The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

३६५ बायका, ८८ अपत्ये, ४४ रोल्स रॉयल्स आणि स्वतःची क्रिकेट टीम असलेला भारतीय राजा

by द पोस्टमन टीम
14 May 2025
in इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


स्वातंत्र्यपूर्व काळातील पतियाळा संस्थानचे संस्थानिक महाराजा भूपिंदर सिंह आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या बऱ्याच गोष्टींसाठी आजतागायत चर्चेचा विषय बनले होते. भूपिंदर सिंहांची ऐषोरामाची जीवनशैली, खेळावर असलेले विशेष प्रेम आणि प्राविण्य, एवढेच नाही तर, अगदी खाजगी आयुष्यातील घडामोडींमुळे देखील ते आजही कुतूहलाचा विषय आहेत.

संपूर्ण भारतात सर्वांत आधी स्वतःच्या मालकीचे खाजगी विमान खरेदी केलेली व्यक्ती म्हणजे महाराजा भूपिंदर सिंह.

बऱ्याचदा परदेश दौऱ्यांसाठीही या विमानाचा वापर केला जाई. या एका विमानासाठी पतियाळा येथे विशेष धावपट्टी देखील उभारण्यात आली होती. शौकीन जीवनशैली असलेले महाराजा हे जेव्हा परदेश दौऱ्यासाठी जात, तेव्हा आलिशान राजमहाल ते पूर्णपणे स्वतःसाठी आरक्षित करून ठेवत असत. त्यांच्या ठायी असलेल्या तब्बल ४४ रोल्स रॉयल कारपैकी २२ कार ते दररोज वापरात आणत.

भूपिंदर सिंहांच्या विलासी जीवनशैलीचे एक उदाहरण म्हणजे त्यांनी ‘कार्टर एस ए’ या त्या काळच्या जगविख्यात पर्शियन जवाहिऱ्याकडून बनवून घेतलेला बहुचर्चित पतियाळा नेकलेस, जो बनविण्यासाठी भारतातून मौल्यवान हिऱ्यांचे पेटारे त्यांनी परदेशी पाठविले होते. त्याबद्दल असे बोलले जाते की, तब्बल २.५ करोड डॉलर्स एवढी प्रचंड किंमत असलेला हा नेकलेस आजपर्यंतचा सर्वाधिक महागडा दागिना आहे.

१९२२ साली प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारतभेटीसाठी महाराजांनी शाही जेवणासाठी १४०० सोन्या-चांदीच्या थाळ्या तयार करून घेतल्या होत्या.

जर्मनीचा हुकूमशहा हि*टल*र याने महाराजा भूपिंदर सिंग यांना मैत्रीखातर मर्सिडीज मेबॅक ही लोकप्रिय कार भेट म्हणून दिली होती. 

भूपिंदर सिंह यांच्या एकूण १० पेक्षा जास्त महाराण्या व तब्बल ३०० हुन अधिक उपराण्या होत्या! एवढेच काय तर त्यांचे ८८ औरस अपत्य देखील होते. असे सगळे असले तरी भूपिंदर हा हेकेखोर, छळवादी, भ्रष्ट आणि मद्यपी महाराजा होता अशी टीकाही काही पुस्तकांत केलेली आढळते.

महाराजा भूपिंदर हे आपल्या वयाच्या नवव्या वर्षी राजगादीवर विराजमान झाले. १९२५ साली ‘लीग ऑफ नेशन्स’मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. ऐतिहासिक ठरलेल्या गोलमेज परिषदांना देखील भूपिंदर सिहांची हजेरी होती.

पटियाळाच्या खास वास्तुस्थापत्य शैलीत देखील महाराजांचे महत्त्वाचे योगदान होते. तेथील काली मंदिर, चेल महाल इत्यादी वास्तू याच खास शैलीत बांधण्यात आल्या आहेत.

भूपिंदर सिंहांचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचे खेळावर असलेले विशेष प्रेम. विशेषतः पोलो आणि क्रिकेट या दोन खेळांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेले होते. त्याकाळी जगातील सर्वाधिक पदकांच्या कमाईसाठी देखील ते नावाजलेले होते. पोलो आणि क्रिकेटच्या ‘पतियाळा ११’ आणि ‘पतियाळा टायगर्स’ या भारतातील सर्वोत्तम टीम भूपेंदर सिंहांच्याच होत्या.

पण, क्रिकेटसाठी ते बेताल उधळपट्टी करायचे असाही आरोप त्यांच्यावर केला जातो. बीसीसीआयच्या स्थापनेवेळी त्यांनी मोठी आर्थिक मदत केली होती, मुंबईतील स्टेडियमचा काही भाग खास त्यांच्या नावाने बनविण्यात आला होता. ब्रिटिश प्रशिक्षकांना सर्वप्रथम भारतात बोलावणारे महाराज म्हणून ते ओळखले जातात.

त्यांची स्वतःची क्रिकेट टीम होती. त्या टीमचे कर्णधारच ते होते. एवढेच नव्हे तर भूपिंदर सिंग हे मेलबर्न देशाच्या बाजूने देखील मैदानात उतरले होते. त्यांनी केलेल्या भरगच्चं आर्थिक मदतीमुळे त्यांना संघामध्ये महत्त्वाचे स्थान सहज मिळत गेले अशीही टीका भूपिंदर महाराजांवर केली जाते.

ऐशोआरामात आपले आयुष्य घालवणारा हा राजा चांगला होता की वाईट हे तर माहिती नाही पण त्याच्याबद्दल सतत काही ना काही चरमरीत खबरी येत असतात हे मात्र खरं!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 


ShareTweet
Previous Post

चार वर्षं लागली पण ही बाई अमेरिकेतून रशियातल्या तिच्या घरी चालत गेली

Next Post

असा माणूस जो काहीही, कितीही खायचा तरीही भुकेला असायचा

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

असा माणूस जो काहीही, कितीही खायचा तरीही भुकेला असायचा

या माणसाने आपण जिवंत आहोत हे सिद्ध करायला थेट पंतप्रधानांविरोधात निवडणूक लढवली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.