The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या शास्त्रज्ञाने अवघ्या २५व्या वर्षी नोबेल पारितोषिक पटकावलं होतं

by द पोस्टमन टीम
2 May 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


दंगा, मस्ती, खेळ, खोड्या, करामती अशा सगळ्या मौजमजेच्या गोष्टी लहानपणी जितक्या उत्स्फूर्ततेने आणि निरागसपणे केल्या जातात तितक्या नंतर होत नाहीत. खरे तर कुठल्याही लहान मुलाला पहिले तर एकच गोष्ट लक्षात येते की त्यांना खेळ, मस्ती आणि हसत खेळत नवनव्या गोष्टी शिकणे यांचीच फार आवड असते. नवनव्या गोष्टींबद्दलचे त्यांचे कुतूहल जोपर्यंत शमत नाही तोपर्यंत शांत बसतील ती मुलं कसली?

असाच एक मुलगा होता ज्याला लहानपणीच शरीरातील अवयवांबद्दल कुतूहल निर्माण झाले. त्याला शरीराच्या आतील भागची रचना जाणून घ्यायची होती. डॉक्टरांना शरीरात कुठे, काय बिघाड झाला आहे हे कसे बरे समजत असेल असे अनेक प्रश्न त्याच्या मनात उच्छाद मांडत असत. शेवटी आपल्या मनातील या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यात हा मुलगा यशस्वी झालाच. तुम्हाला वाटेल मोठा झाल्यावर तोही डॉक्टर झाला असेल पण, नाही! तो एक प्रख्यात शास्त्रज्ञ बनला.

त्याच्या संशोधनामुळे भौतिकशास्त्र आणि शरीरशास्त्रातही बहुमोल भर पडली. मानवी जीवनासाठी उपकारक ठरलेल्या या संशोधानासाठी त्याला अवघ्या २५व्या वर्षीच नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते.

कोण होता हा मुलगा? त्याचे नाव होते विलियम लॉरेन्स ब्रॅग. लॉरेन्स ब्रॅगचे वडील हेन्री ब्रॅग हे देखील १८व्या शतकातील एक प्रसिद्ध गणितज्ञ आणि भौतिक शास्त्रज्ञ होते. त्यांनी रेडीओ ऍक्टिविटीबाबत भरपूर संशोधन केले होते. देशातील सर्व विद्यापीठातील विद्यार्थी त्यांच्या शोधनिबंधांचा अभ्यास करत होते. इंग्लंड येथे जन्मलेले हेन्री ब्रॅग यांना देशभर चांगलीच ख्याती मिळाली होती.

हेन्रींनी आपल्या घराच्या मागच्याच बाजूला आपली प्रयोगशाळा उभारली होती. या प्रयोगशाळेच्या बाहेर उभे राहून लॉरेन्स आपल्या वडिलांचे प्रयोग बघत असत. परंतु, एक्स-रे किरणांच्या घातक परिणामांपासून मुलांना वाचवण्यासाठी त्यांनी प्रयोगशाळेत येण्यास मज्जाव केला होता. म्हणून लॉरेन्स खिडकीत उभे राहून लपूनछपून त्यांचे प्रयोग पाहत होता.



काही करून त्याला प्रयोगशाळेत जायचेच होते. म्हणून एकदा पाळण्यावर खेळत असताना तो मुद्दामहून खाली पडला. वडिलांनी त्याला तातडीने प्रयोगशाळेत नेले आणि एक्सरे काढून पाहिले की कुठे गंभीर दुखापत झालीये का. लॉरेन्सचा पाय फॅक्चर झाला होता. तरीही त्याला प्रयोगशाळेत गेल्याचाच जास्त आनंद होता. एक्स-रे करताना तो बारकाईने सगळ्या गोष्टींच्या नोंदी करत होता.

