The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

म्हणून हि*टल*रने त्याचा देह दफन न करता जाळण्याचे आदेश दिले होते

by द पोस्टमन टीम
29 April 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
2
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


जगभरामध्ये जितके क्रू*र हुकुमशहा होऊन गेले त्यात हि*टल*रचं नाव सगळ्यात वर येतं. ३ कोटी ज्यू लोकांचे शिरकाण करणारा हा क्रूरकर्मा आजही त्याच्या काळ्या कर्तृत्वामुळे जगभरात कुप्रसिद्ध आहे. मुख्यत: याच हि*टल*रमुळे जग दुसऱ्या महायु*द्धाच्या खाईत लोटले गेले होते. ब्रिटीश साम्राज्याचा सूर्य मावळला आणि जगाच्या पटलावर अमेरिका नावाच्या महासत्तेचा उदय झाला होता.

हि*टल*रने ३० एप्रिल १९४५ रोजी पत्नी इव्हा ब्राऊनसह आत्मह*त्या केली. मरण्यापूर्वी हि*टल*रने स्वत: सांगितले होते की माझ्या मृत्यनंतर माझे शरीर जाळून टाका. हि*टल*र हा ख्रिश्चन होता पण त्याला स्वत:ला ख्रिस्ती धर्माप्रमाणे दफन करून घ्यायचे नव्हते तर हिंदू धर्माप्रमाणे स्वत:चे शरीर अग्नीत दहन करायचे होते, ही एक आश्चर्याची गोष्ट होती.

त्याच्या मृत्यला आज ७० हून अधिक वर्षे झाली परंतु तरीही काही लोकांना असे वाटते की हि*टल*र हा जर्मनीमध्ये मेलेला नव्हता.

१९३३ साली या ना*झी भस्मासुराचा उदय झाला. जर्मनीला पहिल्या यु*द्धात भयानक मोठी हार पत्करावी लागलेली होती. वर्सेलीसच्या तहामध्ये अत्यंत अपमानकारक अटी जर्मनीला पत्कराव्या लागलेल्या होत्या. त्याचा राग हि*टल*रच्या मनात अमाप होता. जेव्हा त्याची ना*झी पार्टी सत्तेत आली तेंव्हा त्यांनी इतर राजकीय पार्ट्यांचे अस्तित्व बऱ्यापैकी दाबले अथवा उध्वस्त केले होते. जर्मनीला पुन्हा तिचे वैभव मिळवून द्यायचे याच इराद्याने हि*टल*र सत्तेत आला होता.

माईन काम्फ हे आत्मचरित्र त्याने तुरुंगात असताना लिहिले होते. त्यात त्याने फ्रांसबद्दल असलेला राग तसेच ज्यू लोकांनी जर्मन शुद्ध आर्यन वंशामध्ये केलेली भेसळ या दोन गोष्टींचा प्रामुख्याने उल्लेख केला.



जेव्हा हि*टल*र १९३३ साली सत्तेत आला तेव्हा त्याने त्याची यु*द्धखोरी दाखवून दिली. १९३९ साली जर्मन फौजा पोलंडमध्ये घुसल्या. त्यानंतर हि*टल*रने फ्रांस, डेन्मार्क, नॉर्वे, बेल्जियम या देशांवर ह*ल्ले करणे सुरु ठेवले.

पण त्यांनतर १९४५ सालापर्यंत जर्मनी पूर्णपणे पराभवाच्या खाईत लोटला गेलेला होता. १९४३ साली सोव्हिएत युनियनने स्टालिनग्राडमध्ये घुसलेल्या जर्मन फौजांचा पूर्ण पराभव केलेला होता. जुलै १९४४ मध्ये जर्मन सैन्यातील काही अधिकाऱ्यांना फोडून त्यांना हि*टल*रच्या ह*त्येचा कट रचण्यासाठी मित्रराष्ट्रानी मजबूर केलेले होते परंतु तो कट काही कारणाने फसला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

हि*टल*रने त्यावेळी जवळजवळ ५००० निष्पाप जर्मन लोकांना स्वत:च्या ह*त्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली मारून टाकले होते.

जेंव्हा सोव्हिएत युनियन, अमेरिका आणि इतर मित्रराष्ट्राचे सैन्य हि*टल*रला शोधत होते त्यावेळी मात्र हि*टल*र अचानक गायब झाला. काही लोकांच्या मते तो आल्प्स पर्वत रांगेत जाऊन लपलेला होता. १९४५ साली अमेरिकन सैन्याला खबर लागली की  ३ लाख ना*झी सैन्य हे आल्प्स पर्वतात लपून बसले आहे आणि ते पुन्हा ह*ल्ला करण्याच्या तयारीत आहे.

या बातमीने मित्रराष्ट्राच्या तोंडचे पाणी पळाले. जर्मन प्रचार प्रमुख गोबेल्स त्यावेळी रेडीओ वरून ना*झीचे काम फक्त ठार मारणे आहे असा संदेश देत होता पण या बातम्या खोट्या होत्या. ना हि*टल*रने त्याचे सैन्य आल्प्स पर्वतात लपले होते.

