The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युरोपातून आलेला पाव आज आपल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनलाय

by द पोस्टमन टीम
21 June 2025
in ब्लॉग, भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


आज जिथे पाव खाल्ला जात नाही असा एकही देश नाही. देशोदेशीच्या खाद्यसंस्कृतीमध्ये पावाला महत्त्वाचं स्थान आहे. युरोप, अमेरिका, आफ्रिका सर्वच खंडांत, सर्वच देशांत पाव आवडीने खाल्ला जातो.

पाव हा कर्बोदकांचा उत्तम स्त्रोत मानला जातो. शिवाय याचा आकार लहान असल्यामुळे अनेक वर्षापासून लोक प्रवासात शिदोरी म्हणून बांधून नेतात. सध्या एक संशोधन याबाबत केले गेले की पाव इतिहासात किती जुना आहे तेव्हा अगदी ३० हजार वर्षांपूर्वीसुद्धा पाव अस्तित्वात असल्याचे पुरावे मिळालेले आहेत.

अगदी प्राचीनकाळी मानव गुहेत राहत असे आणि प्राण्यांची शिकार करून जगत असे, पण जेव्हा अन्नधान्य आणि शेतीचा शोध लागला तेव्हा हळूहळू मानव मांसभक्षण सोडून शाकाहारी पदार्थाकडे वळला.

धान्याला बारीक करून त्याचे पीठ बनवून आणि त्या पिठाला पाण्यात कालवून त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवण्याची सुरुवात ही संशोधक आजच्या आधुनिक पद्धतीच्या स्वयंपाकाची सुरुवात मानतात.



बायबलमध्ये बेखमीरच्या पावाचा उल्लेख सापडतो. ज्यू लोकांचा सन योम किप्पुर यादिवशी देवाला प्रसाद म्हणून खमीर म्हणजे यीस्ट नसलेला नसलेला फक्त गव्हाच्या पिठापासून बनवलेला बेखमीर पाव बनवला जावा असे बायबलच्या जुन्या करारात उल्लेख सापडतात.

अर्थात हा सपाट ब्रेड म्हणजे इजिप्त, इस्त्राईल आणि अरब संस्कृतीत मिळणारा पिटा ब्रेड असावा असा अंदाज आहे कारण त्यावेळी पावाला फुगवण्याची प्रक्रिया माहित नव्हती. त्यामुळे अरब संस्कृतीत आजही आपलं स्थान राखून असलेला हा ब्रेड आपल्या भाकरीसारखा सपाट बनवला जात असे. अर्थात भाकरीपेक्षा हा अत्यंत जाड आणि खायला बराच जड लागतो. आजही अरेबिक देशात हा जुन्या पद्धतीचा सपाट ब्रेड मिळतो.

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

अर्थात पाव बनवायला नक्की कितव्या शतकात कोणत्या कालावधीत सुरुवात झाली हे सांगता येणं कठीण आहे. मात्र माणूस अग्नीच्या सहाय्याने स्वयंपाक बनवायला शिकला तसेच तो मांस ज्याप्रकारे भाजत असे तसेच धान्याचे गोळे भिजवून तसे गोळे भाजायला शिकला आणि त्यातून पुढे रोटी अथवा पाव बनवण्याच्या पद्धती विकसित झाल्या असाव्यात.

पूर्वी जो पातळ आणि साधा पाव बनवला जात असे त्यापासून आज आपल्याला मार्केट मध्ये जो सॉफ्ट, फ्लपी, मउसर, चौकोनी आकाराचा ब्रेड मिळतो त्याची उत्क्रांती कशी झाली हा इतिहास मौजेचा आहे.

पाव फुगून तो सॉफ्ट बनण्यासाठी त्यावर किण्वन प्रक्रिया व्हावी लागते त्यासाठी यीस्ट नावाचा एक पदार्थ वापरला जातो. हे यीस्ट दाण्यांच्या स्वरूपात मिळते ते पाव करताना दुधामध्ये अगोदर दुध गरम करून त्यात टाकतात आणि ते दुध मिसळून धान्याचा गोळा मळला जातो.

यीस्टमुळे पिठातील कर्बोदकांचे किण्वन होऊन शर्करेचे रूपांतर कार्बनडायॉक्साईड (CO2) व इथॅनॉलमध्ये होते. CO2 मुळे पीठ फुगते जवळजवळ त्याच्या आकारमानाच्या दुप्पट होते व असा पाव भाजल्यानंतर तो जाळीदार होतो.

हे यीस्ट इजिप्तमध्ये अगदी ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकातसुद्धा बनवले जात असे. या यीस्टच्या ऐवजी बियरच्या फेसाचा पर्याय अनेक ठिकाणी वापरला जात असे.

आजकाल बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, ताक किंवा इतर आम्लयुक्त पदार्थांचा वापर पाव बनवण्याच्या पद्धतीत केला जातो जेणेकरून पीठ आम्बण्याची प्रक्रिया चांगली व्हावी.

