणार होते. या टप्प्यावर नॉर्वुडला तिचे रहस्य बाहेर येणार हे समजले होते, म्हणूनच तिने इंग्लंडमधील बेक्सलेहीथ येथील तिच्या राहत्या घरी पत्रकार परिषद घेण्याचे ठरवले. ब्रीफिंगमध्ये, नॉर्वुडने तिची वैचारिक श्रद्धा आणि आधीच्या स्थितीत ठेवल्यास ती पुन्हा तेच करेल हे स्पष्ट केले.

“जरी सोविएट्सनी केलेले सर्व काही न्याय्य नसले तरी, साम्यवादाचा वैचारिक प्रयोग आजही लाखो लोकांना परवडणारे अन्न, घरे आणि इतर सेवा पुरवत आहे, जे पूर्वी त्यांच्याकडे नव्हतं असा युक्तिवाद तिने केला. त्यामुळे फक्त पाश्चिमात्य देशांकडे अ*ण्वस्त्रे असणे हे तिला मान्य नव्हते, तिच्यासाठी, सोव्हिएट्सनेही हे करणे महत्वाचे होते”. शेवटी, पैसा तिच्यासाठी कधीही प्रेरणा नव्हता हे तिने निदर्शनास आणून दिले. तिचा तिच्या विचारधारेवर खोरखर विश्वास होता हे तिने सिद्ध केले.

पत्रकार परिषदेनंतर, नॉर्वुड तुलनेने सामान्य जीवन जगत राहिली आणि २००५ साली तिने अखेरचा श्वास घेतला. ब्रिटिश सरकारने तिच्यावरील आरोपांचा पाठपुरावा केला नाही. ‘मेलिता नॉर्वुड’वर पुस्तके आणि चित्रपट तयार केले गेले. रेड जोन म्हणून तिचे विचार आणि विश्वास कायमचे अजरामर झाले आहेत.

ती देशद्रोह करत होती असे अनेक लोकांना वाटेल. पण तिचे जीवन हे तुम्ही मनापासून आणि विवेकाच्या तराजूने तोलून स्वीकारलेल्या विचारधारेच्या आणि विश्वासाच्या प्रती कसे प्रामाणिक राहावे हे शिकवून जाते. आज जगात अनेक विचारधारा आहेत, पण त्या विचारधारांचे अनुयायी फक्त स्वार्थासाठी किंवा अन्य विचारधारेच्या द्वेषासाठी ती विचारधारा अंगीकारत असल्याने चुकीची असली तरीही ती टिकून राहते. या वृद्ध ‘गुप्तहेराच्या’ जीवनातून खूप काही शिकण्यासारखं आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

भारतीय महिलांचं दुसऱ्या महायु*द्धातलं योगदान आपल्या पूर्णपणे विस्मरणात गेलं आहे..!

Next Post

एक्स्प्लेनर – कोरोना व्हायरसचा नवीन सापडलेला व्हॅरिएंट किती धोकादायक आहे..?

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

एक्स्प्लेनर - कोरोना व्हायरसचा नवीन सापडलेला व्हॅरिएंट किती धोकादायक आहे..?

किरणोत्सर्गी पाणी चक्क एनर्जी ड्रिंक म्हणून दिलं जायचं, भीषण परिणाम समोर आल्यावर बंदी घातली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.