१८९५ सालीच एक्स-रेचा शोध लागला होता. लॉरेन्सचे वडील हेन्री यांनी रेडीओ ॲक्टिव्हिटी, ध्वनी, प्रकाशाचा वेग आणि क्रिस्टल सायन्स एकाच वेळी अशा अनेक क्षेत्रात त्यांचे संशोधन सुरु ठेवले होते. परंतु अजूनही काही ठोस आणि नवी माहिती त्यांच्या हाती लागली नव्हती.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

आपले वडील नेहमीच या प्रकाश किरणांवरती संशोधन करत असतात, हे लॉरेन्सने पाहिले होते. त्यांच्याकडे जी एक्स-रे मशीन होती त्याच्याबद्दल तर लॉरेन्सला प्रचंड उत्सुकता होती. या उत्सुकतेपोटी त्याचा वैज्ञानिक प्रवास सुरु झाला. शाळेत असल्यापासूनच लॉरेन्स गणित आणि भौतिकशास्त्रात रस घेत होता. या वयात इतर मुले चित्रकला, गायन, खेळ, नृत्य अशा वेगवेगळ्या गोष्टींत रस घेत होती तिथे लॉरेन्सला भौतिकशास्त्रातील नियम समजून घ्यायचे होते. यासाठी तो कधीकधी पुढच्या वर्गातील पुस्तकेही वाचून ती समजून घेत असे.

हेन्रींना तर आपल्या मुलाच्या या विलक्षण प्रतिभेचे नेहमीच कौतुक होते. लॉरेन्स पुढच्या वर्गातील पुस्तकांचा अभ्यास करत आहे, यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. पुढच्या वर्गातील भौतिकशास्त्राची सूत्रेही तो अगदी सहजतेने सोडवत.

लॉरेन्सची ही प्रतिभा ओळखून त्यांनी लॉरेन्सला प्रसिद्ध क्वीन्स स्कूलमध्ये प्रवेश घेऊन दिला. या शाळेत फक्त विज्ञान, गणित आणि इतर विषयातील कठीण स्तरावरील अभ्यासक्रम समजून घेऊ शकणाऱ्या मुलांनाच प्रवेश दिला जात असे.

लॉरेन्सच्या प्रतिभेला अगदी योग्य न्याय मिळाला होता. या शाळेत आल्यावर त्याने आपली बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व सिध्द करून दाखवले. अभ्यासाच्या बाबतीत तो नेहमीच पुढे असे. भौतिकशास्त्र आणि गणित या विषयातील त्याची कामगिरी तर खूपच उल्लेखनीय होती. शालेय शिक्षण संपल्यानंतर पुढील शिक्षणासाठी लॉरेन्सने एडिलेड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. या विद्यापीठात प्रवेश घेतला तेव्हा लॉरेन्सचे वय १५ वर्षे होते. या युनिव्हर्सिटीतून पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी फक्त चार वर्षे लागत असत. पण, लॉरेन्सने केवळ दोनच वर्षात ही पदवी पूर्ण केली.

तो आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलांसोबत अभ्यास करत होता. त्यामुळे वर्गमित्र वगैरे फारसे नव्हतेच. याचा त्याला फायदाच झाला. कारण, अभ्यासाव्यतिरिक्त कधीही त्याचे लक्ष इकडे-तिकडे भरकटले नाही. म्हणूनच त्याला दोनच वर्षात पदवी संपादन करणे शक्य झाले. हेन्रींच्या भौतिकशास्त्रातील योगदानाची दखल घेतली जात असतानाच लॉरेन्स आपल्या शैक्षणिक कारकिर्दीची एकेक उंची सर करत होता.

इंग्लंडच्या लीड्समध्ये त्याला कॅव्हेंडीश प्रोफेसर पदाची नोकरी लागली. त्याच्या वडिलांना हेन्री ब्रॅगना तर याचा खूपच अभिमान वाटत होता. लॉरेन्सच्या पुढच्या अभ्यासासाठी त्याला कॅम्ब्रिज विद्यापीठाकडून स्कॉलरशिप मिळाली होती.

लॉरेन्सला गणित विषयाच्या अभ्यासासाठी स्कॉलरशिप मिळाली होती. पंरतु त्याला तर भौतिकशास्त्राचा अभ्यास करायचा होता. त्याच्या शिक्षकांना मात्र असे वाटत होते की गणित सोडल्यास तो इतर कुठल्याही विषयात फारशी प्रगती करू शकणार नाही. परंतु त्याच्या वडिलांनी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. त्यांनी लॉरेन्सला त्याच्या आवडत्या विषयात अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिले. लॉरेन्सनेही नंतर विद्यापीठातून टॉप केले आणि आपल्या वडिलांचा विश्वास सार्थ ठरवला.