हि*टल*र बर्लिनमध्येच एका बंकरमध्ये लपून बसलेला होता. १९४५ साली मित्रराष्ट्राच्या फौजा जर्मनीमध्ये घुसल्या होत्या आणि जर्मनीचा बराच भाग त्यांनी काबीज केला होता ते पाहून आपला पराभव निश्चित झाला आहे याची हि*टल*रला खात्री पटली.

हि*टल*रचा स्वत:चा फ्युरर बंकर म्हणून एक बंकर होता. त्याचा एरिया २७०० स्क्वेअर फीट इतका होता, त्यात हवा, पाणी, अन्न या सगळ्यांची सोय केलेली होती.

त्याच्या जवळच्या लोकांनी त्याला कितीही सल्ले दिले तरी हि*टल*र आपला बंकर आणि जर्मनी सोडून जायला तयार नव्हता. त्याला खबर लागली होती की सोविएत युनियनच्या फौजा त्याला पकडून त्याला पिंजऱ्यात डांबून संपूर्ण देशातून त्याची वरात काढणार आहेत. त्यामुळे त्याचा आत्मसमर्पण न करण्याचा निश्चय पक्का होता.

२२ एप्रिल १९४५ ला हि*टल*रने त्याच्या २ स्वीय सहायकांना बोलावून घेतले. मित्रराष्ट्राच्या फौजा हि*टल*रच्या बंकर पर्यंत येण्यासाठी बर्लिनमधल्या अनेक तळघराना धडका देत होत्या. हि*टल*रने त्याच्या दोन्ही स्वीय सहायकांना बंकरमधून बर्लिनला जायला सांगितले.

२९ एप्रिल १९४५ रोजी हि*टल*रने १६ वर्षापासून त्याच्याबरोबर राहत असलेल्या इव्हा ब्राऊनबरोबर लग्न केले. ब्राऊन जेव्हा १७ वर्षांची होती तेव्हा तिची आणि हि*टल*रची पहिली भेट झाली होती. हि*टल*रने जेव्हा बंकरचा आश्रय घेतला तेंव्हा देखील इव्हा ब्राऊन त्याच्याबरोबर होती. साधारणपणे एप्रिलच्या सुमारास हि*टल*रला त्याचा मित्र इटलीचा हुकुमशहा बिनितो मुसोलिनीच्या ह*त्येची खबर लागली. त्याचवेळी त्याचा आत्मह*त्या करण्याचा विचार जवळजवळ पक्का झाला.

आत्मह*त्येच्या रात्री हि*टल*रने त्याचे शेवटचे जेवण घेतले. त्याच्याबरोबरच्या लोकांना जर्मनीला परत जायला सांगितले. जितके लोक त्याच्याबरोबर होते, प्रत्येकाला हि*टल*रने शांत आवाजात सांगितले “ मी आता स्वत:ला गो*ळी झाडून घेणार आहे”

त्यानंतर इव्हा ब्राऊन आणि हि*टल*रने स्वत:ला त्यांच्या रूममध्ये बंद करून घेतले. इव्हा ब्राऊन आणि हि*टल*र दोघांनीही जिभेखाली सायनाईडची गोळी ठेवली त्यांनतर हि*टल*रने स्वत:कडच्या पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडून आत्मह*त्या केली.

त्यांच्या मृत्युनंतर दोघांचीही शरीरे बंकरच्या बाहेर आणण्यात आली होती. हि*टल*रच्या शेवटच्या इच्छेनुसार दोघांचीही शरीरे पेट्रोल टाकून जाळण्यात आली. हि*टल*रची आणि त्याच्या जवळच्या लोकांची इच्छा होती की हि*टल*रचे शरीर देखील शत्रूच्या हातात पडू नये पण हि*टल*रचे बंकर उ*ध्वस्त करायला आलेल्या सोव्हिएत युनियनच्या लोकांना अर्धवट जळालेली बॉडी मिळाली होती.

तरीही याच्यानंतर हि*टल*र जिवंत असल्याच्या बातम्या अनेक वर्षे फिरत राहिल्या होत्या. त्यांनतर हि*टल*र आर्जेन्टिनामध्ये राहत असल्याच्या वावड्या देखील उठल्या होत्या पण अमेरिकेच्या FBI ने याचा तपास करून या बातम्यात काही तथ्य नसल्याचे म्हटले होते.

अशा रीतीने मृत्यनंतर देखील हि*टल*रच्या नावाभोवती चे गूढ आजदेखील कायम आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: adolf hitlerHitler
ShareTweet
Previous Post

जग इकडचं तिकडं झालं तरी चहा सोबतची ‘पार्ले-जी’ची जागा दुसरं कोणी घेऊ शकणार नाही

Next Post

युट्यूबच्या माध्यमातून भटकंती करणारा हा तरुण सध्या महाराष्ट्रातील लोकांच्या मनामध्ये घर का करतोय ?

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

युट्यूबच्या माध्यमातून भटकंती करणारा हा तरुण सध्या महाराष्ट्रातील लोकांच्या मनामध्ये घर का करतोय ?

लोथल - भारताचा ५००० वर्षांचा सांस्कृतिक वारसा एकाच ठिकाणी उलगडून दाखवणारं प्राचीन गाव

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.