The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लेहमन ब्रदर्सच्या या कल्पनेमुळेच आज टाइम्स स्क्वेअरला एवढा भाव आहे..!

by Heramb
15 November 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


एकेकाळी लेहमन ब्रदर्स ही अमेरिकेतील अग्रगण्य बँक आणि गुंतवणूकदार कंपनी होती. अमेरिकेतील बँकिंग विश्वात चौथ्या क्रमांकाची ही बँक. पण २००८ साली आलेल्या सबप्राइम मॉर्टगेज क्रायसिसमुळे लेहमन ब्रदर्सचं मोठं नुकसान झालं. आजवर आर्थिक संकटांत सापडलेल्या बँक्समध्ये आजही या बँकेचे पतन हे सर्वांत मोठे व्यावसायिक पतन मानले जाते.

२००८ साली जगभरात आलेल्या आर्थिक मंदीमुळे अनेक कंपन्यांचं नुकसान झालं, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यावेळी भारतात आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांचा प्रभाव वाढला होता. पण या मंदीच्या झटक्यामुळे तो प्रभाव काहीसा कमी झाला.

मॉर्टगेज सबप्राइम क्रायसिस नेमकं काय होतं? 

११ सप्टेंबर २००१ साली अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील दोन प्रमुख ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’च्या इमारतींवर दह*शत*वादी ह*ल्ले झाले. याचा काहीसा परिणाम अमेरिकेच्या आणि पर्यायाने जागतिक अर्थव्यवस्थेवरही झाला. याच काळात झालेल्या डॉट कॉम बबलमुळे देखील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता.

डॉट कॉम बबल म्हणजे १९९० च्या दशकात गुंतवणूकदारांनी इंटरनेट स्टार्टअप्समध्ये फायदा होईल या आशेने पैसे गुंतवले. प्रचंड प्रमाणत पैसा मिळत असल्याने अनेक स्टार्टअप्स मोठी किंमत मिळवण्याच्या रेसमध्ये होते. मिळालेला पैसे तंत्रज्ञानावर खर्च न करता मार्केटमध्ये आपला ‘ब्रँड’ कसा तयार होईल यावर लक्ष केंद्रित केले गेले. काही कंपन्यांनी तर उपलब्ध निधीपैकी ९०% निधी फक्त जाहिरातींवर खर्च केला होता.



१९९७ मध्ये अमेरिकन स्टॉक मार्केट नॅस्डॅकमध्ये विक्रमी भांडवलाचा प्रवाह सुरू झाला. १९९९ पर्यंत, सर्व गुंतवणुकीपैकी ३९% इंटरनेट कंपन्यांकडे जात होते. त्या वर्षी, सर्वाधिक ४५७ इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPOs) इंटरनेट कंपन्यांशी संबंधित होत्या, त्यानंतर २००० च्या पहिल्या तिमाहीत या आयपीओजची संख्या ९१ वर पोहोचली.

सगळा निधी जाहिरातींसारख्या इतर कारणांवर खर्च झाल्याने मूळ ऑपेरेशन्ससाठी कंपन्यांकडे निधीच राहिला नाही, मग या कंपन्या एकमेकांमध्ये मर्ज (विलीन) होऊ लागल्या. म्हणजे एखाद्या मोठ्या कंपनीने तुलनेने लहान कंपनीला विकत घेणे. पण जवळ जवळ सर्वच कंपन्यांची परिस्थिती एकसारखीच होती. त्यामुळे या मर्जरनेही (विलीनीकरण) काही फायदा होत नसे.

जानेवारी २००० मध्‍ये झालेले ‘एओएल टाइम वॉर्नर’चे अयशस्वी मर्जर हा मार्केटसाठी धोक्याचा इशारा होता, जे इतिहासातील सर्वात मोठे विलीनीकरण अयशस्वी ठरले. यामुळे अनेक गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागला आणि बऱ्याच इंटरनेट कंपन्यांचे नुकसान झाले. ज्या कंपन्या या ‘बबल’मधून वाचल्या त्या आजही टिकून आहेत – ॲमेझॉन, इबे, प्राइझलाईन, इत्यादी.

या सगळ्यातून सावरण्यासाठी अमेरिकेच्या केंद्रीय बँकेने अर्थात फेडरल रिजर्व्हने व्याजदर प्रचंड प्रमाणात कमी केले. फेडरल रिझर्व्हने जानेवारी २००१ मध्ये ६% असलेला फेडरल फंड रेट जून २००३ पर्यंत १ टक्क्यावर नेला. शिवाय फेडरल रिजर्व्हने प्रमाणित केलेले व्याजदर सर्व बँक्सवर बंधनकारक नसतात. हे दर फक्त प्रस्ताव म्हणून बँक्सकडे देण्यात येतात. परिणामी, यूएसमध्ये वेगाने आर्थिक भरभराट होऊ लागली. भरभराटीच्या अर्थव्यवस्थेमुळे घरांची मागणी वाढली. गृहनिर्माणात आलेल्या तेजीमुळे यूएसमध्ये घरांची विक्री प्रचंड प्रमाणात वाढली. त्यामुळे, आता बँका आणि इतर तारण कंपन्यांना नवीन खरेदीदार शोधण्यात अडचणी येऊ लागल्या. 

