The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इजिप्तच्या या राणीच्या प्रेमात रोमन सम्राटाने आपलं साम्राज्य धुळीस मिळवलं होतं

by द पोस्टमन टीम
30 August 2025
in इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


इजिप्तची राणी क्लिओपात्राला जगात आजवरची सर्वात सुंदर स्त्री मानले जाते. आजपर्यंत या राणीच्या महालात कोणालाच प्रवेश नव्हता, यामुळे या राणीच्या इतिहासाबद्दल आणि सुंदरतेविषयी लोकांचा मनात संभ्रम होते. आता तब्बल २००० वर्षांनी या महालाचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. काही पुरातत्व संशोधकांना अलेक्झांड्रिया शहराजवळ काही जुने नाणी आढळली होती. यावरून त्यांनी राणीच्या मकबऱ्याचा शोध सुरु केला.

इजिप्तच्या पुरातत्व संशोधक कॅथरीन मार्टिनेज यांना असे वाटते की लवकरच त्या क्लिओपात्राचा हरवलेला मकबरा शोधून काढतील. टॅपोसिरिस मॅग्ना मंदिर या मंदिराच्या जवळ त्यांना सापडलेल्या क्लिओपात्राच्या नाण्यांमुळे त्यांना जवळच तिचा मकबरा असण्याची शक्यता वाटतेय.

उत्खननात सापडलेल्या नाण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या नाण्यांवर क्लिओपात्राचा चेहरा अंकित केलेला आढळून आला आहे. या चेहऱ्याच्या दुसऱ्या बाजूला ग्रीक भाषेत क्लिओपात्रा असे कोरण्यात आले आहे. हे नाणे सापडल्याने जगातील सर्वात सुंदर स्त्रीचा चेहरा लवकरच जगासमोर आणण्यात यश मिळणार आहे असे दिसते.

पुरातत्व संशोधक डॉ. ग्लेन गॉडेन्हो यांनी विश्वास व्यक्त केला आहे की या प्राचीन नाण्यांमुळे क्लिओपात्राच्या आजवर रहस्यमय असलेल्या अस्तित्वाला मान्यता मिळते आहे. ज्याप्रकारे नाणे आढळून आले आहेत, त्याच प्रकारे तिचा एखादा मकबरा देखील आसपास जमिनीत गाडला गेलेला आहे. या भागात उत्खनन करून लवकरात लवकर हा मकबरा बाहेर काढून त्यातील क्लिओपात्राच्या थडग्याचा शोध घेण्यात येणार आहे.

या मकबऱ्याच्या शोधाने आजवर कथांमधून जगातील  सुंदर स्त्री मानण्यात आलेली क्लिओपात्रा  वास्तवात किती सुंदर होती, हे जगासमोर येणार आहे. असं म्हणतात की राणी तितकी सुंदर नव्हती, पण ती त्या काळात वापरत असलेल्या सौंदर्य प्रसाधनांमुळे सुंदर दिसत होती. त्या काळात ती कुठले सौंदर्य प्रसाधन वापरत असावी, याची आपण कल्पना करू शकत नाही.



एका अख्यायिकेनुसार क्लिओपात्रा ही रोज मादी गाढवाच्या दुधाने अंघोळ करायची, यामुळे तिच्या शरीरावर वय वाढण्याचे कुठलेच चिन्ह दिसत नव्हते. तिच्या केसांना आणि शरीराला अत्तर लावायला तिच्या दासी रात्रंदिवस काम करायच्या. हे अत्तर खास फुल आणि वनौषधींच्या मदतीने तयार केले जात होते.

ही राणी जितकी सुंदर होती, तितकी बुद्धीने चाणाक्ष देखील होती. तिच्या बुद्धीचा पैलू तिच्या सौंदर्याच्या चर्चेमुळे दुर्लक्षित राहिला आहे. ती फार बुद्धिमान व बहुभाषिक होती. एका रिपोर्टनुसार क्लिओपात्राला १२ हून अधिक भाषांचे ज्ञान होते.

या राणीच्या सौंदर्याचे दोन दिवाने होते. पहिला होता ज्युलियस सीझर आणि दुसरा होता मार्क अँथनी. मार्क अँथनीशी या राणीने लग्न केलं होतं. रोमन जनरल मार्क अँथनी हा एक शूर सेनानी आणि कुशाग्र बुद्धीचा माणूस होता. त्याची आणि क्लिओपात्राची जोडी काही खास कारणांमुळे खूप चांगल्याप्रकारे मेळ खायची.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

दोघांनाही दारूचे वेड होते. ते इतकेदारू प्रेमी होते की यांनी बेवड्यांचा ‘Inimitable Livers’ नावाचा क्लब स्थापन केला होता. आपल्या काही वफादार साथीदारांना घेऊन दोघेही कित्येक दिवस दारू पित बसायचे. त्यावेळी क्लिओपात्रा वेष बदलून शहरात फिरायची.

क्लिओपात्राच्या रहस्यमय मृत्यूबद्दलचे गूढ मात्र अजूनही कायम आहे. काही इतिहासकार मानतात की साप चावल्याने तिचा मृत्यू झाला. काही म्हणतात तिच्यावर विषप्रयोग करण्यात आला. ती स्वत: सोबत खूप सारे कंगवे घेऊन फिरायची, या कंगव्यामुळे तिच्यावर विषप्रयोग करण्यात आला असंही काही लोकांचं म्हणणं आहे.

क्लिओपात्रावर हॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. १९६३ साली आलेल्या क्लिओपात्रा नावाच्या चित्रपटाने मोठे यश कमावले. हा त्यावेळचा सर्वाधिक खर्च करुन तयार करण्यात आलेला चित्रपट होता. यातील बहुतांश खर्च क्लिओपात्राची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या कपड्यांवर करण्यात आला होता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

बोन्साय : लहान-लहान आकाराची झाडं लावण्याची एक जपानी कला

Next Post

भूल न देता शस्त्रक्रिया करताना बघण्यासाठी लोक तिकीट काढून गर्दी करायचे!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

भूल न देता शस्त्रक्रिया करताना बघण्यासाठी लोक तिकीट काढून गर्दी करायचे!

मुस्लिम बहुल इंडोनेशियात उभं राहतंय हिंदू विद्यापीठ !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.