पूर्वी पाव बनवण्यासाठी जी धान्ये वापरली जात ती भरडलेली धान्ये असत. आज जो पांढराशुभ्र मैद्याचा पाव तुम्हाला दिसतो पूर्वीच्या काळी तसा नसायचा. चक्कीवर, जात्यामध्ये किंवा घरातील साध्या गिरणीवर जे दळण दळले जात असे त्याचे पीठ जाडेभरडे होत असे. त्यात धान्यांचे अर्धवट दाणेही लागत असत. त्यामुळे अशा धान्यांमध्ये यीस्ट घालून जो पाव बनत असे तो जाडाभरडा आणि दिसायला काळपट दिसत असे.

पुढेपुढे यंत्रावर चालणाऱ्या गिरण्यांचा शोध लागला, मोठ्या प्रमाणावर धान्ये दळून त्यांचे विलगीकरण करून धान्यांवर प्रक्रिया करण्याचे उद्योग निर्माण झाले. धान्य अगदी बारीक दळून त्याचे पीठ पाडणे, त्यातील जर्म्स नष्ट करणे, धान्याचे पीठ ब्लीच करून पांढरेशुभ्र बनवणे या प्रक्रिया यंत्राद्वारे केल्या जाऊ लागल्या.

पूर्वी घरोघरी जो पाव बनत असे त्याचे व्यापारीकरण केले गेले. युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीच्या काळात तर जागोजागी पाव विक्रीची दुकाने उघडली गेली.

भारतातून मसाल्याचे पदार्थ युरोपात जाईपर्यंत युरोपमधील लोकांचे पाव आणि बीअर हेच प्रमुख अन्न राहिलेले आहे. आता पाव आणि ब्रेड हे एकाच शब्द असले तरी त्याचे स्वरूप भिन्न आहे. पावाचे स्लाईस करून जेव्हा बाजारात आणला गेला तेव्हा त्याचा ब्रेड बनला. या स्लाईस ब्रेडची सुरुवात साधारणपणे १९२० साली इंग्लंडमध्ये झाली. त्यानंतर ब्रेड स्लाईसर मशीनचे उत्पादन प्रायोगिक तत्वावर सुरु केले गेले. स्लाईस केलेला ब्रेड अल्पावधीत अत्यंत लोकप्रिय बनला.

गोवा आणि मुंबईत या ब्रिटीश लोकांमुळे पाव संस्कृती उदयाला आली जी आता या प्रदेशाच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग बनली आहे.

पावाचे विविध प्रकार आज आपल्याकडे लोकप्रिय आहेत. त्यात आपल्या बटाटेवड्याबरोबर कम्बाईन करून दिला जाणारा वडापाव हा पदार्थ अत्यंत अव्वल मानला जातो, ब्रेड बटर, ब्रेड बटर टोस्ट, खारी, पॅटीस, सँडविच, ब्रेड ओम्लेट असे अनेक पदार्थ भारत देशाच्या गल्लोगल्ली मिळतात.

भले पाव आपल्याकडे जन्माला आला नसेल पण आज पाव खाण्यात आपले लोक अजिबात मागे नाहीत.

आता आरोग्यदृष्ट्या पाहायला गेलं तर हा पाव आरोग्याला तसा चांगला मानला जातच नाही. लठ्ठपणा, डायबेटीस, पीसीओडी यासारखे विकार पाव सतत खाल्ल्यामुळे होतात असा मेडिकल सायन्सचा निष्कर्ष आहे त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर पाव खाऊ नका असे सल्ले डॉक्टर लोक देतात.

अर्थात तरीही जिभेचे चोचले पुरवण्यासाठी लोक ब्रेडचा वापर आपल्या आहारात आवर्जून करतात. बाकी गरीबांचे तर हे पोटभरीचे अन्न आहे. एक डबल पाव ऑमलेट खाऊन गरीब मजूर कामावर निघाला की त्याला १० तासाच्या भुकेची निश्चिती असते. त्यामुळे बऱ्याच गरीब वस्त्यांत वडापाव, सँडविच, ब्रेड ओमलेट, खिमा पाव अशा हातगाड्या लावलेल्या दिसून येतात.

अशारीतीने पाव हा पदार्थ आता जगातील अनेक देशाच्या खाद्य जीवनाचा एक महत्त्वपूर्ण अंग बनलेला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

गोर्टा कांड – हैदराबाद मुक्तीसंग्रामातील जालियानवाला बाग

Next Post

हा जापानी सैनिक दुसरं महायु*द्ध संपल्यानंतरसुद्धा २९ वर्षे लढत होता

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
भटकंती

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

8 September 2025
इतिहास

तुर्कस्तानातील हजारो वर्षांपूर्वीची ही भूमिगत शहरे अविश्वसनीय आहेत..!

8 September 2025
भटकंती

१० हजार वर्षांपूर्वीच्या या अंडरवॉटर पिरॅमिड्सचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही..!

16 October 2025
विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
Next Post

हा जापानी सैनिक दुसरं महायु*द्ध संपल्यानंतरसुद्धा २९ वर्षे लढत होता

भारताची ओळख असलेल्या लंगोटने सुपरमॅनलासुद्धा भुरळ घातलीये

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.