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

आता बँकांनी कर्ज घेण्यासाठी अपात्र असलेल्या लोकांनासुद्धा कर्ज देण्यास सुरूवात केली. म्हणजे ज्यांचा क्रेडिट स्कोअर कमी असेल किंवा ज्यांच्या बँकिंगची हिस्टरी कर्ज देण्यासारखी नसेल अशांनाही बँकांनी कर्ज देण्यास सुरुवात केली. खरंतर कमी क्रेडिट स्कोअर किंवा बँकिंग हिस्टरी चांगल्या नसणाऱ्या लोकांना कर्ज दिले जात नसे. पण आता वर दिलेल्या कारणांमुळे बँकांनी अशा लोकांना कर्ज द्यायला सुरुवात केली. अशा अपात्र कर्जांना सबप्राइम लोन्स म्हणतात.

पण यामुळे दूरगामी विपरीत परिणाम होऊ लागले. कालांतराने कर्जदार त्यांचे तारण भरू शकले नाहीत, बँका अचानक त्यांच्या ताळेबंदात कर्जाच्या तोट्याच्या जाळ्यांमध्ये अडकल्या. संपूर्ण देशात बेरोजगारी वाढल्याने, अनेक कर्जदार एकतर डीफॉल्ट झाले किंवा  किंवा त्यांनी कर्ज फोरक्लोज केले. फोरक्लोज म्हणजे बँका कर्जदाराकडून घर परत घेतात किंवा कर्जदार स्वतः असं करतात.

अर्थव्यवस्था मंदीत असल्यामुळे, बँका ज्या किंमतीत त्यांनी घरे विकली त्याच किमतीत त्यांची पुनर्विक्री करू शकत नव्हत्या. परिणामी, बँकांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला, ज्यामुळे कर्ज देणे अशक्य झाले आणि अर्थव्यवस्थेत कमी कर्ज उपलब्ध होऊ लागले. काही बँकांचे नुकसान इतके मोठे होते की ते व्यवसायातून बाहेर पडले किंवा इतर बँकांनी त्यांना खरेदी केले.

टाइम स्क्वेअरने लेहमन ब्रदर्सला कसेबसे वाचवले

या क्रायसिसमध्ये अडकलेल्या अनेक बँक्सपैकी एक बँक होती लेहमन ब्रदर्स. पण लेहमन ब्रदर्सचे काही इन्वेस्टर्स या क्रायसिसमधून कसेबसे वाचले. त्याचं कारण होतं या बँकने १९६१ साली केलेली एक गुंतवणूक. १९६१ साली, न्यूयॉर्क टाइम्स आणि एफबीआयसारख्या महत्त्वाच्या संस्थांची ज्याठिकाणी मुख्य कार्यालये होती ते न्यूयॉर्कमधील स्कायक्रॅपर विकण्याचे ठरले. हीच ती अमेरिकेतील प्रतिष्ठित वन टाइम स्क्वेअर इमारत.

लेहमन ब्रदर्स जे त्यावेळी एक मोठी गुंतवणूक कंपनी म्हणून प्रसिद्ध होती, त्यांनी २७.५ मिलियन डॉलर्समध्ये अर्थात सुमारे ३ करोड डॉलर्समध्ये हे स्कायक्रॅपर खरेदी केले. पण यामध्येही एक गफलत होती. इमारतीचा काही भाग एफबीआय फायरिंग प्रॅक्टिससाठी वापरत असे, तो त्यांनी अजूनही तसाच ठेवला होता. तो भाग अजूनही वापरात होता. त्यामुळे इमारतीतील कार्यालये भाड्याने देणे जवळजवळ अशक्य झाले.

त्यावेळी लेहमन ब्रदर्सने ‘आऊट ऑफ द बॉक्स’ विचार करून या इमारतीतून आर्थिक फायदा घेण्याचा प्रयत्न केला. जर आपल्याला इमारतीच्या आतील भाग भाड्याने देता येत नसेल तर आपण बाहेरील भाग भाड्याने देऊ शकतो हा तो ‘आऊट ऑफ द बॉक्स’ विचार होता. या इमारतीच्या प्राईम लोकेशनमुळे आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशास्त्रामुळे अनेक जणांचे लक्ष आपसूकच त्याच्याकडे जायचे. ही संधी हेरून लेहमन ब्रदर्सने संपूर्ण इमारतीचे २५ मजले अनेक होर्डिंग्समध्ये रूपांतर केले आणि इतर कंपन्यांना जाहिरातींची जागा भाड्याने देण्यास सुरुवात केली.

त्यांची ही संकल्पना यशस्वी झाली आणि त्यांनी केलेली २७.५ मिलियन डॉलर्स अर्थात सुमारे ३ करोड डॉलर्सची गुंतवणूक फळाला आली. त्यांनी दोन वर्षांत ४००% परतावा मिळवला होता. पुढे १९९७ साली लेहमन ब्रदर्सने आपली ही मालमत्ता मूळच्या जर्मनीच्या जेमस्टोन प्रायव्हेट लिमिटेड पार्टनरशिप या कंपनीला विकली. 

आजही टाइम्स स्क्वेअर बिल्डिंग जागतिक आकर्षणाचे केंद्र आहे, शिवाय त्याठिकाणी जाहिराती करण्यासाठी हजारो रुपये आकारले जातात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

वजन वाढायचं टेन्शन न घेता तुम्ही कितीही खाऊ शकता, ते शक्य झालंय या गोळीमुळं..!

Next Post

गोव्यात आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा होणारा हा सण तुम्हाला माहितीये का?

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

गोव्यात आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा होणारा हा सण तुम्हाला माहितीये का?

गाझावासीयांसाठी आयुष्याची ५० वर्षे दिली, पण ती मुस्लिम नव्हती, एवढीच तिची चूक..!

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.