शिक्षण पूर्ण झाल्यावर लॉरेन्सने आपल्या वडिलांच्याच प्रयोगशाळेत काम सुरु केले. बाप-लेक दिवसदिवस भौतिकशास्त्रावर गप्पा मारत. ते दोघे मिळून नवनवे प्रयोग करत आणि दोघांनाही अपयश येत असे. हेन्री नेहमीप्रमाणेच रेडीओ ॲक्टिव्हिटी आणि प्रकाश यावर काम करत होता. लॉरेन्स त्यांना या कामात मदत करत होता. वडिलांना सहाय्य करता करता त्याला देखील या विषयात रस वाटू लागला आणि हळूहळू त्याचा रस वाढू लागला.

इकडे हे बाप-लेक आपल्या संशोधनात व्यस्त असताना दुसरीकडे इतर वैज्ञानिक देखील ‘एक्स-रे’वर काम करत होते. १९१२ मध्ये जर्मन वैज्ञानिक मॅक्स वॉन लाऊ याने सांगितले की एक्स-रे हे एक प्रकारचे तरंग आहेत. हे तरंग क्रिस्टलमधून बाहेर पडतात.

याच सूत्राचा धागा पकडून लॉरेन्सने आपले संशोधन सुरु ठेवले आणि पुढच्या काही दिवसांत त्याने जगाला ब्रॅग-लॉ-ऑफ-एक्सरे हा नवा नियम दिला. कोणत्याही दोन तरंगाच्या मध्ये जेव्हा रिकामी जागा नसते तेव्हाच प्रकाश किरणांचे विचलन होते, असा हा नियम सांगतो.

एक्स-रे आणि क्रिस्टलमधील अणूच्या रचनेसंबंधीची आत्तापर्यंत दिली गेलेली माहिती चुकीची असल्याचे ब्रॅगच्या लक्षात आले. त्याने हे समजावून सांगितले की क्रिस्टल आणि अणू यांच्यात पुरेसे योग्य अंतर असेल तर हा अणू आणि त्याची संरचना मानवी डोळ्यांना दिसू शकते.

क्रिस्टल आणि अणू यांच्यातील योग्य अंतर मोजता यावे यासाठी त्यांनी एक्सरे-स्पेक्ट्रोमीटरचा शोध लावला. या संशोधानामुळे अणूची रचना समजून घेण्यास मदत झाली. अणूच्या रचनेचे 3-D मॉडेल बनवणेही शक्य झाले. याच संशोधनासाठी त्याला १९१५ मध्ये भौतिक शास्त्रातील नोबेलने सन्मानित करण्यात आले. हेन्री ब्रॅग आणि लॉरेन्स ब्रॅग या दोघांत हा पुरस्कार विभागून दिला गेला. शेवटी लॉरेन्सच्या प्रयोगात हेन्रीचेही योगदान मोठे होते. सर्वात कमी वयात नोबेल मिळवणारा हा पहिला शास्त्रज्ञ.

त्यानंतर १९१४ मध्ये पहिल्या महायु*द्धास तोंड फुटले. तेव्हा तो स्वतः यु*द्धभूमीवरही हजर झाला.

काही वर्षानंतर लॉरेन्सने एक्स-रे क्रिस्टलोग्रफी बनवली. याच्या सहाय्याने क्रिस्टलमधील अणू आणि त्यातील अणूंची संरचना यांचा अभ्यास करणे आणखी सुलभ झाले. फक्त विज्ञानातच नाही तर वेळ पडल्यास तो देशासाठी देखील लढण्यास सज्ज झाला. कामावरील अढळ निष्ठा हेच लॉरेन्सच्या यशाचे खरे गमक होते!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

राईट बंधूंनी तब्बल १४ वर्षं विमान निर्मितीसाठी झोकून दिलं होतं

Next Post

ऑपरेशन गुलमर्गने कश्मीर हडपण्याचा पाकिस्तानचा डाव त्याला चांगलाच महागात पडला

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

ऑपरेशन गुलमर्गने कश्मीर हडपण्याचा पाकिस्तानचा डाव त्याला चांगलाच महागात पडला

१६० वर्षांपूर्वी झालेल्या संथाल विद्रोहाने आपल्याला आपल्या मातीसाठी लढायला शिकवलं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.