The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हस्तांदोलन करण्याची प्रथा नेमकी कधी आणि का रूढ झाली?

by द पोस्टमन टीम
21 August 2025
in मनोरंजन, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


जगभरात लोक एकमेकांना भेटतात तेव्हा हस्तांदोलन करतात. हस्तांदोलन करून एकमेकांचे स्वागत करण्याची आणि शुभेच्छा देण्याची हो युरोपियन पद्धत सध्या भारतातही बऱ्यापैकी रुजलेली असताना, कोरोना विषाणूच्या जगभरातील वाढत्या प्रादूर्भावाचा पार्श्वभूमीवर ही पद्धत लुप्त होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

हस्तांदोलनामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेता, हस्तांदोलनाऐवजी जगभरात भारताच्या पारंपरिक नमस्काराच्या पद्धतीचा अवलंब केला जात होता. तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांनी देखील हस्तांदोलनाच्या पध्दतीला फाटा देत नमस्कार करण्याचा भारतीय पद्धतीचा स्वीकार केला.

भारतात जरी नमस्कार आणि मुजऱ्याची परंपरा असली तरी जगभर अस्तित्वात असलेली ही हस्तांदोलनाची परंपरा देखील फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. तिचा उगम कसा झाला यासंदर्भात अनेक सिद्धांतं आहेत.

एका लोकप्रिय सिद्धांतानुसार हस्तांदोलन दोन शत्रूमधील वैमनस्य मिटल्याची खूण मानली जायची. जेव्हा दोन लोक उजव्या हाताने हस्तांदोलन करतात आणि त्यांना जोराने झटके देतात तेव्हा कुठे शस्त्र लपवले असेल तर ते शस्त्र तत्काळ गळून पडते. यामुळे हस्तांदोलनाच्या माध्यमातून समोरची व्यक्ती आपल्यावर ह*ल्ला करण्यासाठी ह*त्यार घेऊन तरी आली नाही ना याची पुष्टी झाल्यावरच शांतता चर्चा सुरू केली जात असे. दोन विरोधी दलातील हस्तांदोलन हे यामुळे शांततेचे आणि तहाचे प्रतीक मानले गेले आहे.



इतकंच नाही हस्तांदोलनाला अजून एका सिद्धांतानुसार प्रेम आणि बंधुत्वाची भावना बळकट असल्याचे लक्षण मानले जात होते.  इतिहासकारांच्या मते प्राचीन काळी कुठला करार झाल्यास अथवा कुठली नवीन युती झाल्यास हस्तांदोलन करून आपण एकरूप असल्याचे दर्शवले जात होते.

हस्तांदोलनाचा पहिला पुरावा इसवी सन पूर्व नवव्या शतकातील एका भिंतीवर कोरलेल्या शाळेच्या रुपात आढळून येतो. हे एक चित्र असून यात एसायरीयन राजा आणि बॅबिलोनियन राजा एकमेकांशी हस्तांदोलन करताना आढळून येत आहेत. महान इटालियन कवी होमरने आपल्या इलियड आणि ओडिसीसारख्या महान रचनांमध्ये देखील संकल्प आणि परस्पर विश्वास दर्शवण्यासाठी हस्तांदोलन करण्याचे प्रसंग रेखाटले आहेत.

इसवी सन पूर्व पाचव्या आणि चौथ्या शतकातील ग्रीक परंपरेतील विविध कलाकृतींमध्ये देखील हस्तांदोलनाचे उत्तम चित्रण करण्यात आले आहे. रोमन काळातील काही नाण्यांवर देखील हस्तांदोलनाचे चित्र स्पष्टपणे आढळून येते. रोमन काळात हस्तांदोलनाचा प्रकार जरा वेगळा होता, यात हस्तांदोलन करताना एकमेकांच्या भुजा पकडल्या जात होत्या. या माध्यमातून समोरील व्यक्तीकडे कुठलं ह*त्यार आहे की नाही याची चाचपणी केली जात होती.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

प्राचीन काळात हस्तांदोलन जरी वेगवेगळ्या कारणांसाठी केलं जात होतं, तरी त्याचा सामान्यपणे स्वागतासाठी वापर हा फार अलीकडे ३०० वर्षांपासून केला जातो आहे. १७ व्या शतकात युरोपीय देशातील लोकांना हॅट काढून एकमेकांना अभिवादन करण्यापेक्षा हस्तांदोलनाची पद्धत अधिक सोईची आणि उत्तम वाटल्यामुळे त्यांनी या पद्धतीचा अवलंब केला. १८ व्या शतकात यासंबंधी एक नियमावली देखील तयार करण्यात आली होती.

कोरोना महामारीच्या काळात हस्तांदोलनाची प्रथा लुप्त होण्याची शक्यता वर्तवली जात होती. याआधी १९२० साली जेव्हा महामारी आली होती, तेव्हा देखील अशीच शंका व्यक्त करण्यात आली होती. त्यावेळी काही देशात हस्तांदोलन टाळून भारतीय पद्धतीने हात जोडून स्वागत करण्याची परंपरा उपयोगात आणण्याचे आदेश तत्कालीन शासनांनी दिले होते.

२०१५ साली एका इस्पितळाने देखील ‘हँडशेक फ्री झोन’ तयार करून या मार्गाने पसरणाऱ्या संसर्गजन्य आजारांना पायबंद घालण्याचा प्रयत्न केला होता.

कोरोनामुळे ताळेबंद असलेल्या बहुतांश देशांनी आपली अर्थव्यवस्था पुनश्च पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यासाठी लॉकडाऊन उठवून नागरिकांवरील निर्बंध हटवले जात आहेत. बीबीसी या वृत्तवाहिनीनुसार काही काळाने जगात हस्तांदोलन करणारे आणि गळाभेट घेणारे यांचा एक गट आणि सोशल डिस्टंसींगचे पालन करून आपलं वेगळेपण जपणाऱ्या लोकांचा देखील एक गट तयार होईल. पण असे काही झालेले अद्याप दिसत नाही. 

काही वर्षांपासून हस्तांदोलनाला फाटा देत अमेरिकन तरुणाईत आपआपल्या मुठीची टक्कर करून स्वागत करण्याचा प्रकार वाढत होता, पण हा प्रकार देखील आता लोकप्रिय न होता हस्तांदोलनाप्रमाणे लुप्त होतो की काय अशी परिस्थिती आहे. 

कोरोनाच्या काळामध्ये जगभरात भारत, चीन आणि जपान या पौर्वात्य देशातील प्रचलित नमस्काराच्या परंपरेचे स्वागत केले जात होते. गळाभेट आणि चुंबन यासारख्या गोष्टी तर अशा महामारीमुळे सार्वजनिक ठिकाणी चालणारच नव्हत्या. 


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

काय असते व्हर्चुअल रॅली? कसं केलं जातं नियोजन?

Next Post

अमेरिकेत या १४ वर्षीय कृष्णवर्णीय मुलाला गुन्ह्याच्या संशयावरून मृत्युदंडाची शिक्षा दिली होती

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

अमेरिकेत या १४ वर्षीय कृष्णवर्णीय मुलाला गुन्ह्याच्या संशयावरून मृत्युदंडाची शिक्षा दिली होती

मराठवाड्याच्या धुळीत अत्रे साहेबांनी दिलेला वसा पुलंनी आयुष्यभर टाकला नाही

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.